चित्रकृती

Submitted by अत्रुप्त आत्मा on 6 January, 2015 - 07:08

{खुला"सा! :- (माझी १४ वर्षानंतर सुरु झालेली ही चित्र[कला] अजुन अत्यंत प्राथमिक अवस्थेत आहे. फक्त एक आयड्या लोकांपर्यंत पोहोचवावी..एव्हढ्याच हेतूने हे सादर करत आहे.. Happy त्यामुळे चित्राकडे दुर्लक्ष करावे. __/\__ ) }

काय मायबोली'करांनो??? शिर्षक वाचून एकंदर अंदाज आला नसेल ना? किंवा आलाच असेल,तर तो खालिल चित्र-कृती पाहिल्यावर चुकेल! ( कारण ही कोणती विशिष्ट चित्रकृती नसून्,फक्त तेलताटावर चित्र काढण्याची-कृती आहे! Wink ) काय आहे,की चित्रकला हा माझा अवडता विषय.पण प्रसंगचित्र आणि व्यंगचित्र याच्या बाहेर मी फारसा कधिही गेलेलो नाही. (शालेय स्पर्धांमधे वरील दोन्ही विषयात दोनदा ३रा, आणि तिनदा उत्ते-जनार्थ Wink क्रमांक मिळवला आहे मी! ) आणि, ९२ ला दहावी नंतर माझा वेदपाठशाळा..नावाच्या अ'भयारण्यात प्रवेश झाल्यावर पुढे ६ वर्ष ,माझा या सगळ्या (माझ्या Wink ) मूळ जगाशी संबंध तुटलेलाच होता. त्यामुळे ही कला तशी कोपर्‍यातच पडून होती. पुढेही हे भटजीगिरीचे काम करायल्या लागल्या नंतर वास्तुशांतीचे वेळी दरवाज्यावर कुंकवानी शुभ्/लाभ/स्वस्तिक्/ओंकार या पलिकडे उडी मारायला मिळालेली नव्हती! (हां...पण दरवाज्यावरचा ओंकारातला गंपतीबाप्पा मात्र बेश्ट काढायचो हां मी! )

अश्यातच पहिली ३/४ शिकाऊ वर्ष गेली,आणि मग ही सगळी कला फुलांच्या रांगोळ्यांमधून डोकं वर काढायला लागली. यामुळे मात्र माझा एक फायदा झाला .तो असा,की ..माझ्याकडे,बरेचसे कलाआसक्त यजमान वाढले..(किंवा आले त्यांच्यातली आसक्त-कला वाढली! Wink ) त्यामुळे, अश्या अनेक प्रकारच्या गोष्टी ..या लोकांकडे पहायला मिळू लागल्या. अजुनंही मिळत आहेत. एकदा एका गुज्जु क्लायंट कडे एका महिलेनी आरतीचं ताट सजवून आणलं. मी पहिल्यांदा ते पहातच राहिलो. कारण आतली २ कलात्मक निरांजनं मला नविन नव्हती पण त्याखाली वेलव्हेट्चा नाजुक हात लावावा,असं काहितरी दिसत होतं. मी आरती झाल्यावर त्यात सहज हात लावला ,तर बोट चटकन पुढे घसरलं..आणि ते वेलव्हेट् पुसलं गेलं . मला काहि क्षण काहि कळलं नाही. नंतर मात्र माझा प्रश्नार्थक चेहेरा पाहून ,सदर महिलेनी ते ताट बाजुला ठेवलं आणि मला...

महिला:- ओ पंडित जी.. ये दोखो
मी:- क्या जी?
महिला:- ये थाली को ऐसे तेल लगाके उसपर ये कुंकूम ऐसा डाल के... ( वगैरे वगैरे)

असं करून मला हे पहिलं काम शिकवलं .. मी ही लगेच त्यावर फुलाच्या डेखानी भला मोठा ओंकार काढून त्यांना गुरुदक्षिणा दिली.. आणि तेंव्हापासून मला मूड आला आणि हतात वेळ असला तर आमच्या कामात मी असली काहितरी चित्र (वि)चित्र पद्धतीनी जमतील तशी काढून माझी ही,मागे पडलेली चित्रकलेची हौस भागवून घेतो...

