काय पांचट आहे ???

Submitted by मंदार अत्रे on 3 November, 2014 - 06:32

हा धागा निखळ करमणूकीसाठी सुरु करण्यात आला आहे . या धाग्यावर आपण अधिकाधिक पांचटविनोद लिहावेत फेसबुक,व्हाटसअप वरील किंवा आणखी कुठलेही आतापर्यंत विशेष प्रकाशात न आलेले पांचटविनोद चालतील,पांचट कविता ,गाणी सुद्धा चालतील या द्वारे समस्त महाराष्ट्रात आणि मराठी साहित्यात पांवि ची एक परंपरा निर्माण करण्याचा एक उच्च विचार आमच्या मनात आहे.या पुण्य कार्यात आपणही यथाशक्ती हातभार लावावा हि नम्र विनंती. मराठी मनोरंजनातील सर्व प्रकारच्या पांचट पणाचे येथे स्वागत आहे .
(वि .सू :या धाग्यावर अश्लील विनोद लिहू नयेत,कोणाच्याही भावना दुखवू नयेत )

वानगी दाखल पांचट पणाचा एक नमुना सादर करत आहे

माझा आवडता प्राणी – वाघावर
निबंध लिहा
सुहास : ८ वी फ
वाघ माझा आवडता प्राणी आहे.
वाघाचे शरीर पट्टेरी असते.
वाघाच्या शरीरावर जरी पट्टे असले
तरी तो पट्टा घालत नाही कारण
वाघ हा एक प्राणी आहे म्हणून
तो पॅन्ट घालत नाही. कोणतेच
प्राणी पॅन्ट घालत नाही. फक्त
माणूस पॅन्ट घालतो. पॅन्ट लूझ
असली तरच पट्टा घालावा लागतो.
नाहीतर पट्टयाची काही गरज नसते.
लहानपणी मी परीक्षेत नापास
झालो की बाबा मला पट्टयाने मरे
पर्यंत मारायचे. पण आता मला ते
मारत नाही. धारावी मध्ये
चामड्याचे पट्टे स्वस्त आणि मस्त
मिळतात. पण
मला चामड्याच्या पट्या पेक्षा वाघाचा पट्टा जास्त
आवडतो. वाघाला चार पाय असतात,
हाथ एक पण नसतो.
तरीही त्याला कुणी अपंग असे म्हणत
नाही.
वाघाला इंग्लिश मध्ये टायगर असे
म्हणतात.
माझ्या मित्राच्या कुत्र्याचे नाव
टायगर आहे. पण
माझ्या मित्राचा कुत्रा वाघ नाही.
कारण त्याच्या अंगावर पट्टे नाहीत
आणि त्याला वाघ
सारखी डरकाळी पण फोडता येत
नाही. तो एक सारखा भुंकत असतो.
भो भो –
भो भो भो हि त्याची भुंकण्याची स्टाईल
आहे .
आमच्या शेजारी रमेश अंकल राहतात.
त्यांचे पूर्ण नाव रमेश सिताराम
वाघ . मी आणि बंटी त्यांना प्रेमाने
वाघ काका, वाघ काका असे म्हणतो.
सोसायटी मीटिंग मध्ये वाघ
काका नसले की सर्वजण बोलतात "अरे
कुणी त्या वाघाला बोलवा", पण
जंगलात असताना कुणीच असे बोलत
नाही कि "अरे
कुणी त्या वाघाला बोलवा". कारण
खरा वाघ
दिसतो तेव्हा सगळ्यांची हवा टाईट
होते. खर्या वाघाला सगळे जण
घाबरतात पण वाघ काकांना कोणीच
घाबरत नाही कारण ते एकदम साधे
आहेत, आय जस्ट लव वाघ काका……
वाघ काका प्युअर शाकाहारी आहेत.
पण ओरीजनल वाघ मात्र नॉन
शाकाहारी असतो. मला नॉन व्हेज
मध्ये चिकन टिक्का, चिकन
लॉल्लीपाॅप, चिकन फ्राईड, चिकन
फ्राईड राईस हे सर्व आयटम
आवडतात. पण वाघाला चिकन चे
आयटम खायला भेटत नाही कारण
तो जंगलात राहतो. जंगलात चिकन
भेटत नाही म्हणून वाघ दुसर्या डिशेश
वर ताव मारतो. शहरातले डुक्कर
जेव्हा जंगलात जातात आणि जंगलातले
रान खातात तेव्हा ते खर्या अर्थाने
रानडुक्कर होतात. बंटी खेळून
घरी आला की त्याचे कपडे खराब
होतात तेव्हा त्याची आई
त्याला बोलते "ए
डुकरा कोणत्या गटारात लोळून
आला".
वाघ आपला राष्टीय प्राणी आहे.
काही लोक वाघाची शिकार करतात.
ते मला आवडत नाही. आपण
सर्वांनी मिळून वाघाला वाचवले
पाहिजे..
( आंतरजालावरून साभार )

.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशा प्रकारचे मजकूर open source( सर्वांसाठी खुले )असतात हो ,तुम्ही का चिडताय एवढे ??

मी चिडत नाही ओ. तुमचा लेख 'गुलमोहर - विनोदी लेख' या विभागात आहे.
इथे मायबोली, गुलमोहरात "स्वत:चे लेखन अपेक्षीत आहे" असा नियम आहे. म्हणुन फक्त सांगितले.

सुप्रभात मित्रहो
एक भयानक पांचट पहा
व्हेन यू आर लोनली सीट ऑन द रॉक्स
.
.
.
.
.
.
.
.

.

व्हेन यू आर लोनली सीट ऑन द रॉक्स
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

रिमूव्ह युअर शूज अॅण्ड स्मेल युअर साॅक्स

Rofl
Rofl

रिमूव्ह युअर शूज अॅण्ड स्मेल युअर साॅक्स>>>>>>>>>>
पांचट पणाचा कळस
Biggrin Biggrin Biggrin

मला आलेला एक मेसेज
एक मुलगी दुसर्या मुलीला
१ ली मुलगी :तुझा लव्ह अॅट फर्स्ट साईट वर विश्वास आहे का ग ??
२ री मुलगी :लव्ह अॅट फर्स्ट साईट च मला नाही बाई माहिती पण माझा लव्ह अॅट सेकंड साईट वर नक्कीच विश्वास आहे .
१ ली मुलगी : लव्ह अॅट सेकंड साईट???
२ री मुलगी :अग मी जेव्हा ह्याला पानटपरी वर तंबाखू मळताना पाहिलं ना तेव्हा मला तो मुळीच आवडला नाही पण मी जेव्हा त्याला अाॅडी मधून थुंकताना पहिला ना मी त्याच्या प्रेमातच पडले.
Proud Proud Proud

mulaga - tula bhutanchi bhiti vatate ka????

Mulgi - ho re khup bhiti vatate..!!!

mulga - aani Nepal chi?????
Proud

सुधीर >>>>> Rofl

आणखीन एक पांचट विनोद
ब्लड डोनेट करणे से पहिले अपना खून जांचना
.
.
.
.
.
.
.
.

ब्लड डोनेट करणे से पहिले अपना खून जांचना
.
.
.
.
.
.
.

.
.
.

बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना