चिकन करी

Submitted by मृणाल साळवी on 30 November, 2014 - 07:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन - १/२ किलो
कांदा - १ मोठा
टोमॅटो - २
सुके खोबरे - १/२ वाटी किसलेले
लसुण - ३-४ पाकळ्या
आले - १ इंचाचा तुकडा
दालचिनी - १ छोटा तुकडा
काळि मिरी - ४-५
लवंग - २-३
धने - १ चमचा
हिरवी विलायची - २
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - २ चमचे
गरम मसाला - १/२ चमचा
घरचा मसाला - १ चमचा
तेल - ३-४ चमचे
मिठ चवीनुसार
कोथिंबीर - सजावटीसाठी

क्रमवार पाककृती: 

१. चिकन स्वच्छ धुवुन याचे मध्यम आकारात तुकडे करुन घ्यावेत.
२. खालील फोटोत दाखवलेले सर्व पदार्थ मिक्सर मधे एकदम बारीक वाटुन घ्यावेत.

c1

३. कढईत तेल गरम करुन घ्यावे.
४. त्यात वाटलेला मसाला टाकुन तेल सुटेपर्यंत परतुन घ्यावे.
५. मसाल्याला तेल सुटल्यावर त्यात हळद, लाल तिखट, घरचा मसाला, गरम मसाला व धणे पावडर टाकुन निट परतुन घ्यावे.
६. मसाला एकत्र करुन त्यात चिकनचे तुकडे व चवीनुसार मिठ टाकुन निट मिक्स करावे.
७. कढईवर ताटली ठेवुन त्यात थोडे पाणी टाकावे.
८. ५ मिनिटांनी बघितल्यावर चिकनला पाणी सुटले असेल. त्यात तुम्हाला पाहिजे तेवढे अजुन पाणी टाकुन मिक्स करावे व झाकण ठेवुन चिकन शिजु द्यावे.
९. चिकन शिजल्यावर गॅस बंद करावा.
१०. तांदुळाची भाकरी व जिरा राईस सोबत चिकन करी serve करावी.

आशा आहे ही झटपट होणारी चिकन करी तुम्हाला आवडेल.

c2c3c4

वाढणी/प्रमाण: 
२-३ माणसांसाठी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेझिंग फोटो आहेत. आणि रेसिपी पण कमी कटकटीची सोपी वाटतेय. मी करणार ह्याच आठवड्यात.
घरचा मसाला म्हणजे कोणता?

चौकोनी भाकरी?? ईंट्रेस्टींग>>>>>>> >> ती रुमाली रोटी आहे. Happy

Lol गै मेरी भेंस पानी मे. धन्यवाद प्राजक्ता. सॉरी अंजली१२. Happy
मी केव्हाचा डोळ्यात बदाम आणून बघतोय त्या फोटो कडे. बाकी डिटेल्स नीट वाचले नाहीत. Proud

चिकन ज्यात केले आहेत ते तर आमचे हंगेरीचे बोग्राच ज्यात गुयाश बनवतात. तो लाकडी चमचा पण सेंत एन्द्रेच्या दुकानातून आणलेला दिसतोय Happy

व्वा मृणाल....
भारी दिसते आहे हे प्रकरण...
पुढच्या वेळी भारतात याल तेव्हा तुमच्या सगळ्या रेसिप्या खायला सह-परिवार येणार Lol

हो टण्या, मी वरती लिहले पण आहे. बुडापेस्ट वरुनच आणले आहे ते बाऊल आणि तो चमचा. बुडापेस्टला तो मार्केट हॉल आहे ना.. तिथुन.
ती रुमाली रोटि नाहि किंवा ब्रेडही नाहि. ती भाकरीच आहे. Presentation साठी square shape मधे serve केली आहे.
प्रसन्न सर, नक्की. Happy

तोंपासु, सर्व फोटो कातिल आणि खुप सुंदर प्रेझेंटेशन.

पुर्वी श्रावणातच असायचं पण गेल्या काही वर्षापासुन मार्गशिष महिन्यात घरामध्ये मांसाहार मनाई आहे. मार्गाशिष महिन्याच्या सुरूवातीला ही पाककृती दिल्याबद्दल आणि त्याहीपेक्षा असे सुंदर फोटो डकवुन आत्म्याची तगमग वाढवल्याबद्दल णिषेढ!!!:दिवा:

जबरी फोटो आणी प्रेझेन्टेशन! फोटो अप्रतीम आलेत एखाद्या प्रोफेशनल फोटोग्राफर ने काढल्यासारखे. कोणता कॅमेरा आहे ग मृणाल?

मी पण खात नाही, तरीही इतके सुबक आणी सुन्दर पद्धतीने सजवलेले पाहुन कौतुक वाटले.:स्मित:. भाकरी तर नजर लागण्यासारखी आहे.

खुप सुंदर फोटो आहे.
तो चमचा मात्र एकदम ऑड वन आऊट झालाय. त्याऐवजी दुसरा एखादा चमचा हवा होता , किंवा नसता तरी चाललं असतं. Happy

मंजूडी, कधी येऊ ते सांग Wink

सगळ्यांना थँक्स Happy

रश्मी.. अगं मी कुकिंग करते आणि नवरा फोटो काढतो. त्याचा कॅमेरा, Nikon D7000 आणि ह्या फोटोंसाठी त्याने 2 lenses वापरल्या आहेत. - 18-105 mm आणि 1.8 D 50 mm

सावली, अगं हो.. तो चमचा खाली ठेवायला पाहिजे होता. पण हे नंतर फोतो काढल्यावर समजले. नेक्स्ट टाईम लक्षात ठेवेल. Happy

आज ही करी पनीर वापरून केली. मस्त चव आली व रंगही फर्मास. एकदम सोपी रेसिपी आहे त्यामुळे जास्त आवडली.
पनीरला दही + गरम मसाला + मीठ + मिरपूड व किंचित हळद लावून वीस मिनिटे मॅरिनेट केले. नंतर बाकीची कृती. मसाला मुरावा म्हणून जेवणाअगोदर तास दीड तास करी बनवली. जेवायची पानं घेईपर्यंत छान मुरला होता मसाला. करीला आयत्या वेळी एक चटका दिला. वरून लिंबू पिळणे (माझ्यासाठी) मस्ट होते. तरी हायहुई करत खाताना मजा आली.

मृणाल, धणे पावडर वापरली नाही. कोरड्या मसाल्यात वापरलेले धणे पुरेसे वाटले. परंतु चवीत काही कमतरता जाणवली नाही.

अरे वा.. अरुंधती ताई...थँक्स तुला रेचिपी आवडल्या बद्द्ल. मी पण कधी अजुन पनीर वापरुन ट्राय नाहि केली. आता एकदा ट्राय करते ते पण.. Happy

Pages