मन भुलवुन टाकणारा "भुलेश्वर"

Submitted by मुग्धटली on 1 December, 2014 - 03:07

शनिवारी रात्री१०:३० च्या सुमारास आमच्या अर्धांगाने "उद्या आपण काय करायच?" प्रश्न टाकला. मी आणि सासुबाई काहीच उत्तरलो नाही आणि आपापल्या कामांना लागलो.. मग श्री रानड्यांनी टॅबलेट चालु करुन गुगलबाबाला "places around Pune" असं साकड घातल.. आणि परत प्रश्न विचारला "भुलेश्वरला जायच का?" आम्ही दोघिंनी त्याच्याकडे बघितल ते चेहर्‍यावर असंख्य प्रश्नचिन्ह घेउनच.. प्रश्न असे होते "हे काय आहे?, कुठे आहे?, कस जायच?" इ.इ.

आमच्या हुश्शार नवर्‍याने ते सर्व प्रश्न लग्गेच वाचले आणि सांगितल की इथुन साधारण ६० किमीवर म्हणजे जवळपास १:३० तासाच्या अंतरावर पुणे - सोलापूर महामार्गावर यवतच्या जवळ एका डोंगरावर वसलेल हे मंदीर आहे.. नंतर त्याने टॅबलेट माझ्या हातात देउन बाकीच वाचायला सांगितल.. तिथे भेट देउन आलेल्या एका व्यक्तीने लिहीलेला सचित्र वृत्तांत होता.. त्यातिल फोटो बघुनच हे ठिकाण बघावच अस वाटल आणि मी अनुमोदन दिल.. नंतर तो वृत्तांत सासुबाईंना वाचायला दिला, त्यांनाही ते ठिकाण आवडल आणि त्यांनीही होकार दिला.. ठिकाण जवळ असल्याने रवीवारी सकाळी नाष्टा करुन निघायचे ठरले..

रवीवारी सकाळी नाष्टा वगैरे उरकुन ११:३० वाजता आम्ही भुलेश्वराच्या दिशेने कुच केले.. थंडीचे दिवस असल्याने वातावरण प्रसन्न होते आणि मध्यान्हीची वेळ आली तरी उन्हाचा कडाका जाणवत नव्हता.. हडपसर, मगरपट्टा सिटीमार्गे आम्ही मजल-दरमजल करत भुलेश्वरला पोचलो.. तिघेही प्रथमदर्शनीच मंदीर आणि परीसराच्या प्रेमात पडलो.. म्हणजे अगदी "भुललोच"

भुलेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार
Bhuleshwar Entrance.jpg

एका उंच डोंगरावर हे भुलेश्वराच मंदीर आहे.. पूर्ण दगडी बांधकाम असलेल हे यादवकालीन मंदीर आहे.. मंदीराच्या भिंतीवर कोरीव लेणी आहेत.. औरंगजेबाने या मंदिरावर केलेल्या हल्ल्यात यातिल बर्‍याच लेणी विद्रुप झाली.. या हल्ल्यातुन वाचलेली काही लेणी बघितल्यावर त्यावेळच्या कलाकारांच कसब लक्षात येत..

सध्या या मंदिरात काही डागडुजीची कामे चालु आहेत. या मंदिरात आपण चालतही येउ शकतो त्यासाठी नीट बांधलेल्या पायर्‍या आहेत, तसेच मंदिराच्या अगदी पहिल्या पायरीपर्यंत वाहन नेण्याचीही सोय करण्यात आलेली आहे..

लेणी
Bhuleshwar Status 1.jpg

औरंगजेबाच्या हल्ल्यात विद्रुप झालेली लेणी

Bhuleshwar Status.jpg

लेण्यांच सौंदर्य न्याहाळत आम्ही मुख्य दैवताच्या गाभार्‍यापर्यंत येऊन पोचलो.. या शिवलिंगाच एक वैशिष्ट्य अस की यातील शाळुंका पूर्ण उघडता येते आणि आपण आणलेला प्रसाद त्यात ठेवता येतो.. आम्हाला जायला उशीर झाल्याने ते बघता आल नाही.. अस मानतात किंवा असा विश्वास आहे की जर शुद्ध अंतःकरणाने आणि संपूर्ण भक्तीभावाने या लिंगामध्ये प्रसाद ठेवला तर स्वतः शंकर तो प्रसाद भक्षण करतात.. या चमत्काराची प्रचिती आजही येत असल्याच समजत (ख.खो.दे.जा). तिथल्या गुरुजींकडुन असही समजल की आजपर्यंत जिथे जिथे शिवलिंग आहेत तिथे तिथे ती स्थापन केली गेली आहेत, हे शिवलिंग स्वयंभु आहे आणि जागृत आहे..

