सिंगापुरातील खाद्यसंस्कृती (भाग-पहिला)
मला इथे सिंगापुरमधे येऊन तब्बल २० वर्ष पुर्ण झालीत. ३० वर्षाचा पुर्ण होता होता इथे आलो तो इथे इतके वर्ष होतील असे तेंव्हा जराही वाटले नव्हते. अगदी माझ्या पहिल्याच दिवशी मी भुकेजल्या पोटी अन्न शोधायला बाहेर पडलो आणि समोर दोन मोठी कावसे उलटी टांगलेली होती आणि त्यांच्या तोंडातून काळेकुट्ट लाल लाल भडक रक्त वाहत होते.
मी ते दृश्य बघून खंतावलो. त्यापुढे दोन पाऊले टाकली तर .. इथे माकडाच्या मेंदुचे सुप मिळेल अशी पाटी होती. त्याही पुढे गेलो तर सी-फुड ह्या नावाने परिचित असलेले अनेक जलचर प्राणी मला तिथे भेटले. मी जिथे उभा होता.. अर्थात गोल गोल फिरत होतो त्याला फुडकोर्ट असे नाव होते. सिगांपुरमधे आपल्या भारतातल्यासारखे हॉटेल्स, रेस्टॉरंट ह्यांच्यापेक्षा फुडकोर्ट च जास्त आहेत. आणि, सॅड टु से पण बहुतेक ठिकाणी खायला प्यायला सीफुडच जास्त प्रमाणात मिळते. अशा ह्या देशात तब्बल २० वर्ष राहूनही माझा शाकाहार भ्रष्ट झाला नाही ह्याला कारण म्हणजे मास चाखायची माझी कधीच च च हिम्मत झालेली नाही. माझं आणि मासाहारचं प्रचंड मोठ्ठ द्वंद्व आहे. जे कधीच मिटणार नाही! आमच्यात एक फार मोठी दरी होती, असेल आणि राहील.
माझ्या बालपणी मी आणि माझी बहिण आम्ही एकमेकांचे कान दोन्ही हाताचा डायगोनल करुन धरत .. च्याऊ म्याऊ घुगर्या खाऊ. पाळण्या खालच्या घुगर्या खाऊ असे काहीतरी म्हणत नंतर खूप जोरात हसायचो. तो खेळच तसा फार फनी होता. माझ्या वाट्याला घुगर्या (अख्ख्या तुरीच्या दाण्याची उसळ म्हणजे घुगर्या) आल्या नाहीत पण च्याऊ म्याऊ जेवण रोज बघायला मिळतं आणि रोज मला प्रश्न (उत्तर अपेक्षित नसलेला प्रश्न) पडतो की ही लोक हे अन्न कसे खातात!!! म्हणजे मला कुणाच्याही संस्कृतीचा अवमान करायचा नाहीये पण तरीही जे काही चालत फिरत सरपटत ते सगळ चिनी लोकांच्या पोटात जातचं जातं! शाकाहारी अन्नाचा जराही गंध नसलेली रेस म्हणजे चिनी लोक. इथे जे मॉक मीट मिळते ते शाकाहारी असते पण ते बघून असे वाटते की हे मॉक मीट नसून खरेखुरे मास आहे. ह्या लोकांच्या पोटात मॉकमीट मधून भाज्या वगैरे जात असतील पण केवढी ही मानसिकता! (आणि त्यांना दोष देता देता मग मलाही माझे हसायला येते की ते अन्न शाकाहारी दिसत नाही म्हणून मी मॉक मीट ग्रहण करत नाही. शेवटी मग मी आणि ते सारखेच की!)
माझे अनेक मित्र आपण शाकाहारी आहोत म्हणून स्वतःला कमी लेखत लेखत शेवटी मासाहारी बनली. एक मुलगी मेघना तिचे नाव. एके दिवशी मला भेटली. चांगली शाकाहारी होती. आणि म्हणाली आज मी परागला मास खाऊनच दाखवते. खरच तिने डक राईस मागवला आणि तो पुर्ण खाऊन दाखवला. आपण मास खाल्ले म्हणून तिच्या चेहर्यावर एक विजयी भाव उमटला होता. आणि मी ह्या कोडयात सापडलो होतो की नक्की काय बाजी मारली हिने ही हिला मास खाल्ले म्हणून इतका आनंद होतो आहे.
