सरकारी इंग्रजी शब्द

Submitted by नीधप on 9 February, 2015 - 08:24

जंगल, शेती व ग्रामीण भागाशी संबंधित मराठीतले/ मराठीतल्या प्रादेशिक बोलीतले जे विविध शब्द आहेत, विविध संकल्पना आहेत यांना सरकारी इंग्रजीमधे विशिष्ठ शब्द असतात.
ते शब्दश: भाषांतर असतेच असे नाही.
उदाहरणार्थ बचतगट या शब्दाला सेल्फ हेल्प ग्रुप (एस एच जी) असा सरकारी इंग्रजीमधे शब्द आहे. जे शब्दश: भाषांतर नाही.

तर अश्या प्रकारचा मराठी ते सरकारी इंग्रजी शब्दकोश/ पुस्तक उपलब्ध आहे का? नेटवर उपलब्ध आहे का?
असे काही नसल्यास त्या त्या शब्दांचे इंग्रजी शब्द कुठून मिळवता येऊ शकतील?

हा धागा भाषा या ग्रुपमधेही ठेवावा अशी माबो प्रशासनाला विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा खाली जाऊ लागला म्हणून परत वर काढतेय.
टिआरपी माँगर म्हणायचं असेल तर तसं म्हणा.
कुणाला खरंच यासंदर्भाने काही मदत करता येऊ शकत असेल तर प्लीज करा.

माझ्याकडॅ स्पेसिफिक शब्दक्कोष नाही पण भाषांतरामध्ये बर्‍याचदा असे सरकारी शब्द वापरले जातात त्यांची कल्पना आहे. तुला विशीष्ट कुठला शब्द हवा असेल तर इथं विचारलंस तरी चालेल. माझ्या डेटाबेस्मध्ये असेल्तर मी नक्की सांगू शकेन.

नी,
शासनाच्या माहिती प्रसारण विभागाच्या ऑफिसमधे चौकशी कर. ती मंडळी खास सरकारी हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांत कामे करतात. कदाचित त्यांच्याकडे माहिती मिळेल.

Please refer to tribhashakosh by sattvasheela Samant. Published by diamond publication. We will try to make I available in maayboli kharedi.

ओके चिन्मय. येत्या आठवड्यात माबो खरेदीमधे उपलब्ध न झाल्यास इतर ठिकाणी कुठे मिळू शकेल हे सांगशील का? जरा अर्जंट आहे.

नंदिनी, एक शब्द नाहीये. किमान २०० तरी शब्द निघतील.
मी माझे इतर सोर्सेस(ग्रामीण भागात काम करणारे लोक वगैरे!) वापरून मिळवायचा प्रयत्न करतेच आहे.

Please refer to tribhashakosh by sattvasheela Samant. Published by diamond publication.<< यात बरेचसे शब्द मिळतील. मी बर्‍याचदा रेफर करते.

नीधप....

मी शासकीय सेवेत होतो.....साहजिकच पत्रव्यवहारासाठी अनेकदा खास सरकारी भाषांतील शब्दांची वाक्यरचनेसाठी आवश्यकता भासत असे. अशावेळी आम्हाला "भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई" यांच्याकडून "शासन व्यवहार कोश" मिळाला होता....त्याची किंमतही ३० ते ५० रुपयांपर्यंत आहे. भाषा सल्लागार मंडळात त्यावेळी श्रीमती दुर्गा भागवत, डॉ.वि.भि.कोलते, डॉ.ना.गो.कालेलकर, प्रा.गं.बा.सरदार, डॉ.वा.म.कुलकर्णी अशी दिग्गज मंडळी होती आणि या मंडळाने हा कोश तयार करून मग प्रसिद्ध केला. अतिशय उपयुक्त शाबीत होईल तुमच्या गरजेसाठी.

तुम्ही ज्या शहरात राहता तेथील जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला तर शासन मुद्रणालयातर्फे ही प्रत मिळू शकेल असे वाटते. जर काही तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला मिळू शकली नाही तर मात्र थेट मंत्रालयात जाऊन मिळवावी लागेल.

