१. अर्धा किलो चिकन- तुकडे करून, स्वच्छ धुवून वगैरे.
२. लिंबाचा रस- चिकनला पुरेल इतका
३. तिखट
४. चेट्टीनाड चिकन मसाला (नसेल तर मालवणी चिकन मसाला तोही नसेल तर गरम मसाला तोही नसेल तर घरात असेल तो मसाला तोही नसेल तर जाऊद्यात)
५. मीठ (चवीनुसार)
वाटणः
आलं: एवलुसं
लसूण: साताठ पाकळ्या
दालचिनी: बोटाएवढी
लवंगा: ६-७
बडीशेपः अर्धा चमचा
हिरव्या मिरच्या: आपल्याला सोसतील त्या तिखटाच्या मानानं. नेहमीच्या तिखट मिरच्या असतील तर ३-४ पुरेत.
पुदिना- कोथिंबीर : बचकभर
काजू (ऐच्छिक) ५ (मी कधी वापरले नाहीत पण इंटरनेटच्या रेसिपींमध्ये लिहिलेलं आहे.)
बिर्याणीसाठी:
तांदूळ शक्यतो जीरगी सांबा नावानं मिळणारे तांदूळ किंवा अंबेमोहर किंवा सोनामसूरी. लॉंग ग्रेन बासमती इन बिग्ग नोनो. २ वाट्या
नारळाचे दूध १ वाटी
सांबार ओनियन म्हणजेच पर्ल ओनियन : १० नसतील तर साधे कांदे उभा चिरून पण फ्लेवरसाठी पर्ल ओनियन बेष्ट.
टोमॅटो : १ मध्यम: चिरलेला. प्युरे वगैरे अजिबात नकोय.
तिखट : उगं रंग येण्यापुरती.
धणापावडर: तीपण रंग येण्यापुरतीच.
हळद: चिकनला लावलेलं आहेच त्यामुळे इथंही रंग येण्यापुरतीच.
मीठ : उगं रंग येण्यापुरती ( हे कॉपीपेस्टचे दुष्परिणाम आहेत) मीठ चवीनुसार घाला.
तेल-तूप: बिर्याणी करत आहोत त्या अंदाजानं. डायेटींग वाल्यांनी वरण भात करून घ्यावा.
स्टार अनिस: चक्रीफूल १
मराथी मोक्कू : याचे मराठी नाव नागकेशर. चेट्टीनाड पदार्थांमधला द मोस्ट आय एम पी साहित्य.
वेलची चार. : हिरवी वेलची. काळी वेलची वापरायची आवश्यकता नाही.
कढीपत्ता: घ्या एक टहाळं. दाक्षिणात्य पदार्थ असल्यानं हे सांगावं लागू नये.
सोबतः
उकडलेली अंडी किंवा अंड्याचं आमलेट किंवा दोन्ही. बिर्याणी जास्त प्रमाणांत करत असल्यास पुरवठ्याच्या दृष्टीनं हे लक्षात ठेवावं.
बिर्याणी म्हटलं की सर्वसाधारणपणे हैद्राबारी किंवा लखनवी बिर्याणी डोळ्यांसमोर येते. चेन्नईला रहायला आल्यावर समजलं की दक्षिणेमध्ये बिर्याणीचं किती प्रस्थ आहे. इथे मांसाहारामध्ये जास्त करून चिकन बिर्याणी खाल्ली जाते. चेन्नईचा गल्ल्यांगल्ल्यांमध्ये स्ट्रीट फूड म्हणून बिर्याणी मिळतेच मिळते. थलपकट्टू, अंबर, दिंडीगुल अशा ठिकाणच्या बिर्याणी फार प्रसिद्ध आहे. पण सध्या सर्वात जास्त फेमस आहे ती चेट्टीनाड बिर्याणी.
करायला अतिशय सोपी झटपट आणि चुका होण्याची शक्यता फार कमी असलेली ही रेसिपी आहे.
