होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता या शिरेलीचा ट्यारपी जानीच्या बाळापेक्षा 'कला गप्प बसू नको' वर आहे. >+१
पण आता जास्तच ताणलय..

पण कलाबाईंचा हेतू दोन्ही मुलांच्या लग्नात स्पष्ट आहे पैसा लुबाडणे.>>> हो पण पिंट्यासाठी पाहीलेली मुलगी निदान चांगली होती. नाहितर तो अनिल आपटे

काल कलाबाईंचा अभिनय सॉलीड आवडला. त्यांचा प्रसंग झाल्यावर सरळ चॅनेल बदलले. जान्हवी ला बघवत नाही.
कलाबाईं चे वागणे खरेतर पटते. अशी गावंढळ मुलगी घरी येवून म्हणाली ' आमचे लव आहे वैगरे' तर कोणतीही आई असाच आकांत तांडव करेल . Happy

नाव बदलणारेत म्हणे या शिरेलीचं... नवीन नाव - होणार का बाप श्री या वर्षी! Biggrin Light 1
(वॉ.अ‍ॅ. ढकलमेसेज)

इथे एवढी चर्चा करताहात म्हणून १० मिनिटे बघितली भारतात ही.. कसली मठ्ठ हिरॉईन आहे ती. त्या पाणीपुरीच्या गाडीवरच्या एपिसोड मधे निव्वळ टाईमपास होता.

मला वाटतं हत्तंगडी बाई हल्ली सेटवर जातच नसाव्यात, घरातच काहीशे क्लोजप्स चित्रीत करुन ठेवले असावेत.

मालिकेच्या पहिल्या मिनिटापासून ते शेवटच्या मिनिटापर्यन्त तो श्री ओठाचा चम्बू करून आणि ती जान्हवी फिदीफिदी हसत एखाद्या विषयावर ५-६ एपिसोडस कीस पाडत बसलेले असतात.

कला आणी जानु एकमेकीन्च्या झिन्ज्या ओढणारेत का त्यात? तसेही पिन्टुकल्याच्या लग्नावरुन तमाशे होणार असे दिसतय. काय तर म्हणे पिन्ट्याने पळुन जाऊन लग्न केल्याची अफवा उडते.

जानूच्या डिलेव्हरीवरून सहा महिने कीस पाडल्यावर, लोकांनी कंटाळून नेहमीप्रमाणे मालिकेला शिव्या घालायला सुरुवात केल्यावर, यांना जाग आली. त्यामुळे सध्या डिलेव्हरी प्रकरण बाजूला टाकुन आता पुढले सहा महिने त्या पिंटयाच्या लग्नावर कीस पाडतील. तेव्हा जानूचा बहुदा पाचवा किंवा सहावा महिना चालू असेल. (आत्ता तिसरा चालू आहे.) मग पुन्हा एकदा जानूची डिलेव्हरी प्रकरण चालू होईल.

सारिका पिंट्याच्या लग्नाबरोबरच सरुमावशीच्या लग्नाचाही घाट घालणारेत गोखले मंडळी.. कालच श्री म्हणत होता जान्हवीला ..

सरुला तो पप्पुच बरा होता. तेव्हाच उरकले असते पण ही सरु अत्यानन्द महाराजान्च्या मागे लागल्याने ते फिसकटले.

सगळ्यांची वाट लावल्यावरच थांबणार हे लोकं.
म्हणजे लाईनीत आणल्यावर....

पण बेबीचा नवरा मध्ये दाखवला होता ना...

काल बेबीला वेफर खाताना पाहून मला इतकी हुक्की आलीय, मी वेफर घेवून आले.

लहानपणी असाच डब्यात भरलेला वेफर मी जेवायच्या आधी खायचे, नावडती भाजी, डाळ असली की आई वैतागायची हे उगीच आठवले. Happy असो.

पण बेबीचा नवरा मध्ये दाखवला होता ना... >>> हो ना, मला तेव्हा वाटल होत की त्याची बाजु आत्यासमोर मांडुन त्या दोघांचा संसार मार्गी लावेल जानु आणि बेबी आत्याच मतपरीवर्तन करेल. प्रेग्नंसीच्या भानगडीत देवस्थळी काका विसरले वाट्ट आत्तोबाला..

जानूच्या प्रेग्नंसीत देवस्थळी काकाच काय बरेच जण काय काय विसरलेत. खुद्द जानूच हे विसरली आहे की ती प्रेग्नंट आहे मधेच धावते काय, रडते काय हसते काय??
आम्हाला का माहिती नाही मुड स्वींग्जबद्दल, आम्हाला का मुलं झाली नाहीत??? Uhoh उगाच आपलं दाखवायच म्हणुन काहीही दाखवतायत झालं

आम्हाला का मुलं झाली नाहीत???
>>
तुम्ही उगाच अधुन मधुन येड्यासारखे खिडळता का?
तुम्ही तुमच्या नवर्‍याला काहीही हं श्री म्हणता का?
तुम्ही सुनोत्तम (पुरुशोत्तमच्या चालीत वाचा) आहात का?
तुमच्यावर ६ सासवांचा संसार जुळवायची जबाबदारी आहे का?
तुमचे सासरे मधे अमेरिकेतून येतात आणि नंतर अचानक पणे अनंत काळासाठी गायब होतात का?
तुम्हाला कामधाम सोडून स्मितुडी स्मितुडी करणारा बॉस आहे का?
मुळात तुमचा एवढा मोठा गृहोद्योग आहे का की त्या कंपनीतल्या peonसकट सगळे फक्त आणि फक्त तुमच्या प्रेगनन्सीचीच चर्चा करतात
तुमच्या आयुष्यात आपटे आहे का जो सगळे विषय संपले कीच उगवतो?
इन शॉर्ट तुमचं आयुष्य तद्दन मुर्खपणाचं आहे का?

नाही ना?

मग तुमचं वेगळं आहे Proud

Wink
सध्या सिरिअल पहात नसल्याने अधे मधे गोष्टी राहू शकतात.
अ‍ॅक्च्युअली मी हे पण लिहिणार होते -

तुम्ही अशोकमामांची लाडकी भाची आहात का? तुम्ही कितीही चुकलात तरी ते तुमचीच बाजू घेतात का? तुमचा मंदपणा त्यांना मोहकपणा वाटतो का?, तुमच्या बावळटपणाला ते नजरे आड करतात का? Proud

पण मामांना घाबरून गप्प बसले Proud

मामा Light 1

रिये हा भाग शिरेलीत येत नाही..

बाकी तुझे ते पॉइण्ट्स कोलगेटच्या जाहीरातीवरुन आलेले आहेत ना?

तुमच्यावर ६ सासवांचा संसार जुळवायची जबाबदारी आहे का? >>> Uhoh फक्त बेबुटली आणी अत्यानंद महाराज वाली एवढ्याच दोघींचाच संसार जुळवायचाय ना? आणी आता या वयात आईआजींचा संसार का जुळवायचा आहे म्हणे? Proud

Pages