दोन वर्षापूर्वीची गोष्ट, होस्पिटलच्या सहा कर्मचारी महिलांनी मिळुन एका डोक्टरवर खोटा बलात्काराचा आरोप केला.
कारण तो डोक्टर त्यांना वेळेवर कामाला या.ईथे उशीर केल्यास पेशंट दगावु शकतो असे सांगायचा.
ह्याचा राग मनात ठेवुन....पोलिसांनी त्या डोक्टरला जेल मध्ये टाकले आणि त्याचे नाव जगजाहीर केले.
सत्य समजल्यावरही त्या महिलांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत.व अद्यापही त्या महिलांना कसलिच शिक्षा नाही.साधे कोर्टाचे समन्सही नाही.
.खोटा बलात्काराचा आरोप टाकणारया महिलाही पैसे देवुन मिळतात.
ह्याचे ताजे उदाहरण म्हणजे गावात दारुबंदी केली,शाळा बांधली ह्या गोष्टीमुळे त्या समाजसुधारकाचा त्याच्यावर बलात्काराचा आरोप काटा काढण्यासाठी पोटदुख्यांनी एक बाई विकत घेतली.पण जेव्हा आपल्यालाच गावाचा विकास करणारा हा ईसम आहे हे कळले तेव्हा तिने हे काम करण्यास नकार दिला.
म्हणुन भारतासारख्या देशात बलात्काराची शिक्षा फ़ाशी नसावी.कारण आमच्या देशात पोटदुखी प्रवुत्तीचे लोकं भरपुर आहेत.
.तब्बल ७५% खोट्या बलात्काराच्या केसेस.ह्यासाठी महिलांना शिक्षा देणारा कुठलाच कायदा नाही.
कारण फ़ेक रेप हा भारतातील सर्वात मोठा व्यवसाय आहे.
https://www.youtube.com/watch?v=RrMQOEgTYqY
https://www.youtube.com/watch?v=_lHhw23lzD0
४९८ चा गैरवापराची सुरुवात शहरातील उच्चशिक्षित महिलांनी करायला सुरु केली होती पण आज ही आग गावागावांत येवुन पोहचली आहे.
४९८ ह्या एकतर्फ़ी कायद्याच्या ९८% केसेस खोट्या असुनही अजुन एकतर्फ़ी कायदे सरकार बनबत आहे.
क्रुपया वरील माहीती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा नाहीतर उद्या तुमचे नोकरीत प्रमोशन होईल व दुसरया दिवशी पोटदुखी प्रवुत्ती जागी होवुन तुम्ही तुमच्या ओफ़िसच्या महिलेने केलेल्या नकली एकतर्फ़ी कायद्याच्या तख्रारी............you can guess!
दिल्ली रेप केस नंतर फ़ेक रेप केसेसचा महापुर आलाय.
अगदी गर्लफ़्रेंड-बोयफ़्रेंडची भांडणाची केसही विनयभंग व रेप केटेगरी मध्ये जाते.
http://www.youtube.com/watch?v=eUqAowlHs6U
उद्या जर ISI /तालीबानी जिहादी माथेफिरू या एकतर्फ़ी कायद्याचा गैरवापर करुन निरपराध लोकांना अडकवण्यासाठी जिहादी महिलांची फौज उभी केली तर आपल्या देशाचे स्मशान व्ह्यायला वेळ लागणार नाही.व ह्या पापाचे जबाबदार एकतर्फ़ी कायद्याचा गैरवापरावर कानाडोळा करणारे आपणही असु.
https://www.facebook.com/groups/243587459071016/permalink/659668560796235/
संपादित *
उडन खटोला, एक आँखो देखा हाल
उडन खटोला,
एक आँखो देखा हाल तुमच्या माहितीसाठी:
मध्यंतरी लोहगडावरून परतणार्या दोन तरुणींना चार परक्या तरुणांनी घेरले. पूर्ण एकांत असलेल्या त्या वाटेवर त्या तरुणींनी गयावया केली मात्र ती न ऐकता त्या तरुणांनी चाळे सुरू केले. प्रत्यक्ष बलात्कार झाला नाही मात्र शारीरिक छळ झाला, विनयभंग झाला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कसेबसे स्थानिक पोलिस स्टेशनात पोचलेल्या तरुणींचा जबाब लिहून घेण्यास पोलिसांनी नकार दिला. शेवटी एका एन जी ओ ने त्या पोलिस स्टेशनमधील बेपर्वा वृत्ती टॉपच्या ऑफिसर्सना कळवली व एफ आय आर वगैरे सोपस्कार करून घेतले. चार दिवसांनी दोन्ही तरुणींना शिवाजीनगरच्या कोर्टात पहिल्या सुनावणीच्या वेळी बोलावले, तेव्हा पूर्ण दिवसात त्या तरुणी तेथे फिरकल्याही नाहीत.
