बस नंबर ८४.

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 11 November, 2014 - 05:20

हा किस्सा कालचाच.

ऑफिस ला जाण्यासाठी बस स्टोपवर पोहोचले. समोरूनच बस नंबर ८४ गेली. ती बस मला चाल्लीही असती पण, थोड चालावं लागल असत इतकच. "गेली तर जाऊदे...येईल दुसरी" (दुसरा पर्याय नव्हता) असा विचार करून स्टोपवर बसायला गेले. (आजकाल मुंबई बस स्टोप सुधारित स्तिथीत आहेत हे नशिबच...) फावला वेळ मिळालाच आहे तर जरा आपला स्मार्ट फोन चेक करावा या उद्देशाने ब्यागेत हात घालणार तितक्यात बाजूलाच बसलेल्या आज्जीनी विचारले, "बाळ एक मदत करशील का?" मी म्हणाले, "बोला न आज्जी काय झाल?" म्हणाल्या, "अर्धा तास झाला इथे थांबले आहे ..तू असेपर्यंत बस नंबर ८४ आली तर सांगशील का? आता नजरेने नीट दिसत नाही..." मी चकीत होऊनच म्हणाले," अहो आत्ता तर गेली न बस ती ८४ तर होती? कुणाला आधी का नाही विचारलत? आत्ता केंव्हा येईल देवच जाणे.." "अरेरे, हो का? कोणाला विचारू पोरी..? दोघेजण होते इथे.. एक फोनवरची गाणी ऐकत असावा.. आणि दुसरा काहीतरी कामात होता. फोनवर काहीतरी लिहित होता आणि गालातल्या गालात हसत होता... त्याला डिस्टर्ब करावस नाही वाटल ग "(अस म्हणत आज्जी चक्क मिश्किलपणे हसत होत्या ) त्यांनी डोळे मिचकावले. (आजच्या पिढीला ओळ्खल... धन्य हो आज्जीबाई) मी काय बोलणार गप्पच बसले, आणि फोन काढण्यासाठी ब्यागेत घातलेला हात तसाच बाहेर काढला. थोडस बोललो, त्यांना कळाल कि माझ्या रुटची बस त्यांना उपयोगाची नव्हती, त्यांची ८४ नंबर मात्र मला चालली असती. मुंबईत बस आणि ट्रेन फार क्वचित प्रसंगी मनासारखी मिळते. (अर्थात हे विधान माझ्यापुरतच मर्यादित आहे) नाहीतर सगळा सावळा गोंधळ आणि बेभरवशाचा कारभार. आज पहिल्यांदाच उगाचच वाटल कि, माझ्या बस ऐवजी त्यांची बस पहिले यावी, पण दुर्देवाने झाल उलटच, समोरून माझी बस आली, माझी चलबिचल पाहून त्याच म्हणाल्या, "तुला उशीर होत असेल, जा..." मी मागच्या दाराने चढले, मागे बघितलं तर बस नंबर ८४, जोरात ओरडले, "आज्जी तुमची बस... चढा पटकन..." आणि परत सगळ्यांना ढकलत मीही उतरले. कंडक्टर ने हiसडलेली शिवी त्याला ठेंगा दाखवून, वेडावून त्यालाच परत दिली. आणि सरतेशेवटी बस नंबर ८४ पकडली, आज्जींच्या बाजूला जाऊन ऐटीत बसले देखील. का कुणास ठाऊक, त्यांच्या चेहर्यावरच समाधान पाहून मला एकदम मस्त वाटल. माझ ऑफिस आल, मी उतरले.. खिडकीतून आज्जीला टाटा केला, त्यांनीही हौशीने हात दाखवला. मी समाधानाने पुढचा रस्ता कापत होते, अचानक आज्जीनी दाखवलेल्या हाताचा अर्थ लक्षात आला. त्यांनी पाच बोट दाखवली. तो टाटा नव्हता, आशीर्वाद होता. त्यांनी त्याच अर्थाने तो हात दाखवला होता. मी जर त्यांना सांगितलं नसत तर पुढे कितीवेळ त्यांना त्या बस स्टोपवर घालवावा लागला असता कुणास ठाऊक?

मागे एक जोक वाचला होता, "आजकाल तोच माणूस ताठपणे चालतो ज्याच्याकडे स्मार्ट फोन नाही" अगदी खर होत ते. आपल्याच धुंदीत, आणि सोशल नेटवर्किंग च्या नावाखाली असे दररोजच्या जीवनातले किती तरी आशीर्वाद आपण मिळवतच नाही ...