(हुश्श्श्श्श्श्श्श्श्!!!!!!!!!!! झाली एकदाची ती प्रस्ताव'ना! Wink ) आता मूळ गोष्टीकडे वळू या... तर आपण ही छोटीशी चित्रकृती टप्प्या ट्प्प्यानी पाहू...

१) हे साहित्य... एक ताट्,तेल,फुल,काडी,हळद/कुंकू (किंवा आपण तसे इतर रंगंही घेऊ शकतो.फक्त ते तेलावर-बसणारे हवे.तेलात--जाऊन बसणारे नको! ;))
https://lh4.googleusercontent.com/-YG9DT9-KLQc/VKuxrAmh1II/AAAAAAAAGqM/GRGgq5H3pgI/w749-h581-no/my%2Bfone%2B2%2B599.jpg
२) ताटात २ थेंब गोडेतेल टाकून/फुलानी नीट पसरविणे.
https://lh4.googleusercontent.com/OYpbQ2EGoIyKcuFUkISlyvd5DDJ0He4PNWuJNeEWoj8=s148-p-nohttps://lh5.googleusercontent.com/l0EQ5YR8AJKHaCOlLzIHU1khBtmNSpF8afdgdHPaMJ8=s148-p-no
३) आता ,ताटाच्या साइडपट्टीवर हळद पेरुन घ्यायची.पण जास्त मधे अजिबात पडू द्यायची नाही.कारण मग परत ती हळद पुसा..तिथे तेलानी पॅचअप करा..अश्या नसत्या कटकटी होऊन बसतात.
https://lh4.googleusercontent.com/-oEjwFy5d2kc/VKuyq3XDb6I/AAAAAAAAGqk/xSPbx6WgTZk/w694-h581-no/my%2Bfone%2B2%2B602.jpg
४)मग कणकेला चाळण मारल्यासारखं,ताट हलकं हलकं हलवायचं. आणि नंतर एकदम पलटी मारून खाली(घेतलेल्या) पेपरावर हलकेच अपटायचं.म्हणजे,एक्स्ट्रो लागलेली हळद -पडते.
https://lh4.googleusercontent.com/-jcPqjluWUbo/VKuyw7-7i-I/AAAAAAAAGqs/fFLTiSQFX-0/w621-h581-no/my%2Bfone%2B2%2B603.jpghttps://lh3.googleusercontent.com/-0w55B7OC6ck/VKuy6uaHA5I/AAAAAAAAGq0/kD_qjxODltA/w800-h450-no/my%2Bfone%2B2%2B604.jpg
५) आता..हळद-कृती प्रमाणेच ..मधल्या मोकळ्या ग्राऊंडवर कुंकू-लावणी करायची.
https://lh3.googleusercontent.com/n5VN-HNtkA7HRiQTyYDpYPzplxseE67O5NEo1uo9Pxs=w769-h581-nohttps://lh4.googleusercontent.com/hQw4co3M-xI-Wxwp7QyXDWVV4NOm0Ngl7BMgEz6tpY8=w800-h558-nohttps://lh6.googleusercontent.com/TsKRqnoWUWESvg7ehNhFUNBYqbAkSR3S5UAvKs2-tio=w714-h581-no
६) मग हळद/कुंकवाच्या मधून बोट मारून... https://lh6.googleusercontent.com/ut6vUP0eRiXAb8-bPzLEJwD3D_S6MBEGf35rU5XJy-4=s148-p-no घेतलं..
की ही अशी तयार होते..ती आपली चित्रखरडपाटी!
https://lh4.googleusercontent.com/3jvVh37_3Rt1uTTMLXpCbnfBWsqePOMnbnlMbFscHRk=w723-h581-no
७) आणि मग काय.. ? जसा आपला हात तसा सापडेल जगन्नाथ.. करायची मग खेळायला सुरवात
https://lh4.googleusercontent.com/-sD1u4aUuJ8E/VKu1UTIb_ZI/AAAAAAAAGrw/-3vwzbucNno/w800-h450-no/my%2Bfone%2B2%2B611.jpghttps://lh3.googleusercontent.com/-es86nWhC8UY/VKu1MwkFxjI/AAAAAAAAGro/TX1NP_UBCPI/w326-h580-no/my%2Bfone%2B2%2B610.jpghttps://lh4.googleusercontent.com/-52t7U1fFpTI/VKu1ZleILUI/AAAAAAAAGr4/I4PYZ3nLsBE/w528-h581-no/my%2Bfone%2B2%2B612.jpg
८) "आता ह्याचं करायचं काय हो मग???" सांगतो ना..! एकतर त्यात निरांजनं ठेऊन आरतीसाठी वापरा,अथवा अगदी ओवाळणीचं ताट म्हणूनही वापरा... किंवा मग आंम्ही करतो तसलं काहि तरी करा.
"काय करता हो तुम्ही?" :- पहा खाली...
(लघुरुद्र असल्यामुळे शंकराच्या फोटो ऐवजी पुजे मागे ठेवणे )
https://lh6.googleusercontent.com/-bDLDJKcl5oQ/VKu1q7WMKQI/AAAAAAAAGsI/wo3exIiqBpQ/w326-h580-no/my%2Bfone%2B2%2B614.jpg
९)आरती करताना प्रसन्नतेत भर पडायला हे ही एक..उपयोगी!
https://lh4.googleusercontent.com/-igcxxlBeSDk/VKu1hIEpVpI/AAAAAAAAGsA/n6_70b9mRP0/w326-h580-no/my%2Bfone%2B2%2B615.jpg
१०) निसर्गही का नाही बरं प्रसन्नतेत सामिल होणार मग? Happy
https://lh3.googleusercontent.com/-4txUlsn9gEQ/VKu12mjqJ6I/AAAAAAAAGsQ/CrhgZnvysmg/w326-h580-no/my%2Bfone%2B2%2B613.jpg
००००००००००००००००००००००००००००========================००००००००००००००००००००००००००००००

