बस नंबर ८४.

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 11 November, 2014 - 05:20

हा किस्सा कालचाच.

ऑफिस ला जाण्यासाठी बस स्टोपवर पोहोचले. समोरूनच बस नंबर ८४ गेली. ती बस मला चाल्लीही असती पण, थोड चालावं लागल असत इतकच. "गेली तर जाऊदे...येईल दुसरी" (दुसरा पर्याय नव्हता) असा विचार करून स्टोपवर बसायला गेले. (आजकाल मुंबई बस स्टोप सुधारित स्तिथीत आहेत हे नशिबच...) फावला वेळ मिळालाच आहे तर जरा आपला स्मार्ट फोन चेक करावा या उद्देशाने ब्यागेत हात घालणार तितक्यात बाजूलाच बसलेल्या आज्जीनी विचारले, "बाळ एक मदत करशील का?" मी म्हणाले, "बोला न आज्जी काय झाल?" म्हणाल्या, "अर्धा तास झाला इथे थांबले आहे ..तू असेपर्यंत बस नंबर ८४ आली तर सांगशील का? आता नजरेने नीट दिसत नाही..." मी चकीत होऊनच म्हणाले," अहो आत्ता तर गेली न बस ती ८४ तर होती? कुणाला आधी का नाही विचारलत? आत्ता केंव्हा येईल देवच जाणे.." "अरेरे, हो का? कोणाला विचारू पोरी..? दोघेजण होते इथे.. एक फोनवरची गाणी ऐकत असावा.. आणि दुसरा काहीतरी कामात होता. फोनवर काहीतरी लिहित होता आणि गालातल्या गालात हसत होता... त्याला डिस्टर्ब करावस नाही वाटल ग "(अस म्हणत आज्जी चक्क मिश्किलपणे हसत होत्या ) त्यांनी डोळे मिचकावले. (आजच्या पिढीला ओळ्खल... धन्य हो आज्जीबाई) मी काय बोलणार गप्पच बसले, आणि फोन काढण्यासाठी ब्यागेत घातलेला हात तसाच बाहेर काढला. थोडस बोललो, त्यांना कळाल कि माझ्या रुटची बस त्यांना उपयोगाची नव्हती, त्यांची ८४ नंबर मात्र मला चालली असती. मुंबईत बस आणि ट्रेन फार क्वचित प्रसंगी मनासारखी मिळते. (अर्थात हे विधान माझ्यापुरतच मर्यादित आहे) नाहीतर सगळा सावळा गोंधळ आणि बेभरवशाचा कारभार. आज पहिल्यांदाच उगाचच वाटल कि, माझ्या बस ऐवजी त्यांची बस पहिले यावी, पण दुर्देवाने झाल उलटच, समोरून माझी बस आली, माझी चलबिचल पाहून त्याच म्हणाल्या, "तुला उशीर होत असेल, जा..." मी मागच्या दाराने चढले, मागे बघितलं तर बस नंबर ८४, जोरात ओरडले, "आज्जी तुमची बस... चढा पटकन..." आणि परत सगळ्यांना ढकलत मीही उतरले. कंडक्टर ने हiसडलेली शिवी त्याला ठेंगा दाखवून, वेडावून त्यालाच परत दिली. आणि सरतेशेवटी बस नंबर ८४ पकडली, आज्जींच्या बाजूला जाऊन ऐटीत बसले देखील. का कुणास ठाऊक, त्यांच्या चेहर्यावरच समाधान पाहून मला एकदम मस्त वाटल. माझ ऑफिस आल, मी उतरले.. खिडकीतून आज्जीला टाटा केला, त्यांनीही हौशीने हात दाखवला. मी समाधानाने पुढचा रस्ता कापत होते, अचानक आज्जीनी दाखवलेल्या हाताचा अर्थ लक्षात आला. त्यांनी पाच बोट दाखवली. तो टाटा नव्हता, आशीर्वाद होता. त्यांनी त्याच अर्थाने तो हात दाखवला होता. मी जर त्यांना सांगितलं नसत तर पुढे कितीवेळ त्यांना त्या बस स्टोपवर घालवावा लागला असता कुणास ठाऊक?