कुठल्या भाषेत आहे हा शा व्य कोश?
माझ्याकडे मराठी शब्द आहेत. त्या सर्व शब्दांचे/ संकल्पनांचे अर्थ मला माहिती आहेत परंतु इंग्रजीमधे मी केलेले अर्थानुरूप भाषांतर आणि त्या संदर्भाने सरकारदफ्तरी वापरली जाणारी इंग्रजी संज्ञा हे एकच आहे ना हे चेक करणे आणि एकच नसल्यास सरकारदफ्तरी भाषा वापरणे हे गरजेचे आहे.

इंग्लिश भाषेतील संज्ञांचे शासकीय मराठीकरण केले आहे. प्रशासनिक भाषेची आपली अशी शैली व शब्दार्थांच्या निरनिराळ्या छटा या कोशात दर्शविण्यात आल्या आहेत.

तुम्ही मूळ लेखात शेती संदर्भातील शब्दांचा उल्लेख केला आहे. त्या बाबतीत शासकीय व्यवहार कोश काय देत आहे ते पहा....उदाहरणार्थ :
Agricultural entomology = कृषि कीटकशास्त्र
Agricultural equipment = कृषिसाधन
Agricultural farm = कृषिक्षेत्र
Agricultural marketing = कृषि पणन
Agro-industrial = कृषिऔद्योगिक
Agronomist = कृषिविद्यावेत्ता
Agrotologist = तृणविद्यावेत्ता
.....आदी अनेक नमुने आहेत. अशा स्वरुपातील कोशाची तुम्हाला उपयुक्तता वाटेत असेल तर जरूर हा ग्रंथ तुम्ही मिळवा. किंमतही अगदी अत्यल्प अशीच आहे....(शासकीय प्रकाशन असल्यामुळे)

याबाबत वराह पालन केन्द्र यासंबम्धी पुलंची (ट्चेआले) टिपणी वाचावी....

अशोक जी ..
पूर्वी शासनाचे निर्णय अथवा दस्तावेज इंग्रजीतून निघत . पुढे सत्तरीत मराठी अनिवार्य झाल्याने (वर्जित प्रयोजने वगळता) मूळ डॉक्युमेन्ट इंग्रजीत न निघता मराठीत निघतात. म्हणून मराठीत येताना सुलभ व्हावे म्हणून शसन व्यवहार कोष निर्माण झाला.आता तर मूळ विचारच मराठीत होत असल्याने ईन्ग्रजी शब्दाचा विचार होत नाही. व सुयोग्य शब्द वापरण्याबाबत काळजी घेतली जात नाही. शासनातली नवी पिढीचे मराठी 'दिव्य' च असल्याने त्याच्या 'दिव्यत्वाची प्रचिती' शासकीय दस्तावेजात ठायी ठायी येते. व्यकरणाचा, शुद्धतेचा आग्रह धरणार्‍याकडे रागाने पाहिले जाते. अत्यन्त घाईत जी आर ड्राफ्ट केले जातात व इश्यू केले जातात. भाषान्तर न सुचल्याने इन्ग्रजी शब्द देवनागरीत अथवा रोमन लिपितच बिन्दिक्कतपणे घुसडले जातात.चुकीचे शब्द वापरल्याने न्यायालयीन प्रकरणेही निर्माण होताहेत... नवीन पीपीपी , संगणक संस्कृतीत काही शब्दाना मराठी शब्द तयारच न झाल्याने ' हाण रे सावळ्या ' पद्धतीने मूळ शब्दच वापरले जातात. उदा. अपफ्रंट प्राईस हा पीपीपी च्या करारात येणारा शब्द अजून स्टन्डर्डाईज झालेला नाही मग त्याचे काहीतरी वेगळ्याच अर्थच्छटेचे भाषान्तर करणे नाहीतर अपफ्रन्ट प्राईस हाच शब्द वापरणे अवलम्बले जाते . डाऊनलोड करणे हा असाच एक शब्द.मग अर्जाचे नमुने संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावेत अशा तीन चार भाषातल्या सूचना वाचाव्या लागतात.
आता वेबसाईटचे भाषान्तर संकेत स्थळ कसे होते , कुणी केले कुणास दख्खल! Happy पण भावना पोचतात::फिदी:

