दोन वर्षाच्या मुलांसाठी पार्टी गेम्स

Submitted by मृदुला on 13 January, 2015 - 11:22

दोन वर्षाची ६ मुले व त्यांचे पालक अश्या पार्टीसाठी खेळ घ्यायचे आहेत. केवळ मुलांचे आणि मुले+पालक अश्या टीमचे असे खेळ मी शोधते आहे. आमचे कुटुंब वगळता बाकी लोक स्थानिक इंग्रज आहेत.

दोन वर्षाची मुले सूचना कितपत समजू शकतील आणि आनंदाने खेळू शकतील अशी मला थोडी शंका आहे. कोणाला या वयोगटाचा अनुभव असल्यास तेही सांगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन वर्षाची मुलं सूचना सम जून त्या फॉलो करणं कठीण असतं. अगदी साधे-साधे गेम्स या वयोगटाला बरे पडतात. एकातरी पालकाचा सक्रिय सहभाग असल्याखेरीज या वयोगटातली मुलं काही करणं कठीण आहे. त्यामुळे आई/बाबा कोणालातरी बरोबर घ्यावेच लागेल.

मी माझा मुलगा २ वर्षाचा असताना तो आणि त्याच्या प्लेग्रुप मध्यल्या मुलां करीता असे काही खेळ घेतलेले :

१. सगळ्यांनी मिळून ring around the roses - फक्त मुलांना जमत नसल्यास थोड्या पालकांना त्यात सामील करावे Happy

२. मुलांची पार्टी songs लावून त्यावर dance.
असा Maracas चा सेट घेऊन डान्स करताना ते वापरू शकतात. किंवा waving streamer पण वापरू शकता.
http://www.amazon.com/kilofly-Musical-Rhythm-Plastic-Maracas/dp/B00EF1JI8A

असं एखादं अ‍ॅक्शन song
https://www.youtube.com/watch?v=I5RUzkySseE
https://www.youtube.com/watch?v=bK0W18IZ-TI
https://www.youtube.com/watch?v=JFn2wEn3tFM

३. http://www.amazon.com/Hasbro-5294-Elefun/dp/B001R6ATXO - हे करायला मुलांना मज्जा येते. त्याच्यावर ३ वर्षे वय लिहीलय पण २ वर्षाच्या मुलांना पण चालायला हरकत नाही.

४. त्याखेरीज तळ्यात-मळ्यात सारखा साधासा खेळ, एखादं train चं गाणं लावून ( किंवा तोंडाने गाऊन) किंवा नुसतंच एकमेकांना पकडून गाडी करून गोल फिरायला सांगणे!

५. घरात् चालणार असेल तर किंवा बाहेर automatic बबल मेकर लावून ठेवलं मुलं ते पकडण्यात मस्त रमतात.

झुकझुकगाडी... एकेका स्टेशनावर एकेक डबा (पक्षी -मूल) जोडत जायचे. पण सध्याच्या छोटुल्यांना झुकझुकगाडीचा फंडा कितपत झेपेल हे माहीत नाही.

- मुले+पालक यांच्यासाठी डोंगराला आग लागली पळा पळा (Fire in the mountain run run run)
- मुलांसाठी अ‍ॅप्रोप्रिएट थिंग्स - म्हणजे एका टेबलवर आई बाबा वापरतात त्या वस्तू एकत्र ठेवायच्या. आणि त्यातल्या अ‍ॅप्रोप्रिएट वस्तू ज्याच्या त्याला नेऊन द्यायच्या. यात लेडिज हँडबॅग, टाय, जेंट्स/ लेडीज वॉलेट, रूमाल, ब्रश/ कंगवा, नेलपेंट इत्यादी वस्तू ठेवता येतील. हे आईचं/ हे बाबाचं अशी विभागणी मुलं करू शकतील अश्या रोजच्या वापरातल्या, मुलांना नेहमी नजरेस पडणार्‍या वस्तू ठेवायच्या.
- रंग ओळखता येत असतील तर एकाच रंगाचे फुगे गोळा करणे.
याअगोदर मुलांच्या बाबांसाठी फुगे फुगवणे हा गेम घेता येईल.

ज्या अनेकानेक बड्डे पार्ट्या पाहिल्या आहेत त्यातून काही आयडियाजः

* पार्टीला सगळे एकाच वेळी येत नाहीत. त्यामुळे आलेल्या मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी छान छान चित्रं आणि क्रेयॉन्स तयार ठेवायचे. ते रंगवण्यात मुलं छान गुंगून जातात. रंगवलेली चित्रं भिंतीवर सेलोटेपनं चिकटवायची. असंच नंबर टू नंबर जोडून बनवायची चित्रं देखिल प्रिंट करून तयार ठेवता येतील.

