जुन्या कपड्यांचे काय करावे?

Submitted by मी अमि on 16 February, 2015 - 00:52

घरी खुप जुने कपडे जमा झाले आहेत. काय करावं कळत नाही. पुर्वी आई जुने कपडे बोहारणिला देऊन भांडी घेत असे. आता सोसायटीत बोहारणी येत नाहीत. कुठे येत असतील तर त्यांना गाठायला आम्ही दिवसभर नसतो. विनाकारण भांडी जमा करायची सुद्धा इच्छा नाही.

जुने कपडे डिस्पोज करण्यासाठी काय करता येईल? मला खालील पर्यांयांबद्दल माहिती/ मदत हवी आहे. मी मुंबईत राहते.

१. एखादी सेवाभावी संस्था जर कपडे स्विकारत असेल तर उत्तम. परंतु घरी येऊन न्यायला हवेत. तुमच्या ओळखी मध्ये अशी संस्था असल्यास सांगा.
२. रद्दी प्रमाणे जुने कपडे विकत घेणारी दुकाने असतात का? कृपया माहीत असल्यास सांगा.
३. रिसायकलींग करून देणारे कुणी ओळाखीचे आहे का? म्हणजे जुन्या कपड्यांपासून गोधड्या, रजया, पिशव्या इ. शिवुन देईल का?

कबीर यांनी दिलेली माहिती:

विशेष विनंती - कृपया सायंकाळी ६.३० नंतर आमच्या स्वयंसेवकांशी फोन द्वारे संपर्क साधावा. ऑफिस वेळेत संपर्क करायचा असेल तर व्हाट्स अप किंवा फोन मेसेज द्वारे संपर्क करा.
आपल्या सोयीसाठी आमच्या विभागवार स्वयंसेवकांची नावे व फोन नं खाली दिले आहेत:-
CENTRAL ZONE⌛
● प्रथमेश दिवेकर #9029714387 » कल्याण ते अम्बरनाथ

आपली हकाची,
टीम प्रोजेक्ट फँड्री
संपर्क : projectfandry@gmail.com
आमचे फेसबुक पेज
https://m.facebook.com/profile.php?id=711562668909315

सारिका संगिड़वार » मुलुंड
● संदेश तटकरे #8108508193, शर्मिला यादव व पूनम यादव » भांडुप
● रुपेश तटकरे #8080682205 » मुलुंड ते विक्रोली
● दीपेश कांबळे #9892323553 » घाटकोपर-W
● महेश खेडेकर #8097574009 » घाटकोपर-E
● प्रविण दाभोळकर #9773770507, दिलीप वरेकर #9664138181 » लालबाग ते दादर
● अमेय & सुखदा जोशी #9833998187 » दादर
● किशोर झोरे #7506640338, प्रियंका लाखन » भायखळा ते वरळी
● योगेश चव्हाण #9869404046 » मसजिद, CST

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदा जुन्या बाजारात चक्कर मारा. तिथे कपडे विकणारे लोक कपडे उचलून नेतील का विचारा.
जुन्या बाजारात हे जे कपड्यांचे स्टॉल्स आहेत तिथे विकायला असलेले सर्व कपडे हे वापरलेले असतात.
साड्याही असतात तिथे. या लोकांचे कपडे मिळवण्याचे विविध सोर्सेस असतात बोहारणी, संस्थांकडे आलेले कपडे ते वाळत घातलेले कपडे चोरी करणारे लोक. Happy

त्या विक्रेत्यांची मोठी गोडाऊन्सही असतात. तुम्हाला तुमच्या घरी येऊन त्यांनी कपडे उचलून न्यायला नको असेल. ते सेफ वाटत नसेल तर त्यांच्या गोडाऊन्सला जाऊन तुम्ही पोचवू शकता.
पुण्यात रविवारी आणि बुधवारी असतो जुना बाजार. सकाळी ८-९ च्या दरम्यान जा तेव्हा त्यांच्याकडे खूप वर्दळ सुरू झालेली नसते त्यामुळे ते बोलायला वेळ काढू शकतात.

तुम्ही त्यांना तुमचे जुने कपडे फुकट दिलेत तरी ते कुणाला तरी ते विकतच देणार आहेत मात्र.

