नेत नाहीत कोठेच वाटा मला

Submitted by वैवकु on 20 December, 2014 - 01:25

नेत नाहीत कोठेच वाटा मला
काय , नेशील कोठे फलाटा मला
.
केवढे मखमली दु:ख पायांमधे
टोचणारच सुखाचा सराटा मला
.
थांबतो !!! ..मस्त उमलून खिडकीत ये ..
हास गालात अन बोल टाटा मला
.
वाट मागायची कौतुके नेहमी
फोडला मीच मग एक फाटा मला
.
छान वाजेन मी फार गाजेन मी
दे अता एक मोठा चव्हाटा मला
.
पायटे मारुनी जन्म झिजतोय हा
एकदा देच हातात हाटा मला
.
एक इच्छा करा पूर्ण माझी जरा
छान आरास घ्या आणि थाटा मला
.
पाहुया काय करतेय अदलाबदल
हा कसाटा तुला तो कसाटा मला
.
ज्ञानिया नामया चोखया अन् तुका
या पिसाटा मला रे पिसाटा मला
.
सांग मांडू कशी फायद्याची गझल
विठ्ठला रे तुझा फार घाटा मला

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली

नेत नाहीत कोठेच वाटा मला
काय , नेशील कोठे फलाटा मला

पहिली ओळ फारच छान.
माझा एक शेर आठवला:

वाटेलाही कळते कोठे
पाय कुठे ती वळते कोठे

केवढे मखमली दु:ख पायांमधे
टोचणारच सुखाचा सराटा मला

फारच छान.

थांबतो !!! ..मस्त उमलून खिडकीत ये ..
हास गालात अन बोल टाटा मला

छान. चिन्हांचा वापर कमी करता यावा. दुसरी ओळ अधिक चांगली करता यावी.
काही शेर (उदा. पायटे) काही शब्द (उदा. कसाटा) कळले नाहीत.
धन्यवाद.

गझल आवडली,
केवढे मखमली दु:ख पायांमधे
टोचणारच सुखाचा सराटा मला

हा शेर मी असा वाचला

केवढे मखमली दु:ख पायांमधे
टोचणारा सुखाचाच काटा मला

गैर समज नसावा

गझल आवडली,
केवढे मखमली दु:ख पायांमधे
टोचणारच सुखाचा सराटा मला

हा शेर मी असा वाचला

केवढे मखमली दु:ख पायांमधे
टोचणारा सुखाचाच काटा मला

गैर समज नसावा

छान