सर्वात आधी चिकन धुवून लिंबाचारस, मीठ आणि मसाला घालून मुरवत ठेवा. मुरवत ठेवण्याचा वेळ कितीही चालेल. अगदीच दहा पंधरा मिनिटं मुरवलं तरी पुरेसं आहे. तांदूळ धुवून भिजत घाला. अर्ध्यातासाने भिजलेले तांदूळ निथळून घ्या.
वाटणासाठी दिलेले जिन्नस अगदी बारीक वाटून घ्या.
आता एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा कूकरमध्ये तेल आणि तूप गरम करा. त्यात तामालपत्र, वेलची, स्टार अनिस, मराथी मोक्कू घाला. कढीपत्ता घाला. तेलातुपामधे कंजूसी नकोय. जिरेमोहरी वगैरे घालू नका.
आता त्यात सांबार कांदे घालून परता. कांदे चांगले परतल्यावर वाटण घाला. चांगलं खरपूस परता. आता सर्व कोरडे मसाले घाला.
चिरलेला टोमॅटो घाला. तोही चांगला शिजल्यावर चिकनचे तुकडे घाला. पाचसात मिनिटं चांगलं परता.
३ वाट्यापाणी आणि नारळाचे दूध घाला. चवीनुसार मीठ घाला.
चांगली उकळी आल्यावर तांदूळ वैरा. कूकर वापरत असाल तर एक शिटी घ्या. पातेल्यात करत असाल तर काय करायचे ते मला माहित नाही. सुगरणींकडून सल्ला घ्या.
कूकरचे प्रेशर उतरल्यावर बिर्याणी नीट मिक्स करून घ्या. उकडलेली अंडी सोलून त्यामधेय मिक्स करा.
आमलेट असेल तर बिर्याणीसोबत वाढा. बिर्याणीवर कोथिंबीर, ओलं खोबरं वगैरे घालू नका. ती बिर्याणी आहे, कांदेपोहे नव्हेत.
सोबत दह्याचा रायता, तळलेले आप्प्लम उर्प्फ पापड एवढंच पुरेसं आहे. गोडासाठी फिरनी करा ( )
ही बिर्याणी सौम्य वगैरे चवीची अज्जिबात होता कामा नये. चांगली दणदणीत तिखट मसालेदार बिर्याणी व्हायला हवी, पण इतर बिर्याणींसारखी तूपकट होत नाही.
चिकन ऐवजी बटाटे चालतील. फक्त एक उप्कार करा आणि त्याला "बिर्याणी" म्हणू नका. बटाटे पुलाव वगैरे म्हणा!
एरव्ही दाक्षिणात्य सापडेल त्याच्यात मिरे घालतात, पोंगलमध्ये तर तांदळातांदळाला मिरीचा दाणा वेचावा लागतो, पण या बिर्याणीमध्ये मात्र मिरे घातलेले पाहिले नाहीत.
मटण घालून कसे करायचे ते मला माहित नाही, मी कधी बनवले नाही.
मराथीमोक्कूला मराठीत काय म्हणतात असं गूगलला एकदा विचारून बघा चेट्टीनाड मसाल्यांमध्ये हा सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे.
आमाला चेट्टीनाड म्हट्लं की
आमाला चेट्टीनाड म्हट्लं की फक्त सिमेंट आठवतं.
टेस्टी वाटतेय बिर्याणी.
http://www.google.co.in/url?s
http://www.google.co.in/url?sa=i&rct=j&q=&esrc=s&source=images&cd=&cad=r... मराथी मोक्कू, मसाला वेलचीसारखे असतं का हो नंदिनीतै?
http://www.renushome.com/indi
http://www.renushome.com/indian-spices-glossary-indian-spices-english-hi...
इथे ते म्हणाजेच केपर्स असं दिलं आहे. फोटो पण आहे. हेच का नंदिनी ?