जर अश्या कपड्यांची क्वांटीटी जास्त नसेल तर ओळखीच्या गरजूंमध्ये देता येतात. मग ते कामवाली, सफाई कामगार, वॉचमन वगैरे पासून जवळचे लांबचे नातेवाईक कोणीही असू शकते. आमचे कपडे असेच संपतात. फक्त कोणालाही देताना समोरच्याच्या मनात कोणतीही कमीपणाची भावना येऊ नये याची काळजी घ्यावी. आपण आपले कपडे वापरून झाल्यावरच कोणालाही देत असतो, नवीन कपडे देण्याचे औदार्य दाखवत नसतो हे स्वतालाच बजावावे. तसेच शक्यतो, नवीनच आहे बघ, एकदाच वापरले, मग आवडले नाही त्याला तर आता हात नाही लावत, चांगला रेमंडचा कपडा आहे, वगैरे वगैरे डायलॉग टाळावेत. समोरच्याला नवीन आहेत की जुने आहेत ते समजते. (वैयक्तिक मत) Happy

कबीर यांनी खरंच छान माहिती दिली आणि छान उपक्रम आहे.

मी माझे, नवऱ्याचे आणि मुलाचे चांगल्या स्थितीत असणारे कपडे धुऊन, इस्त्री करून आमच्या कामवाल्या ताईना देते त्यांच्या गावात त्या गरजूंना नेऊन देतात. त्यांच्या गावात, नातेवाईकात गरिबी असल्याने त्यांना गरज असते.

कोणाकडे 'दे दान सुटे गिराण' वाली मंडळी येत नाहीत का?
आमच्याकडे नागपूरच्या अनाथाश्रमाच्या नावे जुने कपडे मागायला एक तरुण वर्षभरातून एकदा नेमाने यायचा. त्याला देण्यासाठी वापरातून काढलेले कपडे बाजूला ठेवलेले असायचे.
गेल्या वर्षी तो आला नाही तेव्हा चक्क दे दान सुटे गिराण वाल्यांना दिले. त्या कपड्यांना वाट मिळाली. त्या लोकांचा तो व्यवसाय असला तर असो.

आमच्याकडे एक चिंधीवाली सुद्धा येते.

पुण्यात वारजे माळवाडीला 'आपलं घर' नावाची एक संस्था आहे. आम्ही नेहमी जुने कपडे (वापरता येण्या लायकीचे) त्यांच्याकडे देतो. माळवाडीतच २-३ दुकानं आहेत, जिथे जुन्या कपड्यांपासून पायपुसणी, सतरंज्या वगैरे (सशुल्क अर्थात) बनवून देतात.

मी पण माझ्या मुलीचे वापरलेले कपडे कामवालीला आणी एक दारावर कपडे विकायला येणार्‍या बाईला देते. मुलीचे कपडे धुतलेले, स्वच्छ आणी कुठेही न फाटलेले असतात. पण त्याना अजून एकदा धुऊन घ्यायला सान्गते. पण खुद्द पुण्यात अशी कुठली सन्स्था आहे का की जे हे घेते? कारण वारज्याला ( माळ्वाडी) जाणे मला शक्य नाही.

आशुडीचे पण मला पटते, असे एकदा मी केले आहे. मग चिन्धी गोळा करणार्‍या मुलीनी ते नेले. ते विकुन त्याना थोडे पैसे मिळतात, कारण बाहेर गाड्या साफ करण्यासाठी हे कपडे वापरले जातात. ते लोक या चिन्धीवल्यान्कडुन घेतात

माझ्या काही जाड कापडाच्या जुन्या ओढण्यांची मी दुपटी बनवून मुलासाठी वापरली. एक चादर फक्त एका ठिकाणी विरली होती. तेवढा भाग कापुन उरलेल्या कापडाची दुपटी आणि उश्यांची कव्हर्स बनवली होती. मला पिशव्या, पर्सेस वगैरे बनवता येत नाहीत. नाहीतर ओढण्यांच्या पिशव्या, पर्सेस, बटवे बनवुन वापरल्या असत्या किंवा गिफ्ट देऊन टाकल्या असत्या.

तुम्हाला दुपटी बनवता येत असतील तर कुशन कव्हर्स, लोड कव्हर्स पण बनवता येतील. अगदी सोप्पे आहे ते.

मुलाचे खूप आवडते काही टीशर्ट असतील तर त्यावरील पॅटर्न नीट चौकोनी कापून घ्यायचे आणि क्विल्ट बनवताना त्या पॅटर्नची बॉर्डर बनवायची. असे क्विल्ट मुलगा कॉलेज साठी वगिअरे हॉस्टेल ला जाताना त्याला द्यायचे. हे मी नेटवर पाहिले आहे. त्याच्या प्रत्येक वर्शाची आठवण राहते.

छान पैकी बाहुल्या पण बनवता येतात. रॅगडॉल. मी पूरवी अश्या हात शिवणीच्या बाहुल्या, हँड पपेट्स बनवत असे. आता एक करून बघते आणि इथे टाकते. अगदीच सोपे आहे.

माळवाडीतच २-३ दुकानं आहेत, जिथे जुन्या कपड्यांपासून पायपुसणी, सतरंज्या वगैरे (सशुल्क अर्थात) बनवून देतात. >..

मित, माळ्वाडीच्या दुकानांची नावे सांग तोस का, प्लीज ... मला ही कल्पना योग्य वाटते, पायपुसणी, सतरंज्या करण्याची ! आणि याव रुन एक गोष्ट ही आठ्वली ...
--- पूर्वी चट्ट्या-पट्ट्याचा पायजमा मिळायचा, तो जुना झाला की तो कापून त्यांची विजार केली जायची(बर्मुडाचे पूर्वज) , तो जून झाला की, दोन भागात कापून त्यांच्या पिशव्या केल्या जायच्या, भाजी आणण्यासाठी टिकावू पिशव्या, पिशव्या फाटे प र्यंत त्या वाप र ल्या जाय च्या. म ग त्या पायपुसणी म्ह्णुन वापरल्या जायच्या .... ह्यात कपोलकल्पीत पणा किती हा भाग सोड्ला तरी आजच्या काळात ही आयडीया वापरावयास काय हरकत नाही
.... मी सुध्दा जुन्या पॅट गुड्ख्याच्या खाली फाडून बर्मुडा म्ह्णुनच वापरतो

ते वाळत घातलेले कपडे चोरी करणारे लोक. >>>>>माझ्याकडे पूर्वी होत असे अशी चोरी. कॉमन ग्यालेरी असल्याने बाहेर ठेवलेल्या चपला वाळत घातलेलेल कपडे चोरी होत. मी एकदाच बंदोबस्त केला अशीच आवई उठवली कि मी खिडकीत cc tv क्यामेरा लावला म्हणून बंद झाली चोरी होणे. Happy Happy Happy Happy

माझी बहिण जुन्या ओढ्ण्य्नांची पायपुसणी बनवत असे. छान रंगीबेरंगी ओढण्या गुंफून गोलाकार पायपुसणी अगदी विकत घेतल्यासारखी वाटत.

For those who are in Pune, please try to contact on the numbers given in Image. It might help. Not only for clothes but for anything which is not in use.

1186712_231702006954008_1640004935_n.jpg

आमच्या कडचे कपडे असे वाटले जातात :

ऑफिसमध्ये वर्शातून एकदा गून्ज ची कलेक्शन ड्राईव्ह असते

लेकाचे चाण्गले कपडे नात्यातच २/३ जणाना लहान मुल आहेत त्याना देते .
अर्थात हे कपडे वापरले आहेत याची त्याना कल्पना असते , पण काही कपडे खूपच चान्गले नविन दिसतात , तेवधेच पाठवते .

जूने कपडे हातपूसणी , पायपूसणी , कधितरी वापरा आणि फेका अशी सफाईचे कपडे म्हणून .

माझे काही चान्गले कपडे नणंद घेउन जाते , नवर्याचे कपडे तिचा मुलगा नेतो आणि त्याचे काही कपडे माझ्या मुलाकडे येतात .

एक कॉलेज गोईंग पुतणी आहे , ती माझे बरेचसे टॉप्स वगैरे घेउन गेली नाचत नाचत .

मला चाण्गल्या साड्यान्चे काय करयच कळत नाही . सध्यातरी आई आणि नणंद या दोघीना न्ययला सांगते.

दादरला एक संस्ठा जून्या साड्या घेउन सतरंज्या बनवून देते , सशुल्क . आईने आणि तिच्या मैत्रिणीनी बर्याच बनवून घेतल्या होत्या . एक मी सासरीही घेउन आले होते.

पण तरीही अजून बरेचसे निघतात , त्यान्च काय करायच कळत नाही . प्रतिसादात मिळालेले ऑप्श्न्स बघेन

चिंचवड येथील गुरुकुल आश्रमात लहान मुलांचे कपडे नेऊन देता येतील तर पहा.पहिल्यांदा ११० मुले होती,आता ४०० च्या घरात आकडा गेलाय.

लेकाचे टि शर्ट नेहमी कामवाल्या बाईंना देते पण नेट वर मेमरी क्विल्ट पाहिल्यावर थोडे टी शर्ट वापरून हे बनवले. मुलगा मोठा होतोय, असे रंगीबेरंगी कपडे कदाचित पुढे वापरणार नाही. हि आठवण रंगीत दिवसांची.

IMG_0896.JPG

प्राची, कित्ती क्यूट Happy

माझ्या मुलाच्या टिशर्ट्स चे असे काही करावे असे वाटु लागलय.