आता धाग्यात दिलेले उदाहरण बचत गट हा सर्रास वापरला जाणारा शब्द आहे. पण त्याचे मूल रूप आहे सेल्फ हेल्प ग्रुप एस एच जी ... त्याला स्वयंसहायता गट म्हनतात. पण त्याची व्याप्ती मर्यादित करनारा आर्थिक व्यवहारापुरताच मर्यादित असनारा बचत गट शब्द रूढ झाला आहे. स्वयंसहायता गट ही व्यापक कल्पना आहे व त्यात आर्थिक व्यवहाराव्यतिरिक्त ही वेगवेगळ्य्य क्षेत्रात राबविली जाणारी संकल्पना आहे....

हल्लीचे धेडगुजरी सरकारी वाड्मय वाचवत नाही कारण ते लिहिणारी शासनातली पिढी व्याकरण म्हंजी काय रं भाऊ हे इच्यारनारी हाये::फिदी:

शिवाजी नगर पोस्टाजवळ पूर्वी ' बलिवर्दसंयंत्र कार्यालय ' असा एक बोर्ड दिसे. त्याचा अर्थ बुलडोझर ऑफिस असा होता कुठलं महापालिकेचं की कृषी खात्याच ऑफिस होतं म्हणे ते Happy

लाष्ट लिंक शेव करण्यात आलेली हाये.

अशोकरावांनी सर्कारी छापील कोशाचं सांगितलं, पण हुडोबांनी ही लिंक देवून धाग्याचं काटूकच मोडून टाकलं की बा!

ता.क. पुण्यात फोटोझिंको प्रेस. बीजे मेडीकल कॉलेज होस्टेलच्या बाजूला. असा पत्ता आहे.

शासकीय मराठीसाठी इंग्रजी->मराठी शब्दकोश आहे. पण मराठी-> इंग्रजी असा शब्दकोश असेल का?
शासकीय कामकाजात भाषांतराचा ओघ इंग्रजी->मराठी असाच होत असावा.

हा भारत सरकारच्या गृहखात्याच्या संकेतस्थळावरचा हिंदी-इंग्रजी शब्दकोश. यात हिंदी शब्दासाठी इंग्रजी शब्द शोधण्याची सोय दिसली , पण तिचा उपयोग करता आला नाही.
http://e-mahashabdkosh.rb-aai.in/EnglishIndex.asp

पूर्वी शासनाचे निर्णय अथवा दस्तावेज इंग्रजीतून निघत . पुढे सत्तरीत मराठी अनिवार्य झाल्याने (वर्जित प्रयोजने वगळता) मूळ डॉक्युमेन्ट इंग्रजीत न निघता मराठीत निघतात. म्हणून मराठीत येताना सुलभ व्हावे म्हणून शसन व्यवहार कोष निर्माण झाला <<<
अशी उलटी गंगा आहे होय!! Happy
पण सत्तरीनंतर बर्‍याच काळाने अश्या शब्दांशी संपर्क आल्याने माझ्याकडे सरकारी मराठीतील प्रचलित शब्द आहेत आणि मला सरकारी इंग्रजीतले प्रतिशब्द हवे आहेत. ते हा कोश देऊ शकतो का?

मराठीतून इंग्रजीत असे भाषांतर अपेक्षित आहे. उलट नव्हे. हूड यांनी दिलेल्या लिंकेवर गेल्यावर इंग्रजीतून मराठीत असा मामला आहे. जो सध्यातरी मला उपयोगाचा नाही.