स्टार अनिस : चक्री फूल
स्टार अनिस : चक्री फूल
https://www.google.co.in/sear
https://www.google.co.in/search?q=marathi+mokku&es_sm=93&tbm=isch&imgil=...
हे मराथी मोक्कू.
नंदिनी, बिर्याणीत उकडलेली
नंदिनी, बिर्याणीत उकडलेली अंडी वा आम्लेट टाकल्याने चव बिघडते असा अनुभव आहे. बटाटे टाकल्यानेही असाच चवीचा ऱ्हास होतो. हे पदार्थ पुरवठ्यास (filler) म्हणून टाकतात का?
आ.न.,
-गा.पै.
गामापैलवान, बिर्याणीत आमलेट
गामापैलवान, बिर्याणीत आमलेट टाकायचं नाही. साईड डिश म्हणून द्यायचं. - ही खास चेट्टीनाड पद्धत. उकडलेली अंडी बिर्याणीमध्ये मिक्स करून किंवा सेपरेट द्यायची हे मात्र इकडे सर्वत्र बघायला मिळतं. चवीचा र्हास वगैरे माहित नाही. पण आवडत नसेल तर टाकू नका. हाकानाका.
बिर्याणीसोबत उकडलेलं अंड
बिर्याणीसोबत उकडलेलं अंड देताना बघितलं आहे पण ऑम्लेट पहिल्यांदाच ऐकते आहे. एकुणात रेसिपी भारी असल्यानं ते किंवा हे वापरून करण्यात येइल
फोटो?
मस्त रेसीपी! इंग्रोत मराथी
मस्त रेसीपी!
इंग्रोत मराथी मोक्कू मिळते का बघायला हवे.
रेसिपीच्या लेखनात सौजन्याचा
रेसिपीच्या लेखनात सौजन्याचा फारच र्हास झाल्यासारखा वाटतोय. पुणेरी पाटी वाचल्यासारखे वाटले.
मस्त आहे. मी चे. चिकन नेहमी
मस्त आहे. मी चे. चिकन नेहमी करते. अभि बिर्यानी भी करें गे. तलपकट्टू बिर्या णी पण छान लागते. सूप्पर.
मस्तय रेसिपी!
मस्तय रेसिपी!
>>आमाला चेट्टीनाड म्हट्लं की
>>आमाला चेट्टीनाड म्हट्लं की फक्त सिमेंट आठवतं. <<
भारी रेसिपी..
रेसिपी पेक्षा लिखान आवडले.
रेसिपी पेक्षा लिखान आवडले.
धन्यवाद, सुप्रिया. बदल केलेला
धन्यवाद, सुप्रिया. बदल केलेला आहे.
खतरनाक .. फोटू हवा होता मात्र
खतरनाक .. फोटू हवा होता मात्र ... करुन बघण्यात येईल लवकरच ..
(No subject)
रेसिपीच्या लेखनात सौजन्याचा
रेसिपीच्या लेखनात सौजन्याचा फारच र्हास झाल्यासारखा वाटतोय. स्मित पुणेरी पाटी वाचल्यासारखे वाटले.>>> बरोब्बर!
फोटो नसल्याने कमेंट करू इच्छित नाही.
चिकन ऐवजी बटाटे चालतील. फक्त एक उप्कार करा आणि त्याला "बिर्याणी" म्हणू नका. बटाटे पुलाव वगैरे म्हणा!>> तुम्हाला व्हेज. चेट्टीनाड बिर्याणी माहिती नाहीसं दिसतंय. त्यात अर्थात बटाटा नसतोच, मटार, गाजर, फरसबी आणि कंद (होय!) या भाज्या घालतात. बाकी मसाला हाच असाच. सांबार कांदे तेलात परतून वरूनही घालतात.
