बस नंबर ८४.

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 11 November, 2014 - 05:20

हा किस्सा कालचाच.

ऑफिस ला जाण्यासाठी बस स्टोपवर पोहोचले. समोरूनच बस नंबर ८४ गेली. ती बस मला चाल्लीही असती पण, थोड चालावं लागल असत इतकच. "गेली तर जाऊदे...येईल दुसरी" (दुसरा पर्याय नव्हता) असा विचार करून स्टोपवर बसायला गेले. (आजकाल मुंबई बस स्टोप सुधारित स्तिथीत आहेत हे नशिबच...) फावला वेळ मिळालाच आहे तर जरा आपला स्मार्ट फोन चेक करावा या उद्देशाने ब्यागेत हात घालणार तितक्यात बाजूलाच बसलेल्या आज्जीनी विचारले, "बाळ एक मदत करशील का?" मी म्हणाले, "बोला न आज्जी काय झाल?" म्हणाल्या, "अर्धा तास झाला इथे थांबले आहे ..तू असेपर्यंत बस नंबर ८४ आली तर सांगशील का? आता नजरेने नीट दिसत नाही..." मी चकीत होऊनच म्हणाले," अहो आत्ता तर गेली न बस ती ८४ तर होती? कुणाला आधी का नाही विचारलत? आत्ता केंव्हा येईल देवच जाणे.." "अरेरे, हो का? कोणाला विचारू पोरी..? दोघेजण होते इथे.. एक फोनवरची गाणी ऐकत असावा.. आणि दुसरा काहीतरी कामात होता. फोनवर काहीतरी लिहित होता आणि गालातल्या गालात हसत होता... त्याला डिस्टर्ब करावस नाही वाटल ग "(अस म्हणत आज्जी चक्क मिश्किलपणे हसत होत्या ) त्यांनी डोळे मिचकावले. (आजच्या पिढीला ओळ्खल... धन्य हो आज्जीबाई) मी काय बोलणार गप्पच बसले, आणि फोन काढण्यासाठी ब्यागेत घातलेला हात तसाच बाहेर काढला. थोडस बोललो, त्यांना कळाल कि माझ्या रुटची बस त्यांना उपयोगाची नव्हती, त्यांची ८४ नंबर मात्र मला चालली असती. मुंबईत बस आणि ट्रेन फार क्वचित प्रसंगी मनासारखी मिळते. (अर्थात हे विधान माझ्यापुरतच मर्यादित आहे) नाहीतर सगळा सावळा गोंधळ आणि बेभरवशाचा कारभार. आज पहिल्यांदाच उगाचच वाटल कि, माझ्या बस ऐवजी त्यांची बस पहिले यावी, पण दुर्देवाने झाल उलटच, समोरून माझी बस आली, माझी चलबिचल पाहून त्याच म्हणाल्या, "तुला उशीर होत असेल, जा..." मी मागच्या दाराने चढले, मागे बघितलं तर बस नंबर ८४, जोरात ओरडले, "आज्जी तुमची बस... चढा पटकन..." आणि परत सगळ्यांना ढकलत मीही उतरले. कंडक्टर ने हiसडलेली शिवी त्याला ठेंगा दाखवून, वेडावून त्यालाच परत दिली. आणि सरतेशेवटी बस नंबर ८४ पकडली, आज्जींच्या बाजूला जाऊन ऐटीत बसले देखील. का कुणास ठाऊक, त्यांच्या चेहर्यावरच समाधान पाहून मला एकदम मस्त वाटल. माझ ऑफिस आल, मी उतरले.. खिडकीतून आज्जीला टाटा केला, त्यांनीही हौशीने हात दाखवला. मी समाधानाने पुढचा रस्ता कापत होते, अचानक आज्जीनी दाखवलेल्या हाताचा अर्थ लक्षात आला. त्यांनी पाच बोट दाखवली. तो टाटा नव्हता, आशीर्वाद होता. त्यांनी त्याच अर्थाने तो हात दाखवला होता. मी जर त्यांना सांगितलं नसत तर पुढे कितीवेळ त्यांना त्या बस स्टोपवर घालवावा लागला असता कुणास ठाऊक?