थोड जड जाईल, कठीण आहे पण अशक्य मात्र नाही. किती वेळ फुकट घालवायचा आणि किती वेळ मार्गी लावायचा हे आपल्याच हातात आहे. शेवटी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारकच ठरतो. मग थोड बदलुयात का स्वतःला? मोबाईल मधून थोडा वेळ डोक बाहेर काढून बघुयात कि जरा उघड्या डोळ्याने... या सुंदर जगाकडे...

मयुरी चवाथे- शिंदे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टॉप लिहल काय आनि स्टोप लिहल काय समजनारे समजुन वाचतात.
शुध्द लिहनार्‍याला मायबोलि certificate देते वाटत.

thank's Happy

<< तुम्ही एकदा बस मधे चढलात की लगेचच्या लगेच उतरायचे असेल तर आजकाल आपल्यामागुन येणार्‍यांना ढकलतच उतरावे लागते. >> ट्रेनमधे तर फक्त न हालचाल करता उभं राहायचं स्टॅच्युसारखे लोकच तुम्हाला व्यवस्थित स्टेशनवर उतरवतात अलगद गर्दीच्या वेळी . Proud Happy

प्रतिसादामुळे व्यथित झाला असलात तर क्षमस्व. सगळे हवे ते लिहून शेवटी क्षमस्व लिहिण्यात काय अर्थ आहे असे वाटत असेल तर त्याला निदान माझ्याकडे तरी इलाज नाही. >> माफ करा बेफीकीर त्यांनाही आणि मलाही आज बालदिवस Happy आहे ना त्यासाठितरी.

तुमच्या पोस्ट वर, एक वाचलेला मजेशीर किस्सा आठवतो आहे तो सांगते --मोबाईलचे फायदे माहीत आहेतच की सर्वांना.:स्मित:
तोटयाचा हा एक ,भरपुर पाउस पडुन गेला होता मुंबईत ,त्याची मजा लुटण्यासाठी चार मित्र पाण्याने भरुन गेलेल्या रस्त्याने जात होते. तरीही गुडघाभर पावसाच्या पाण्याच्या अवस्थेत एक मित्र मोबाईल वर फोटो काढुन फेसबुक वर टाकत होता.आणि पावसाचे पाणी जाण्यासाठी उघडण्यात आलेले मॅनहोल चे झाकण उघडलेले न दिसल्यामुळे तो मोबाईलवर फोटो काढणारा मित्र त्यात बुडाला.इतर मित्रांनी लगेचच प्रसंगावधान दाखवुन त्याला हाताला खेचुन बाहेर काढले. परंतु बाहेर काढल्यानंतर एक मित्र इतका भडकला की म्हणालाच "काढ अजुन फोटो आणि कर अपडेट मैत्रीणींसाठी फेसबुक वर म्हणजे उद्या त्या सगळ्या न्युज मधे तुझी बातमी पाहुन श्रद्धांजली द्यायलाच आल्या असत्या. फिदी: Happy

ये तुम जानते हो कि ये उनकी बस नही थी, ये मै जानता हूँ, लेकिन कंडक्टर नही जानता....>>>> Rofl
आणि अजुन एक धागा काढा चेतनजी चित्रपटावर -माझे आवडते कलाकार व त्यांचे बालपणीचे फोटो मी पहीला दिपीकाचा टाकेन जर माझी फोटोंची केस (पेंन्डिग असलेली) सुटली तर. Happy

: Happy

माणसाचे लिखाण नाही तर विचार शुद्ध असावेत.

लेखिकेचेही शुद्ध विचार मला भावले असे सांगायचे असल्याने हि पोस्ट अवंतर नाहीये.

अरे लोकहो टेस्टी बिर्यानी मधे १०-१२ खडे सापडले तर सांगता की नाही आचार्‍याला की बाबा बिर्यानी अप्रतिम होती पण खडे होते त्यात.
तसाच लेख अप्रतिम आहे म्हणून त्यातले खडे काढ्हून परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न चालुये.
जे फालतू ललेख असतात त्यात कोणी शुद्धलेखन पहातं का?
कै तरीच आपलं

रीया यांच्याशी सहमत, शुद्धलेखनाच्या सुधारणा नेहमी वेलकम असाव्यात.
माझी वरची हसणारी स्माईली केवळ ते वाक्य वाचून हसायला आले म्हणून होती.