म्हणा बरं मग आता.... हरं हरं महादेव!!!!!!!!!!!!!!!!

https://lh5.googleusercontent.com/-uDu6F8Bc4jc/VKvHq9jc3nI/AAAAAAAAGsg/6r-60jD9oJY/w800-h450-no/my%2Bfone%2B2%2B592.jpg

=======================================
नविन चित्रकृती!
https://lh5.googleusercontent.com/-NB-smjOjdPw/VK8qW9kpO2I/AAAAAAAAGtM/ekE9vT_ZbDU/w640-h581-no/IMG_20150108_183540365%7E2%7E2.jpghttps://lh6.googleusercontent.com/0F2BMNYkBQD4wKjhdSBCTj9gE-tk1xISMVqY1JmwmxE=w800-h566-no

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निसर्गही का नाही बरं प्रसन्नतेत सामिल होणार मग? >>> वाह! हेच निघाले तोंडुन १० वा प्रचि बघताना.

छान आहे चित्रकृती व सर्व प्रचिही.

मस्तच!
मी गणपतित अशा तेल लावून कुंकु पसरलेल्या ताटावर उदबत्तीच्या काडीने बारीक डिज़ाइन काढ़ते. साधारण मेंदीचे असते तसे किंवा पान फुलं त्यावर आरतीसाठी निरांजन ठेवले की अप्रतिम दिसते.
इथे दिवाळीत बरीच थंडी/वारे असते. बाहेर रांगोळी काढ़ने शक्य होत नाही. मग एका ताटाला किंवा chopping बोर्ड ला तेलाचा हात लावून त्यावर नेहमीची रांगोळी-रंग वापरून रांगोळी काढल्यास २-३दिवस टीकते. घरात बसून रांगोळी काढता येते. नंतर ताट/बोर्ड दारात नेऊन ठेवायचा.फक्त गोपद्म वगैर वेळेवर काढ़ते.

