शनिवारी रात्री१०:३० च्या सुमारास आमच्या अर्धांगाने "उद्या आपण काय करायच?" प्रश्न टाकला. मी आणि सासुबाई काहीच उत्तरलो नाही आणि आपापल्या कामांना लागलो.. मग श्री रानड्यांनी टॅबलेट चालु करुन गुगलबाबाला "places around Pune" असं साकड घातल.. आणि परत प्रश्न विचारला "भुलेश्वरला जायच का?" आम्ही दोघिंनी त्याच्याकडे बघितल ते चेहर्यावर असंख्य प्रश्नचिन्ह घेउनच.. प्रश्न असे होते "हे काय आहे?, कुठे आहे?, कस जायच?" इ.इ.
आमच्या हुश्शार नवर्याने ते सर्व प्रश्न लग्गेच वाचले आणि सांगितल की इथुन साधारण ६० किमीवर म्हणजे जवळपास १:३० तासाच्या अंतरावर पुणे - सोलापूर महामार्गावर यवतच्या जवळ एका डोंगरावर वसलेल हे मंदीर आहे.. नंतर त्याने टॅबलेट माझ्या हातात देउन बाकीच वाचायला सांगितल.. तिथे भेट देउन आलेल्या एका व्यक्तीने लिहीलेला सचित्र वृत्तांत होता.. त्यातिल फोटो बघुनच हे ठिकाण बघावच अस वाटल आणि मी अनुमोदन दिल.. नंतर तो वृत्तांत सासुबाईंना वाचायला दिला, त्यांनाही ते ठिकाण आवडल आणि त्यांनीही होकार दिला.. ठिकाण जवळ असल्याने रवीवारी सकाळी नाष्टा करुन निघायचे ठरले..
रवीवारी सकाळी नाष्टा वगैरे उरकुन ११:३० वाजता आम्ही भुलेश्वराच्या दिशेने कुच केले.. थंडीचे दिवस असल्याने वातावरण प्रसन्न होते आणि मध्यान्हीची वेळ आली तरी उन्हाचा कडाका जाणवत नव्हता.. हडपसर, मगरपट्टा सिटीमार्गे आम्ही मजल-दरमजल करत भुलेश्वरला पोचलो.. तिघेही प्रथमदर्शनीच मंदीर आणि परीसराच्या प्रेमात पडलो.. म्हणजे अगदी "भुललोच"
भुलेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार
एका उंच डोंगरावर हे भुलेश्वराच मंदीर आहे.. पूर्ण दगडी बांधकाम असलेल हे यादवकालीन मंदीर आहे.. मंदीराच्या भिंतीवर कोरीव लेणी आहेत.. औरंगजेबाने या मंदिरावर केलेल्या हल्ल्यात यातिल बर्याच लेणी विद्रुप झाली.. या हल्ल्यातुन वाचलेली काही लेणी बघितल्यावर त्यावेळच्या कलाकारांच कसब लक्षात येत..
सध्या या मंदिरात काही डागडुजीची कामे चालु आहेत. या मंदिरात आपण चालतही येउ शकतो त्यासाठी नीट बांधलेल्या पायर्या आहेत, तसेच मंदिराच्या अगदी पहिल्या पायरीपर्यंत वाहन नेण्याचीही सोय करण्यात आलेली आहे..
लेणी
औरंगजेबाच्या हल्ल्यात विद्रुप झालेली लेणी

लेण्यांच सौंदर्य न्याहाळत आम्ही मुख्य दैवताच्या गाभार्यापर्यंत येऊन पोचलो.. या शिवलिंगाच एक वैशिष्ट्य अस की यातील शाळुंका पूर्ण उघडता येते आणि आपण आणलेला प्रसाद त्यात ठेवता येतो.. आम्हाला जायला उशीर झाल्याने ते बघता आल नाही.. अस मानतात किंवा असा विश्वास आहे की जर शुद्ध अंतःकरणाने आणि संपूर्ण भक्तीभावाने या लिंगामध्ये प्रसाद ठेवला तर स्वतः शंकर तो प्रसाद भक्षण करतात.. या चमत्काराची प्रचिती आजही येत असल्याच समजत (ख.खो.दे.जा). तिथल्या गुरुजींकडुन असही समजल की आजपर्यंत जिथे जिथे शिवलिंग आहेत तिथे तिथे ती स्थापन केली गेली आहेत, हे शिवलिंग स्वयंभु आहे आणि जागृत आहे..
भुलेश्वर शिवलिंग
या गाभार्याबाहेर पितळी त्रिशुळ आणि डमरु उभ करुन ठेलेल आहे.. त्याच प्रचि काढण्याचा मोह आवराता येण शक्यच नव्हत
त्रिशुळ - डमरु
दर्शन घेउन झाल्यावर आम्ही बाहेर येउन मंदीराभोवतालचा परीसर न्याहाळत होतो. मंदिराच्या आवारातुन काढलेल्या या प्रचि

परतीच्या वाटेवर क्षुधाशांती करण्यासाठी कांचन नावाच्या एका शुद्ध शाकाहारी हॉटेलात गेलो.. तिथे मराठी थाळीची ऑर्डर दिली.. थाळी समोर आल्यावर तिचा फोटो काढण्याचाही मोह आवरता आला नाही.. ब्राह्मणी पद्धतीच मराठी जेवण आवडणार्याला हे जेवण नक्कीच आवडेल..
मराठी थाळी @ हॉटेल कांचन
मेन्यु: पोळ्या, भरल वांग, मेथी बेसन (मेथी घालुन केलेल पिठल), दही-कांदा, मसालेभात, कढी, जिलेबी, ठेचा, लोणच, पापड आणि दाण्याची चटणी..
काल अनेक दिवसांनंतर मी मला आवडते तशी जिलेबी खाल्ली.. बारीक नळी आणि पाकात मुरुनही कडक राहीलेली... मला आणि निलेशला इतकी आवडली जिलबी की आम्ही परत मागवलि.. या नंतर मागवलेल्या जिलेबीच्या द्रोणाने तर अगदी तृप्त होउन भरुन पावलो.. मस्त गरमागरम जिलेबी मिळाली सेकंड राउंडला.. 
या सगळ्या जेवणावर उच्च म्हणजे मातीच्या सुगडातल मसाला ताक... आहाहा! जातीच्या शाकाहारी खवय्यांसाठी हे हॉटेल म्हणजे मेजवानीच
सुगडातील ताक
मन आणि पोट दोन्ही तृप्त होउन तिथुन बाहेर पडलो व वाटेत येता येता विघ्नहर्त्या चिंतामणीच दर्शन घेउन आनंदी आणि प्रसन्न मनाने घरी परतलो..
बघा तुम्हालाही भुलवतोय का हा "भुलेश्वर"?
टीप: सर्व फोटो सौजन्य श्री. निलेश रानडे.. एकही फोटो मी काढलेला नाहीये
नाही नाही. माझा ब्लॉग वगैरे
नाही नाही. माझा ब्लॉग वगैरे नाहीये. तो टॉवर बघीतला की लगेच डोक्यात जातो आहे.
ब्लॉगवर नाही कांपो पण गुगलवर
ब्लॉगवर नाही कांपो पण गुगलवर रिव्ह्युज वगैरे काही लिहील आहे का तुम्ही भुलेश्वराबद्दल?
Pages