परतोनि पाहे - एक काल्पनिका

Submitted by वीणा सुरू on 24 December, 2014 - 06:24

पूर्वी मोठ्या आकाराचे सेल फोन होते. किंमत सोळा हजाराच्या पुढे होती. खूप श्रीमंत लोकांकडेच ते होते.
इनकमिंग आठ रुपये आणि आउटगोईंग सोळा रुपये असे काहीसे चार्जेस होते असं अंधूकसं आठवतंय. त्या काळी तो फोन स्टेटस सिंबॉल म्हणून काही लोक जवळ बाळगत. तर इतरांना त्यांचा हेवा वाटत असे. मोबाईल क्रांती वगैरे काही तरी बोललं जायचं. चार चौघात हा फोन वाजला की लोकांना तो फोन दिसेल अशा पद्धतीने बाहेर काढून त्यावर बोलण्यात त्या सेलधारी व्यक्तीला कोण गुदगुल्या होत असतील ना ? इतरांकडे हा फोन नाही आपल्याकडेच आहे ही भावना त्याला इतरांपेक्षा वेगळं समजायला लावत असेल.

आपल्याला आता एक खेळ खेळायचा आहे. तो काळ डोळ्यासमोर आणायचा आणि असं समजायचं की त्या काळात असा फोन बाळगणारी व्यक्ती आपल्या या विश्वातून बाहेर गेली असेल आणि काही कारणाने आता परतून आली तर काय होईल याची कल्पना करायची. या विश्वातून बाहेर जाण्याची असंख्य उदाहरणे असू शकतील. माझ्या कल्पनेप्रमाणे एखाद्या बेटावर, अंटार्क्टिका सारख्या खंडावर किंवा मागास देशात अडकून पडणे जिथे दळणवळणाची सोय नसेल, अंतराळात गेलेली असणे, कोमात गेलेली असणे, हिमालयात अडकून पड्लेली असणे, ज्यांना अद्भूतरम्य कल्पना आवडतात त्यांनी ही व्यक्ती मृत झाल्यानंतर ती परत येणे या कल्पनेचा आधार घेतला तरी चालेल. या विश्वातून बाहेर जाणे, इथल्या घडामोडींबद्दल अनभिज्ञ असणे आणि आल्यानंतर ज्या क्षणी इथून ती गेली त्या क्षणापर्यंतचं (फक्त) सगळं लक्षात असणे हे जास्त महत्वाचं आहे, बाहेर कशी गेली हे नाही.

कल्पनाशक्तीला वाव देणारा हा खेळ आहे. कसलेही नियम नाहीत. ज्याला जसे सुचेल तसं त्याने लिहायचं. फक्त ती व्यक्ती आताच्या काळात थेट आल्याने तिला मधलं काहीच माहीत नाही हे लक्षात ठेवायचं. ( आणि प्लीज विषयाला धरून रहायचं).

तर मग लिहीताय ना ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष. शाखाचे सिनेमे ओळखण्यासाठी किंवा त्याबद्दल क्विज चालवण्यासाठी वेगळा धागा काढा प्लीज. इथे अपेक्षित असलेले लिखाण तुम्ही करू शकता.

सर्वांना नाताळाच्या शुभेच्छा !

परतुन काय अन काय काय ?
माझे वडिल अजुनही म्हणतात की पुर्वीचा नोकियाचा मोठी बटने असलेला फोनच किती छान होता. Happy

ओम शांती ओम उत्तर येणे ठिक आहे, किंबहुना संकल्पनेच्या बरेच जवळ आलात..
पण बाजीगर ?? का ही ही हां >>>>>>

अरे बापरे ! ओम शांती ओम नाही मग कोणता?? त्रिमूर्ती ??

एक खरी गोष्टः
आमच्याकडे अमेरिकेत आल्यापासून बटनवाले फोनच होते. पुढे मुलगा ५ वर्षाचा झाल्यावर नवीन फोन आणायला दुकानात गेलो. तिथे तो जुन्या स्टाईलचा डायल अप फोन बघत होता. तो कसा वापरायचा हे त्याला दाखवल्यावर त्याला इतकी गंमत वाटली की तो हट्टच धरून बसला की मला अस्साच फोन हवा. (मग काय, सगळ्यात स्वस्त फोन तोच असल्याने मी पण खूष.)

अजूनहि माझ्या वयाचे अनेक मित्र, जीपीएस न वापरता, जुन्या काळाप्रमाणे, जिथे जायचे तिथे फोन करून, (फोन मात्र अत्यंत मॉडर्न म्हणजे बटनवाले नि फोनशी वायरने जखडलेले ) सर्व डिरेक्शन्स डिटेलमधे विचारून घेतात.

म्हणजे कुठे जाऊन परत यायच्या ऐवजी इथे राहूनच पुढे न गेलेले अनेक लोक आहेत.

चला उत्तर फोडतो..

मित्रांनो नावातच हिंट होती की..

ते परतून आले तर....

नाही आठवले...

आयेंगे, मेरे करण अर्जुन आयेंगे ..

झक्कीसर, खरंय तुमचं. आवडला प्रतिसाद
सेनापतीजी - तुमच्या प्रतिसादामुळे हेडर एडीट केला. धन्यवाद. तो काळ इतकाही जुना झालेला नाही, पण असं वाटतं खरं की खूप प्राचीन गोष्ट आहे. छान लिहीलय तुम्ही सुद्धा.