मागे एक जोक वाचला होता, "आजकाल तोच माणूस ताठपणे चालतो ज्याच्याकडे स्मार्ट फोन नाही" अगदी खर होत ते. आपल्याच धुंदीत, आणि सोशल नेटवर्किंग च्या नावाखाली असे दररोजच्या जीवनातले किती तरी आशीर्वाद आपण मिळवतच नाही ...

थोड जड जाईल, कठीण आहे पण अशक्य मात्र नाही. किती वेळ फुकट घालवायचा आणि किती वेळ मार्गी लावायचा हे आपल्याच हातात आहे. शेवटी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारकच ठरतो. मग थोड बदलुयात का स्वतःला? मोबाईल मधून थोडा वेळ डोक बाहेर काढून बघुयात कि जरा उघड्या डोळ्याने... या सुंदर जगाकडे...

मयुरी चवाथे- शिंदे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कंडक्टर ने हiसडलेली शिवी त्याला ठेंगा दाखवून, वेडावून त्यालाच परत दिली. >> हा हा, हे खरेच असे करतात का.... मी करतो, फ्लाईंग किस फेकतो Wink

बाकी खरेय, हा स्मार्ट फोन त्यात डोकावत मार्गक्रमण करणार्‍या पिढीला खड्ड्यात पाडणार हे नक्की.

अरे लेख घाईत पण भर्कन वाचुन काढला. खूप सुरेख आणी धमाल लिहीला आहेस. विशेषतः हा खालचा पॅरा गम्मतशीर आहे.:फिदी:

>>>>मी मागच्या दाराने चढले, मागे बघितलं तर बस नंबर ८४, जोरात ओरडले, "आज्जी तुमची बस... चढा पटकन..." आणि परत सगळ्यांना ढकलत मीही उतरले. कंडक्टर ने हiसडलेली शिवी त्याला ठेंगा दाखवून, वेडावून त्यालाच परत दिली<<<<<<

तुझ्या आशावादी आणी सहकार्याने ओतप्रोत भरलेल्या स्वभावाचे कौतुक वाटले.:स्मित: लेख आवडला.

छान लेख.

<मोबाईल मधून थोडा वेळ डोक बाहेर काढून बघुयात कि जरा उघड्या डोळ्याने... या सुंदर जगाकडे...> खरे आहे.

Happy स्वतःची बस सोडून अनोळखी व्यक्तीला मदत करणारे क्वचितच बघायला मिळतात. त्यातही बसमध्ये चढल्यावर चटकन निर्णय घेऊन खाली उतरणे याबद्दल मानलेच पाहिजे.

रच्याकने, ऑफिस लिहिताय तर स्टॉप पण लिहा.

<< आणि परत सगळ्यांना ढकलत मीही उतरले. कंडक्टर ने हiसडलेली शिवी त्याला ठेंगा दाखवून, वेडावून त्यालाच परत दिली. >>

ज्येष्ठ महिला नागरिकांकरिता चांगलं काम करताना त्या कामाला गालबोट लावलंत. ज्या प्रवाशांना ढकललं त्यांना आणि वाहकाला का दुखावलंत?

सर्वांचे मनःपूर्वक आभार..

सिंडरेला- बस स्टोप बद्दल सविस्तर माहिती देण्याचा विचार मनात आला होता, पण उगाच वाचकांचा (विशेष करून मुंबई बाहेरच्या) गोंधळ उडू नये म्हणून ते टाळले.
मला काशीबाई रुग्णालय हा बस स्टोप सोयीस्कर आहे, बस न. ८४ पार पुढे सांताक्रूझ स्टेशन जवळ जाऊन थांबते, मग थोडी पायपीट करावी लागते इतकच.

श्रीयुत चेतन सुभाष गुगळे - तुम्ही पुण्याचे आहात का हो? मुळात चांगल काम करायचं अस काही डोक्यात नव्हतच, तेवढा विचार करायला वेळही नव्हता... ते सार नकळत घडून आल.
राहिला प्रश्न प्रवाशांना ढकलण्याचा तर मुंबईच्या 'धकाधकीच्या' जीवनात तेवढ सगळेच स्वत:हून अडजस्ट करून घेतात. वाहकाच्या बाबतीत म्हणाल तर त्यांनी 'पहिले' आगाऊपणे बोलायची काहीच गरज नव्हती. काही कारणाशिवाय कोणी अस वागत नाही एवढा समजूतदारपणा ते दाखऊ शकले असते.

आवडला लेख!

रच्याकने, ऑफिस लिहिताय तर स्टॉप पण लिहा. >> सिंडी, हे समजायला दोन तीन वेळा स्क्रोल करावे लागले Happy

चेसुगु - कसे काय? अत्यंत रास्त कामाकरिता त्या पुन्हा खाली उतरल्या ना? वाहकाने (बस स्टॉपवर म्हातारी व्यक्ती उभी असताना) मुळात आधीच थांबवायला हवी होती बस. प्रवाशांना ढकलाढकली झाली, पण ती जाणूनबुजून केलेली नाही, आणि चान्सेस आहेत की त्यातील अनेकजण स्वतः धक्काबुक्की करूनच चढले असतील Happy

अरेरे, जरा बाजू घेतली, तेही चेसुगुंशी मतभेद व्यक्त करून, तर तुम्ही आम्हा पुणेकरांना दुखवलेत. आता मात्र गालबोट लागले Happy

आता बघा, चेसुगु पुणेकर असतील, तर त्यांच्याशी मतभेद व्यक्त करणारेही पुणेकर आहेत. ते पुणेकर नसतील तर पुणेकर योग्य ठिकाणी मतभेद व्यक्त करतात असेच म्हणावे लागेल Happy

श्रीयुत चेतन सुभाष गुगळे - तुम्ही पुण्याचे आहात का हो?
>>
अरेरे! तद्दन मुर्ख , बिनबुडाचा आणि फालतू प्रश्न Happy

लेख आवडला.

चेतन, डोण्ट टेल मी की तुम्हाला बस मधून लगेच उतरायचं असेल तर तुम्ही पटकन मागच्या दाराने चढून पुढच्या दारापर्यंत पळत जावून उडी मारून उतरता.
किंवा सगळ्या जनतेला चढू देता मग कंडक्टरला शांतपणे सांगता मला लग्गेच इथेच या स्टॉपला उतराचंय आहे. दोन मिनिट गाडी थांबवा मग तो थांबवतो आणि मग तुम्ही शांतपणे उतरता. आणि विषेश म्हणजे तोपर्यंत मागे नुकतीच आलेली बसही शांतपणे उभी असते.

अतिच अवांतर - चेतन, तुम्ही शेवटचा बस प्रवास (पीएमपीएल (पुण्यात आहात असं समजतेय) कधी केला होतात?

फारेण्ड Happy

रच्याकने, ऑफिस लिहिताय तर स्टॉप पण लिहा. >> सिंडी, हे समजायला दोन तीन वेळा स्क्रोल करावे लागले.
>>>
सेम हिअर Wink

मला जास्त वाद विवाद नाही करता येत हं ...
>>>
निराश केलेत Proud

पण येस्स, घाईघाईत उतरताना होणारी हलकीशी(?) धक्काबुक्की, कंडक्टरच नव्हे तर चढणार्‍या प्रवांशांचेही "अबे सोयेला था क्या?" असे टोमणे आणि आपली उतरण्याची प्रक्रिया पुर्ण पार पडल्यावर, बस सुटतेय हे बघत निवांतपणे प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे व्यक्त होणे.. ईटस पार्ट ऑफ मुंबईकरांची लाईफ Happy

Pages