अत्रुप्त आत्मा तुम्ही अतिशय क्रिएटिव्ह आहात. सर्व गोष्टीतली तुमची रसिकता अगदी पोचते. मग ती मिसळ असो, फुलांची रांगोळी असो वा ही चित्रकृती असो Happy

फारच सुरेख. Happy

दक्षुतै +१ Happy

अनुतै, मस्तय तुझी आयडिया Happy बरेच दिवसांपासून मी दाराबाहेर रांगोळी काढणं बंद केलेलं. आता या पद्धतीने काढून बघते Happy

अत्रुप्त आत्मा, (तुम्हाला खरंतर हा आयडी शोभत नाही ) यू आर सिंपली ग्रेट Happy

मस्त आहे कलाकृती आणि फोटोज .अश्याप्रकारची ताटातली रांगोळीची आयडीया आवडली. आणि तुमचा आयडीपण , क्रिएटिव्ह आहे . Happy

छान idea ..आमच्या ग्रूपने एकदा ताटात flower arrangement केली होती. ताटाला चपातीचे भिजवलेल कणीक लावुन .मस्त होते ती पण... इथ photo upload होत नाहीये ...

छान आहे. आमच्या कडे पूजा सांगायला येणारे गुरुजी नेहेमीच असं काहीतरी सुंदर प्रत्येक वेळी नवं रेखाटतात.
फोटो असला तर डकवीन इथे.

हायला, भारी हाय की. Happy

बा द वे, डावखुरा गुर्जी बघुन लोक कपाळावर आठ्या घालतात का?
तरुण नसली तरी जुणीजाणते ज्येष्ठ नागरीक? Happy

मी ही करते ओवाळणीच तबक वगैरे अशा तर्‍हेने. रांगोळी अथवा रांगोळी मिश्रित रंग ही वापरता येतात ह्या साठी. त्यामुळे रंगाचा चॉईस अधिक मिळतो.

अ आ सर्व फोटो सुरेख.

छान आहे कल्पना... Happy
गुजराथमधे नवरात्रात अष्टमीच्या दिवशी आरतीच्या तबकांची खास सजावट केली जाते.
सार्वजनिक नवरात्रात अशी घरोघरची तबकं सोसायटीत बसवलेल्या देवीसमोर ठेवली जातात. त्यांत दरवर्षी या प्रकारे सजवलेलं एकतरी तबक असतंच. काही ठिकाणी याच्या स्पर्धाही होतात. बायका खूप छान छान कल्पना लढवतात यासाठी.

@बा द वे, डावखुरा गुर्जी बघुन लोक कपाळावर आठ्या घालतात का? >> यात जुने/नवे हां अपवाद नाहिये . पण असतात काही तसे! मग मी ही त्यांना उत्तरतो:- आय एम अ बॉर्न कम्युनिस्ट! Lol

@निल्सन - धन्यवाद!
@दिनेश.-धन्यवाद!

@वत्सला
नंतर ताट/बोर्ड दारात नेऊन ठेवायचा.फक्त गोपद्म वगैर वेळेवर काढ़ते.>> व्वाह!

@दक्षिणा
अत्रुप्त आत्मा तुम्ही अतिशय क्रिएटिव्ह आहात. सर्व गोष्टीतली तुमची रसिकता अगदी पोचते. मग ती मिसळ असो, फुलांची रांगोळी असो वा ही चित्रकृती असो>> मनःपूर्वक धन्यवाद!