भुलेश्वर शिवलिंग
Bhuleshwar.jpg

या गाभार्‍याबाहेर पितळी त्रिशुळ आणि डमरु उभ करुन ठेलेल आहे.. त्याच प्रचि काढण्याचा मोह आवराता येण शक्यच नव्हत

त्रिशुळ - डमरु
Bhuleshwar Trishul.jpg

दर्शन घेउन झाल्यावर आम्ही बाहेर येउन मंदीराभोवतालचा परीसर न्याहाळत होतो. मंदिराच्या आवारातुन काढलेल्या या प्रचि
Bhuleshwar Surroundings 1.jpgBhuleshwar Surroundings.jpg

परतीच्या वाटेवर क्षुधाशांती करण्यासाठी कांचन नावाच्या एका शुद्ध शाकाहारी हॉटेलात गेलो.. तिथे मराठी थाळीची ऑर्डर दिली.. थाळी समोर आल्यावर तिचा फोटो काढण्याचाही मोह आवरता आला नाही.. ब्राह्मणी पद्धतीच मराठी जेवण आवडणार्‍याला हे जेवण नक्कीच आवडेल..

मराठी थाळी @ हॉटेल कांचन
Kanchan Restaurant - Marathi Thali Veg.jpg
मेन्यु: पोळ्या, भरल वांग, मेथी बेसन (मेथी घालुन केलेल पिठल), दही-कांदा, मसालेभात, कढी, जिलेबी, ठेचा, लोणच, पापड आणि दाण्याची चटणी..

काल अनेक दिवसांनंतर मी मला आवडते तशी जिलेबी खाल्ली.. बारीक नळी आणि पाकात मुरुनही कडक राहीलेली... मला आणि निलेशला इतकी आवडली जिलबी की आम्ही परत मागवलि.. या नंतर मागवलेल्या जिलेबीच्या द्रोणाने तर अगदी तृप्त होउन भरुन पावलो.. मस्त गरमागरम जिलेबी मिळाली सेकंड राउंडला.. Happy

या सगळ्या जेवणावर उच्च म्हणजे मातीच्या सुगडातल मसाला ताक... आहाहा! जातीच्या शाकाहारी खवय्यांसाठी हे हॉटेल म्हणजे मेजवानीच

सुगडातील ताक
Kanchan Restaurant - Masala Chas.jpg

मन आणि पोट दोन्ही तृप्त होउन तिथुन बाहेर पडलो व वाटेत येता येता विघ्नहर्त्या चिंतामणीच दर्शन घेउन आनंदी आणि प्रसन्न मनाने घरी परतलो..

बघा तुम्हालाही भुलवतोय का हा "भुलेश्वर"?

टीप: सर्व फोटो सौजन्य श्री. निलेश रानडे.. एकही फोटो मी काढलेला नाहीये

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच

सुंदर....खरोखरीच भुलवणारा भुलेश्वर आहे. शिवाय पुणे परिसरात ५०-६० किमी च्या अंतरावरील हे स्थळ म्हणजे एका दिवसाची सहल. हडपसरपासून तर आणखीन् जवळ पडेल असे दिसत्ये.

बाकी शंकरच नव्हे तर अन्य देवदेवतांच्यासंदर्भात सांगितल्या जाणार्‍या कथीत चमत्काराच्या मागे धावण्यात काही अर्थ नसतो, मुग्धा....अशा गोष्टी एका कानाने ऐकायच्या दुसर्‍या कानाने सोडून द्यायच्या....समजा शाळुंका उघडी झाली आणि त्यात तू ठेवलेला प्रसाद भक्षीला गेला असे दिसले तर तुला उद्या ऑफिसचे काम करावे लागणार नाही का ? ते तर आपल्या ललाटी लिहिलेले असते ते करावे लागणारच. त्यामुळे तसले चमत्कार पाहात राहाण्यापेक्षा परिसर भ्रमणाचा शुद्ध आनंद घ्यावा फक्त....त्याचेच समाधान अचाट असते.

छान आहे भुलेश्वर.

खुप दिवस झाले भुलवतोय पण मुहुर्त लागला नव्हता.
आता ह्या धाग्याने त्या भुलीची तीव्रता वाढवली.

थाळी लै भारी की. Happy

मुगु शॉर्ट अ‍ॅन्ड स्वीट वर्णन आणि फोटो तर एकसे एक आहेत.
अजून थोडी माहिती दे, म्हणजे पुण्यातून कसं जायचं वगैरे.

आवडली माहिती. अशोक यांचा प्रतिसाद तर फारच आवडला. Happy

मला आधी वाटलं 'भुलेश्वर' म्हणजे मुंबईचं !