कारण एकच, प्रत्यक्ष प्रसंगातून तर सुटलो आहोत, पुन्हा सगळ्यांसमोर जाऊन आणखी बदनामी कशाला?
फिर्यादी पक्षच अनुपस्थित असल्याने आरोपींना सोडून द्यावे लागले.
४९८ हा कायदा नसून आ.पी. सी.
४९८ हा कायदा नसून आ.पी. सी. कायद्यातील एक कलम आहे.
आय.पी. सी. म्हणते की "गुन्हेगार सुटला तरी बेहत्तर, पण निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये"
=========
स्त्री ही पुरुषासाठी उपभोग्य वस्तू (व्यक्ती) आहे हा सिद्धांत नाकारणारा समाज निर्माण करणे सर्वात मोठे आव्हान असून त्यात जोवर आपण यशस्वी होत नाही तोवर हे अशा प्रकारे उपभोगणे चालूच राहील.
दोनच् उपाय
एकतर स्त्री हि उपभोग्य आहे हे स्विकारा व अनुरुप बंधने घाला.
दुसरं स्त्रीला उपभोग्य समजणार नाही असा समाज निर्माण करा.
दोन्ही गोष्टी सोप्या नाहीत!
आपला धागा हा चूकीच्या
आपला धागा हा चूकीच्या आरोपांबाबत आहे. अशा आरोपांनंतर भयंकर त्रास होतो हे खरे आहे. मात्र सहसा सामन्य महिला स्वत:हून असे आरोप करायला पुढे येत नाहीत. ज्या महिला अशा गोष्टी करतात त्यांना न्यायालयात उघडे पडावे लागते.>>>>>>>>>>>>बरोबर आहे.
लेखात तब्बल ७५% खोट्या बलात्काराच्या केसेस.ह्यासाठी महिलांना शिक्षा देणारा कुठलाच कायदा नाही.>>>>>>>???????? लेखकाला असे का वाटावे?
प्रत्येक कायद्याचा गैरवापर
प्रत्येक कायद्याचा गैरवापर होतो आरोपी वा बळी दोन्ही बाजूंनी. जे योग्य नाही अर्थातच.
पण महिलांना आधार देणार्या कायद्यांच्याच नावाने (४९८अ, बलात्कारविरोधी कायदा आणि तत्सम) गैरवापराची बोंब होते हा मुद्दा एका भिकार मानसिकतेचे दर्शन घडवणारा आहे.
फेक रेप वर चिंता करण्यापेक्षा
फेक रेप वर चिंता करण्यापेक्षा खर्या रेप वर आधी गंभीरपणे चिंता करा. ................१००+१ अनुमोदन
लग्नाच्या आमिषानी २ वर्षे
लग्नाच्या आमिषानी २ वर्षे बलात्कार असल्या बातम्या एक आड एक दिवस पेपर येतात, त्या बघुन हसावे का रडावे ते कळत नाही.
फेक रेप वर चिंता करण्यापेक्षा
फेक रेप वर चिंता करण्यापेक्षा खर्या रेप वर आधी गंभीरपणे चिंता करा >>>>>>>>>>
असे का? आधीच एक समस्या आहे म्हणुन दुसर्या समस्ये बद्दल चर्चा करुच नये असा नियम आहे का?
ज्या पुरुषांवर असे खोटे आरोप होता आणी त्यांची आयुष्य देशोधडीला लागतात त्यांच्या साठी हा त्यांच्यावर झालेला रेप च आहे. तो पण तितकाच खरा आहे.
टोचा, गैरसमज करुन घेणार नसाल
टोचा, गैरसमज करुन घेणार नसाल तर एक शंका / मत आहे. मांडू का?
