शेजवॉन सॉस/ चटणी

Submitted by रश्मी. on 21 January, 2015 - 07:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

शेजवॉन सॉस.

लागणारा वेळः१० मिनिटे. ( साहित्य तयार असेल तर)

साहित्यः १२ ते १५ सुक्या लाल मिर्च्या गरम पाण्यात भिजवाव्यात.,२ टेबलस्पून लसुण बारीक चिरुन, ६ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर, २ चहाचे चमचे साखर, २ टेबलस्पून खायचे तीळाचे तेल, १ चहाचा चमचा मीठ.

क्रमवार पाककृती: 

कृती:- भिजवलेल्या सुक्या लाल मिर्च्या पाण्यातुन निथळुन काढाव्यात आणी त्यातल्या बीया काढुन टाकाव्यात. तेल सोडुन मिर्च्या बरोबर इतर सर्व पदार्थ मिक्सरमध्ये गन्धासारखे बारीक वाटुन घ्यावेत. नन्तर कढईत तीळाचे तेल चान्गले कडकडीत तापवावे आणी त्यात ही मिर्चीची पेस्ट घालुन पटापट चान्गले हलवुन घ्यावे. नीट एकत्र झाले पाहीजे. मग गार करुन एअर टाईट डब्यात भरावे.

वाढणी/प्रमाण: 
४ जणान्करता
अधिक टिपा: 

यात पाण्याचा अन्श नसल्याने फ्रिझमध्ये ही पेस्ट ४ - ५ दिवस टिकते.

ही कृती मी स्व. तरला दलाल यान्च्या कृतीतुन घेतली होती. अजूनही मला ते लेटर येते. मी घरी बनवलीय. चान्गली होते, अगदी हॉटेलसारखी चव नाही आली तरी निदान घरी केल्याने बाकी काळजी घेता येते. साधारण अर्धा ते पाऊण कप बनते. अशी बनवुन ठेवली तर एक दिवस चायनीज भेळ तर दुसर्‍या दिवशी न्युडल्स बनवुन सम्पवु शकतो.

माहितीचा स्रोत: 
स्व. तरला दलाल
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त ...
मी पन बनवते पण पाण्यात भिजवत नाही .. लाल मिरच्या + लसुण पाकळ्या + थोड अद्रक + मिठ + व्हिनेगर हे सर्व साहित्य पाण्यात ५ ते ७ मिनीट उकळून घेते .. पाणी निथळल्यावर मग मिक्सरमधून थोडिशी जाडसर पेस्ट करते आणि त्यानंतर तेलात बारीक कापलेल्या लसुण पाकळ्या आणि बारीक कापलेल्या अद्रक मधे फोडणी देते ..

टेस्ट अगदि हॉटेलसारखी येते .. Proud

छान प्रकार. पाण्याएवजी थेट व्हीनीगरमधेच मिरच्या भिजवल्या तर जास्त टिकेल.
वसईला ख्रिश्चन लोक या वाटणात पोर्क शिजवत असत आणि तसे शिजवलेले पोर्क खुप टिकते.

काल लहान प्रमाणात प्रयोग करुन बघण्यात आला. मिरच्या खुप तिखट असतील या भितीने जरा जास्त साखर टाकली आणी हो, थोडे केचप पण.
पण त्यामुळे सर्व चवी बॅलन्स झाल्या (असे आपले माझे मत आहे. :P)

मस्तं, मस्तं!
अनेकानेक धन्यवाद!
या गावात माझा जीव मुंबई स्टाईल शेझवान खाण्यासाठी तळमळत असतो.
कुठल्याच हॉटेलात परफेक्ट चव मिळाली नाही.
बर्‍याच जणांनी शेझवान म्हटल्यावर चक्कं व्हेज फ्राईड राईस आणून दिलाय आणि अरे शेझवान सॉस तरी आण याच्याबरोबर असं म्हटल्यावर टोमॅटो सॉसची वाटी!
Wink

आज असला परफेक्ट सॉस केलाय या रेसिपीने की बास!
डायरेक्ट पॅनचाच फोटो टाकतेय. मी फक्तं अर्ध्या लसूण पाकळ्यांची पेस्ट केली आणि अर्ध्या वाटल्या.

image_19.jpg

साती, छान रन्ग आलाय चटणी/ सॉसला . मोकळ्या भातासाठी तरला दलालच्याच टिप्स एकदा मी वापरल्या होत्या. पण जरा वेळखाऊ प्रकरण झाले तरी भात मोकळा झाला होता.

१ वाटी तान्दूळ धुवुन बाजूला निथळत ठेवावे. ६ वाट्या पाणी उकळत ठेवावे, त्यात किन्चीत मीठ व अर्धा टिस्पुन तेल घालावे. पाण्याला उकळी फुटली की बाजूला धुवुन ठेवलेले तान्दूळ त्या उकळत्या पाण्यात घालावे. पण अधुन मधुन सारखे ढवळावे. आवश्यक वाटल्यास अजून पाणी घालावे. पुरेसा मोकळा शिजला की चाळणीवर ओतुन निथळावा. ही चायनीज रेसेपी आहे.

होय रश्मी.
मी असाच करते मोकळा भात.
माबोवरच कुठेतरी वाचली होती आयडिया.
आता शेफ्रारा करायला कधी वेळ मिळतो कुणास ठाऊक!
चमचा चमचा शे सॉ खाऊनच संपेल असं वाटतंय तोपर्यंत.
Wink