कुटप्रश्न क्र. ३

Submitted by शाबुत on 6 December, 2014 - 23:26

तिन प्रेमी युगल जोडपे फिरायला जातात... तिन मुले-तिन मुली... जंगलात पुढे जाता-जाता त्यांना एक मोठी नदी लागते... ती नदी पार करण्यासाठी एक होडी तिथे बांधलेली असते... या होडिची फक्त दोन व्यक्ती वाहुन नेण्याची क्षमता असते... होडी इकडुन- तिकडे नेण्यासाठी तिथे वेगळा व्यक्ती नाही... आता वास्तव असे की... त्यांचा आपापल्या जोडीदारावर विश्वास नाही...
>> थोडक्यात एका जोडप्यातला मुलगा आणि दुसर्‍या जोडप्यातली मुलगी यांना आपल्या एका काठावर ठेवायचे नाही.
>> दोन मुले आणि दुसर्‍या जोडप्यातली एक मुलगी जिचा प्रियकर तिकडच्या काठावर असे चालु शकणार नाही.
>> एक जोडपे म्हणजे एक मुलगा आणि त्याच्या सोबतची मुलगी एका काठावर चालु शकतात.
>> थोडक्यात मुलींना दुसर्‍या मुलापासुन वाचवायचे.

@ ह्याचे उत्तर नक्कीच सोपे नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तीन जोड्या -

मुलगा १ - मुलगी १
मुलगा २ - मुलगी २
मुलगा ३ - मुलगी ३

पहिल्या ट्रीपला - मुलगा १ आणि मुलगी १ पलीकडच्या काठावर - मुलगा १ उतरतो. मुलगी १ परत अलीकडे येते.
दुसर्‍या ट्रीपला - मुलगी १ आणि मुलगी २ पलीकडच्या काठावर - मुलगी १ उतरते. मुलगी २ परत अलीकडे येते.
तिसर्‍या ट्रीपला - मुलगी २ आणि मुलगा २ पलीकडच्या काठावर - मुलगी २ उतरते. मुलगा २ परत अलीकडे येतो.
चौथ्या ट्रीपला - मुलगा २ आणि मुलगा ३ पलीकडच्या काठावर - मुलगा २ उतरतो. मुलगा ३ परत अलीकडे येतो.
पाचव्या ट्रीपला - मुलगी ३ आणि मुलगा ३ पलीकडे जातात.

(या वयात शाळेतली कोडी घालू नका हो)!

हा प्रश्न जुनाच नाही तर कालबाह्य सुद्धा आहे, कारण आजकाल जोडीदारावर विश्वास नसेल तर मुलाला मुलाबरोबर आणि मुलीला मुलीबरोबर सोडणेही घातकच Wink

त्यापेक्षा जशास तसे बदला घ्यावा, म्हणजे ज्याचा जोडीदार दुसर्‍या कोणाबरोबर विश्वासघात करत असेल त्याचा जोडीदार त्याचवेळी फ्री असल्याचा फायदा उचलत आपण विश्वासघाताचा बदला विश्वासघाताने घ्यावा.

अन्यथा हे कोडे आयुष्यभर पडतच राहणार. किती वेळा सोडवत बसणार...

अन्यथा हे कोडे आयुष्यभर पडतच राहणार. किती वेळा सोडवत बसणार...>>>

ॠन्मेष फॅन क्लब चालू करा रे कुणीतरी.मी तहहयात सदस्यत्व घेते.

@ स्पार्टाकस...>> चुकलात....
पहिलीच ट्रीप - पहिल्या नदी पार करणार्‍या जोडप्यातली जेव्हा मुलगी परत येते... तेव्हा इकडच्या काठावर दोन मुले आणि तिन मुली होतात....हे जमणारे नाही.
>>> तेव्हा पुढच्या सगळ्या ट्रिप चुकल्या.

*** उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा... शेवटी मी उत्तर देणार आहे.

अहो इकडच्या काठावर आली तरी ती लगेच दुसऱ्या मुलीला घेऊन जातेच ना. इतकी काय घाई म्हणतो मी विश्वासघात करण्याची

हो ना.. आणि त्या मुलाची गफ्रेंड तिथे हजर असताना कसा तो डाव साधणार..
अशी काही आयडिया असेल तर आम्हालाही द्या Wink

>>ॠन्मेष फॅन क्लब चालू करा रे कुणीतरी.<<
ॲग्रीड, अँड आय गाट्टु से - यु कॅन लव हिम, यु कॅन हेट हिम; बट यु कॅनाट इग्नोर हिम... nono.gifnono.gif

काय चाल्लय काय? चवथीच्या स्कॉलरशीप परीक्षेचे प्रश्न का विचारत आहात एकामागे एक? क्लुलेस वगैरे धागे एकदा वाचून पहा.