@कोकणस्थ - विचारा की
@कोकणस्थ - विचारा की
धन्यवाद टोचा. पुन्हा
धन्यवाद टोचा. पुन्हा सर्वांनाच विनंती कृपया मी कुठल्याही घाणेरड्या कृत्याचे समर्थन करत आहे असे समजून तुटून पडू नका.
टोचा, वर तुम्ही म्हटले आहे "लग्नाच्या आमिषाने बलात्कार".
एखादी स्त्री जर का पुरुषाने लग्नाचे वचन दिल्यावर शरीरसंबंध ठेवत असेल आणि नंतर तो पुरुष लग्नाला नकार देऊन फसवणूक करत असेल तर या घाणेरड्या फसवणुकीबाबत त्या पुरुषाची चूक आहेच, पण अशा प्रकारचे शरीरसंबंध बलात्कार कसे काय ठरतात?
अशा बाबतीत नंतर फसवणूक झाल्यावर रडत बसण्यापेक्षा स्त्रीयांनी आधीच सावध असायला नको? लग्नाच्या नुसत्या वचनावर शरीरसंबंध ठेवायचा? अर्थात आता पुरोगामी लोक म्हणतील, कुणीही कुणाशीही शरीरसंबंध ठेवावा, त्याला कायद्याने काहीच चूक नाही. पण मग अशा स्वखुषीने ठेवलेल्या शरीरसंबंधांच्या बाबतीत वेगळी भूमिका का?
मुळात जिथे जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले जातात त्याला बलात्कार म्हणतात. पण लग्नाच्या आमिषाने का होईना, स्वखुषीने ती स्त्री त्या पुरुषाशी शरीरसंबंध ठेवत असते. जबरदस्ती होत नसते. मग तो बलात्कार कसा?
अशाही बातम्या वाचल्या आहेत की "लग्नाचे वचन देऊन आरोपी पिडीत तरुणीवर दोन वर्ष बलात्कार करत होता." म्हणजे काय? दोन वर्ष ती तरुणी काय करत होती?
मला वाटते की लग्नाचे वचन देऊन
मला वाटते की लग्नाचे वचन देऊन संबध ठेवले तर त्या मुलीची थोडी चूक आहेच पण एकदा चूक झाल्यानंतर त्या मुलीला इच्छा असेल तरी माघार घेता येत नाही. कारण मग बदनामी होण्याची भिती..
त्या बदनामीच्या भितीने तिला वारंवार संबध ठेवण्यात तो मुलगा भाग पाडत असेल तर कुठलीही शारिरीक जबरदस्ती नाही झाली तरी तो बलात्कारच...
हे तर सोडूनच द्या....
पत्नीच्या मर्जीविरुद्ध तिला संबंध करण्यास भाग पाडणे हा देखील बलात्कारच...
प्रत्येक वेळी बलात्कार म्हणजे शारिरीक जबरदस्तीच असणे गरजेचे नाही.
म्हणूनच मी म्हणालो की कुणी
म्हणूनच मी म्हणालो की कुणी लग्नाचे वचन देत असेल तरीही थेट शरीरसंबंध ठेवण्यापर्यंत स्त्रीयांनी मजल मारण्याआधी विचार करायला हवा. मग अशा बदनामी / ब्लॅकमेलिंगला तोंड द्यावे लागते. अखंड सावध असावे.
आणखी एकच शंका. या संदर्भात कायदा काय म्हणतो?
प्रत्येक वेळी बलात्कार म्हणजे शारिरीक जबरदस्तीच असणे गरजेचे नाही.>> कायद्यात असे काही आहे का?
@ अरुंधती कुलकर्णी (वाचत असतील तर)
या बाबत तुमचे काय मत आहे? कायदा काय म्हणतो अशा केसेस मधे. काही "केस लॉ" असतील तर शेअर करणार का?
http://www.indialawjournal.co
http://www.indialawjournal.com/volume2/issue_2/article_by_priyanka.html
इथे वाचा
दुव्याबद्दल धन्यवाद आशुचँप.
दुव्याबद्दल धन्यवाद आशुचँप.
It is a non-consensual act of violent perversion by a husband against the wife where she is physically and sexually abused.
इथे मर्जीविरुद्ध हा शब्द महत्वाचा आहे. मग ती बायको असो की लग्नाचे आमिष दिलेली एखादी तरुणी.
असो. पुन्हा एकदा धन्यवाद.
पण अशा प्रकारचे शरीरसंबंध
पण अशा प्रकारचे शरीरसंबंध बलात्कार कसे काय ठरतात? >>>>>> @ कोकणस्थ - बलात्कार ठरत नाहीतच, न्यायालयात ते पुरुष निर्दोष सुटतात. पण मधल्या काळात त्यांना अटक होते, मग त्यांची नोकरी जाते.
मला वाटते की लग्नाचे वचन देऊन संबध ठेवले तर त्या मुलीची थोडी चूक आहेच पण एकदा चूक झाल्यानंतर त्या मुलीला इच्छा असेल तरी माघार घेता येत नाही. कारण मग बदनामी होण्याची भिती..>>
@आशुचँप - दुसरी पण बाजु आहे, शरीरसंबंध ठेवले म्हणुन पुरुषाला पण माघार घेता येत नाही कारण ती स्त्री कंप्लेंट करेल ह्या भीतीने आणि त्या निमित्ताने होणार्या बदनामीने.
आणि आरोप करायला काय हो शरीरसंबंध असलेच पाहीजेत असे नाही.
महेश, सत्यमेव जयते च्या
महेश,
सत्यमेव जयते च्या दुसर्या सिझनमधला या विषयावरचा एपिसोड अवश्य बघा.
४९८ अ बाबत, हायकोर्टाने एक निकाल गेल्या आठवड्यातच दिला आहे. तोही बघाच.
दुसरी पण बाजु आहे, शरीरसंबंध
दुसरी पण बाजु आहे, शरीरसंबंध ठेवले म्हणुन पुरुषाला पण माघार घेता येत नाही कारण ती स्त्री कंप्लेंट करेल ह्या भीतीने आणि त्या निमित्ताने होणार्या बदनामीने.
आणि आरोप करायला काय हो शरीरसंबंध असलेच पाहीजेत असे नाही.
हे प्रमाण खूपच कमी असणारे हे नक्कीच सांगू शकतो कारण अजूनही समाजाची असलेली पुरुषी मानसिकता....
एखादा मुलगा आपल्याला खूप मैत्रिणी आहेत आणि खूप जणींना फिरवले आहे असे दर्पोक्तीने, अभिमानाने, माजाने सांगू शकतो..त्याला मग कॅसानोव्हा वगैरे नावे ठेऊन एका अर्थी कौतुकच केले जाते. इतकेच काय मुलींमध्ये पॉप्युलर असलेल्याला कॉलेजमध्ये कन्हैया म्हणले जाते.
हेच उलट, एखादी मुलगी मुलांमध्ये जास्त पॉप्युलर असेल, त्यांच्यात जास्त मिसळत असेल तर ती चालू हे ठरायला जास्त काळ जावा लागत नाही.
अजूनही बलात्काराची तक्रार केल्यानंतरही जास्त बदनामी स्त्रीचीच होते.
ताजे उदाहरण आहे....एका अभिनेत्रीला वेश्याव्यवसाय करताना पकडले गेले आणि तिच्या फोटोसकट सगळीकडे बातमी प्रसिद्ध झाली. पण तिला ज्यांच्याबरोबर पकडले त्यांचा कुणाला थांगपत्ताही नाही. असे का...
त्यामुळे हे फेक रेप वगैरे थोतांड आहे..काही केसेस असतीलच पण शतकानुशतके बाईने ही होरपळ सोसलीये आता त्याचे थोडे चटके पुरुषवर्गाला बसत असतील तर उगाच जळलो जळलो म्हणून बोंबाबोंब करू नये...
काही केसेस असतीलच पण
काही केसेस असतीलच पण शतकानुशतके बाईने ही होरपळ सोसलीये आता त्याचे थोडे चटके पुरुषवर्गाला बसत असतील तर उगाच जळलो जळलो म्हणून बोंबाबोंब करू नये... >> +११
आशुचँप, >> शतकानुशतके बाईने
आशुचँप,
>> शतकानुशतके बाईने ही होरपळ सोसलीये आता त्याचे थोडे चटके पुरुषवर्गाला बसत असतील तर उगाच जळलो
>> जळलो म्हणून बोंबाबोंब करू नये...
म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो. न्यायव्यवस्थेचा गैरफायदा घेण्यात आला आहे ही बाब दुर्लक्षिली जाऊ नये.
आ.न.,
-गा.पै.
न्यायव्यवस्थेचा गैरफायदा
न्यायव्यवस्थेचा गैरफायदा घेण्यात आला आहे >>>>> बरं मग ? ही बाब नविन आहे का भारतात ?
त्या व्यवस्थेचा गैरफायदा घेऊनच बलात्कार प्रकरणातले अपराधी "अल्पवयीन " म्हणून सुटतात ना?
मुळात तुमचं म्हणणं तरी काय आहे? ४९८अ हा एकच आणि पहिलाच कायदा आहे का ज्याचा गैरफायदा घेतला गेलाय ???
बाकी सग्गळ्या कायद्यांचा दुरुपयोग होतो, ही बाब दुर्लक्षिली जातेच ना? इतकेच काय बहुतांश कायदेच दुर्लक्षित होतात की आपल्याकडे. म्हणून कायदेच रद्द करावेत असे म्हणाल का ?
उगीच आपलं साप समजून भुई धोपटत बसू नका.
काही केसेस असतीलच पण
काही केसेस असतीलच पण शतकानुशतके बाईने ही होरपळ सोसलीये आता त्याचे थोडे चटके पुरुषवर्गाला बसत असतील तर उगाच जळलो जळलो म्हणून बोंबाबोंब करू नये... >> +११
प्लस वन माझाही..
..
विवाहाचे वचन देऊन फसवण्यासंदर्भात ...
प्रेमप्रकरणात नैसर्गिक भावनेला अनुसरून थोडेफार घडतेच. मुलगी एक मर्यादा ओळखून थांबते, पण मुलाला तशी काही मर्यादा नसल्याने त्याला शेवटच्या लेव्हलपर्यंत जायचे असते वा गेल्यासही हरकत नसते. बरेचदा हि फसवणारी मुले मग अशी मागणी करतात आणि ती मान्य न झाल्यास ब्रेकअपची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या धमकी असतेच. आधीच जे काही झाले असते त्यानुसारही कित्येक मुलींना ते ब्रेकअप परवडणारे नसते. कारण आपल्या टुच्च्या समाजात लगेच अश्या मुलींकडे बघायची नजरही बदलते. मग त्या मुली, चला पुढे जाऊन हा लग्न तरी करेल या आशेवर वा त्याचे आपल्यावर खरेखुरे प्रेम आहे या विश्वासावर सर्वस्व बहाल करतात आणि फसवणारा फसवतोच.. तर, हा बलात्कारच आहे.. नुसता शरीराचा नाही तर विश्वासाचा देखील.
<<<<<लग्नाच्या आमिषानी २
<<<<<लग्नाच्या आमिषानी २ वर्षे बलात्कार असल्या बातम्या एक आड एक दिवस पेपर येतात, त्या बघुन हसावे का रडावे ते कळत नाही>>>
एक आड एक दिवस? अशा बातम्या छापणारा एखादा स्पेशल पेपर आहे का?
शतकानुशतके बाईने ही होरपळ
शतकानुशतके बाईने ही होरपळ सोसलीये आता त्याचे थोडे चटके पुरुषवर्गाला बसत असतील तर उगाच जळलो जळलो म्हणून बोंबाबोंब करू नये...
चूक ! मुळात हे स्त्री विरुद्ध पुरुष इतके साधे गणित नाही. एखाद्या स्त्रीने सासरच्या लोकांविरुद्ध ४९८ ची खोटी केस केली तर नवर्याची आई, बहीण ई लोकांना भयंकर त्रास होतो, म्हातार्या स्त्रियांना कोर्टाच्या तारखेला वारंवार हजर रहावे लागते, त्या स्त्रिया नाहीत ? ४९८ च्या बहुतेक केसेस बोगस असतात हे सुप्रीम कोर्टाच्या एका न्यायाधीशांनेही मान्य केले आहे. इतकेच नव्हे तर या प्रकरणात सरसकट अटक करू नये म्हणून नुकतेच निर्देशही दिले आहेत. दिल्लीतील एका मुलीचे दुसर्या एका मुलावर प्रेम होते आणी म्हणून लग्नाच्या दिवशी तिने नियोजित वराशी विवाह करायला नकार दिला. हुंडा मागितला असा कांगावा करून ४९८ ची केसही घातली. मुलाच्या आईची इमाने इतबारे केलेली शिक्षिकेची नोकरी गेली, मुलगी रातोरात सेलेब्रिटी झाली. अगदी अमेरिकेतील ओप्रा शो वरही आली. एन सी ई आर टी च्या पुस्तकात तिचा धडाही आला. तिच्या सासरची बदनामीही. दहा वर्षांनी कोर्टात तिचे पितळ उघडे पडले तोपर्यंत नवर्याचे नुकसान व्ह्यायचे होउन गेले होते. खोटा खटला घातल्याबद्दल तिच्यावर कारवाई नाहीच.
'द हिंदु' ने दिल्लीतील सुमारे सहाशे रेप केसेस चा सखोल अभ्यास करून काढलेले निष्कर्ष जरूर वाचावेत.
त्यापैकी फक्त १६२ केसेस ज्याला आपण बलात्कार म्हणू अशा आहेत.
बहुसंख्य (१८९) केसेस घरातून पळून गेलेल्या मुलामुलींची आहेत. आपली मुलगी एखाद्या मुलाबरोबर पळून गेली की लगेच तिचे वय १४ दाखवून तिच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराची केस घालण्यात येते. कोर्टाचा बराच वेळ मुलीचे वय निश्चित करण्यात जातो. शिवाय या मुलावर माझे प्रेम आहे असे त्या मुलीने कोर्टात अगदी शपथपूर्वक सांगितले तरी जर ती सज्ञान नसेल तर कायद्या प्रमाणे तो मुलगा दोषीच ठरतो. न्यायाधीश त्याला किरकोळ शिक्षा देऊ शकत असत पण एप्रिल २०१३ मध्ये झालेल्या कायदा दुरुस्तीने न्यायाधीशाचा तो अधिकारही काढून घेतला गेला. हे बरेचदा आंतर जातीय आणी आंतर्धर्मीय विवाह असतात आणी केवळ धडा शिकवायला रेप केस घातली जाते.
१०९ केसेस 'लग्नाच्या आमिषाने बलात्कार' च्या आहेत आणी त्यात फक्त दहा केसेस मध्ये शिक्षा झाली. एका सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या घरी एक नवोदित अभिनेती काही वर्षे लिव्ह इन राहिली आणी मग त्याच्यावर 'लग्नाच्या आमिषाने बलात्कार' ची केस घातली. रेप सारख्या गंभीर गुन्ह्याच्या तरतुदीचा हा सरळ सरळ गैरवापर आहे.
दिनेशदा, धन्यवाद ! तुम्ही
दिनेशदा, धन्यवाद !
तुम्ही सुचविलेला भाग शोधून पाहिन.
विकु, फारच चिंताजनक आहे हे.
विकु, फारच चिंताजनक आहे हे.
आक्रस्ताळ्या आणि कांगावखोर बाईमुळे एका सज्जन माणसाची झालेली दैना पाहिली आहे मी.
अर्थात नंतर सामोपचाराने एकत्र येऊन आता सुखाने(?) संसार चालू आहे.
पण यातल्या नवर्याला जो काही मनस्ताप सहन करावा लागला होता तो फार भयानक होता.
विकु ,हा एक विचित्र चष्मा आहे
विकु ,हा एक विचित्र चष्मा आहे .कायद्याचा गैरफायदा घेणे याचे समर्थन नाही करायचेय पण पुन्हा विचारते, ४९८अ हा एकच आणि पहिलाच कायदा आहे का ज्याचा गैरफायदा घेतला गेलाय ??? कायद्यातून पळवाटा शोधणे, गैरफायदा घेणे हे आपल्याकडे कितीतरी वेळा होते की !! मग याच कायद्याबद्दल एवढा ओरडा का ?
उदा. टॅक्स मधे पळवाट मिळावी म्हणून एनाराय किंवा तत्सम स्टेटस वापरणे, दोन - ३ बायका करायच्या असतील तर तेवढ्यासाठी मुस्लीम होणे, शिक्षा टाळण्यासाठी अल्पवयीन, वय्स्क, मेंटली अनफिट जाहिर करणे . एक ना अनेक, किती सांगू ? त्या मूळ कायद्यांचा हेतू चांगलाच असतो पण पळवाटा शिधल्या जातात.
म्हणून हे कायदेच रद्द करावेत असे म्हणाल का ?