नाग केशर बहुदा- मराटी मोक्कु
नाग केशर बहुदा- मराटी मोक्कु
मंजूडी, बिर्याणी बाय डीफॉल्ट
मंजूडी, बिर्याणी बाय डीफॉल्ट नॉनवेज. व्हेज बिर्याणी म्हणजे उगंच आपलं मनाचं समाधान केल्यासारखं!!
श्यामली, येस्स. थँक्स. बदल करते.
नवीन ओव्हन घेतल्यावर त्या
नवीन ओव्हन घेतल्यावर त्या सोबतच्या रेसिपि बुक मधे चेट्टीनाड चिकन ची रेसिपी होती.करुन पाहिली.अर्थात मस्तच.पण त्यात टीपीकल फोडणी ,कढीपत्ता वगैरे सगळ होत. आनि नारळ दुध नव्हत.
त्यापेक्षा ही रेसिपि वेगळी आहे.नक्की करुन पाहण्यात येइन.
तृप्ती, हवं तर बटाटे वापरा पण
तृप्ती, हवं तर बटाटे वापरा पण पनीर वापरू नका. त्याइवजी बेस्ट म्हणजे अंडी वापरा आणि अंडाबिर्याणी करा.
अंकु, नुसतं चिकन चेट्टीनाड वेगळं. त्याची रेसिपी पण लवकरच टाकेन.
मस्तय रेसिपी... लिखाण पण आवडल
मस्तय रेसिपी...
लिखाण पण आवडल ..
मी खालीये ही बिर्यानी ,
मी खालीये ही बिर्यानी , तमिलनाडू मधे. बिर्यानी म्हणजे सुट्टा लांब, राईस ह्या गृहितकाचा चकनाचूर.
शेवटी मनातल्यामनात नाव वेगळ ठेवल आणि खाल्ला. टेस्ट भारी मात्र. त्याबरोबर चुक्का ( हा सौदिंडियन उच्चार आहे मराठीत सुक्कं अस म्हणता येइल) हा पदार्थ , कढीपत्ता, आणि खडा गरम मसाला यात रोस्ट केलेल चिकन. बिर्यानीच्या बाउल वर एक उकडलेल्या अंड्याच फूल मस्ट
छान.करुन बघावी
छान.करुन बघावी लागणार.
दिल्लीच्या आंध्राभवन मधे मस्त मिळते चेट्टीनाड चिकन. आंध्राथाळी मागवुन बरोबर चेट्टीनाड चिकन च्या प्लेट मागवायच्या. लै भारी !!!!!
रेसिपी वाचून करायला हवी अस
रेसिपी वाचून करायला हवी अस वाटायला लागलाय. फोटो पण टाक न म्हणजे जरा अंदाज येतो.
अंकु, नुसतं चिकन चेट्टीनाड वेगळं. त्याची रेसिपी पण लवकरच टाकेन. - नक्की टाक
आणि हो तो मसाला पुण्यात कुठे मिळेल का ? ( हा प्रश्न पुणेकारासाठी )
केरळी किराणा /वस्तू/मसाले
केरळी किराणा /वस्तू/मसाले मिळणारी काही दुकान असतात ना कॉफीच्या घमघमाट वाली , तिथे असावा. रास्तापेठेत आहेत . औंध रोडलाही आहेत.
नंदे, <<मीठ : उगं रंग
नंदे, <<मीठ : उगं रंग येण्यापुरती ( हे कॉपीपेस्टचे दुष्परिणाम आहेत) मीठ चवीनुसार घाला.>>
छान रेसिपी. मराथी मोक्कू
छान रेसिपी.
मराथी मोक्कू म्हनजे नागकेशर नाही. नागकेशर खरेच एका फुलातले तंतू असतात.
नागकेशर आहे माझ्याकडे. ते
नागकेशर आहे माझ्याकडे. ते लवंगेसारखे दिसते.
http://www.nandyala.org/mahanandi/archives/2007/10/14/naaga-keshar-clove...
या लिंकवर लवंग, नागकेशर आणि मराटी मोकू चा फोटो आहे.
Pages