दोन वर्षापूर्वीची गोष्ट, होस्पिटलच्या सहा कर्मचारी महिलांनी मिळुन एका डोक्टरवर खोटा बलात्काराचा आरोप केला.
कारण तो डोक्टर त्यांना वेळेवर कामाला या.ईथे उशीर केल्यास पेशंट दगावु शकतो असे सांगायचा.
ह्याचा राग मनात ठेवुन....पोलिसांनी त्या डोक्टरला जेल मध्ये टाकले आणि त्याचे नाव जगजाहीर केले.
सत्य समजल्यावरही त्या महिलांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत.व अद्यापही त्या महिलांना कसलिच शिक्षा नाही.साधे कोर्टाचे समन्सही नाही.
.खोटा बलात्काराचा आरोप टाकणारया महिलाही पैसे देवुन मिळतात.
ह्याचे ताजे उदाहरण म्हणजे गावात दारुबंदी केली,शाळा बांधली ह्या गोष्टीमुळे त्या समाजसुधारकाचा त्याच्यावर बलात्काराचा आरोप काटा काढण्यासाठी पोटदुख्यांनी एक बाई विकत घेतली.पण जेव्हा आपल्यालाच गावाचा विकास करणारा हा ईसम आहे हे कळले तेव्हा तिने हे काम करण्यास नकार दिला.
म्हणुन भारतासारख्या देशात बलात्काराची शिक्षा फ़ाशी नसावी.कारण आमच्या देशात पोटदुखी प्रवुत्तीचे लोकं भरपुर आहेत.
.तब्बल ७५% खोट्या बलात्काराच्या केसेस.ह्यासाठी महिलांना शिक्षा देणारा कुठलाच कायदा नाही.
कारण फ़ेक रेप हा भारतातील सर्वात मोठा व्यवसाय आहे.
https://www.youtube.com/watch?v=RrMQOEgTYqY
https://www.youtube.com/watch?v=_lHhw23lzD0
४९८ चा गैरवापराची सुरुवात शहरातील उच्चशिक्षित महिलांनी करायला सुरु केली होती पण आज ही आग गावागावांत येवुन पोहचली आहे.
४९८ ह्या एकतर्फ़ी कायद्याच्या ९८% केसेस खोट्या असुनही अजुन एकतर्फ़ी कायदे सरकार बनबत आहे.
क्रुपया वरील माहीती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा नाहीतर उद्या तुमचे नोकरीत प्रमोशन होईल व दुसरया दिवशी पोटदुखी प्रवुत्ती जागी होवुन तुम्ही तुमच्या ओफ़िसच्या महिलेने केलेल्या नकली एकतर्फ़ी कायद्याच्या तख्रारी............you can guess!
दिल्ली रेप केस नंतर फ़ेक रेप केसेसचा महापुर आलाय.
अगदी गर्लफ़्रेंड-बोयफ़्रेंडची भांडणाची केसही विनयभंग व रेप केटेगरी मध्ये जाते.
http://www.youtube.com/watch?v=eUqAowlHs6U
उद्या जर ISI /तालीबानी जिहादी माथेफिरू या एकतर्फ़ी कायद्याचा गैरवापर करुन निरपराध लोकांना अडकवण्यासाठी जिहादी महिलांची फौज उभी केली तर आपल्या देशाचे स्मशान व्ह्यायला वेळ लागणार नाही.व ह्या पापाचे जबाबदार एकतर्फ़ी कायद्याचा गैरवापरावर कानाडोळा करणारे आपणही असु.
https://www.facebook.com/groups/243587459071016/permalink/659668560796235/
संपादित *
मामी , सर्व प्रतिसाद
मामी , सर्व प्रतिसाद +१
रस्त्यावर आणि गर्दीत घेडछाडी करणा-या रोमीओंना चोप देणे हा एकमेव मार्ग आहे त्यांना सुधरवण्याचा. त्यासाठी अशी घटना घडत असताना बघ्याची भूमीका घेणारे पुरुषही त्या घटनेस जबाबदार धरायला हवे. पुरूषावर अन्याय होण्याच्या घटनांची संख्या आणि स्रीयांवर होणा-या अत्याचाराची संख्या यात जमीन आसमानाएवढा फरक आहे, मग प्रत्येक वेळी पुरुष हक्काचे तुणतुणे वाजविणे योग्य आहे का ?
