सरकारी इंग्रजी शब्द

Submitted by नीधप on 9 February, 2015 - 08:24

जंगल, शेती व ग्रामीण भागाशी संबंधित मराठीतले/ मराठीतल्या प्रादेशिक बोलीतले जे विविध शब्द आहेत, विविध संकल्पना आहेत यांना सरकारी इंग्रजीमधे विशिष्ठ शब्द असतात.
ते शब्दश: भाषांतर असतेच असे नाही.
उदाहरणार्थ बचतगट या शब्दाला सेल्फ हेल्प ग्रुप (एस एच जी) असा सरकारी इंग्रजीमधे शब्द आहे. जे शब्दश: भाषांतर नाही.

तर अश्या प्रकारचा मराठी ते सरकारी इंग्रजी शब्दकोश/ पुस्तक उपलब्ध आहे का? नेटवर उपलब्ध आहे का?
असे काही नसल्यास त्या त्या शब्दांचे इंग्रजी शब्द कुठून मिळवता येऊ शकतील?

हा धागा भाषा या ग्रुपमधेही ठेवावा अशी माबो प्रशासनाला विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिस्ट पाठवा. उत्तर देऊ. Happy बचत गट हा स्लॅन्ग आहे शासकीय. खरे तर उपगट. स्वयं सहायता गट हा अगदी प्रौढ शिक्षणाचा, ग्रामस्वच्छतेचाही असू शकतो. बांगला देशात प्रो. मोहम्मद युनुस यानी एसेह्जी ला आर्थिक चलवळीचे रूप दिले आणि क्रान्ती केली. म्हणून बचत गट नाव पडले. (हे अवान्तर मूळ विषयाशी याचा सम्बंध नाही आवडले नसल्यास वाचू नये::फिदी:)

अशोक जी आता शासनातली थॉट प्रोसेस मराठीतच असते. इंग्रजीत त्याचा बॅक अप करीत नाहीत. त्यामुळे इंग्रजीकडे वळायची सोय नाही. सगळीकडेच हे आहे . संदर्भासाठी इतर राज्यांच्या साईट्स पाहिल्या तर सगळ्या जिलब्या जिलब्या दिसतात अ‍ॅण्ड व्हाईस वर्सा.

Pages