चिकन करी

Submitted by मृणाल साळवी on 30 November, 2014 - 07:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन - १/२ किलो
कांदा - १ मोठा
टोमॅटो - २
सुके खोबरे - १/२ वाटी किसलेले
लसुण - ३-४ पाकळ्या
आले - १ इंचाचा तुकडा
दालचिनी - १ छोटा तुकडा
काळि मिरी - ४-५
लवंग - २-३
धने - १ चमचा
हिरवी विलायची - २
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - २ चमचे
गरम मसाला - १/२ चमचा
घरचा मसाला - १ चमचा
तेल - ३-४ चमचे
मिठ चवीनुसार
कोथिंबीर - सजावटीसाठी

क्रमवार पाककृती: 

१. चिकन स्वच्छ धुवुन याचे मध्यम आकारात तुकडे करुन घ्यावेत.
२. खालील फोटोत दाखवलेले सर्व पदार्थ मिक्सर मधे एकदम बारीक वाटुन घ्यावेत.

c1

३. कढईत तेल गरम करुन घ्यावे.
४. त्यात वाटलेला मसाला टाकुन तेल सुटेपर्यंत परतुन घ्यावे.
५. मसाल्याला तेल सुटल्यावर त्यात हळद, लाल तिखट, घरचा मसाला, गरम मसाला व धणे पावडर टाकुन निट परतुन घ्यावे.
६. मसाला एकत्र करुन त्यात चिकनचे तुकडे व चवीनुसार मिठ टाकुन निट मिक्स करावे.
७. कढईवर ताटली ठेवुन त्यात थोडे पाणी टाकावे.
८. ५ मिनिटांनी बघितल्यावर चिकनला पाणी सुटले असेल. त्यात तुम्हाला पाहिजे तेवढे अजुन पाणी टाकुन मिक्स करावे व झाकण ठेवुन चिकन शिजु द्यावे.
९. चिकन शिजल्यावर गॅस बंद करावा.
१०. तांदुळाची भाकरी व जिरा राईस सोबत चिकन करी serve करावी.

आशा आहे ही झटपट होणारी चिकन करी तुम्हाला आवडेल.

c2c3c4

वाढणी/प्रमाण: 
२-३ माणसांसाठी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय अप्रतिम सुंदर फोटो आहेत...करीचा रंग लाजवाब..... मृणाल मिनि-कढाई मस्त... अगदि प्रोफेशनल !!

वरच्या सगळ्यांनां +१ .. मसाला कचाच वाटोन घ्यायचा का?

ब्लॉगवरच्याही काही रेसिपीज् वाचल्या आणि आवडल्या .. फारच छान! Happy

चौकोनी असली तरी भाकरी छान दिसत आहे ..

सगळ्यांना थँक्स. Happy
हो मसाला कच्चाच वाटायचा आहे. नंतर ते वाटण तेलात चांगले परतुन घ्यायचे. त्यामुळे कच्ची चव लागत नाही.

Pages