Submitted by वैवकु on 20 December, 2014 - 01:25
नेत नाहीत कोठेच वाटा मला
काय , नेशील कोठे फलाटा मला
.
केवढे मखमली दु:ख पायांमधे
टोचणारच सुखाचा सराटा मला
.
थांबतो !!! ..मस्त उमलून खिडकीत ये ..
हास गालात अन बोल टाटा मला
.
वाट मागायची कौतुके नेहमी
फोडला मीच मग एक फाटा मला
.
छान वाजेन मी फार गाजेन मी
दे अता एक मोठा चव्हाटा मला
.
पायटे मारुनी जन्म झिजतोय हा
एकदा देच हातात हाटा मला
.
एक इच्छा करा पूर्ण माझी जरा
छान आरास घ्या आणि थाटा मला
.
पाहुया काय करतेय अदलाबदल
हा कसाटा तुला तो कसाटा मला
.
ज्ञानिया नामया चोखया अन् तुका
या पिसाटा मला रे पिसाटा मला
.
सांग मांडू कशी फायद्याची गझल
विठ्ठला रे तुझा फार घाटा मला
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टाटा , फाटा आणि कसाटा सर्वांत
टाटा , फाटा आणि कसाटा सर्वांत जास्त आवडले!!!
धन्यवाद
आवडली
आवडली
नेत नाहीत कोठेच वाटा मला काय
नेत नाहीत कोठेच वाटा मला
काय , नेशील कोठे फलाटा मला
पहिली ओळ फारच छान.
माझा एक शेर आठवला:
वाटेलाही कळते कोठे
पाय कुठे ती वळते कोठे
केवढे मखमली दु:ख पायांमधे
टोचणारच सुखाचा सराटा मला
फारच छान.
थांबतो !!! ..मस्त उमलून खिडकीत ये ..
हास गालात अन बोल टाटा मला
छान. चिन्हांचा वापर कमी करता यावा. दुसरी ओळ अधिक चांगली करता यावी.
काही शेर (उदा. पायटे) काही शब्द (उदा. कसाटा) कळले नाहीत.
धन्यवाद.
कसाटा नावाचे आईसक्रीम माहित
कसाटा नावाचे आईसक्रीम माहित आहे. तोंडाला पाणी सुटले.
कसाटा नावाचे आईसक्रीम माहित
कसाटा नावाचे आईसक्रीम माहित आहे.
माझी ही झेप तेवढीच आहे.
माझ्या तोंडाला पाणी सुटले नाही.
गझल आवडली, केवढे मखमली दु:ख
गझल आवडली,
केवढे मखमली दु:ख पायांमधे
टोचणारच सुखाचा सराटा मला
हा शेर मी असा वाचला
केवढे मखमली दु:ख पायांमधे
टोचणारा सुखाचाच काटा मला
गैर समज नसावा
गझल आवडली, केवढे मखमली दु:ख
गझल आवडली,
केवढे मखमली दु:ख पायांमधे
टोचणारच सुखाचा सराटा मला
हा शेर मी असा वाचला
केवढे मखमली दु:ख पायांमधे
टोचणारा सुखाचाच काटा मला
गैर समज नसावा
छान
छान