फसवा डाव

Submitted by गणेश पावले on 15 January, 2015 - 07:01

पाठीवर वेदनांचा अलगद घाव आहे
गोड बोलून कुणाचा फसवा डाव आहे

तिजोरी खाली तरी नावात राव आहे
छळतो जवळचाच कोणी चोरून घाव आहे

जाणताच मर्म मनातले त्वरित धाव आहे
फिरताच हात मायेचा जिवात जिव आहे

कोपरयात मनाच्या आज तिचेच नाव आहे
वेशीवर उभा जिथे तिथेच खिन्न गाव आहे

जरी धागा मनात विणला श्रद्धेत देव आहे
कर जोडूनी उभा गणेश भक्तीत त्याच्या भाव आहे

कवी-गणेश पावले
१५\०१\२०१५

Group content visibility: 
Public - accessible to all site users