बादवे.. लेट्स एन्जॉय धिस.. नवरे कसे घाबरतात बायकांना
https://www.youtube.com/watch?v=2rpbNgMbCjw
एक प्रश्न अतिशय पुरातन, अतिशय
एक प्रश्न अतिशय पुरातन, अतिशय गंभीर आणि अतिशय व्यापक आहे. दुसरा प्रश्न कायद्याचा गैरवापर इतक्याच व्याप्तीचा, तुलनेने फारच नवा व तीव्रतेच्या दृष्टीने फारच किरकोळ आहे.
पण दोन्ही प्रश्न आहेत व दोन्हींवर एकच माणूस बोलू शकतो हे येथे नाकारले जाताना दिसत आहे. एका प्रश्नावर बोलणारा दुसर्या प्रश्नाबाबत उदासीनच असला पाहिजे असा ग्रह नोंदवण्याची घाई दिसत आहे.
असे काही नसेल असे मानण्याची, गृहीत धरण्याची तयारी दिसत नाही आहे.
एका अभिनेत्रीला वेश्याव्यवसाय
एका अभिनेत्रीला वेश्याव्यवसाय करताना पकडले गेले आणि तिच्या फोटोसकट सगळीकडे बातमी प्रसिद्ध झाली. पण तिला ज्यांच्याबरोबर पकडले त्यांचा कुणाला थांगपत्ताही नाही. असे का...????????????
प्रीती झिंटा नामक बाईने त्या
प्रीती झिंटा नामक बाईने त्या नेस वाडिया नामक पुरुषावर टाकलेले आरोप आठवले कि हसायला येते. वर्तमानपत्राने पण जणूकाही national अजेंडा बनवला होता त्या बातमीचा. हि बाई तक्रार दाखल करते आणि जग फिरायला जाते काय आणि जग भटकून आल्यावर तिची जबानी घेतली जाते. शी वीट आला होता त्या बातमीचा. शेवटी काय झाले ते कळलेच नाही.
मामीच्या सर्व प्रतिसादांना
मामीच्या सर्व प्रतिसादांना अनुमोदन!
बलात्कार, अत्याचार, हुंडाबळी, छेडछाड, अश्लील असभ्य वर्तन हे नक्कीच गंभीर विषय आहेत पण नाण्याची दुसरी बाजू ही असू शकते अश्या अनुभवांवर ही चर्चा अपेक्षित आहे ना? या धाग्याचा विषय बलात्कार कायद्याचा दुरूपयोग असा आहे. त्या अनुशंगाने काही घटना अशा असू शकतात, त्यासाठी काही ठोस कायदे वा नियम आहेत का? फसवणूकीच्या कलमा व्यतिरिक्त! १ उदा. जर ऑफीसमध्ये एखादी स्त्री सहकारी पुरूष सहकार्यावर असा आरोप ठेवत असेल आणि तो निर्दोष असेल तर हे सिद्ध कसे करावे. यावर चर्चा अपेक्षित आहे ना? माफ करा माझ्या अल्पमतीसाठी! माबोवर नवीन विषयावर धागा येतो आणि मग त्यावरील चर्चेत, मतांच्या वादावादीत विषय इतका भरकटतो की नक्की कोणत्या विषयावर चर्चा सुरू होती हेच समजत नाही!
चांगल्या विषयाला आणि सकस चर्चेला मुकावं लागतं.
स्वप्नसुंदरी, गंमतच वाटली.
स्वप्नसुंदरी,
गंमतच वाटली. तुम्ही फोकस पुन्हा चर्चेकडे छान वळवलात पण प्रतिसादाची सुरुवात फोकस घालवणार्यांना अनुमोदन देऊन केलीत.