<< अतिच अवांतर - चेतन, तुम्ही शेवटचा बस प्रवास (पीएमपीएल (पुण्यात आहात असं समजतेय) कधी केला होतात? >>

बसचा प्रवास २०१० पूर्वी मी बराच केलाय. २०१० मध्ये स्वतःचे वाहन खरेदी केल्यावर हे प्रमाण कमी झाले. आता वाहनाला सीएनजी किट बसविल्यावर तर बसप्रवास बंदच झालाय. ज्यादिवशी वाहनाला सीएनजी किट बसविले तेव्हा ते आणण्याकरिता गॅरेज पर्यंत गेलो तो माझा शेवटचा बस प्रवास ऑगस्ट २०१४ मध्ये केला. आता बसपेक्षा स्वतःचे वाहन स्वस्त वाटते.

>>>>> रिया, यू आस्क्ड फॉर धिस ! Proud

त्यांचं स्वतःचं इतकं गुणी वाहन असून तू त्यांना बसमध्ये चढवतेस???? Angry

आता कोणी तरी त्या स्मार्ट फोन च्या अती वापराबाबत लिवा की बुवा!
... मला तर त्याला चिटकुन असलेले हात आजुबाजुला पाहिले कि तो आपल्या हातात नको असेच वाटते... म्हणुन आजवर घेतला नाही.

^^^^^^
स्मार्टफोनला त्याची वेळ ठरवून द्यावी.
जसे की मी करतो.

सकाळी ट्रेनमध्ये १५ मिनिटे
वॉशरूममध्ये १२ मिनिटे
लंचब्रेक झाल्यावर ८-१० मिनिटे
दोनदा टीब्रेक होतो तेव्हा प्रत्येकी ५-५ मिनिटे
संध्याकाळी ट्रेनमध्ये ३० मिनिटे
रात्री झोपायला बेडवर पडल्यावर डोळे जड होईपर्यंत साधारण १०-१५ मिनिटे.

म्हणजे टोटल इझ इक्वल टू........ कोणाकडे कॅल्सी आहे का?

असो, हा दिड तासाच्या आसपास जाणारा वेळ स्मार्टफोनगिरी करायला नक्कीच खूप वा पुरेसा आहे, पण यात कुठेही माझी दिनच्रर्या गडबडत नाही, वैयक्तिक कामे अडत नाहीत, किंवा मी माझ्या जवळच्यांना वेळ देत नाही, असे होत नाही. Happy

फारेण्ड, माझ्यामते येथेच गफलत होत आहे. बस स्टॉपपाशी आली की इच्छुक प्रवासी सरसावून पुढे झालेले असतात. त्या आजींना सांगण्यात आले होते की ती बस त्यांच्यासाठी योग्य नाही. त्यामुळे त्या पुढे सरसावल्या नाहीत. मग कंडक्टरने का विचारावे बाहेर डोके काढून? आजींना जी बस त्यांच्यासाठी आहे असे सांगण्यात आले होते त्या बससाठी त्या सरसावल्याच की? आणि तुम्ही म्हणता तसे कंडक्टर्स हे सहसा ग्रामीण विभागात बघायला मिळतात. मुंबईत तसे दिसत नसावेत, पुण्यातही नसतात. >>> बेफि, पॉइंट आहे. मान्य. मी पुण्यात लहानपणी बघितलेले आहेत, पण I get your point.

ऋन्मेऽऽष , चेतन सुभाष गुगळे, फारएण्ड , रीया, बेफ़िकीर- तुम्हा सर्वांचे स्पेशल आभार. मला उगाचच नारद मुनी झाल्यासारखं वाटल... म्हणजे लेख लिहून मी तर नामानिराळी झाले, पण तुम्ही वेगवेगळे वाद घालून, विनोद करून, कौतुक करून... माझ्या लेखाची TRP वाढवलीत. धन्यवाद.

ऋन्मेऽऽष- ( वॉशरूममध्ये १२ मिनिटे, लंचब्रेक झाल्यावर ८-१० मिनिटे, दोनदा टीब्रेक होतो तेव्हा प्रत्येकी ५-५ मिनिटे ) तुमच्या ऑफिसमध्ये व्हेकन्सी आहे का हो? आम्हाला नाही मिळत इतके ब्रेक... Happy

सुरेख- तुमच्या प्रोत्साहनाबद्दल आभार..

आणि इतरांनाही धन्यवाद

रीया, तुमच्या प्रतिसादावरून मला एक विषय सुचल्याचं मी आधीच लिहीलं होतं. आज त्यावर लेख लिहून तो प्रकाशित केला आहे.

http://www.maayboli.com/node/52204

छान वागलात व छान लिहीलंत.
ज्या आजींकरतां हें घडलं , त्यानीच हें सारं वाचलं तर मात्र म्हणतील, " पोरी, बस नको, पण हा धागा आवर !" Wink

Pages