कायदेशीर, बेकायदेशीर आणि नैतिकता!

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 November, 2014 - 13:48

"
कायदे हे नेहमीच नैतिकतेला अनुसरून बनतात, असे माझे मत आहे, नव्हे असा माझा विश्वास आहे!..
"

आता धागा सुरू करूया,

१) त्या दिवशी सचिन फॅन क्लब या धाग्यावर सचिनच्या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी फिरतेय अशी बातमी पाहून मी म्हणालो, "पायरसी हे नक्कीच बेकायदेशीर कृत्य आहे, पण तरीही सचिनच्या काही गरीब चाहत्यांकडे (ज्यात तुटपुंजे पॉकेटमनी असलेले कॉलेजस्टुडंट सुद्धा आले), ज्यांना हे पुस्तक विकत घेणे परवडणार नाही, अश्यांपर्यंत हे पुस्तक पोहोचले तर मला मनापासून आनंदच होईल." ..अर्थात, अगदी मनापासून केलेले हे विधान होते.

मी स्वत: त्या पिढीचे प्रतिनिधित्व करतो ज्या पिढीला क्रिकेटची जाण येणे आणि सचिन नावाचा तारा भारतीय क्रिकेट क्षितिजावर उगवणे हे एकाच वेळी घडले. तेव्हापासून द्रविड-सेहवाग-दादा यांचा उदय होण्याआधी, झाल्यानंतरही, किंबहुना अगदी हल्लीचे कोहली-धोनी-शर्मा यांच्या झंजावातातही, भारतीय क्रिकेटमधील आमचा ईंटरेस्ट सचिन या नावापासूनच सुरू व्हायचा आणि त्याच्या बाद होण्याला संपायचा. अगदी त्याच्या शेवटच्या सामन्यापर्यंत, "सचिनने किती केले?" हा प्रश्न स्कोअर विचारण्याचाच एक भाग होता. असा हा खेळाडू आपल्या स्वत:च्या कर्तुत्वावर मोठा झाला हे न नाकारताही त्याच्या यशातील त्याच्या निस्सीम चाहत्यांचा वाटा देखील कबूल केलाच पाहिजे. आणि अश्यांसाठीच ते केलेले विधान होते. भले मग पुस्तक छापणे आणि विकणे हा व्यवसाय मानला तरी पैसाच कमवायचा म्हटले तर सचिनने स्वाक्षरी केलेल्या बॅट दहापट किंमतीत विकायला काढल्या तरी तो तेवढे पैसे सहज कमावू शकतो. म्हणूनच ज्यांनी सचिनला बघण्यात वीस वर्षे खर्ची घातली त्या प्रत्येकाला सचिन वाचायलाही मिळाला पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

असो, तर त्या दिवशी ‘सचिन फॅन क्लब’ या धाग्यावर, माझ्या या विधानावर तिथे थोडासा गदारोळ उडाला. मी शब्दाला शब्द टाकत बसलो असतो तर वाढलाही असता. पण मी सुद्धा सचिन फॅन क्लबचा सदस्य असल्याने तिथे त्या धाग्याला वेगळे वळण लावायचे टाळलेच. आणि इथे आज हा धागा उघडला.

कोणाला यावर इथे चर्चा करायची असल्यास वेलकम पण,
हा धागाही इथेच संपत नाही..

२) त्यानंतर एका धाग्यावर लेटेस्ट भोंदू बाबा रामपालवर चर्चा चालू होती. चर्चेच्या दरम्यान त्या बाबाची काही लैंगिक शोषणाची स्कॅंडल्स सामोरी आली. त्या संतापजनक बातम्या पाहता कोणीतरी त्या बाबाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, लोकांच्या हवाली करत दगडाने ठेचून मारले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. अर्थातच हि इच्छा देखील मनापासून आणि प्रामाणिकच होती. काही जणांनी त्याला अनुमोदन देखील दिले. (मनोमन मी सुद्धा दिले).

पण ईथेही पुन्हा, हि इच्छा कायद्याच्या चौकटीत बसवू पाहता कोणत्याही गुन्हेगाराला शिक्षा करायला कायदा आपल्या हातात घेणे हा देखील एक गुन्हाच झाला. मग त्या आरोपीचा गुन्हा कितीही भयंकर का असेना आणि त्याच्या गुन्ह्याची शिकार खुद्द आपण का असेना, तरीही त्याला आपण स्वत: शिक्षा करणे हे बेकायदेशीर कृत्यातच मोडते. मग जसे वरच्या क्रमांक १ मधील भावनेचे समर्थन होऊ शकत नसेल तर या भावनेचेही नाही झाले पाहिजे.

