सोपा (नो बेक)चीज केक

Submitted by माधवी. on 11 February, 2015 - 05:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नेस्ले मिल्कमेड ४०० ग्रॅ - १ टीन
अमूल फ्रेश क्रीम २०० ग्रॅ - १ पॅक
जिलेटीन २ टीस्पून
फ्रेश पनीर २५० ग्रॅ
DIGESTIVE BISCUITS २०० ग्रॅ
लोणी किंवा तूप ४-५ टीस्पून

क्रमवार पाककृती: 

१. प्रथम एका पसरट भांड्याला आतमधून सिल्वर फॉइल लावून घ्या

२. DIGESTIVE BISCUITS चा मिक्सर मधून बारीक चुरा करून घ्या.

३. ह्या चूऱ्यात वितळलेले लोणी किंवा तूप घालून नीट मिक्स करून घ्या.

४. आता हा चुरा सिल्वर फॉइल लावलेल्या भांड्याच्या तळाशी एकसारखा पसरवून घ्या आणि वाटीने दाबून घट्ट बसवा.

५. हे भांडे आता फ्रीजमध्ये ठेवून द्या.

६. आता पनीर व मिल्कमेड एकत्र मिक्सर मधून काढून घ्या. मिश्रण एकदम एकजीव झाले पाहिजे.

७. ह्या मिश्रणात फ्रेश क्रीम नीट मिक्स करून घ्या.

८.एका भांड्यात जिलेटीन आणि ते विरघळेल इतके पाणी घेऊन बारीक गॅसवर ठेवा. हळू हळू ढवळत रहा. जिलेटीन पूर्ण विरघळले की हे पाणी पनीर मिल्कमेडच्या मिश्रणात मिक्स करा.

९. आता फ्रीजमधील बिस्किटाचा चुरा असलेले भांडे काढून चुऱ्यावर हे मिश्रण हलकेच ओता.

१०. आता पुन्हा भांडे फ्रीज मध्ये २ तास सेट करायला ठेवा. चीजकेक रेडी!

cheesecake.jpgcheesecake.jpgslice.jpg

वाढणी/प्रमाण: 
भरपूर होतो! ७-८ लोकांना आरामात पुरेल!
अधिक टिपा: 

जिलेटीनचे प्रमाण महत्त्वाचे आहे

सिल्वर फॉइल लावल्यामुळे केक भांड्यातून नीट निघून येतो.
सिल्वर फॉइल नसेल तर भांडे आतून थोडे ओलसर करून घ्यावे. बिस्कीट चुरा व मिश्रण दोन्ही टाकताना. म्हणजे केक नीट कापता येतो. पण मी हे करून पहिले नाही.

शेवटी महत्त्वाचे, बस, कॅलरीज मत पुछो! Happy

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त... याच्या अगणित वेरिएशन्स करता येतील. फक्त कॅलरीज नजरेआड केल्या म्हणजे झाले Happy

तोंपासू! बायो, जिलेटीन व्हेज मिळु शकते का? किंवा मिळाले तर यात वापरु शकतो का?

दिनेशजी याला पर्याय ( जिलेटीनला ) व्हेज मिळेल का? काय नाव आहे?

केक जबरी आहे.

मस्त आहे. जिलेटीन नाही घातले तरी चालते. लेमन इसेन्स, लेमन झेस्ट वापरून लेमन चीज केक मस्त होतो. पण कदाचित नो बेक चीजकेक करता जिलेटीन लागत असेल.

वर फोटोतल्या चीजकेकचा शुभ्र रंग छान दिसत आहे.

रश्मी.. भारतात आता व्हेजच जिलेटीन मिळते... अगर अगर / चायना ग्रास या नावाने मिळेल.

खरे जिलेटीन, प्राण्यांच्या हाडांपासून करतात. सध्या भारतात ते नाहीच. जेली वगैरे मधे सुद्धा अगर अगर च असते. ते एका समुद्र वनस्पति पासून बनवतात.

माधवी, वेलकम बॅक! छान आणि सोपी रेसिपी.
मला चीजकेक खुप आवडतो पण आता खायची हिंमत होत नाही.

........

मामी जिलेटीनबद्दल थॅन्क्स. बाकी सार्‍या गोष्टी विनासायास उपलब्ध असल्याने करुन पहायला हरकत नाही.

पण यातले अमूल क्रीम जर उरले तर ते अजून कशात वापरता येईल?

वत्सला आणि सगळ्यांना धन्यवाद Happy खुप दिवसांनी रेसिपी लिहिली. प्रतिसाद बघून छान वाटले.

हा चीजकेक जिलेटीन किंवा तत्सम पदार्थाशिवाय होईल असे वाटत नाही (माझ्या अल्पमतीनुसार). बाईंडिंगसाठी काहीतरी लागेलच ना?

मस्त आहे. कट केक पॅक मॅन सारखा दिस्तो आहे. खूपच फ्लेवर्स आणि फळे वगैरे डेकोरेशनला वापरता येतील.

जिलेटिनशिवाय नो बेक चिजकेक करता येतो. धागा हायजॅक करायचा हेतू नाही . कुणाला जिलेटिन, अगर अगर वगैरे न वापरता करायचा असेल तर http://www.joyofbaking.com/NoBakeCheesecake.html

आवडता केक. छान आणि सोपी रेसिपी. निवडक दहात नोंदविली आहे लवकर सापडावी म्हणुन.
लवकरच करुन बघणार.

पनीर सोडुन सर्व साहित्य आणले आहे. पण एक शंका आहे की दुकानातील चिजकेकमध्ये क्रीम चिज वापरतात त्यामुळे यात पनीर वापरुन ती चिझी टेस्ट येते का?