मागे एक जोक वाचला होता, "आजकाल तोच माणूस ताठपणे चालतो ज्याच्याकडे स्मार्ट फोन नाही" अगदी खर होत ते. आपल्याच धुंदीत, आणि सोशल नेटवर्किंग च्या नावाखाली असे दररोजच्या जीवनातले किती तरी आशीर्वाद आपण मिळवतच नाही ...

थोड जड जाईल, कठीण आहे पण अशक्य मात्र नाही. किती वेळ फुकट घालवायचा आणि किती वेळ मार्गी लावायचा हे आपल्याच हातात आहे. शेवटी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारकच ठरतो. मग थोड बदलुयात का स्वतःला? मोबाईल मधून थोडा वेळ डोक बाहेर काढून बघुयात कि जरा उघड्या डोळ्याने... या सुंदर जगाकडे...

मयुरी चवाथे- शिंदे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेषा, इट इज पार्ट ऑफ एनी बस जर्नी बाबा.

आम्ही मुंबईकर नसून रोज हे प्रकार अनुभवतो. त्याला कंटाळून आता दुचाकी घेतली. त्याचा त्रास वेगळा! इथे ते नको Sad

रीया,
मुंबई आणि पुणे येथील पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे.
बस बाबत म्हणाल तर बेस्ट नक्कीच शतपटीने बेस्ट आहे.
माझी पोस्ट नुसती सेवेबाबत नसून लोकांच्या स्वभावाबद्दल आणि अ‍ॅटीट्यूडबद्दलही होती, आणि यामध्येही मुंबईकर आणि पुणेकर फरक आहेच. Happy

तसेही, मी माझ्या वरच्या पोस्टमध्ये मुंबईचे नाव घेताना फक्त मुंबई असे नाही म्हणालोय, इतर शहरांतही असे असू शकतेच, पण आता आपण पुण्याचे उदाहरण घेतले म्हणून त्याच्याशी तुलना करून हि पोस्ट लिहिली.

रीया,

<< चेतन, डोण्ट टेल मी की तुम्हाला बस मधून लगेच उतरायचं असेल तर तुम्ही पटकन मागच्या दाराने चढून पुढच्या दारापर्यंत पळत जावून उडी मारून उतरता.
किंवा सगळ्या जनतेला चढू देता मग कंडक्टरला शांतपणे सांगता मला लग्गेच इथेच या स्टॉपला उतराचंय आहे. दोन मिनिट गाडी थांबवा मग तो थांबवतो आणि मग तुम्ही शांतपणे उतरता. आणि विषेश म्हणजे तोपर्यंत मागे नुकतीच आलेली बसही शांतपणे उभी असते. >>

एका बसमध्ये चढल्यावर लगेचच उतरण्याचा प्रसंग माझ्यावर कधीच आला नाही.

<< अतिच अवांतर - चेतन, तुम्ही शेवटचा बस प्रवास (पीएमपीएल (पुण्यात आहात असं समजतेय) कधी केला होतात? >>

बसचा प्रवास २०१० पूर्वी मी बराच केलाय. २०१० मध्ये स्वतःचे वाहन खरेदी केल्यावर हे प्रमाण कमी झाले. आता वाहनाला सीएनजी किट बसविल्यावर तर बसप्रवास बंदच झालाय. ज्यादिवशी वाहनाला सीएनजी किट बसविले तेव्हा ते आणण्याकरिता गॅरेज पर्यंत गेलो तो माझा शेवटचा बस प्रवास ऑगस्ट २०१४ मध्ये केला. आता बसपेक्षा स्वतःचे वाहन स्वस्त वाटते.

माझ्या प्रतिक्रियेमुळे संतप्त होणार्‍या सर्वांनाच एक साधा प्रश्न -

<< ज्येष्ठ महिला नागरिकांकरिता चांगलं काम करताना त्या कामाला गालबोट लावलंत. ज्या प्रवाशांना ढकललं त्यांना आणि वाहकाला का दुखावलंत?>>

या प्रश्नात आक्षेपार्ह काय होतं. मी पुण्याचा आहे हे मी लपवलं नाहीच कधी. माझ्या प्रोफाईलमध्ये तसा उल्लेख आहेच. असो. रीया आणि मयूरी यांना अजून एक प्रश्न -

जर एखादा पुरुष प्रवासी बसमध्ये मागील दाराने चढला आणि अचानक पुन्हा इतर प्रवाशांना धक्का मारत मागील दारानेच उतरला. ज्या धक्का लागले अशा सह प्रवासी समजा महिला असतील आणि योगायोगाने वाहक देखील महिला असेल तर त्या पुरुष प्रवाशाविषयी सदर महिला वाहक व प्रवाशांच्या मनात नेमके काय विचार येतील? त्यांची उघड प्रतिक्रिया देखील काय असेल? जाणून घेण्यास उत्सुक आहे.