चेतन सुभाष गुगळे - छान प्रतिसाद देता तुम्ही. इथेही छान लिहील्याबद्दल धन्यवाद.

हे सर्व प्रतिसाद वास्तवाला धरून आहेत. आपल्या खेळात मात्र कल्पना करायची आहे...

धन्यवाद वीणाजी,

तुमच्या या खेळावरून मला एक नाटक आठवले जे मी सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर दहा वर्षांपूर्वी पाहिले होते. यात रमेश भाटकर, अविनाश नारकर व आशा काळे नाईक यांच्या प्रमुख भूमिका होत्या. १९७१ साली युद्धबंदी झालेले भारतीय सैनिक तीस वर्षांनी म्हणजे २००१ साली भारत पाक शिष्टाचारानुसार पाकिस्तान कडून मुक्त केले जातात. असाच एक सैनिक तीस वर्षांहूनही अधिक कालावधीनंतर आपल्या कुटुंबात परततो. त्याचा मुलगा आता पस्तिशीत असतो जो कुटुंबप्रमुख बनलेला आहे तो वडिलांना नीटसा ओळखू शकत नाही कारण वडिलांना त्याने शेवटचे पाहिलेले असते तेव्हा तो चार वर्षांचा असतो. त्यामुळे तो वडिलांशी नीट समरस होऊ शकत नाही. तर या सैनिकाचा आपल्या मुलाशी व सुनेशी सुसंवाद होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे पत्नीसोबत देखील त्याचा सहवास होऊ शकत नाही कारण त्याच्या अनुपस्थितीत कुटुंबाची जबाबदारी घेण्याकरिता तिने एक लहानसा कारखाना उभारलेला असतो ज्याचा वाढलेला व्याप ती अजुनही पाहात असते.

इकडे घरात मोबाईल, कॉम्प्युटर, इंटरनेट, फॅक्स, आन्सरिंग मशीन अशी विविध उपकरणे असतात जी कशी हाताळायची हे या सैनिकाला समजतच नाही. मुलाला काही विचारायला जावे तर तो म्हणतो तुम्हाला आता काय आणि कसं समजावणार कारण गेल्या तीस वर्षांत या सैनिकाने वर्तमानपत्र, टीव्ही, रेडिओ यापैकी कुठल्याही माध्यमातून बाहेरच्या जगाशी संपर्कच साधलेला नसतो. पत्नीकडेही वेळ नसतो. अखेर हा सैनिक वैतागतो आणि यापेक्षा आपण पाकिस्तानच्या तुरुंगातच बरे होतो अशी त्याची भावना होऊ लागते.

शेवटी पत्नी कारखान्याचा सारा कारभार गुंडाळून एक मोठी रक्कम उभी करते आणि पतीला सोबत घेत त्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेते. आपल्या पतीला त्याच्या साठी नव्या असलेल्या या जगात पूर्णवेळ साथ सोबत करणे ही आपली एकटीचीच जबाबदारी असून यात मुलगा व सून यांच्यावर विसंबून राहण्यात काहीच अर्थ नाही हे ती ओळखते.

ईलेक्ट्रॉनिक गॅझेट्स चा अविष्कार पाहून हबकून गेलेला सैनिक रमेश भाटकर यांनी चांगला रंगविला होता आणि आशा काळे नाईक यांनी त्यांच्या पत्नीच्या रुपात चांगली साथ केली होती. अविनाश नारकर ने मध्यमवयीन मुलाची भूमिका ठीकठाक केली होती.

या नाटकातले रमेश भाटकरचे गोंधळलेले वर्तन हे थोड्या फार प्रमाणात तुमच्या खेळात कल्पिलेल्या परतून आलेल्या नव्वदीतल्या व्यक्तिंच्या वर्तनाशी मिळतेजुळते असावे.

भाऊ Lol

भाऊ नमसकर सर
खूप हसवलंत तुम्ही तर... अगदी मार्मिक आहे चित्र !!

चेतन सुभाष गूगळे
धन्यवाद. एका चांगल्या नाटकाची ओळख करून दिल्याबद्द्दल. डीव्हीडीवर असेल तर मिळवून पाहता येईल. नाटकाचा विषय या धाग्याला एकदम सूट करतोय. पुन्हा एकदा आभार.

कृपया title बदलाल का? याच नावाचा एक अतिशय माहीतीपर बाफ आहे.
त्यात आणि यात गोंधळ होतोय.

http://www.maayboli.com/taxonomy/term/13696

याबद्दल म्हणताय का ?
आणखी बरेच बाफ दिसले सेम नावाचे. आक्षेप लक्षात आला नाही. आग्रह असल्यास बदलेन नाव.

<< आक्षेप लक्षात आला नाही. आग्रह असल्यास बदलेन नाव. >>

आग्रहामुळेच तर रुप देखील बदललं गेलं; नाव काय चीज आहे?

नाम गुम जायेगा, चेहरा भी बदल जायेगा | मेरी सोच ही मेरी पहचान है|

शीर्षक मघाशीच बदललं. हे खटकण्यासारखं नसावं ही अपेक्षा.
या नावाचे अनेक बाफ दिसले म्हणून आक्षेप लक्षात आला नाही म्हटलं. दुसरं काही नाही.

सुप्रभात.
सुरू बै, कधी परतोनि पाहणार ?
लोक तुमची वाट पाहत आहेत. कुणीही तुम्हाला काहीही म्हणणार नाहीत. परतोनि पहावे ही विनंती.

Pages