शनिवारी रात्री१०:३० च्या सुमारास आमच्या अर्धांगाने "उद्या आपण काय करायच?" प्रश्न टाकला. मी आणि सासुबाई काहीच उत्तरलो नाही आणि आपापल्या कामांना लागलो.. मग श्री रानड्यांनी टॅबलेट चालु करुन गुगलबाबाला "places around Pune" असं साकड घातल.. आणि परत प्रश्न विचारला "भुलेश्वरला जायच का?" आम्ही दोघिंनी त्याच्याकडे बघितल ते चेहर्यावर असंख्य प्रश्नचिन्ह घेउनच.. प्रश्न असे होते "हे काय आहे?, कुठे आहे?, कस जायच?" इ.इ.
आमच्या हुश्शार नवर्याने ते सर्व प्रश्न लग्गेच वाचले आणि सांगितल की इथुन साधारण ६० किमीवर म्हणजे जवळपास १:३० तासाच्या अंतरावर पुणे - सोलापूर महामार्गावर यवतच्या जवळ एका डोंगरावर वसलेल हे मंदीर आहे.. नंतर त्याने टॅबलेट माझ्या हातात देउन बाकीच वाचायला सांगितल.. तिथे भेट देउन आलेल्या एका व्यक्तीने लिहीलेला सचित्र वृत्तांत होता.. त्यातिल फोटो बघुनच हे ठिकाण बघावच अस वाटल आणि मी अनुमोदन दिल.. नंतर तो वृत्तांत सासुबाईंना वाचायला दिला, त्यांनाही ते ठिकाण आवडल आणि त्यांनीही होकार दिला.. ठिकाण जवळ असल्याने रवीवारी सकाळी नाष्टा करुन निघायचे ठरले..
रवीवारी सकाळी नाष्टा वगैरे उरकुन ११:३० वाजता आम्ही भुलेश्वराच्या दिशेने कुच केले.. थंडीचे दिवस असल्याने वातावरण प्रसन्न होते आणि मध्यान्हीची वेळ आली तरी उन्हाचा कडाका जाणवत नव्हता.. हडपसर, मगरपट्टा सिटीमार्गे आम्ही मजल-दरमजल करत भुलेश्वरला पोचलो.. तिघेही प्रथमदर्शनीच मंदीर आणि परीसराच्या प्रेमात पडलो.. म्हणजे अगदी "भुललोच"
भुलेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार
एका उंच डोंगरावर हे भुलेश्वराच मंदीर आहे.. पूर्ण दगडी बांधकाम असलेल हे यादवकालीन मंदीर आहे.. मंदीराच्या भिंतीवर कोरीव लेणी आहेत.. औरंगजेबाने या मंदिरावर केलेल्या हल्ल्यात यातिल बर्याच लेणी विद्रुप झाली.. या हल्ल्यातुन वाचलेली काही लेणी बघितल्यावर त्यावेळच्या कलाकारांच कसब लक्षात येत..
सध्या या मंदिरात काही डागडुजीची कामे चालु आहेत. या मंदिरात आपण चालतही येउ शकतो त्यासाठी नीट बांधलेल्या पायर्या आहेत, तसेच मंदिराच्या अगदी पहिल्या पायरीपर्यंत वाहन नेण्याचीही सोय करण्यात आलेली आहे..
लेणी
औरंगजेबाच्या हल्ल्यात विद्रुप झालेली लेणी

लेण्यांच सौंदर्य न्याहाळत आम्ही मुख्य दैवताच्या गाभार्यापर्यंत येऊन पोचलो.. या शिवलिंगाच एक वैशिष्ट्य अस की यातील शाळुंका पूर्ण उघडता येते आणि आपण आणलेला प्रसाद त्यात ठेवता येतो.. आम्हाला जायला उशीर झाल्याने ते बघता आल नाही.. अस मानतात किंवा असा विश्वास आहे की जर शुद्ध अंतःकरणाने आणि संपूर्ण भक्तीभावाने या लिंगामध्ये प्रसाद ठेवला तर स्वतः शंकर तो प्रसाद भक्षण करतात.. या चमत्काराची प्रचिती आजही येत असल्याच समजत (ख.खो.दे.जा). तिथल्या गुरुजींकडुन असही समजल की आजपर्यंत जिथे जिथे शिवलिंग आहेत तिथे तिथे ती स्थापन केली गेली आहेत, हे शिवलिंग स्वयंभु आहे आणि जागृत आहे..
