क्रॅनबेरी गाजर लोणचं

Submitted by प्रीति on 7 January, 2015 - 11:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या ताजी क्रॅनबेरी चिरुन (एकाचे दोन तुकडे)
२ वाट्या गाजर छोटे तुकडे चिरुन
लोणचं मसाला
मीठ
फोडणीसाठी तेल, मोहरी, जीरे, हिंग

क्रमवार पाककृती: 

क्रॅनबेरी, गाजर, मसाला, मीठ मिसळुन वरुन हिंगाची फोडणी घालावी.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

एक दिवस बाहेर टिकते, नंतर फ्रिजात ठेवावे. ताजचं मस्त लागतं, कुरकुरीत. मला नुसतं खायला पण आवडतं Happy पौष्टिक लोणचं Proud

माहितीचा स्रोत: 
माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही फोटो आहे!

क्रॅनबेर्‍यांबरोबर हिरव्या मिर्च्या घालून करावं म्हणते. कैरी, मिर्च्या आणि लिंबूलोणचं मसाल्यांपैकी कुठला घालावा?

कैरी, मिर्च्या आणि लिंबूलोणचं मसाल्यांपैकी कुठला घालावा>> मिरच्या घालून करणार असशील तर मिरची लोणचं मसाला घाल. मोहरीच्या डाळीचा स्वाद छान लागेल (असं मला वाटतं).

करवंद जाम आंबट नाही का होणार?
नक्की क्रॅनबेरीची चव लक्षात आली की मग ट्राय मारता येईल!

करवंद जाम आंबट नाही का होणार?>> गाजर आणि मसाला आंबट चव झाकेल बहुतेक. क्रॅनबेरीची चव आंबट, तुरट असते.

ओके Happy
घरात सध्या ताजं फ्लॉवर+गाजर लोणंच आहे.
करवंद मिळालीत की हे पाहावं करून!

मस्त आहे हे एकदम. करुन बघणार. आत्या ,करवंदाच लोणच घालताना मोहरीची डाळ एकदम बारीक करते. म्हणजे ती व्यवस्थित लागते अस तिच म्हणण. बहुदा तसच करेन.