अमेरीकेत रस्त्यावरुन
अमेरीकेत रस्त्यावरुन फिरणार्या स्त्रीला किती कुचेष्टा आणि बदनामीकारक शेर्यांना सामोरे जावे लागले त्याचा व्हिडीओ मधे प्रसिध्द झाला. त्याच्या पाठोपाठ हाच प्रयोग मुंबईत झाला आणि चक्क महाराष्ट्रात त्यातुलनेने कमी त्रास त्या महिलेला झाला. याचे श्रेय नक्कीच सरकार/ पोलीस यांचे नसुन उत्तम समाज व्यवस्थेच्या निर्मीतीत असलेले सर्व जण उदा. शालेय शिक्षक / सुजाण पालक इ. लोकांना आहे.
बलात्काराच्या घटना दक्षीणेकडील राज्यातुन जवळ जवळ हद्दपार झाल्यात इतपत कमी बातम्या या राज्यातुन येतात ही बाब खरी असेल तर नक्कीच प्रशंसनीय आहे.
जगात लाख खरे रेप होत असतील (
जगात लाख खरे रेप होत असतील ( किंवा होतातच ), पण म्हणुन एका पुरुषावर खोट्या रेपचा आरोप झाला तर तो त्या पुरुषासाठी १००% च असतो ना. त्याचे आयुष्य संपतेच ना.
एक लाख खरे रेप होतात म्हणुन तू एक खोट्या रेपचा आरोप सहन कर असे माबोवर सुचवायचे आहे असे दिसते.
प्रतिसादाची सुरुवात फोकस
प्रतिसादाची सुरुवात फोकस घालवणार्यांना अनुमोदन देऊन केलीत. स्मित >> जे प्रतिसाद पटले ते पटलेच म्हणायचे ना... फक्त या धाग्याचा विषय त्यापेक्षा वेगळा आहे, दुसरी बाजू दाखवणारा आहे (म्हणजे माझी तशी समजूत) एवढंच सुचवायचं होतं! काही चुकलं का?
१००
१००
क्रुपया वरील माहीती जास्तीत
क्रुपया वरील माहीती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा नाहीतर उद्या तुमचे नोकरीत प्रमोशन होईल व दुसरया दिवशी पोटदुखी प्रवुत्ती जागी होवुन तुम्ही तुमच्या ओफ़िसच्या महिलेने केलेल्या नकली एकतर्फ़ी कायद्याच्या तख्रारी............ >>>
सिरीयसली??!! हे तर फेबुवर साईबाबांचे फोटो लावतात आणि लाईक करा नाहीतर...सांगतात तस झाल.
फक्त ऑफिसमधल्या महिला का? आणि नुस्त ही माहिती देवून काय होणार?? दुकानात पत्नीशिवाय एकटे दुकटे जावू नका सेल्सगर्ल खोटी केस टाकेल. घरी कामवाल्या बाईला आई असतानाच येवू द्या. शेजारच्या ताईकडे चहापत्ती संपली तरी मागायला जावू नका. मुलांचे निकाल घ्यायला शाळेत बायकोला पाठवा. आजारी पडलात तर पुरुष नर्स असणार्या डॉक्टरचा दवाखाना माहित आहे का?
जे पटले ते पटले म्हणायलाच
जे पटले ते पटले म्हणायलाच पाहिजे.
मी तुमच्या त्या मताबद्दल बोलायला नको होते, माझे चुकले.
काही केसेस असतीलच पण
काही केसेस असतीलच पण शतकानुशतके बाईने ही होरपळ सोसलीये आता त्याचे थोडे चटके पुरुषवर्गाला बसत असतील तर उगाच जळलो जळलो म्हणून बोंबाबोंब करू नये...
>>> हे भयंकरच. बाईने ही होरपळ सोसलीये म्हणुन खोट्या केसमधे फसलेल्या पुरुषाने ते सहन करावे? कैच्याकैच.
ड्रीमगर्ल, तुमची धाग्याच्या
ड्रीमगर्ल, तुमची धाग्याच्या फोकसबद्दलची पोस्ट छान आहे.