भुलेश्वर शिवलिंग
या गाभार्याबाहेर पितळी त्रिशुळ आणि डमरु उभ करुन ठेलेल आहे.. त्याच प्रचि काढण्याचा मोह आवराता येण शक्यच नव्हत
त्रिशुळ - डमरु
दर्शन घेउन झाल्यावर आम्ही बाहेर येउन मंदीराभोवतालचा परीसर न्याहाळत होतो. मंदिराच्या आवारातुन काढलेल्या या प्रचि

परतीच्या वाटेवर क्षुधाशांती करण्यासाठी कांचन नावाच्या एका शुद्ध शाकाहारी हॉटेलात गेलो.. तिथे मराठी थाळीची ऑर्डर दिली.. थाळी समोर आल्यावर तिचा फोटो काढण्याचाही मोह आवरता आला नाही.. ब्राह्मणी पद्धतीच मराठी जेवण आवडणार्याला हे जेवण नक्कीच आवडेल..
मराठी थाळी @ हॉटेल कांचन
मेन्यु: पोळ्या, भरल वांग, मेथी बेसन (मेथी घालुन केलेल पिठल), दही-कांदा, मसालेभात, कढी, जिलेबी, ठेचा, लोणच, पापड आणि दाण्याची चटणी..
काल अनेक दिवसांनंतर मी मला आवडते तशी जिलेबी खाल्ली.. बारीक नळी आणि पाकात मुरुनही कडक राहीलेली... मला आणि निलेशला इतकी आवडली जिलबी की आम्ही परत मागवलि.. या नंतर मागवलेल्या जिलेबीच्या द्रोणाने तर अगदी तृप्त होउन भरुन पावलो.. मस्त गरमागरम जिलेबी मिळाली सेकंड राउंडला.. 
या सगळ्या जेवणावर उच्च म्हणजे मातीच्या सुगडातल मसाला ताक... आहाहा! जातीच्या शाकाहारी खवय्यांसाठी हे हॉटेल म्हणजे मेजवानीच
सुगडातील ताक
मन आणि पोट दोन्ही तृप्त होउन तिथुन बाहेर पडलो व वाटेत येता येता विघ्नहर्त्या चिंतामणीच दर्शन घेउन आनंदी आणि प्रसन्न मनाने घरी परतलो..
बघा तुम्हालाही भुलवतोय का हा "भुलेश्वर"?
टीप: सर्व फोटो सौजन्य श्री. निलेश रानडे.. एकही फोटो मी काढलेला नाहीये
मस्त लिहिलंय थाळी सगळ्यात
मस्त लिहिलंय
थाळी सगळ्यात जास्त आवडली
अवचित जुळून आलेल्या ट्रिप्स कधीकधी जास्त आनंद देऊन जातात, जो लिखाणातून पुरेपूर जाणवतोय.
(फोटो सौजन्यवाली टीपही झकास
)
मी इथे गेले होते ८० च्या
मी इथे गेले होते ८० च्या उत्तरार्धात. असच एक दिवसात सुटीचं कुठे थोडं आउटिंग करता येइल अशा ठिकाणी जायचं शोधतानाच हे ठिकाण सांगितलं कुणीतरी. पण तेव्हा त्या देवळाची अगदीच दुरावस्था होती.
पण तिथे फार फार शांत वातावरण होतं म्हणून लक्षात राहिलं ते ठिकाण.
थाळी मस्तच दिसते आहे.
सुंदर वर्णन. छान फोटो. माझे
सुंदर वर्णन. छान फोटो.


माझे सुद्धा आवडते ठिकाण.
मुग्धटली, आपण परत जर भुलेश्वर येथे गेलात (किंवा मा.बो.कर जे जाणार आहेत), त्यांच्यासाठि माहिती.