सिंगापुरमधे चिनी, मलय, ईंडोनेशियन, जॅपनिज, भारतीय-मुस्लिम, भारतीय-मलय, भारतीय, कोरियन, फिलिपीन अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जेवण एकाच ठिकाणी मिळते. ह्यामधे एक भारतीय जेवण बाजूला काढले तर बाकी पद्धतीचे जेवण जवळपास सारखेच दिसते. निदान मला तरी ह्या सगळ्यात सी-फुड असते म्हणून ते सारखेच वाटते. खूप वर्षांपासून मी इथे ईंडोनेशियाचा एक पदार्थ ऐकतो आहे - "मी-गोरे" पण हा मीगोरे नक्की कसा दिसतो हे काही मला अजून कळलेले नाही. मी कित्येकदा फुडकोर्टात गेल्यानंतर कुठे अभारतीय शाकाहारी अन्न कुठे मिळते का म्हणून प्रयास केलेले आहेत पण ह्या लोकांना चिकन पावडर, कुठल्या तरी मासाचा अर्क कमीतकमी हे घातल्याशिवाय त्यांचे अन्न शिजत नाही. वर आपल्याला सांगतात की ह्यात मास नाही पण एक जरी घास तोंडात टाकला की लगेच कळते ह्यात काहीनाकाही घातलेले आहे. माझा भ्रमनिरास चिक्कार वेळी झालेला आहे. आता तर मी वाट्यालाच जाणे सोडले.
हो.. पण इथल्या खीरी माझ्या प्रचंड आवडीच्या आहेत. इथले चायनीज डीझर्ट मला फार प्रिय आहे. मुगाची खीर, रेडबीन्सची खीर, रताळ्याची खीर, नाना प्रकारचे नट्स घालून केलेली खीर. कमळाच्या बिया घालून केलेली खीर. ह्या खीरींमधे नारळाचे दुध घातलेले असते आणि ह्या फार गोड नसतात. शिवाय पौष्टिक असतात.
ह्या पहिल्या भागाचा शेवट गोड केला आहे .. आता बघुया दुसरा भाग लिहायला मुहुर्त कधी उगवतो
बी
मला वाट्लेले आतावर सर्व
मला वाट्लेले आतावर सर्व लोकांना माहित असेल बी चे वय.
हो।हो ५० .
बी, हलके घ्या.
इथे मी बलुतची लिंक देतो आहे:
इथे मी बलुतची लिंक देतो आहे:
इथे हे सगळ असच दिसत राहत. तुम्हीच विचार करा.. आपल्या भारतियांना हे प्रकार किती अमानवी वाटत असतील!!!
http://en.wikipedia.org/wiki/Balut_%28food%29
छान लेख! @ बी - तुम्ही ५०
छान लेख!
@ बी - तुम्ही ५० वर्षाचे आहात? काहीतरी जाम गडबड आहे.
<<
<<
मलाही हाच प्रश्न पडलेला लेखातील पहीली ओळ वाचल्यावर.
हो मी वाटत नाही पण आहे आहे
हो मी वाटत नाही पण आहे आहे आहे! परत ह्यावर आणि इथे चर्चा नको
बी, मग या वातावरणानेच तूला
बी, मग या वातावरणानेच तूला स्वतःला जेवण शिजवायला भाग पाडले का ? त्याबाबतीत पण तू बरीच वर्षे प्रयोग केले आहेस ना ? ते पण अवश्य लिही.
बाप रे ते बलुत प्रकार फार
बाप रे ते बलुत प्रकार फार भयंकर आहे
दक्षिणा >> दिनेशदा, सुमुक्ता
दक्षिणा >> दिनेशदा, सुमुक्ता यांनी लिहिलेल्या धाग्यांप्रमाणे तिथली खाद्यसंस्कॄती काय आहे, कशी आहे हे अपेक्षीत होतं; ना की मला हे आवडत ते नाही आवडत हा बी यांचा विचार .. ते शाकाहारी आहेत याचा आदरच आहे.. धागा बघून मला वाटल कि देशोदेशीच्या खानपानाविषयी माहिती मिळेल .. पण हे वाचून भ्रमनिरास झाला असं म्हणताहेत मी आणि इतर .. बाकी सर्वांनाच सर्व काही आवडायला हवं हे बरं नव्हे
बाप रे ते बलुत प्रकार फार
बाप रे ते बलुत प्रकार फार भयंकर आहे
>>> खरचं .. इयु .. बघावस पन नै वाटतय ते..