विकू, तुम्ही दिलेल्या लिन्कवरील प्रतिसाद मात्र दुर्लक्षिला गेला आहे. (तरीही तो इथे "धाडस करून दिलात" याबद्दल धन्यवाद, कारण बाहेर बस/रेल्वे वगैरे मधुन जाताना किती काय खबरदारी घ्यावी लागेल ते कळते).
शेवटी काय, "बळी तो कान पिळी" हेच तत्व खरे..... फरक असलाच तर संख्यात्मकदृष्ट्या स्त्रीपुरुषांमधे दुसर्यान्चे कान पिळायला "बळी" कितीक असतात इतकाच असू शकला तर असेल. पण तिथेही मला शंका आहेच. मूळात स्त्री विरुद्ध पुरुष असा रन्ग प्रत्येक विषयाला चढणे / चढविणे हेच अयोग्य आहे.
हे भयंकरच. बाईने ही होरपळ
हे भयंकरच. बाईने ही होरपळ सोसलीये म्हणुन खोट्या केसमधे फसलेल्या पुरुषाने ते सहन करावे? कैच्याकैच.
>>>>
वैयक्तिकरीत्या नक्कीच नाही, पण एकंदरीत समाजाचा विचार करता आणि याचे प्रमाण पाहता या आपत्तीचा बाऊ करू नये असे सुचवायचे असेल. केस बाय केस बघावे.
असो,
पण याबाबत जागरूकता हवी आणि उपाययोजना शोधायला हव्यात याच्याशी सहमत.
माझ्यामते सर्वात मोठा आणि महत्वाचा उपाय पुरुषांनी आपले चारीत्र्य अश्या प्रकारे मेनटेन ठेवावे की असा आरोप झाल्यास हा माणूस असा करूच शकत नाही असा विश्वास सर्व महिलावर्गाने आपल्या पाठीमागे व्यक्त केला पाहिजे. जेणेकरून अश्या चारीत्र्याच्या पुरुषावर कोणी खोटा आरोप करायलाही घाबरेल.
व्वा!
व्वा!
हेच विधान स्त्रीच्या बाबतीत
हेच विधान स्त्रीच्या बाबतीत येथे लिहा बरे!
हेच विधान स्त्रीच्या बाबतीत
हेच विधान स्त्रीच्या बाबतीत येथे लिहा बरे!
>>>>
इथे बेसिक आपले फसतेय..
स्त्रीबरोबर विनयभंग होतो आणि पुरुषावर विनयभंगाचा आरोप (अपवाद वगळता)
त्यामुळे विनयभंग करणार्याला समोरच्या स्त्रीच्या चारीत्र्याशी काही घेणेदेणे नसते, किंबहुना ते चांगले असो वा वाईट तो तसाच वागणार जसा तो आहे.
सुंदर प्रतिवाद! मग स्त्रीने
सुंदर प्रतिवाद!
मग स्त्रीने चारित्र्य नाही सांभाळले किंवा सांभाळले तरी तिची बदनामी करणार्यांबाबत आपले निरिक्षण ऐकवावेत कृपया.
>>>माझ्यामते सर्वात मोठा आणि
>>>माझ्यामते सर्वात मोठा आणि महत्वाचा उपाय पुरुषांनी आपले चारीत्र्य अश्या प्रकारे मेनटेन ठेवावे की असा आरोप झाल्यास हा माणूस असा करूच शकत नाही असा विश्वास सर्व महिलावर्गाने आपल्या पाठीमागे व्यक्त केला पाहिजे. जेणेकरून अश्या चारीत्र्याच्या पुरुषावर कोणी खोटा आरोप करायलाही घाबरेल.<<<
वर उदाहरणादाखल आलेल्या एक दोन केसेसमध्ये पुरुषांचे चारित्र्य वाईट होते म्हणून आरोप झाले असे म्हणायचे आहे का?
