दिल्लीला पुर्ण राज्य दर्जा: केजरीवालयांची मागणी, रास्त की एक पळवाट ?

Submitted by रमाकांत कोंढा on 14 February, 2015 - 08:31

निवडणुकीचे निकाल आल्या आल्या केजरीवाल व त्यांच्या टिम ने केंद्र सरकारला भेटून दिल्लीला पुर्ण राज्य देण्यासंबंधी मागणी केली.

आता पर्यंत दिल्ली ही केंद्रशासित प्रदेश म्हणुन माहीती होती. मध्ये मध्ये दिल्लीला राज्य व्हावी अशी मागणी होत होती. पण त्याला पुर्णत: मान्यता मिळालेली नव्हती. गेले बरीच वर्षे दिल्लीत आणी केंद्रात काँग्रेसचे सरकार असुनही हा महत्वाचा निर्णय त्यावेळच्या संपुर्णपणे जनसेवेला वाहीलेल्या, सतर्क अश्या सरकार ने कधीही घेतला नाही. याचा अर्थ हा प्रश्न जनतेच्या प्रगतीशी पर्यायाने देश्याच्या भविष्याशी जोडलेला नसावा !!

केजरीवाल यांनी हा प्रश्न ऐरणीवर आणुन प्रलंबीत प्रश्नाला वाचा फोडली आहे. त्यांच्या समोर ह्या प्रश्ना व्दारे उद्भवणार्या कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे ? ह्या विषयी चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< वर तुम्ही डकवलेल्या चित्रात स्पष्ट दिसतंय की वीजेचे बिल अर्धे करण्याकरिता हप्त्यांवर एलईडी दिवे देणार असं वचन दिलंय. एलईडी दिवे साध्या (इन्कॅन्डेसन्ट - क्लिअर ग्लास बल्ब) दिव्यांच्या पाच पट प्रकाश देतात. म्हणजे ५ वॅटचा दिवा वापरून २५ वॅटच्या दिव्याइतका प्रकाश मिळू शकतो.>>

त्यामुळे वीजेचं बिल अर्धं होतं?? कसं ते समजावून सांगा. माझ्या वाचण्यात आलंय की दरमहा फारतर ३०० रूपयांचा फरक पडतो.
आणि दिल्लीतल्या प्रखर उन्हाळ्यात लोकांनी काय करायचं? पंखे, एसी लावायचे नाहीत???
शिवाय हे बल्बज वाटण्यात अजून एक स्कॅम होण्याची शक्यता- एल ई डी बल्ब घोटाळा !

भाजपाने यंदाच्या निवडणूकीत पूर्ण पानभरून जाहिरात दिली होती. त्यात मोदीसरकारच्या अचिव्हमेंटसमध्ये लिहिलं होतं -- distribution of eight million high-efficiency LED bulbs to 140,000 citizens !!
म्हणजे प्रत्येकी ५७ बल्ब्ज वाटले सुद्धा ! Uhoh कधी? कुणाला मिळाले? माबोवरच्या दिल्लीकरांना मिळाले का?
"The reality, however, is that not a single bulb has been handed out yet and distribution is slated to begin in March.
Coming a day before the Delhi elections, the ad - dominated by a picture of Modi, with chief minister candidate Kiran Bedi prominently featured - has left the BJP with egg on its face."

Pages