फारएण्ड

<< वाहकाने (बस स्टॉपवर म्हातारी व्यक्ती उभी असताना) मुळात आधीच थांबवायला हवी होती बस. >>

हे विधान अयोग्य आहे. तुम्ही जेवढ्या काळजीपूर्वक चित्रपट पाहून त्याचे समीक्षण करता तितक्या काळजीपूर्वक हा लेख वाचला नाही का?

लेखात स्पष्ट उल्लेख आहे -
<< आज पहिल्यांदाच उगाचच वाटल कि, माझ्या बस ऐवजी त्यांची बस पहिले यावी, पण दुर्देवाने झाल उलटच, समोरून माझी बस आली, माझी चलबिचल पाहून त्याच म्हणाल्या, "तुला उशीर होत असेल, जा..." मी मागच्या दाराने चढले, मागे बघितलं तर बस नंबर ८४, जोरात ओरडले, "आज्जी तुमची बस... चढा पटकन..." आणि परत सगळ्यांना ढकलत मीही उतरले. >>

यातून सहज अर्थबोध होतो की ज्या बसच्या प्रवाशांना लेखिकेने ढकलले आहे त्या बसच्या वाहकाची आज्जींच्या बसमध्ये न चढण्यात काहीच चूक नव्हती कारण आज्जींना त्या बसमध्ये चढायचेच नव्हते. त्यांची बस तर मागची होती.

नका ओ भांडू...
प्रत्येकाच्या क्रिया- प्रतिक्रिया, आणि सामोरी जाण्याची परिस्तिथी, काळ, वेळ (इथे लिंग) सार वेगवेगळ असू शकत ना? शेवटी जैसी जिसकी सोच...

यातून सहज अर्थबोध होतो की ज्या बसच्या प्रवाशांना लेखिकेने ढकलले आहे त्या बसच्या वाहकाची आज्जींच्या बसमध्ये न चढण्यात काहीच चूक नव्हती कारण आज्जींना त्या बसमध्ये चढायचेच नव्हते. त्यांची बस तर मागची होती. >> सहमत नाही. कंडक्टरला कोठे माहीत होते की ही त्यांची बस नाही. ये तुम जानते हो कि ये उनकी बस नही थी, ये मै जानता हूँ, लेकिन कंडक्टर नही जानता.... Happy

फारेण्ड, (आणि चेतन तुम्ही सुद्धा)
अरे पण दोन्ही बस व्यवस्थित तर थांबल्या. लेखात असा कुठे उल्लेख आहे की कुठचीही बस आजींना टाकून जात होती, Uhoh
सारेच गूढ आणि रहस्यमय होत चाललेय ........ जणू काही प्रत्येक जण वेगवेगळ्या मितीतला लेख वाचतेय Sad

अरे थांबवणे म्हणजे टेक्निकली थांबवणे असे नाही - दारातून डोकावून स्टॉपवर थांबलेल्या म्हातार्‍या आज्जीला म्हातारे/ओ आज्जी, कुठं जायचंय? विचारणारे कंडक्टर्स पाहिलेले आहेत. याने जर तसे केले नाही, तर त्या बाईला बस मिळवून देण्यासाठी बसमधे पॅसेंजर जर पुन्हा उतरले तर त्यात त्याची गैरसोय झाली वगैरे विचार करण्याची गरज नाही.

दारातून डोकावून स्टॉपवर थांबलेल्या म्हातार्‍या आज्जीला म्हातारे/ओ आज्जी, कुठं जायचंय?
>>>
बाबा या खूपच अपेक्षा झाल्या.
दोन्ही बस स्टॉपवर व्यवस्थित थांबल्या. म्हणजे पुढे थांबल्या किंवा घंटी वाजवून पळाले लगेच असे केले नाही, सो नियम आणि नैतिकतेनुसार वागलेच आहेत की.. आता आजींना बस नंबर कळतोय की नाही वा त्यानुसार चौकशी करणे, एवढे पण अच्छे दिन नाही रे हजम होत Wink

विचारणारे कंडक्टर्स पाहिलेले आहेत.
>>
मुंबईत तरी मला असे पाहिलेले आठवत नाही. आणि खरे तर मुंबईसारख्या शहरात ते अपेक्षितही नाही.

अवांतर - हा कंडकटरचा जॉब जाम त्रासदायक आहे. बसमध्ये गर्दी, रस्त्यावर ट्राफिक, बरेचदा बसायला न मिळणे, मिळाले तरी लोकांच्या तिकीट फाडायसाठी उठायचे आहेच, पैश्याची बॅग अश्यातच सांभाळायची आहे, हिशोबही चुकवायचा नाहीये कारण काहीही गोंधळ झाल्यास पगारातून पैसे कटले .. दिवसातून एखादा तरी यांना तिरसट प्रवासी भेटत असावा जो कुठल्या ना कुठल्या कारणांवरून वाद उकरून काढत असावा.. किंबहुना एकापेक्षा जास्तच.. मग ते सुट्टे पैसे असो वा ड्रायव्हरने बस हाकताना स्टॉपच्या पुढे नेऊन थांबवणे, वा आधीच फुल्ल गर्दी असल्याने नाईलाजाने घंटी मारत बस पळवणे, वा लोकांना सतत चिकाटीने उतरायला पुढे चला सांगत राहणे.. एक ना दोन, अनेक मनस्ताप.. अश्यात चीडचीड होऊ न देणे यासाठी तसाच खास स्वभाव हवा..

<< ये तुम जानते हो कि ये उनकी बस नही थी, ये मै जानता हूँ, लेकिन कंडक्टर नही जानता >>

हा अशा प्रकारचा संवाद कुठल्यातरी चित्रपटात ऐकल्यासारखा वाटतोय. कालपासून आठवायचा प्रयत्न करतोय पण आठवतच नाहीये. बाकीचे इतके खळखळून हसतायेत याचा अर्थ त्यांना आठवत असावं. मलाही कुणीतरी सांगाल का?

अवघडेय सगळंच Proud

चेतन, म्हणूनच तुम्म्हाला माहीत नाही Happy
तुम्ही एकदा बस मधे चढलात की लगेचच्या लगेच उतरायचे असेल तर आजकाल आपल्यामागुन येणार्‍यांना ढकलतच उतरावे लागते. गर्दी प्रचंड असते. पुण्यात (मुंबईतलं माहीत नसल्याने फक्त पुण्याचा उल्लेख करतेय) तर शेवटच्या पायरीपर्यंत लोकं लटकत असतात. तुम्ही बसच्या आत येता तेच तुमचं नशिब असतं Proud त्या नशिबाला डावलून पुन्हा उतरायचं म्हणजे बघा बर किती कष्ट ते? आपल्या मागचे लोकं जागचे हलू देत नाहीत आपल्याला. Wink ढकला ढकली करावीच लागणार Happy
आणि लेखिकेने कोणालाही इजा केलेली नाहीये Happy त्यामुळे चलता है! शांततेत घ्या पाहू Happy

ये तुम जानते हो कि ये उनकी बस नही थी, ये मै जानता हूँ, लेकिन कंडक्टर नही जानता.... >> Rofl

रीया,
<< तुम्ही एकदा बस मधे चढलात की लगेचच्या लगेच उतरायचे असेल तर आजकाल आपल्यामागुन येणार्‍यांना ढकलतच उतरावे लागते. >>

असं का करावं लागतं? म्हणजे आपला निर्णय चुकलाय आणि बदलावा लागतोय असं का वाटतं? दरेक वेळी तो बदलता येणं शक्य असतंच का? नसेल तर काय होतं?

हे प्रश्न तुम्हाला नाहीयेत तर माझ्या मनात आता उभे राहत आहेत. याच अनुषंगाने तीन दशकांपूर्वीच्या काही आठवणीदेखील प्रकर्षाने येत आहेत. धन्यवाद रीया. तुम्ही माझ्या मनात एका नवीन लेखाचे बीज रोवले आहे. यावर आधारित लवकरच एक नवा धागा मी प्रकाशित करीत आहे.

अरे बाबानो!

वर मयूरीने लिहीले आहे ना की आज्जीना डोळ्याने नीट दिसत नाहीये ते, मग ज्या बसमध्ये मयूरी चढली, त्या बसच्या ,मागची बस आज्जीना हवी असणारी बस होती. म्हणून बाईणूकी ( माणुसकी ) या नात्याने ती प्रवाशाना ढकलुन खाली उतरली. तिने आज्जीन्चा विचार केला त्यात काय चुकले? या बया! कुटबी आणी कसबी अन कवा बी भान्डत्यात हे मायबोलीकर.

>>>मागे एक जोक वाचला होता, "आजकाल तोच माणूस ताठपणे चालतो ज्याच्याकडे स्मार्ट फोन नाही" अगदी खर होत ते. आपल्याच धुंदीत, आणि सोशल नेटवर्किंग च्या नावाखाली असे दररोजच्या जीवनातले किती तरी आशीर्वाद आपण मिळवतच नाही ...

थोड जड जाईल, कठीण आहे पण अशक्य मात्र नाही. किती वेळ फुकट घालवायचा आणि किती वेळ मार्गी लावायचा हे आपल्याच हातात आहे. शेवटी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारकच ठरतो. मग थोड बदलुयात का स्वतःला? मोबाईल मधून थोडा वेळ डोक बाहेर काढून बघुयात कि जरा उघड्या डोळ्याने... या सुंदर जगाकडे...<<<

आँ??

म्हणजे स्मार्ट फोन वापरणारे 'आशीर्वादास पात्र' असे एकही कृत्य करत नाहीत हे ठरवून मोकळ्याही झालात? त्यांना आशीर्वाद मिळत नाहीत? त्यांना त्यांच्या मोबाईलच्या बाहेरचे जग सुंदर आहे हे माहीत नसते?

फारच अवांतर - एखाद्याने स्वतःच्या मोबाईलवरून एखाद्या अपरिचित रुग्णासाठी मी ताबडतोब रक्त द्यायला तयार आहे असा मेसेज केला व त्या मदतीमुळे रुग्ण वाचला तर काय म्हणाल तुम्ही?

ह्या लेखात स्वतःच्या बसमधून उतरून एका ज्येष्ठ महिलेला मदत करण्यासाठी मुद्दाम तिच्या बसमध्ये जाऊन बसणे हे एक उत्तम सत्कृत्य आहे.

मात्र निष्कर्ष काहीच्या काही आहे. चर्चेमध्ये घडलेले वाद अजून वाचलेले नाहीत.

प्रतिसादामुळे व्यथित झाला असलात तर क्षमस्व. सगळे हवे ते लिहून शेवटी क्षमस्व लिहिण्यात काय अर्थ आहे असे वाटत असेल तर त्याला निदान माझ्याकडे तरी इलाज नाही. Sad

>>>सहमत नाही. कंडक्टरला कोठे माहीत होते की ही त्यांची बस नाही. ये तुम जानते हो कि ये उनकी बस नही थी, ये मै जानता हूँ, लेकिन कंडक्टर नही जानता..<<<

>>>अरे थांबवणे म्हणजे टेक्निकली थांबवणे असे नाही - दारातून डोकावून स्टॉपवर थांबलेल्या म्हातार्‍या आज्जीला म्हातारे/ओ आज्जी, कुठं जायचंय? विचारणारे कंडक्टर्स पाहिलेले आहेत. याने जर तसे केले नाही, तर त्या बाईला बस मिळवून देण्यासाठी बसमधे पॅसेंजर जर पुन्हा उतरले तर त्यात त्याची गैरसोय झाली वगैरे विचार करण्याची गरज नाही.<<<

फारेण्ड, माझ्यामते येथेच गफलत होत आहे. बस स्टॉपपाशी आली की इच्छुक प्रवासी सरसावून पुढे झालेले असतात. त्या आजींना सांगण्यात आले होते की ती बस त्यांच्यासाठी योग्य नाही. त्यामुळे त्या पुढे सरसावल्या नाहीत. मग कंडक्टरने का विचारावे बाहेर डोके काढून? आजींना जी बस त्यांच्यासाठी आहे असे सांगण्यात आले होते त्या बससाठी त्या सरसावल्याच की? आणि तुम्ही म्हणता तसे कंडक्टर्स हे सहसा ग्रामीण विभागात बघायला मिळतात. मुंबईत तसे दिसत नसावेत, पुण्यातही नसतात.

चेतन, मी माझ्याबद्दल उत्तर देते. मला मॉडर्नला जायचं असेल तर माझ्या इथुन जाणारी मनपा, कात्रज, कोडेपो, माळवाडी यातली कोणतीही बस चालते.
समजा मी स्टॉपवर उभी असताना माझ्या समोर कात्रजची खचाखच भरलेली बस आली आणि मी चढले. लग्गेच मनपाची बस आली तर मी तीच प्रेफर करेन ना.
आधी मला मनपाचे बस येणार आहे हे माहीत नसल्याने मी त्यात चढले पण मनपाचे एबस आलीये हे बघून मला यातून उतरून त्यात चढायचं असेल (कारण माझ्यासमोर रिकामी बस उभी असताना दिड तासाचा प्रवास उभा राहून करण्याची मला आता इच्छा नाहीये.मला बसून जायचंय)
पण माझ्या मागून बस मधे चढणार्‍या लोकांना मात्र कात्रजचीच बस हवी असेल तर ते मला उतरण्याची संधी देण्यासाधी स्वतः चढणं प्रेफर करतील. तेंव्हा मला यांना ढकलूनच उतरावं लागेल. (ढकलून म्हणजे शब्धशः बसमधुन खाली जमिनीवर ढकलून देणे असं समजू नका. रेटारेटी करत असं समजा)

वरती लेखिकेने एक वॅलिड कारण दिलेच आहे जे रश्मीने हायलाईट केलेय.
मी जे माझं माझं स्वार्थी पण खरं कारण असतं ते सांगतेय.

लेख आवडला.

मोबाईल, स्मार्टफोनबद्दल बोलाल तर त्याचे उपयोग दुरूपयोग दोन्हीही आहेत. अनेक व्यक्ती चालता चालता आलेले मेसेजेस वाचत असतात किंवा कोणाला तरी रिप्लाय करत असतात. आणि त्यावे़ळी त्यांना आजुबाजुच्या जगाचे काहीच भान नसते. रस्त्यावरील किंवा लोकल ट्रेनचे कितीतरी अपघात तर एअरफोनवर गाणी ऐकताना झालेले आहेत. ह्यावर एक स्वतंत्र बाफ काढावा लागेल.

मयुरी लिखान चालु ठेव प्रतिसादांना ज्यास्त मनावर घेउ नकोस.आपल लिखान वाचल जातय हे महत्वाचे समज.
समजुन उमजुन फाटे फोडनारे अप्रत्यक्षरित्या मदतच करत असतात.
८४ ८३ नि भरपुर प्रवास केलाय मि. सांताक्रूझचा खिरानगर माझा बसस्टोप.१४ वर्ष राहिलोय तिथे.

माझ्या मुलिच्याबाबतित पुण्यात घडलेला एक प्रसंग औधहुन हिंजेवाडिला जाताना तिचि गाडि रस्त्यात बंद पडलि तेंव्हा मदत करायचि सोडुनएक रिक्षेवाला बडबड्त होता पोरिच्या जातिला गाडी चालवायचि हौस कशाला पाहिजे. मागाहुन तिच्याच कंपनिच्या मुलांनि तिला मदत केलि.
चांगले आनि वाईट दोन्हि किस्से काहि दिवस तरि चांगलेच लक्षात राहतात.

लेख आणि लेखिकेची मदत करण्याची वृत्ती आवडली.
बस क्रमांक ८४ मधून मी ही प्रवास केलेला आहे. बेस्ट असलेल्या बेस्टच्या बेस्ट आठवणी जाग्या केल्यात. Happy

`इथे मला तीन गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत Proud
१) मयुरी सिंडरेला म्हणतेय की फिस तुम्हाला लिहिता येतय ना? मग तसच स्टॉपही लिहिता येईल Happy स्टॉपला स्टॉप म्हणतात स्टोप नाही.

२) चेतन, माझी 'तद्दन मुर्ख,बिनबुडाचा आणि फालतू प्रश्न' ही कमेंट तुमच्या प्रश्नाला उद्देशून नव्हती तर मयुरीच्या 'तुम्ही पुणेकर का' या प्रश्नाला उद्देशून होती.

३) तिसरं काय सांगावं ते सुचत नाहीये Proud

Pages