खूप चीड निर्माण होते की शेवटी
खूप चीड निर्माण होते की शेवटी तुम्ही काहीनाकाही मास त्यात घालतातच ना! > बी मला वाटते भारताच्या बाहेर वेज- नॉन्वेज असे वेगवेगळे अन्नाचे प्रकार नसतात त्यामुळे ती फसवणूक नसते. युके मधे वेज बर्गर हवा सांगितल्यावर मला बर्गर मधील पॅटी काढून उरलेला बर्गर हातात देण्यात आला होता.
मला सिन्गापूर च्या फूड कोर्ट मधले नॉन्वेज जेवण ही आवडते आणि खूप ठिकाणी वेज खाणार्यांसाठी फ्राईड आणि बॉईल्ड भाज्या विथ राईस अॅन्ड नूडल्स पण बघितल्या आहेत. माझी आई बाहेर गेल्यावर नॉन्वेज खात नाही पण सिन्गापूर मधे तिला विषेश प्रॉब्लेम आला नाही.
तुमचा लेख आवडला.
अशा संस्कृतीमध्ये राहूनसुद्धा
अशा संस्कृतीमध्ये राहूनसुद्धा तुमचे शाकाहारी असणे तुम्ही जपलेत याबद्दल तुमचे खरोखरच खूप कौतुक आहे.
पण भारत सोडून इतर देशांमधील लोकांना शाकाहारी लोकांचे प्रश्न कळावेत ही अपेक्षा चुकीची आहे. त्यांची जशी संस्कृती आहे त्याप्रमाणेच ते खाद्यपदार्थ बनविणार. शाकाहाराची संकल्पना माहितच नसेल तर तर त्यांना तुमचे प्रश्न कसे कळतील?
बाप रे ते बलुत प्रकार फार
बाप रे ते बलुत प्रकार फार भयंकर आहे >>> सहमत.
बी,
मी किंचित मांसाहारी असूनही, चिकन, मटण कधी आणू शकत नाही.सोललेले बकरे पहावत नाही. भायखळ्यावरून बस जाताना कबाबांच्या वासाने उमासे भरतात.
देवकी, तू जर इथे आली तर इथे
देवकी, तू जर इथे आली तर इथे झिगे वगैरे भाजताना जो वास येतो तो अक्षरशः गुदमरुन टाकणारा असतो.
नेशदा, सुमुक्ता यांनी
नेशदा, सुमुक्ता यांनी लिहिलेल्या धाग्यांप्रमाणे तिथली खाद्यसंस्कॄती काय आहे, कशी आहे हे अपेक्षीत होतं; ना की मला हे आवडत ते नाही आवडत हा बी यांचा विचार .. >> टिना हा ज्याच्या त्याच्या शैलीचा प्रश्न आहे.
मि. बी ,मी कट्टर शाकाहारी
मि. बी ,मी कट्टर शाकाहारी वारकरी साम्प्रदायातील आहे ,हे सर्व वाचुन कधी तरी तिथे फिरायला जाण्याच्या नुसत्या कल्पनेनेही पोटात गोळा आला ..
तुम्ही परिस्थितीशी कसे जुळवून घेतले असेल पुढचे लेख वाचण्यासाठी खूप उत्सुकता लागून राहिली आहे
बी, सिंगापुरची खाद्यसंस्कृती
बी, सिंगापुरची खाद्यसंस्कृती ही तिथे वसलेल्या वेगवेगळ्या देशांमधील नागरिकांमुळे निर्माण झालेली असावी. दक्षिणपुर्व आशियातील बहुतेक राष्ट्रांमधील खाद्यसंस्कृतीमध्ये मांसाहाराचा भरणा अधिक असतो. पुर्ण शाकाहाराबाबत भारतीयांच्या संकल्पना कदाचित त्यांना माहित नसाव्यात. तुमचे अजुन अनुभव लिहा वाचायला आवडतील.
भुईकमळ, तिथे आता अनेक भारतीय
भुईकमळ, तिथे आता अनेक भारतीय रेस्टॉरंट्स आहेत. टेन्श्न घ्यायची खरच गरज नाही.
सर्वण्णा भवन आहे ना आता तिथे.
सर्वण्णा भवन आहे ना आता तिथे. कशाला चिंता..
सेन्या.... वेजफूडकोर्ट तुला
सेन्या.... वेजफूडकोर्ट तुला कशाला शोधायचंय रे सिंगापुरात???
बी.. तू कोणत्याही फूड्सवर टीका टिप्पणी न करता आलिप्तपणे सर्व माहिती सांग पाहू..
तुला सरंगून आणी बर्याच ठिकाणी मिळेल ना वेज जेवण..
आपल्या जेवणाच्या स्ट्राँग मसालेदार वासाने , भाजलेल्या वांग्याच्या वासाने इतर देशातील लोकांनाही त्रास होतो , ते माहितीये का तुला???