रश्मी , मी सुद्धा फेबु वासी नाही. पण गूगल मध्ये चेक करते.

स्वस्ति. दादर मधल्या संस्थेचा पत्ता, फोन नं इ. द्याल का प्लिज?

स्वस्ति. दादर मधल्या संस्थेचा पत्ता, फोन नं इ. द्याल का प्लिज? >> आईला विचारून नक्की डिटेल्स देते .

प्राची, कित्ती क्यूट >>> + १०००० .
मी पण विचार करेन अस काहीतरी करून घ्यायचा Happy

मी लेकाच एकच टी शर्ट सुट जपून ठेवला आहे .
दोन हत्तीन्च पॅचवर्क आहे , " मी अ‍ॅण्ड डॅडी "
आणि त्या सुट्च्या पॅन्टवर एक छोटासा टॅग आहे " आय अ‍ॅम डॅडीज लिटिल स्टार "

प्राची मेमरी क्विल्ट मस्त आहे. तू स्वतः केलीस का? कशी केलीस? पुण्यात जर कुणी अशी मेमरी क्विल्ट करुन देत असतील तर पत्ता लिहा.

चिंचवड येथील गुरुकुल आश्रमात लहान मुलांचे कपडे नेऊन देता येतील तर पहा.>देवकी कुठे आहे गं? मला काही द्यायला आवडेल

अतरंगी मस्त उपयोगी लिंक

हे मीच बनवलं आहे. मला शिलाई मशीन चालवता येत नाही. म्हणून हाताने शिवले आहे. मी अंदाजाने एक आकार ठरवून पुठ्ठा कापून घेतला आणि त्याच्या मदतीने टि शर्ट चे एका आकाराचे तुकडे कापून घेतले आणि एकमेकांना जोडले. मागे एक जाड चादर लावली आहे. त्याच्या पहिल्या शाळेचा बॅच/खिसा पण लावलाय Happy फार सुबक असं नाही झालंय काम पण, आठवणी महत्वाच्या.
असं कोणी करून देतं का माहिती नाही. पण कोणाला व्यवसाय करायचा असेल तर छान आयडिया आहे.

_प्राची_ ,
मस्त केलंय.मुळात ही आयडियाच सुरेख आहे.

डीविनिता ,
पुनरुत्थान समरसता गुरुकुलम
चापेकर विद्यालय परिसर,केशवनगर
गावडे जलतरण तलावाशेजारी,चिंचवडगाव

श्री गिरीश प्रभुणे :९७६६३२५०८२
gurukulam.pune@gmail.com

_प्राची_ ,
मस्तच. आता मुलांचे काही निवडक कपडे असे पण ठेवले पाहिजेत.

अमेरिकेत गुडविल नावाच्या दुकानामुळे कपडेच काय बर्‍याच इतर गोष्टी देउन टाकायची सोय आहे. असंच काहीतरी भारतात पण असायला हरकत नाही. ज्यांना नेहमीच्या दुकानात नव्या गोष्टी परवढत नाहीत त्यांना अगदी माफक दरात तिथून विकत घेता येईल.

प्राची तुम्ही स्वतः बनवले आहे ? कौतुक आहे तुमचे. सफाइदार झाले आहे. पुढे फॅमीली एअर्लुम होतात अश्या वस्तू.

माझ्या नणंदे कडे खूप स्वेटर वगैरे असत. तर तिने सर्व फॅमिलीचे स्वेटर्स उसवून एक मल्टिकलर ब्लँकेट विणवून घेतले. साधाच पॅटर्न आहे. ते छान तर दिसतेच पण एक न्यारीच उब आहे त्यात.

प्राची तुम्ही स्वतः बनवले आहे ? कौतुक आहे तुमचे. सफाइदार झाले आहे. पुढे फॅमीली एअर्लुम होतात अश्या वस्तू.

माझ्या नणंदे कडे खूप स्वेटर वगैरे असत. तर तिने सर्व फॅमिलीचे स्वेटर्स उसवून एक मल्टिकलर ब्लँकेट विणवून घेतले. साधाच पॅटर्न आहे. ते छान तर दिसतेच पण एक न्यारीच उब आहे त्यात.

माळ्वाडीच्या दुकानांची नावे सांग तोस का, प्लीज >>> वर्षातून एकदाच भारतवारी होत असल्याने नावं अशी काही लक्षात नाही. माळवाडीच्या बसस्टॉप च्या मागे जुन्या पोलीस स्टेशनकडून आत रस्ता जातो. त्या रस्त्याने पुढे आल्यावर देवीच्या मंदीराच्या आसपास एका पीठाच्या गिरणीजवळ दुकानं आहेत बहुदा.

Pages