साखरेचे घरटे (Sugar Nest)

Submitted by स्नू on 10 February, 2015 - 05:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साखर - अर्धी वाटी
पाणी - अर्धी वाटी
जाड बुडाचे लांब हॅंडल असलेले पातेले
दोन काटे चमचे
एक खोलगट पातेले
वर्तमानपत्र

क्रमवार पाककृती: 

1. जाड बुडाच्या पातेल्यात साखर आणि पाणी टाकून मध्यम आचेवर ढवळावे.
2. हळू हळू साखरेचा पाक तयार होईल
3. साधारण 4-5 मिनिटात पाकाचा रंग बदलून पिवळसर होईल.
4. चमचा पाकात बुडवून वरपर्यंत खेचत आणल्यास अतिशय बारीक धागा तयार झाल्याचे दिसेल.
4. गॅस बंद करा.
5. दुसरीकडे एका वर्तमानपत्रावर खोलगट पातेले ठेवा.
6. 2 काटे चमचे समांतर धरून पाकात बुडवा
5. खोलगट भांड्यावर चमच्यातल्या पाकाने आडव्या रेषा मारा.
6. साखरेचे धागे तयार झालेले दिसतील.
7. पुरेसे धागे तयार झाल्यावर उचलून हवा तो आकार द्या.

45.jpg

अधिक टिपा: 

1. आईसक्रीम किंवा केकचे डेकोरेशन करण्यासाठी ह्या शुगर नेस्टचा वापर करता येऊ शकतो.
2. गरम साखरेपासून त्वचा वाचवा.
3. पातेल्यात पाक वाळल्यास अतिशय कडक होतो. वॉश करण्यासाठी कडक पाणी घालून भिजत ठेवा.
4. हा खेळ करताना आजूबाजूची भांडी दूर ठेवा. चिकट झाल्यास मी जबाबदार नाही Wink

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतंय घरटं Happy

एकतारी पाक लागेल की दोनतारी?
२ काटे चमचे म्हणजे दोन्ही काटेच लागतील ना?
आणि धागे उचलून आकार द्या म्हणजे काय? ते भांड्यापासून अलग होतात का? वाळल्यावर कडक होतात का?

मंजुडी,
थॅंक्स. Happy
पाकाच्या वरची स्टेज साधारण Caramel होईल अशी.. हो. दोन काटे घेतले की धाग्यांची डेन्सिटि चांगली मिळते.
धागे आरामात भांड्यापासून विलग होतात. वाळल्यावर कडक होतात पण ढोबळ आकार देता येऊ शकतो.

भारी.. याला मस्त सोनेरी रंग येतो, दिसतोही छान.
एक्स्पर्ट लोक हवेतल्या हवेत असे धागे तयार करताना बघितले आहेत.

स्नूने पातेले घेतले म्हणजे धागे पातेल्यापासून वेगळे होत असेल. काचेच्या वाडग्यात प्रयोग केला तरी चालेल बहुतेक.

काऊ, कॅरामेल करताना साखर पातेल्यात करपवल्यामुळे तसे झाले. इथे १-२ तारी पाक करुन काट्याने त्याच्या तारा काढायच्या आहेत. तारा काढून इकडून तिकडे त्या काट्याने ट्रान्स्फर करताना तो तारांमधला पाक गार होऊन घट्ट होत असावा.

हो ना गं स्नू?

खोलगट पातेल्याचा फायदा असा की धागे केवळ कडांच्या आधारे विसावतात आणि पातेल्यात मध्यभागी हाताने धरून उचलता येते. सपाट ताटावर केल्यास चिकटतील.

ओगले आज्जींनी एका पेल्यावर मळलेली कणीक थापून, त्यावर तेल लावून असे धागे सोडायला सांगितले आहेत. ( असे अंधुकसे आठवतेय :-० )

सोपे कॅरेमल पुडिंग ट्राय केलेले बरेच जण सांगतील पातेले कसे धुवायचे ते Happy
सोनपापडी पण अश्याच प्रकारे करतात फक्त पाकात डा. पिठ पण असते.

मागे एकदा केला होता हा प्रयोग.
पाक जसा जसा थन्ड होत गेला तसे तसे वेगवेगळ्या रंगाचे आणि आकराचे धागे बनत गेले. मज्जा येते हे करताना.

sugar.jpg