प्रत्येक देशाची स्वतःची खाद्यसंस्कृती असते , ती त्या त्या देशातील हवामानावर, उत्पादनावर अवलंबून असते.. त्याबद्दल बोलताना शब्द थोडे सौम्य वापर ना प्लीज.. उगीच लोकांना ईय्यु वाटेल असं नको लिहूस..
प्युअर वेज खाणारे तर ठेवतातच नांव, पण चिकन, मटन खाणारे ही हॉर्स, कॅमल,डॉग,, डाँकी मीट खाणार्यांना नावं ठेवतात , ये कहाँका न्याय है..
सामी तसे असेल तर सुटकेचा
सामी तसे असेल तर सुटकेचा निश्वास......
आणी सेनापती लगेच लिन्क टाकलीत धन्स!!!
प्रत्येक देशाची स्वतःची
प्रत्येक देशाची स्वतःची खाद्यसंस्कृती असते , ती त्या त्या देशातील हवामानावर, उत्पादनावर अवलंबून असते.. त्याबद्दल बोलताना शब्द थोडे सौम्य वापर ना प्लीज.. उगीच लोकांना ईय्यु वाटेल असं नको लिहूस..>>>>>
याला अनुमोदन.
सुमुक्ता आणि वर्षू नील यांना
सुमुक्ता आणि वर्षू नील यांना अनुमोदन.
प्रत्येक खाद्यसंस्कॄती(किंवा खरेतर कुठलीही राहणीमानाशी निगडीत संस्कृती) डेव्हलप होण्यामागे उपलब्धता, हवामान, गरजा वगैरे अशी बरीच कारणे असतात.
आपण दुसरीकडे गेल्यावर त्यातले जे आपल्याला झेपतेय ते घ्यावे. काहीच मिळत नसेल तर मिळत नाही, हाल होतात म्हणून टाहो फोडावा बिंधास्त पण त्यांच्या अन्नाला नावे ठेवू नये.
सर्वण्णा भवन आहे ना आता ति<<<
सर्वण्णा भवन आहे ना आता ति<<< सरावना भवन. लिही दहा वेळा. सरावना!!!!
प्रत्येक देशाची स्वतःची खाद्यसंस्कृती असते , ती त्या त्या देशातील हवामानावर, उत्पादनावर अवलंबून असते.. त्याबद्दल बोलताना शब्द थोडे सौम्य वापर ना प्लीज.. उगीच लोकांना ईय्यु वाटेल असं नको लिहूस..>>>>>+१
दुसर्याच्या अन्नाला नावे ठेवण्यासारखा दुसरा असंस्कृतपणा नाही.
वर आपल्याला सांगतात की ह्यात
वर आपल्याला सांगतात की ह्यात मास नाही पण एक जरी घास तोंडात टाकला की लगेच कळते ह्यात काहीनाकाही घातलेले आहे. माझा भ्रमनिरास चिक्कार वेळी झालेला आहे. आता तर मी वाट्यालाच जाणे सोडले.>>>.
बी, म्हणजे तुम्ही नकळत मांसाहार केला आहे का? भ्रमनिरास झाला म्ह्णजे टेस्ट आवडली नाही का?
टेस्ट आवडली असती तर चालले असते का?
नीधप +१ नंदिनी +१ आता तरी
नीधप +१
नंदिनी +१
आता तरी नाव बदलले आहे. म्हणून इतका भ्रमनिरास होणार नाही लेख वाचून. पण त्यात "ही सगळी माझी मते आहेत" असे काही तरी पाहिजे.
नकळत केलेल्या मांसाहाराबद्दल
नकळत केलेल्या मांसाहाराबद्दल त्याला इतकं का विचारत आहात? त्यानं चुकूनमाकून भाषा समजत नसताना एखादा घास खाल्ला असेल तर लगेच "नकळत मांसाहार केलात?"
एखाद्यानं काय खावं आणि काय खाऊ नये हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे.
जजमेंटल होणं थांबवा, सर्वांनीच.