प्रदक्षिणा मार्गावर - मागच्या डाव्या बाजुस गेल्यावर, वरच्या बाजुला तुम्हाला स्त्रीरुपातील गणेश मुर्ती पहायला मिळेल, जरुर पहा.
मस्त प्रवासवर्णन आणि
मस्त प्रवासवर्णन
आणि
छान..सुरेख फोटो...(आमच्या हातात ही कला नाही.)
मी गेलो तेव्हा फोटो काढायला
मी गेलो तेव्हा फोटो काढायला बंदी केली होती. अतिप्राचीन ऐतिहासीक ठेवा आहे हे माहीत असल्याने मी पण फोटो काढले नाहीत. त्या मंदीराच्या मागचा BSNL चा टॉवर मात्र डोक्यात गेला. एकीकडे हेरीटेज साईट म्हणत असताना त्याच्या सोंदर्याला काळीमा लावणारा सरकारी संस्थेचाच टॉवर मागे असणे ही कमालच आहे.
खूप छान स्थळ आहे. माझी आई ८०
खूप छान स्थळ आहे. माझी आई ८० वर्षाची आहे. खूप जास्त चढ आहे का? शक्य होईल का तिला?
कांचनमधील जेवण एकदम लज्जतदार तोपासु दिसत आहे.
प्रतिसादात टीडीके यानी
प्रतिसादात टीडीके यानी स्त्रीरुपातील गणेशाचा फोटो दिला आहे. महाराष्ट्रातील गणेशभक्तांना त्या आकारातील श्री ला पाहणे विस्मयकारक वाटेल; पण राजस्थान तसेच केरळ भागात स्त्री रुपातील गणेशमूर्तींची मंदिरे थोड्या प्रमाणात आढळतात.
"विनायकी" तसेच "गणेशीनी" या नावाने देवीची पूजाअर्चना केली जाते.
छान वर्णन व फोटोही! थाळी
छान वर्णन व फोटोही! थाळी तोंपासु..
टीडीके हो हे शिल्प आम्हीही
टीडीके हो हे शिल्प आम्हीही बघितल आहे...
थाळी सगळ्यात जास्त आवडली >>>> अपेक्षित प्रतिसाद अमेया...
अवचित जुळून आलेल्या ट्रिप्स कधीकधी जास्त आनंद देऊन जातात, >>>> हो ते आहेच..
जो लिखाणातून पुरेपूर जाणवतोय >>>> काय काय जाणवत असत बाबा तुला..
बी फोटोत तर पायर्या जास्त
बी फोटोत तर पायर्या जास्त दिसत नाहीयेत. मुग्धा, बी ला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दे की बायो.
रश्मी अग हो देते, मगाशी अचानक
रश्मी अग हो देते, मगाशी अचानक काम आल म्हणुन तशीच गेले..पहीला फोटो बघ त्यात दिसतायत पायर्या..
खूप छान स्थळ आहे. माझी आई ८० वर्षाची आहे. खूप जास्त चढ आहे का? शक्य होईल का तिला? >>> बी सॉरी मगाशी जरा गडबडीत होते..
गाडी देवळाच्या प्रवेशद्वारापर्यंत जाते तिथुन पुढे आहेत पायर्या आणि बर्यापैकी खड्या पायर्या आहेत पण संख्या कमी आहे.. मुख्य देवळात जाण्यासाठी एक १०-१२ पायर्यांचा किल्ल्यांवर असतो तसा जिना आहे.. तुमच्या आईला जर पाय, अथवा गुडघ्यांच्या दुखण्याचा त्रास नसेल तर त्या नक्की चढु शकतील.. आम्ही गेलो होतो त्यावेळी साधारण याच वयाच्या एक आजी तिथे आल्या होत्या.. पहील्या फोटोत थोड्या पायर्या आल्या आहेत त्यावरुन अंदाज बांधु शकाल..
मुग्धा, धन्यवाद.
मुग्धा, धन्यवाद.
जाउन आलात की नक्की लिहा इथे
जाउन आलात की नक्की लिहा इथे बी.. सर्वांना नक्कीच आवडेल तुमचे अनुभव वाचायला..