पहिल्या उदाहरणात कायद्याचे उल्लंघन करायचा विचार एखाद्या गरजूला मदत व्हावी भावनेतून आलेला आहे तर दुसर्‍यामध्ये कोणालातरी धडा शिकवण्याच्या भावनेतून आला आहे.

३) आता तिसरे आणि जरा वेगळे उदाहरण बघूया. ज्यात कायद्याच्या चौकटीत एखादी गोष्ट बसत असूनही कित्येकांना ती मंजूर नसते. यासाठी विषय गेले दोनेक महिने फॉर्मात असलेल्या राजकारणाचा घेऊया.

यंदाच्या विधानसभा निवडणूकीत भाजपाला बहुमत मिळाले नाही हे आपण सारे जाणतोच. अश्यावेळी ते कायद्यानुसार किंवा संविधानानुसार ईतर पक्षांची मदत घेऊन सरकार बनवू शकतात. पण तेच त्यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा (तो देखील न मागता) घेतल्यावर अचानक एकच गदारोळ उठला. जणू काही त्यांना बरोबर न घेणे हे त्यांच्यासाठी बंधनकारकच होते. खुद्द भाजपाला मत दिलेल्या लोकांनी हा आमचा विश्वासघात आहे, आम्ही फसवलो गेलो असा ओरडा सुरू केला. परिणामी भाजपाला ठामपणे राष्ट्रवादीचा पाठिंबा स्विकारताही येत नव्हता. पण जर संविधानानुसार ते गैर नसेल तर तुम्ही आम्ही मतदार याबाबत कोणत्या अधिकाराने त्यांनी तसे करू नये हा हट्ट धरू शकतो??

म्हणजे इथे आपण फिरून पुन्हा नैतिकतेकडे आलो तर!..

यातून मॉरल ऑफ द स्टोरी काय काढायची हे आपल्यावरच सोडतो.
आपलाच,

Group content visibility: 
Public - accessible to all site users

{{{ बाकी एखादी बाई आपली चूक असूनही किंवा समोरच्याची चूक नाही हे तिला माहीत असूनही उगाच एखाद्या पुरुषाच्या थोबाडीत मारेल याची शक्यता (प्रोबॅबिलिटी) (भारतीय समाजाचा विचार करता) किती असावी? }}}

या प्रश्नातच याचे उत्तर आहे. "चांगली (?)" / "चांगल्या चालीची / चारित्र्याची {?)" स्वतःची चूक नसतानाही परपुरुषाच्या थोबाडीत मारणार नाही असा विचार खोलवर रुजलेला असणे ही भारतीय समाज मानसिकता आहे. त्यामुळे जी बाई असे कृत्य करेल तिला समाज आपोआपच वेगळ्या नजरेने पाहील आणि ती समाजाची सहानुभुती गमावून बसण्याची शक्यता आहे.

http://www.maayboli.com/node/63096 या धाग्यावरील चर्चेतून....

हुप्पाहुय्या,
न्याय मिळवण्यासाठी कायदेशीर मार्ग ऊपलब्धं असतांना खुनाची भलामण करण्याच्या तुमच्या वाक्याचा निषेध.
>>>>>

कायदेशीर मार्ग Happy
तुम्ही हा मुद्दा घेऊन माझ्या या धाग्यावर याल का?

किंबहुना हा धागा पुर्ण वाचून घेतलात तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल आणि मला पुन्हा तेच लिहावे लागणार नाही.
तरी काही शंका असल्यास ईथेच विचारलेल्या आवडतील जेणेकरून त्या कथेच्या धाग्यावर अवांतर चर्चा होणार नाही Happy

धाग्याने शंभरी गाठण्यासाठीचा खटाटोप का हा? स्वतःचेच ईतर धाग्यावरील अवांतर प्रतिसाद ऊचलून आणण्याएवढी वाईट वेळ एवढ्या लवकर येईल असे वाटले नव्हते. अर्थात तुम्हाला प्रतिसाद संखेशीच मतलब असल्याने यात वावगे वाटणार नाही हे कळाले.
एक हिंट देते.. तुमच्या वरच्या प्रश्नावर मी त्या धाग्यावर ऑलरेडी प्रतिसाद दिला आहे तो कॉपी पेस्ट करा ईथे म्हणजे संख्या अजून एकने वाढेल.

मायबोलीकरांना तुमची कारस्थाने ध्यानात आल्याने प्रतिसादांचा ओघ घटला असे वाटते का?
मागचा धागा तर २२ वरच अडकला त्यात ७-८ तुमचे आणि ३-४ तर माझेच आहेत. काही तरी जोरदार थाप, खोटे विधान, सनसनाटी, भडकाऊ धागा येवू द्या आता. नाही तर एक करा स्वःतःचाच फॅन क्लब काढता का?

Pages