पालक पकोडे

Submitted by प्रीति on 24 November, 2014 - 11:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तुर दाळ ३/४ वाटी
पालक १ जुडी
ति़खट, मीठ, धने, जीरे पुड
तळायला तेल

क्रमवार पाककृती: 

तुर दाळ ४-५ तास किंवा रात्रभर भिजवुन, उपसुन ठेवावी. पाणी अजिबात नको.
ओबडधोबड (पाण्याशिवाय) वाटुन घ्यावी.
पालक बारीक चिरुन घ्यावा.
पकोडे तळायच्या अगदी आधी, वाटलेली दाळ, पालक, ति़खट, मीठ, धने, जीरे पुड मिसळुन गुलाबजाम साईझ पकोडे तळावे. जरा ब्राऊन झाल्यावर काढुन, सॉस, चिंचेची चटणी सोबत खावेत.

वाढणी/प्रमाण: 
७-८ जणं स्टार्टर म्हणुन
अधिक टिपा: 

हे पकोडे, मस्त क्रिस्पी होतात. गार, गरम कसेही मस्त लागतात. आलं, लसुण पेस्ट टाकुन अजुन चव वाढवता येईल. हे पकोडे तळताना सारखे हलवत बसावे लागत नाहीत, मस्त गप्पा मारत तयार होतात. पालक आधी मिसळला तर पाणी सुटतं, असं झाल्यास थोडं लाडु बेसन मिसळावं. पालक आवडीनुसार कमी जास्त करता येईल.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

६ वाट्या तूरडाळ आणि एक जुडी पालक?
प्रमाण चुकतंय का?
आमच्या मध्यम आकाराच्या सहावाट्या पकडल्या तर जवळपास एक ते दीड किलो नुसती तूरडाळच होईल.

खाऊन संपले, फोटो विसरले. काल उरलेला चुरा खाल्ला, मस्त कुरकुरीत होता, एका दिवसा नंतर पण. नक्की करुन बघ, मस्त लागतात.

छान प्रकार.
कारवार कडे असे प्रकार करतात. तूरडाळ आणि तांदूळ एकत्र वाटतात.. पण ते थंड झाल्यावर चांगले लागत नाहीत.
हे कुरकुरीत रहात असतील.

कालच केले मस्त कुरकुरीत झाले. मी थोडा कांदा पण घातला चिरून. माझा मुलगा चणा डाळीला allergic आहे त्यामुळे त्याच्या साठी बरं झालं. धन्यवाद प्रीती.
20150827_200646_resized.jpg

अरे मस्तं वाटतीये रेसिपी.. हे काँबी नाही करून पाहिलं कधी.. क्रिस्पी म्हंजे हिट होतील Happy

( मी तिख्खट वाल्या हिरव्या मिरच्या ही घालीन.. Happy )