व्व्वा! मस्तच मुग्धा
व्व्वा! मस्तच मुग्धा
प्रवासवर्णन व थाळी दोन्ही मस्तच 
छान लिहिले आहे भुलेश्वर बद्दल
छान लिहिले आहे भुलेश्वर बद्दल लवकरच प्लान करावा असे वाटते .
धन्स आदे विशाल नक्की जाउन
धन्स आदे
विशाल नक्की जाउन या.. एकदिवसीय सहलीसाठी उत्तम पर्याय आहे..
मुग्धे, फ़ोटो व वर्णन छान!
मुग्धे, फ़ोटो व वर्णन छान!

एकदिवसीय सहलीसाठी उत्तम पर्याय आहे..>>>>>>>>..मुग्धे, लक्षात ठेवायचा प्रयत्न करते.
धन्स शोभा ताई.. नाही आठवल नाव
धन्स शोभा ताई.. नाही आठवल नाव तर फोन कर मला ते ही नाही आठवल तर मग कठीण आहे..
नाही आठवल नाव तर फोन कर मला
नाही आठवल नाव तर फोन कर मला ते ही नाही आठवल तर मग कठीण आहे..>>>>>>>>>....:हाहा:
मस्तच आहेत फोटो व लेखन
मस्तच आहेत फोटो व लेखन एकंदरीत भुलेश्वर पाहायला लवकरच प्लान करावा असे वाटते .
छान वर्णन केलंत. मूर्तींची
छान वर्णन केलंत.
मूर्तींची तोडफोड पाहून जीव जळला.
मस्तच.
मस्तच.
जबरीच. जायलाच पाहिजे राव!
जबरीच.
जायलाच पाहिजे राव!
खूप छान!! महिती बद्दल
खूप छान!! महिती बद्दल धन्यवाद!! अदीजो मयुरेश्वर बद्दल कधी ऐकले नव्हते. पुढच्या भारतभेटी मध्ये ह्या दोन्ही ठिकाणी नक्की जाणार..
धन्यवाद मुग्धा.
धन्यवाद मुग्धा.:स्मित:
मुग्धा, जय मल्हार सिरीयल
मुग्धा, जय मल्हार सिरीयल मध्ये या ठिकाणाचा उल्लेख आलाय. खन्डोबाने सान्गीतले की त्याच्या भक्तासाठी तो यवत जवळ एका शिवलिन्गाची स्थापना करेल. बहुतेक ते हेच असावे. पण हे हडपसरच्या किती पुढे आहे ग? सासवड फार लाम्ब होईल ना? सासवडच्याही पुढे आहे का? रेल्वेने जाताना यवत स्टेशन लागते हे माहीत आहे.
ईथे जाणार्यांनी अजीबात घरुन
ईथे जाणार्यांनी अजीबात घरुन ब्रेफा वै.करुन जावु नये. कांचन मध्ये अप्रतिम मिसळ मिळते.
हे मंदीर ईतक्या जवळ आहे हे माहित नव्ह्त.. आम्ही फ्क्त कांचन मधे जाउन परत येतो
अरे जवळ म्हणजे किती? हडपसर
अरे जवळ म्हणजे किती? हडपसर पासुन किती लाम्ब/ जवळ आहे?
हडपसर वरुन सोलपुर हाय वे ने
हडपसर वरुन सोलपुर हाय वे ने सोलपुर च्या दिशेने ३५ कि मि वर यवत नावाचे छोटेशे गाव आहे ते गाव येयिपर्यन्त सरळ जात राहणे. ते गाव आल्यावर त्याच्या अगोदर ५०० मीटर्स वर एक फाटा जातो तो भुलेश्वर फाटा म्हणुनच ओलखला जातो त्या फाट्याने १२ कीमी गेल्यावर भुलेष्वर देऊळ आहे
त्या मंदीराच्या मागचा BSNL चा
त्या मंदीराच्या मागचा BSNL चा टॉवर मात्र डोक्यात गेला. >>> कांपो, गुगलवर ज्यांच भुलेश्वराच प्रवासवर्णन वाचलय त्यात त्यांनीही या टॉवर बद्दल सखेद उल्लेख केला आहे, ते तुम्हीच का?
Pages