नवीन पीपीपी , संगणक संस्कृतीत काही शब्दाना मराठी शब्द तयारच न झाल्याने ' हाण रे सावळ्या ' पद्धतीने मूळ शब्दच वापरले जातात. <<<<
काहीतरी चुकीचे किंवा कुणालाही अर्थबोध होणार नाही असे मराठीकरण करण्यापेक्षा ड ला काना डा, उ, न नळातला, ल ला काना ला आणि वर ओ ची मात्रा, ड डमरूतला हे परवडले की.

पण मराठी-> इंग्रजी असा शब्दकोश असेल का? <<< एक्झॅक्टली मयेकर. हाच प्रश्न आहे.

मी इथून काही वेळा शब्दार्थ घेते
हिंदी शब्दांसाठी मी एक Administrative Glossary वापरते जी वर्ड मध्ये संकलित आहे, हवी असल्यास इमेल करू शकते.
त्यातूनही शब्द नाहीच सापडल्यास भाषा संचालनालय विभागात ओळखीने फोन करून विचारते. तिथल्या बाईंचा फोन क्रमांक मेल करू शकेन.

काहीच नाही मिळाले तर अखेर सर्व शब्दांची यादी करून ओळखीच्या कृषी अधिकार्‍यांना पाठवणे हा पर्याय आहे माझ्याकडे. Happy

डिविनिता, बघते. धन्स.
शब्दार्थ आणि प्रचलित शब्द यातला घोळ आहे मोठा. परत माझ्याकडे आहे तो मूळ इंग्रजी शब्दाला मराठी प्रचलित शब्द जो खरंतर अर्थानुरूप नाही. (सेल्फ हेल्प ग्रुप - बचतगट उदाहरण आणि त्याची हूडने दिलेली फोड).
मला माहित असलेले मराठी प्रचलित शब्द जे आहेत त्यांचे अर्थ आणि त्या सर्व संकल्पना माझ्या चांगल्याच परिचयाच्या आहेत.

शब्दार्थ आणि प्रचलित शब्द यातला घोळ आहे मोठा. >>हो हा नेहमीच असतो. काही डॉक्युमेंट्स नेटवर मिळतील का ते आपण एकत्र शोधू शकतो, तुम्ही तसे सांगितल्यास. अशा डॉक्युमेंट्स मध्ये बरीच परिभाषा सापडते.

<माझ्याकडे सरकारी मराठीतील प्रचलित शब्द आहेत आणि मला सरकारी इंग्रजीतले प्रतिशब्द हवे आहेत. ते हा कोश देऊ शकतो का? >

सरकारी (शासकीय) मराठी ही सामान्य मराठी भाषेपेक्षा वेगळी(!) अशी एक भाषा असते, तशी सरकारी इंग्रजी ही सामान्य इंग्रजीपेक्षा वेगळी भाषा नसावी.

त्यामुळे प्रचलित (बचत गट) वा शासकीय (स्वयंसहायता समूह) मराठीतील शब्दासाठी इंग्रजी प्रतिशब्द शोधणे तुलनेने सोपे ठरावे. बहुधा असे शब्द शोधायची गरज पडू नये. फार तर आपल्याला माहीत असलेला प्रतिशब्द योग्य आहे का याची शासकीय व्यवहार कोशातून खात्री करून घेता येईल. (अर्थात हे सगळं पाण्यात उतरल्यावरच कळेल.)

इंग्रजी शब्दांचे मराठीकरण करण्याच्या प्रयत्नातून शासकीय मराठी भाषा तयार झाली असावी. काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात या शासकीय मराठीबद्दल एक लेख वाचला होता. लेखक बहुधा बाळ सामंत, जे स्वतः शासनाच्या प्रसिद्धी वा तत्सम विभागात काम करायचे. त्यातले एक उदाहरण लक्षात आहे : अण्डर सेक्रेटरी = अवर सचिव (वर नसलेले ते अवर!!)