मस्त

दक्षे, पुण्यातुन २-३ मार्गाने जाता येत.
सोलापुर हायवे; हडपसर-दिवे घाट - सासवड; कात्रज - बोपदेव घाट - सासवड अस जाता येत

प्रकाशचित्रे सुंदर!
भुलेश्वर छानच आहे, शिवाय तेथुन जवळच काळविटांसाठी प्रसिद्ध मयुरेश्वर अभयरण्यही आहे Dry deciduous scrub forest असल्याने वेगळे आहे. नक्की पहा.

बाकी शंकरच नव्हे तर अन्य देवदेवतांच्यासंदर्भात सांगितल्या जाणार्‍या कथीत चमत्काराच्या मागे धावण्यात काही अर्थ नसतो, मुग्धा....अशा गोष्टी एका कानाने ऐकायच्या दुसर्‍या कानाने सोडून द्यायच्या....समजा शाळुंका उघडी झाली आणि त्यात तू ठेवलेला प्रसाद भक्षीला गेला असे दिसले तर तुला उद्या ऑफिसचे काम करावे लागणार नाही का ? ते तर आपल्या ललाटी लिहिलेले असते ते करावे लागणारच. त्यामुळे तसले चमत्कार पाहात राहाण्यापेक्षा परिसर भ्रमणाचा शुद्ध आनंद घ्यावा फक्त....त्याचेच समाधान अचाट असते. >>>> ते तर आहेच मामा.. पण ही कथा फार मजेशीर आणि वेगळी वाटल्याने लक्षात राहिली इतकच...

शिल्पांचे फोटो टाकण्यात कंजुषी का केलीस >>> आबा ती शिल्प मंदिरात आतल्या बाजुस आहेत. तिथे उजेड अज्जिबातच नाही... इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था आहे, पण काल आम्ही गेलो त्यावेळेत लोडशेडींग होत त्यामुळे फक्त गाभार्‍यातच लाईट्स चालु होते..

भुलेश्वर देवळात असंख्य कोरीव मूर्त्ति आहेत....पण मुघल राजवटीत हिदूंच्या देवळांची जी तोड्फोड झाली त्यात येथील अनेक मूर्तिवर घाव बसले...(अशी माहिती ऐकल्याच आठवतय..) खरच त्या भग्न मूर्ति बघताना मन विषण्ण होत...

बाकी देऊळ सुंदर,कोरीव आहे...

माझ्याकडे आहेत भुलेश्वरचे बरेच फोटो.मुग्धा तुम्हाला चालणार असेल तर टाकेन मी.
आम्ही सुद्धा रविवारी गेलो होतो तेव्हा देवळाच्या बाहेर जी पाण्याची टाकी आहे तिथे एक फॅमिली त्यांच्याकडून जेवण देत होती या वेळेस ही होते का ते? दर रविवारी असतात असे कळले होते.
जेवणाचे पैसे एच्छिक होते आणि दिले तरच घेते होते.

पिंकी नक्की टाक..

नाही यावेळेस नाही दिसल अस कुणी... पण बरेच जण तिथे घरुन डबे वगैरे घेउन आलेले दिसले..

मुग्धा मस्त झालीय तुझी ट्रिप. आम्हाला पण मजा अनूभवता आली.:स्मित:

पण नेमके जेवणा च्या वेळेस रसभरी थाळी बघीतल्याने निराशा झाली.:अरेरे::फिदी:

मस्त मेन्यु दिसतोय. हॉटेलचे नाव सुचवल्याबद्दल आभार. नाहीतर बाहेर गेल्यावर जरा पन्चाईतच असते.

माबोवरच्या फेरफटका ( निशीकान्त पटवर्धन )या आय डी ने पण भुलेश्वरचे फोटो इथे किन्वा त्यान्च्या ब्लॉगवर टाकलेत बघ.

खुप छान लिहिले आहे ...
माझे गाव जवळच असल्यामुळे शाळेत असताना आमची सहल यायचि इथे... श्रावण महिन्यात खुप गर्दी असते ... प्रसादाबद्दल जे सान्गितले ते खरे आहे... तुमच्या समोर ते प्रसाद वाटित ठेवतात... नन्तर वाटी काढली तर प्रसाद नसतो त्यात... मी पाहिले आहे खुपदा....
कान्चन ... मस्त आहे .. सकाळी मिसळ मस्त असते ... ताक .. जेवन मस्तच.... एकुनच परत जावेसे वाटायला लगले आहे .. लवकरच जाइन आता....

मुग्धा मस्तच आहे ग तुझं लिखाण आणि फोटो. सुरेख. आकाश पण सुंदर टिपलंस.

थाळी बघून परत भूक लागली. जिलबी तेव्हढी नवऱ्याला देईन, बाकी स्वाहा करते.

अन्जु जिलबी खा.. मस्तच आहे...

सकाळी मिसळ मस्त असते . >>>> या माहितीबद्दल प्रचंड धन्यवाद.. आता परत त्या रस्त्याने जाण्याचा योग आला सकाळी तर मिसळ हाणणार नक्की..

Pages