माझी जर प्रतिक्रिया भडक असेल
माझी जर प्रतिक्रिया भडक असेल तर त्याला कारण मी तशा अनुभवातून गेलेलो आहे. माझ्यावर इथे खिशात पैसे असूनही सफरचंद खाऊन मला भुक शमवावी लागलेली आहे. इथे अनेक भारतीय हॉटेल्स आहेत पण ही हॉटेल्स आपल्या घरापासून खूप लांब असतात. त्यात त्यांचे चटकमटक जेवण मला झेपत नाही. मी लाईट आहार घेणारा माणूस आहे. मला माझ्या ऑफीसच्या कॅन्टीनमधे ब्रेड सोडली की दुसरे पदार्थ मिळत नाही. मी एच आर फक्त एकच विनंटी केली की नुडसल्स मधे मला हव्या असलेल्या भाज्या असतात फक्त त्यात तुम्ही अंडा भुरजी नका घालू. माझा प्रश्न मिटेल. पण त्यांनी ती सुचना मान्य नाही केली. कितपत ही लोक शाकाहारी लोकांचे प्रश्न समजवून घेतात. आणि जी लोक सध्या भारतात आहेत आणि ज्यांनी मला जो अनुभव आला तो घेतला नाही त्यांना माझी भावना कशी समजेल. भारतात राहून शाकाहारी असणे सोपे आहे. आपल्याकडे शाकाहारच जास्त प्रचलित आहे. मी इथे भारतिय अन्न मागत नाही. मी फक्त इतकीच अपेक्षा करतो की तुम्ही १०० टक्के शाकाहारी अन्न द्या. त्यात कशाला चिकन पावडत, चिनन फ्लेवर वगैरे अॅड करतात. पण ही लोक ऐकत नाही. कारण ९९.९९ टक्के लोक मासाहारी आहेत. अशावेळी एक शाकाहारी म्हणून माझी जी परवड होते ती मला त्रासदायक वाटते. पुर्वी इथे शाकाहारी अन्न मिळायचे. हल्ली अधोगती झाली. जे मिळायचे तेही आत मिळत नाही. नुसते वणवण भटकून हवी ती शक्ती गमावून जमेल ते खावे लागते. ह्या उलट मासाहाराला शेकडो पर्याय उपलब्द्ध आहेत इथे.
आणि आनखी एक की इथे नोकरी करणार्या कुठल्याही शाकाहारी व्यक्तिला तुम्ही त्यांच्या जेवणाबद्दल विचारा त्यांचीप्रतिक्रिया माझ्यासारखीच असेल. वर सलिल शहा ह्यांंनी सुद्धा हे अनुभवले आहे. मला जर वेळ असेल तर मी दुर जावून शाकाहारी अन्न शोधू शकेल पण लंच आवर हा फक्त १ च तासाचा असतो. आपल्या पंचक्रोशित १०० दुकाने अस्तात फुडकोर्टमधे पण एकाही दुकानात वेज मिळू नये. आय फील अॅनॉईड!!!
मी हे सगळं काही दिवस नाही तर मागिल २० वर्षांपासून अनुभवत आहे. हा माझा रोजचा प्रश्न आहे. असे नाही की एक दिवस .. एक महिना.. एक वर्ष पण डेली नीड्स चा प्रश्न आहे. इथे बहुतेक वैवाहिक पुरुष स्त्रिया डबे घेऊन येतात. कारण इथे हेल्पर ठेवणे सोपे आहे. हेल्पर हाताशी असलेले कपल्स खूप एन्जॉय करतात इथे.
>>आपल्या पंचक्रोशित १००
>>आपल्या पंचक्रोशित १०० दुकाने अस्तात फुडकोर्टमधे पण एकाही दुकानात वेज मिळू नये. आय फील अॅनॉईड!!!<<
तुमच्या जागी मी अस्तो तर तक्रार करण्याऐवजी दहा वर्षातच एक छोटंसं शुद्ध शाकाहारी रेस्ट्राँ टाकलं असतं... भरपुर पोटेंशियल दिसतेय...
पण लंच आवर हा फक्त १ च तासाचा
पण लंच आवर हा फक्त १ च तासाचा असतो. आपल्या पंचक्रोशित १०० दुकाने अस्तात फुडकोर्टमधे पण एकाही दुकानात वेज मिळू नये. >> काहिही झाल तरी चालते पण जेवणासाठी मारामार करावी लागली कि खुप जीवावर येत हे खरय.. पुण्यात आल्यावर पीजी म्हणून राहताना तो मेस चा डब्बा खाणं . आई ग्ग . आठवल तरी कसस होते.. स्वयंपाक शिकुन घ्या बी तुम्ही ..
आय फील अॅनॉईड!>>>> बी, मला
आय फील अॅनॉईड!>>>> बी, मला वाटते की ज्यावेळी आपण परदेशात असतो,त्यावेळी दोन्ही खाद्यसंस्कृती भिन्न असतात हे पटवून घेतले की सोपे होते.
.
.
Pages