महाराष्त्र शासनाच्या वेब साईट्वर शासनाचे निर्णय नावाची (गवर्नमेन्ट रिझॉल्युशन पक्षी जी आर) लिन्क आहे त्यातप्रथन्म सर्व विभाग असा ड्रॉप डाऊन मेन्यू दिसेल त्यातून कृषि पशुसंवर्धन सिलेक्ट करून शोधा क्लिक केले असता केवळ कृषी विभागाचे जी आर सॉर्ट होऊन येतात २००२ पासूनचे साधारण. त्या पीडीएफग्फाईल्स आहेत . त्यात शासकीय योजनांच्या अनुषंगाने शासकीय मराठीचे विश्वरूप दर्शन घडेल...::फिदी:

न च जमल्यास इथे लिस्ट टाकल्यास इथेच सडेतोद उत्तर दिले जाईल::फिदी:

https://www.maharashtra.gov.in/

रॉबीनहूड....

छान आहे तुमचा प्रतिसाद.

"...मूळ डॉक्युमेन्ट इंग्रजीत न निघता मराठीत निघतात...." ~ शासकीय नोकरीतील अनुभवाने सांगू इच्छितो की कित्येकदा इंग्रजी तर्जुमाच आम्हाला व्यवस्थितरित्या समजत असे...म्हणजे जी.आर. जरी दोन्ही भाषेत असले तरीही (सवयीमुळे म्हणा...) सर्वप्रथम इंग्रजी पानांचेच वाचन आपसूक होत असे. मराठीतील परिभाषा कित्येकवेळा समजत नसे...भाषेच्या क्लिष्टतेमुळे....तेव्हा इंग्रजीकडे वळण्याशिवाय तरणोपाय नसे.

शासकीय आदेशातील मराठीची ही काही रुपे पाहा : "विविक्त"...."अप्रत्यावर्ती"..."अपवाहन"...."संपीड्यता" असे शब्द स्वतंत्ररित्या तुम्हाआम्हासमोर आले तर झटदिशी कधीच कळू शकत नाही. त्यामुळे परत इंग्रजीकडे जाणे भाग पडत असे.

त्यामुळे प्रचलित (बचत गट) वा शासकीय (स्वयंसहायता समूह) <<
असे नाहीये.
बचत गट हा प्रचलित आणि बहुतेक शासकीय ही शब्द आहे.
स्वयंसहायता समूह हा योग्य अर्थ, योग्य शब्द आहे.

आज कुठल्याही ग्रामपंचायतीत किंवा कृषी विभागात किंवा ग्रामीण भागातल्या बँकांमधे किंवा नाबार्डमधे जाऊन बघितलेत तर बचतगट हा शब्दच चालतोय मराठीत. स्वयंसहायता समूह असा शब्द वापरून विचारले तर आपल्याकडे कुठून आलेत हे येडे असं बघतील. (त्यांनी तसे बघायला माझी काहीच हरकत नाहीये तेव्हा त्यावरून वाद नको!)

तर ग्रामीण भागात सरकारदरबारी चालणारे शब्द मराठी संज्ञा आहेत माझ्याकडे त्याचे इंग्रजीकरण करायचे तर मी करू शकते सहजपणे पण ते योग्य ठरणार नाही हे माहितीये. (जसे की बचतगटाचे मी सेव्हिंग ग्रुप असे इंग्रजी भाषांतर करेन पण ते योग्य नाहीये!)

न च जमल्यास इथे लिस्ट टाकल्यास इथेच सडेतोद उत्तर दिले जाईल: <<<
खरंच देणार असाल उत्तर तर ४-५ दिवसात एक यादी संपर्कातून पाठवेन. तिथे उत्तर द्या.

शासनाच्या कुठल्याही पुस्तकाचे मागे (जसे रजा नियम, भविष्य निर्वाह निधी किंवा शासन दिनदर्शिका) यांचे मागे असे शब्द लिहीलेले असतात. मराठी व इंग्रजी

घ क व्य विभाग

घनकचराव्यवस्थापन विभाग

Pages