@रीया
@अत्रुप्त आत्मा, (तुम्हाला खरंतर हा आयडी शोभत नाही ) >> आपल्या भावनेला आदरपूर्वक नमस्कार. Happy पण मी काहि विशिष्ट कारणानीच हे नाम-धारण केलेले आहे. तस्मात..मी बदलेन्,तेंव्हा नामही बदलेल!
@यू आर सिंपली ग्रेट स्मित >> धन्यवाद!

@सिनि
मस्त आहे कलाकृती आणि फोटोज .अश्याप्रकारची ताटातली रांगोळीची आयडीया आवडली. आणि तुमचा
आयडीपण , क्रिएटिव्ह आहे. >> थँक्स हो. Happy

@kamini8

छान आहे चित्रकृती व सर्व प्रचिही.
ही चित्रकृती पद्धत माहीत नव्हती, करुन पाहीन.>> चला...काम सार्थकी लागले. Happy

@चनस

मस्त आयडिया!>>> धन्यवाद!

दक्षिणा

@अतृप्त आत्मा खरंच तुम्ही आयडी बदला.>> वरती स्पष्टीकरण दिलेलं आहे. तरिही आपल्या भावनेचा आदर आहेच.

@जाई.
सुरेख !>> धन्यवाद!

@पाख्ररु

छान idea ..आमच्या ग्रूपने एकदा ताटात flower arrangement केली होती. ताटाला चपातीचे भिजवलेल कणीक लावुन .मस्त होते ती पण... इथ photo upload होत नाहीये ...>> तो फोटो मला प्लीज मेल करता का? फुलातलं काय वेगळं आहे? हे पहायलाच हवं. मेल करा प्लीज. (पाहातो .आणि इथेही लावतो. )
माझा मेल आयडी:- Parag.divekar4@gmail.com

@मामी
किती सुरेख कल्पना. मस्तच.>>> थँक्स! Happy

@मनीमोहोर

मी ही करते ओवाळणीच तबक वगैरे अशा तर्‍हेने. रांगोळी अथवा रांगोळी मिश्रित रंग ही वापरता येतात ह्या साठी. त्यामुळे रंगाचा चॉईस अधिक मिळतो.>> वॉव.

अ आ सर्व फोटो सुरेख. >> धन्यवाद.

@ललिता-प्रीति

छान आहे कल्पना... स्मित
गुजराथमधे नवरात्रात अष्टमीच्या दिवशी आरतीच्या तबकांची खास सजावट केली जाते.
सार्वजनिक नवरात्रात अशी घरोघरची तबकं सोसायटीत बसवलेल्या देवीसमोर ठेवली जातात. त्यांत दरवर्षी या प्रकारे सजवलेलं एकतरी तबक असतंच. काही ठिकाणी याच्या स्पर्धाही होतात. बायका खूप छान छान कल्पना लढवतात यासाठी.>>> येस ..बडोद्यामधे पाहिलय हे.

@नंदिनी

दहावा फोटो खूप सुंदर आलाय.

चित्रकृतीदेखील सुंदरच. अजून फोटो असल्यास अवश्य डकवा.>>> येस्स नक्कीच.

@अश्विनी के
ही आयडिया मस्त आहे. एकदा नक्की करुन बघेन आरतीचं तबक अश्याप्रकारे.>> करुन पहा . आणि सांगा. Happy

@अनघा.

खूप सुंदर. अतिशय कल्पक आहात तुम्ही. त्या रांगोळ्या - फुलांच्या पण सुंदर होत्या.>> धन्यवाद. Happy

@urmilas

अतिसुंदर>> धन्यवाद. Happy

काल संकष्टीला एके ठिकाणी सहस्रावर्तने करत असता,केलेल्या चित्रकृती

https://lh5.googleusercontent.com/-NB-smjOjdPw/VK8qW9kpO2I/AAAAAAAAGtM/ekE9vT_ZbDU/w640-h581-no/IMG_20150108_183540365%7E2%7E2.jpghttps://lh6.googleusercontent.com/0F2BMNYkBQD4wKjhdSBCTj9gE-tk1xISMVqY1JmwmxE=w800-h566-no
=======================================

Pages