परतोनि पाहे - एक काल्पनिका

Submitted by वीणा सुरू on 24 December, 2014 - 06:24

पूर्वी मोठ्या आकाराचे सेल फोन होते. किंमत सोळा हजाराच्या पुढे होती. खूप श्रीमंत लोकांकडेच ते होते.
इनकमिंग आठ रुपये आणि आउटगोईंग सोळा रुपये असे काहीसे चार्जेस होते असं अंधूकसं आठवतंय. त्या काळी तो फोन स्टेटस सिंबॉल म्हणून काही लोक जवळ बाळगत. तर इतरांना त्यांचा हेवा वाटत असे. मोबाईल क्रांती वगैरे काही तरी बोललं जायचं. चार चौघात हा फोन वाजला की लोकांना तो फोन दिसेल अशा पद्धतीने बाहेर काढून त्यावर बोलण्यात त्या सेलधारी व्यक्तीला कोण गुदगुल्या होत असतील ना ? इतरांकडे हा फोन नाही आपल्याकडेच आहे ही भावना त्याला इतरांपेक्षा वेगळं समजायला लावत असेल.

आपल्याला आता एक खेळ खेळायचा आहे. तो काळ डोळ्यासमोर आणायचा आणि असं समजायचं की त्या काळात असा फोन बाळगणारी व्यक्ती आपल्या या विश्वातून बाहेर गेली असेल आणि काही कारणाने आता परतून आली तर काय होईल याची कल्पना करायची. या विश्वातून बाहेर जाण्याची असंख्य उदाहरणे असू शकतील. माझ्या कल्पनेप्रमाणे एखाद्या बेटावर, अंटार्क्टिका सारख्या खंडावर किंवा मागास देशात अडकून पडणे जिथे दळणवळणाची सोय नसेल, अंतराळात गेलेली असणे, कोमात गेलेली असणे, हिमालयात अडकून पड्लेली असणे, ज्यांना अद्भूतरम्य कल्पना आवडतात त्यांनी ही व्यक्ती मृत झाल्यानंतर ती परत येणे या कल्पनेचा आधार घेतला तरी चालेल. या विश्वातून बाहेर जाणे, इथल्या घडामोडींबद्दल अनभिज्ञ असणे आणि आल्यानंतर ज्या क्षणी इथून ती गेली त्या क्षणापर्यंतचं (फक्त) सगळं लक्षात असणे हे जास्त महत्वाचं आहे, बाहेर कशी गेली हे नाही.

कल्पनाशक्तीला वाव देणारा हा खेळ आहे. कसलेही नियम नाहीत. ज्याला जसे सुचेल तसं त्याने लिहायचं. फक्त ती व्यक्ती आताच्या काळात थेट आल्याने तिला मधलं काहीच माहीत नाही हे लक्षात ठेवायचं. ( आणि प्लीज विषयाला धरून रहायचं).

तर मग लिहीताय ना ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती व्यक्ती म्हणेल , 'च्यामारी, आमच्यावेळी मोबाईल आधुनिकपणाचे लक्षण होते नी आता अगदी उथळपणाचे झालेय.'

हा गृप परदेशातुन परतुन येणार्‍या लोकांसाठी आहे बहुदा
स्वर्गातुन / नरकातुन परत येणार्‍यांसाठी नाही आहे

मी एक उदाहरण म्हणून लिहीते.
तुमच्याइतकी मी काही बुद्धीमान नाही. चुकभूल द्यावी घ्यावी.

समजा त्या काळी असा मोबाईल बाळगणारी व्यक्ती परत आली तर त्याला अनेक बदल जाणवतील. त्याच्यात आपण कुणीतरी विशेष आहोत असा इगो असल्याने त्याला रिस्पेक्ट आपोआप मिळण्याची सवय असेल. पण या काळात त्याला अगदी लहान वयातले सुद्धा कुणी विचारणार नाहीत. उलट उत्तरं मिळतील. संस्कृती तर ओळखूच येणार नाही. शिवाय नावाला कुठे म्हणून हिरवा रंग दिसणार नाही. प्रदूषण, गर्दी याने जीव नकोसा होईल. तो भांबावून जाईल.
असं काहीसं मला सुचलं.

अहो वीणातै नवीन आहेत
तेव्हा
एजोताहोजाद्या
प्लीज एक्सप्लेनच!

डी विनिता
खरंच. इथे काही शब्द अगम्य वाटतात. पण विचारायची भीतीच वाटतेय. सरळ उत्तर मिळेल याची काही खात्री नाही इथं.

असा एक फोन अजूनही जपून ठेवलाय घरी. Happy मोठ्या भावाला कंपनीने दिला होता मोटोऱोलाचा फोन. ६ ईंच लांब आणि २ इंच रूंद.

माझ्या माहितीत २-३ जण आहेत जे असा फोन वापरायचे. पण अजून कोणी सुदैवाने गेलेले नाही. Happy

लोक परतून आले तर त्यांना काय वाटेल ते सांगता येणार नाही, पण माझ्यासारख्या लोकांकरिता - ज्यांना ते फोन आवडायचे अशांकरिता आनंदाची बातमी:

ते जुन्या पद्धतीचे भ्रमणध्वनी संच ज्यांना ब्रिक मोबाईल हँडसेट असे म्हणतात ते आता परत बाजारात आले आहेत. हे पाहा :-

https://www.youtube.com/watch?v=9UF4s4HfqE4

रुपये तीन हजार पेक्षाही कमी किंमतीत उपलब्ध

http://www.amazon.in/Binatone-Brick-Sim-Free-Mobile-Phone/dp/B00HA22F2C

http://www.ebay.co.uk/bhp/brick-phone

http://www.ebay.co.uk/bhp/binatone-mobile-phone

http://www.ebay.co.uk/bhp/retro-mobile-phone

म्हन्जे ९० च्या दश्कत्लि व्यक्ति आता २०१४ मधे आलि तर ... मुम्बै सरख्या थिकनि काहि फरक नहि पद्नार ...

पुने वगैरे मधे घब्रुन जयिल गर्दि आनि कार चा सुल्सुलत बघुन...

ओम शांती ओम उत्तर येणे ठिक आहे, किंबहुना संकल्पनेच्या बरेच जवळ आलात..
पण बाजीगर ?? का ही ही हां

Pages