* सगळ्या मुलांचे आई-बाबा (विशेषतः आया) असले तर या खेळात मजा येते. emcee ने सगळ्या बच्चे कंपनीला एकत्र करायचे. आणि गाणी लावून नाचायला सांगायचे. मग थोड्या थोड्या वेळाने गाणं थांबवून दहा रु ची नोट, मोबाईल, कार की, रिंग, लिप्स्टिक, मिरर, रुमाल, बेल्ट वगैरे गोष्टी आणायला सांगणे. जो सगळ्यात पहिले आणेल त्याला काहीतरी छोटंस बक्षिस.

* एक जाड दोर घेऊन दोघांनी उभं राहणे. मुलांनी त्या दोराखालून पलिकडे जाणे. दोर हळूहळू खाली खाली आणायचा.

* इथे बरेच बड्डे पार्टीत inflatable bouncy moonwalks आणतात. त्यावर मुलं झक्कास खेळतात.

* मिनिट टू विन इट गेम्स.
उदा. टिश्यू अथवा तत्सम बॉक्सला टेटेचा बॉल आतबाहेर जाईल इतपत भोक पाडून त्यात काही (समजा १० टेटे बॉल्स भरणे.) हा बॉक्स मुलांच्या कमरेभोवती पोटावर येईलसा बांधता येईल अशी त्याला दोरी बांधणे. मग मुलानी उड्या मारून १ मिनिटात त्यातील बॉल्स बाहेर पाडायचे.

अथवा, एकाच रंगाचे साधारण २० प्लॅस्टिक ग्लास एकमेकांत अडकवून ठेवायचे. मग त्यावर एक वेगळ्या रंगाचा ग्लास अडकवून ठेवायचा. खेळ : मुलाच्या हातात ती चळत देऊन स्टॉपवॉच सुरू करायचं. त्या वरच्या वेगळ्या रंगाच्या ग्लासमध्ये सगळ्यात खालचा ग्लास काढून लावायचा. मग त्यावर पुन्हा सगळ्यात खालचा ग्लास असं लावत जायचं. एका मिनिटात पुन्हा तो वेगळ्या रंगाचा ग्लास वर आला पाहिजे. मग बक्षिस.

वरच्या फोटोत वेगवेगळ्या रंगाचे ग्लासेस आहेत पण जर एकच वेगळ्या रंगाचा असेल तर लहान मुलांना पटकन समजेल.

* Magnetic Fishing Game

* प्राणी अथवा कार्टुन कॅरॅक्टर्सचा हौजी

हौजी सारखीच पण आकड्यांऐवजी प्राण्यांची अथवा कार्टुन कॅरॅक्टर्सची चित्रे असलेली कार्डस बनवायची. ऐकूण समजा ३० काकॅ मधून प्रत्येक कार्डवर १० - १० वेगवेगळी कार्डस येतील असे बघायचे. त्या सगळ्या ३० काकँची टोकन्स (अथवा नावाच्या चिठ्या) बनवून एक एक काढून मग बाकी नेहमीच्या हाउजीसारखे खेळायचे.

* जरा मोठ्या मुलांसाठी असाच वर्डसर्चचा गेम बनवता येईल.

* पेपर प्लेट्सची संगित खुर्ची. सोपी आणि कमी जागेत खेळता येण्याजोगी.

* Tug of war

सही आयडिया आहेत. मामी केव्हढी कल्पक आहेस.

मंजूडी डोंगराला आग लागली कसे खेळायचे?

पार्टी घरात आहे. बाहेर बर्फ, पाऊस इत्यादी, त्यामुळे केवळ घरातच आहे. आईबाबाबाळ अशी टीम करावी काय? की केवळ एक पालक आणि बाळ?

शक्य वाटतील अश्या कल्पनांची शॉर्टलिस्ट
१. फुगे फुगवणे आणि ते बटाटा शर्यतीसारखे दुसर्‍या बाजूला आणून देणे. म्हणजे बाबा फुगा फुगवेल, पोर पळापळ करेल. (सगळ्यांना रंग ओळखता येतात की नाही कल्पना नाही. जस्ट दोनची झाली आहेत मुले. त्याचीच पार्टी आहे.)
२. > अ‍ॅप्रोप्रिएट वस्तू ज्याच्या त्याला नेऊन द्यायच्या ..
हा मस्त खेळ आहे. (माझी कोणती वस्तू रोहन ओळखेल बरे?)
३. दोराखालून जाणे.
हे जमेल बहुतेक बाळांना.

मंजूडी डोंगराला आग लागली कसे खेळायचे?>> एकाने "डोंगराला आग लागली पळा पळा/ Fire in the mountain run run run" हे म्हणत उभे राहायचे. खेळणार्‍या मंडळींनी त्याच्याभोवती गोलात पळायचे. मध्ये उभा राहणारा २, ३, ५ असे कुठलाही आकडा ओरडेल, खेळणार्‍यांनी त्या संख्येचा ग्रूप करायचा. ग्रूप बनवण्यासाठी तो आकडा गाठता आला नाही तर ती मंडळी आऊट. असं करत मंडळी एलिमिनेट करत जायची.