१) मुलगा१ व मुलगी १ प्रथम पलीकडे जातील. मुलगा १ परत येईल. (आता मुलगी १ पलीकडे, बाकीचे सगळे अलीकडे)
२) मुलगी २ व मुलगी ३ पलीकडे जातील. मुलगी १ परत येईल. (आता मुलगी २ व ३ पलीकडे , बाकीचे सगळे अलीकडे)
३) आता मुलगा २ व मुलगा ३ पलीकडे जातील. मुलगी २ परत येईल. (आता ३ नंबरची जोडी व मुलगा २ पलीकडे आहेत.)
४) मुलगा १ व मुलगी १ पलीकडे जातील व मुलगी १ परत येईल) (आता तिन्ही मुलगे व मुलगी ३ पलीकडे आहेत)
५) आता मुलगी १ व मुलगी २ पलीकडे जातील.

@ सानुली... Lol

>> भरत मयेकर तुम्ही चुकले आहात...
>> ट्रिप नं. ३... मुलगी २ परत येते... तेव्हा अलीकडे नंबर १ चा मुलगा आहे... म्हणायला त्याची मैत्रीण त्याच्या सोबत आहे... पण हे कोड्याचे योग्य उत्तर नाही.
>> परत प्रयत्न करा... किती कठिण असले तरी शेवटी उत्तर मी देणार मोबो.. करांच्या माहितीसाठी.

असा फ्लॅश चा एक गेम ऑलरेडी आहे ना.. आम्ही लहानपणी खेळायचो. अजुनही खेळतो.

राक्षस आणि माँक्स चा. त्यात असंच आहे. एका वेळेस दोन माँक आणि एक राक्षस असेल तर चालेल पण एका वेळेस दोन राक्षस आणि एक माँक असेल तर ते खाऊन टाकतात वै. तुम्ही कोणी खेळला नाहीये का कंप्युटरवर?

पहिल्या ट्रीपला - मुलगी १ आणि मुलगी २ पलीकडच्या काठावर - मुलगी १ उतरते. मुलगी २ परत अलीकडे येते.
दुसर्‍या ट्रीपला - मुलगी २ आणि मुलगी ३ पलीकडच्या काठावर - मुलगी २ उतरते. मुलगी ३ परत अलीकडे येते.
तिसर्‍या ट्रीपला - मुलगा १ आणि मुलगा २ पलीकडच्या काठावर - मुलगा २ उतरतो. मुलगा १ परत अलीकडे येतो.
चौथ्या ट्रीपला - मुलगा १ आणि मुलगा ३ पलीकडच्या काठावर - मुलगा १ उतरतो. मुलगा 3 परत अलीकडे येतो.
पाचव्या ट्रीपला - मुलगा ३ आणि मुलगी ३ पलीकडच्या काठावर

उत्तराची उत्सुकता ताणतोय....

@ अनिलभाई.

>> तिसर्‍या ट्रिपला.... जेव्हा मुलगा २ उतरतो... मुलगा १ परत येतो... तेव्हा पलीकडे मुलगी १ आणि मुलगी २ राहतात...सोबत मुलगा २ चुक.

पहिली फेरी : मुलगी १ व मुलगी २ पलीकडे . मुलगी २ परत.
दुसरी फेरी : मुलगी २ व मुलगी ३ पलीकडे. मुलगी ३ परत. (आता मुलगी १ व मुलगी २ पलीकडे आहेत)
तिसरी फेरी : मुलगा १ व मुलगा २ पलीकडे. मुलगा २ व मुलगी २ परत (जोडी १ पलीकडे)
चौथी फेरी : मुलगा २ व मुलगा ३ पलीकडे. मुलगी १ परत (आता तिन्ही मुलगे पलीकडे आहेत)
पाचवी फेरी : मुलगी १ व मुलगी २ पलीकडे. मुलगा ३ परत (आता जोडी १ व जोडी २ पलीकडे आहेत)
सहावी फेरी : मुलगा ३ व मुलगी ३ पलीकडे.
सगळ्यांची चारित्र्ये शुद्ध राहून सगळे पोचले एकदाचे पलीकडे.

वा मयेकर, सहा फेर्‍या मारल्यात पण इज्जत वाचवलीत पोरींची..
आता तिन्ही जोड्यांनी सात फेरे घ्यायला हरकत नाही Happy

पोहुन का जाउ शकत नाही ?
>>>
घ्या.. आधीच त्या लोकांचा एकमेकांवर विश्वास नाही, वर त्यात तुम्ही त्यांना पोहायला लाऊन भिजवा, कपडे ओले करा, मग थंडी वाजणार, शेकोट्या पेटणार... चारीत्र्यावर डाग पडू न द्यायचे कोडे सोडवत आहात की पाय घसरायची वातावरणनिर्मिती करत आहात!

>>घ्या.. आधीच त्या लोकांचा एकमेकांवर विश्वास नाही, वर त्यात तुम्ही त्यांना पोहायला लाऊन भिजवा, कपडे ओले करा, मग थंडी वाजणार, शेकोट्या पेटणार... चारीत्र्यावर डाग पडू न द्यायचे कोडे सोडवत आहात की पाय घसरायची वातावरणनिर्मिती करत आहात!<<<<

ऋन्म्या...भौ...हसुन हसुन मेलो ना मी !!!!

थोडक्यात मुलींना दुसर्‍या मुलापासुन वाचवायचे. >>>>>> ऋन्मेष धागाकर्त्याचे ही ओळ वाचली नाही का ? दुसर्या मुलापासुन वाचवायचे स्वतःच्या बॉयफ्रेंड पासुन नाही. Happy

Pages