यावरून एक सांगतो, जी स्त्री
यावरून एक सांगतो,
जी स्त्री साधीसरळ दिसते ना तिलाच जास्त भिती असते, पण जी मॉडर्न आणि डॅशिंग दिसते तिला समोरचा जरा वचकून असतो.
मला वाटते 'समग्र ऋन्मेऽऽष'
मला वाटते 'समग्र ऋन्मेऽऽष' असे काही खंड काढावेत आपण! कृपया हलके घ्या, हा धागा गंभीर आहे पण थोडी गंमत करावीशी वाटली.
मी तो उपाय तसे घडू नये याची
मी तो उपाय तसे घडू नये याची काळजी घेण्यापैकी एक सांगितला,
सदर केस मध्ये तसे असेलच वा नसेलच असे केस बाय केस चर्चेला अर्थ नाही..
पण माझ्याबद्दल खात्रीने सांगू शकतो, माझ्यावर असा खोटानाटा आरोप झाला तर माझी ग'फ्रेंडच सर्वात पहिले माझे वकीलपत्र घेईल.
(संदर्भासाठी - ऐतराज चित्रपट नक्की बघा. आणि त्यातील परेश रावल शेवटी करीना कपूरला तू का जिंकलीस याचे कारण काय सांगतो हे पण ऐका)
ऐतराज पाहिला आहे. धन्यवाद!
ऐतराज पाहिला आहे. धन्यवाद!
तुमच्या गर्लफ्रेंडबद्दल नक्कीच खात्री आहे मलाही
त्याशिवाय का तुम्ही तिचा येथे उल्लेख कराल सर्वत्र?
आली आली ! गर्लफ्रेण्ड इकडे पण
आली आली ! गर्लफ्रेण्ड इकडे पण आली
आता फक्त आईचं प्रेम आणि गर्लफ्रेण्डशीच लग्न आणि मल्टीनॅशनल कंपनी बाकी आहे.
येऊ दे येऊ दे!
होऊ दे खर्च नेट आहे घरचं
धन्यवाद, पण अश्या केसेस मध्ये
धन्यवाद,
पण अश्या केसेस मध्ये तुमचे चारीत्र्य हि तुमची जमेची बाजू असते याबाबत मला वाटते कोणाचेही दुमत होऊ नये.
इथे पण आणलीत गर्लफ्रेन्डला
इथे पण आणलीत गर्लफ्रेन्डला

चारित्र्याचा प्रश्न उद्भवतच
चारित्र्याचा प्रश्न उद्भवतच नाही असा एक प्रसंग वर विकूंनी सचित्र दाखवला आहे बघा! आधी ओळखही नसलेल्या मुलांवर काही मुलींनी आरोप केले आहेत. त्यामुळे चारित्र्यवान असणे हा अश्या प्रसंगांपासून बचाव करण्यासाठीचा सर्वात महत्वाचा व मोठा उपाय नव्हे. (सर्वात मोठा व महत्वाचा उपाय - हे आपले शब्द आहेत).
असा चूकीचा आरोप कधी आपल्यावर
असा चूकीचा आरोप कधी आपल्यावर झालाच तर आपणही आपल्या प्रेयसी किंवा बायकोला त्या बाईच्या जवळच्या नातेवाईकांवर असे आरोप टाकायला सांगायचे हा उपाय चांगला आहे. जे आरोप आपल्यावर तेच आरोप त्या खोट्या बाईच्या नातेवाईकांच्या पुरुषांवर .......................
यामुळे होईल काय हे यांचे आपाससातील व्ययक्तिक वाद आहेत असे कोर्टाला वाटेल आणि दोघेही निर्दोष सुटतील .... पण मानसिक त्रास तर होणारच
करू द्या ना आरोप, लोक
करू द्या ना आरोप, लोक महापुरुषांवरही आरोप करतातच, पण केस कोर्टात उभी राहते तेव्हा चारीत्र्य आणि पास्ट रेकॉर्ड नाही का बघितले जात.. आणि हो, त्यांचा तपासावर तसेच निकालावर प्रभावही पडतो.
Pages