कायदा रद्द करण्यापेक्षा,
कायदा रद्द करण्यापेक्षा, त्यात आवश्यक ते बदल कसे करता येतील हे पाहिले जावे.
तसेच या कायद्याबद्दल ओरड का तर यामधे लोकांच्या मानसिक, सामाजिक, इ. हानी जास्त होते म्हणुन.
असे वाटते.
४९८अ हा एकच आणि पहिलाच कायदा
४९८अ हा एकच आणि पहिलाच कायदा आहे का ज्याचा गैरफायदा घेतला गेलाय ??? कायद्यातून पळवाटा शोधणे, गैरफायदा घेणे हे आपल्याकडे कितीतरी वेळा होते की !! मग याच कायद्याबद्दल एवढा ओरडा का ?
याचे कारण मुळातच हा कायदा नैसर्गीक न्यायाच्या तत्वाच्या विरुद्ध आहे आणी त्यतल्या तरतुदी भयंकर आहेत. तुम्ही दिलेली इतर उदाहरणे गैरलागू आहेत कारण ते तितकेसे गंभीर नाहीत. एखाद्याने टॅक्स वाचवण्यासाठी इकडे तिकडे फेरफार करणे, दोन बायका करण्यासाठी मुस्लिम होणे यात इतरांचे काय नुकसान आहे? पण ४९८ चे हत्यार वपरून एखादी स्त्री सासरच्या लोकांचे जे अपरिमित नुकसान करू शकते ते भयंकर आहे. शिवाय तिला खोटी केस घातल्याबद्दल शिक्षाही होत नाही. गाजराची पुंगी. खुद्द सुप्रीम कोर्टानेच या कायद्याचा गैर वापर होत आहे हे मान्य करणे पुरेसे आहे. ४९८ चे इंटेन्सिव्ह स्ट्रक्चर पर्व्हर्स आहे. माझा एक मित्र तीन वर्षे तुरुंगात आहे. माझ्या नात्यातली एका मुलगी सासरी त्रास देतात म्हणून वर्षभरातच परतली. तिच्या सासरच्यांवर ४९८ केस घालू आणी दहा वर्षे त्यांना कोर्टाच्या चकरा मारायला लावू असे काही उत्साही समाजसेविकांनी सुचवले होते. सुदैवाने मुलीच्या कुटुम्बाने दुसरे स्थळ बघून लग्न करून देन्याला जास्त महत्व दिले आणी ती सुखी आहे.
मैत्रेयी +१०० अवांतर पण तरीही
मैत्रेयी +१००
अवांतर पण तरीही : विजयकुलकर्णी , अनेक वेळा मुली घरी परत येतात तेव्हा त्या दुसरे लग्न लावून देण्याच्या परिस्थितीत उरलेल्या नसतात. त्यांना न्याय मिळावा ह्या उद्देशाने काही कायदे आहेत. तुमच्या नात्यातील मुलगी सुदैवी म्हणा.
मुस्लीम होवून दुसरे लग्न करणारे सर्व धर्मेंद्र नसतात. पहिल्या पत्नी आणि अपत्यांचे संगोपन शक्य नसतानाही मुस्लीम होवून दुसरे लग्न करणे हे गंभीर आहे. त्या धर्माचा अपमान जाऊ द्या पण बेसिक माणुसकी अशा प्रकारात धारातीर्थी पडते.
तसेच कर चुकवणारे लाखो-करोडोचा कर चुकवण्यासाठी इकडे तिकडे करतात. समाजातील पायाभूत सोयींचे फार नुकसान होते. मैत्रेयी देते ती उदाहरणे गंभीर आहेत आणि म्हणून तिचे म्हणणे रास्त आहे.
maitreyee , >> म्हणून हे
maitreyee ,
>> म्हणून हे कायदेच रद्द करावेत असे म्हणाल का ?
अजिबात नको. पळवाटा बुजवायला हव्यात. मला वाटतं शासनाच्या विविध अंगांमध्ये पेचप्रसंग उत्पन्न झाला तर सर्वोच्च न्यायालय स्वमते तो हाताळू शकतं. मात्र दंडविधानाच्या बाबतीत तसं करता येत नाही. ४९८ अ च्या जाचक तरतुदी (सर्व नव्हे) व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात आहेत अशी जनहित याचिका दाखल कशी झाली नाही याचं नवल वाटतं.
आ.न.,
-गा.पै.
Pages