नायक / नायिकांसाठी एकाच चित्रपटात वापरले गेलेले वेगवेगळे पार्श्वगायक व गायिका यांचे आवाज

Submitted by चीकू on 1 November, 2014 - 08:46

एकाच चित्रपटात काही काही वेळा एकाच व्यक्तीसाठी वेगवेगळे पार्श्वगायक / गायिका वापरले जातात. बहुतेक वेळा ही संख्या साधारण दोन असते पण क्वचितच याहून अधिक आवाज वापरले जातात. माझ्या माहितीत तीन आवाज वापरले जाण्याच खालील उदाहरण आहे. तुम्ही अजून भर घालू शकता.

वैजयंतीमाला - सूरज ( आशा भोसले, शारदा, सुमन कल्याणपूर)
छोटीसी मुलाकात ( आशा भोसले, सुमन कल्याणपूर, लता मंगेशकर)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रितिक रोशन - कहो ना प्यार है. ( लकी अली, बाबुल सुप्रियो, उदित नारायन, कुमार शानु ) चार वापरले

मुंबईचा रितिक रोशन साठी उदित आणि कुमार सानु यांचा आवाज वापरला गेला (दोघांचा आवाज मेलेडी आहे) पण न्युझिलंडच्या रितिक साठी लकी अलीचा आवाज वापरला (वेस्टर्न पॅटर्न हवा म्हणुन) आणि तोच रितिक मुंबईत आल्यावर जो शो करतो त्यात बाबुल सुप्रियोचा आवाज वापरला आहे ( मेलेडी आणि वेस्टर्न मिक्स वाटायला कारण न्युझिलंडचा रितीक मुंबईच्या रितिक याच्या आवाजात शो करणार होता Wink )

वरील सुमन कल्याणपूर यांची गाणी ही रफी यांच्याबरोबर गायलेली आहेत. कदाचित लता मंगेशकर आणि रफी यांच्यातल्या नाराजीमुळे ही गाणी कल्याणपूर यांना मिळाली असण्याची शक्यता आहे.

अभिमानमध्ये अमिताभ बच्चन गायकाच्या भूमिकेत आहे, आणि तरी त्याला किशोर कुमार, मोहम्मद रफीचा आवाज वापरलाय. लुटे कोइ मन का नगरला अजूनच तिसरा आवाज- मनहर उधास (तो आवाज अमिताभला अज्जीब्बात शोभत नाही). नायिकेला मात्र लता मंगेशकरच.

हे असे बरेच चित्रपटांमध्ये असावे ना.
शाहरूखच्या चित्रपटांमध्ये सोनू निगमचा एक आवाज हवाच. त्यानंतर शान असतो. उदित नारायण सुद्धा जमतोच. हे आले असावेत एकाच चित्रपटात. मितवा गाणे शंकर महादेवनचे ना.. ओम शांती ओम मध्ये आंखो मे तेरी अजब सी अदाए है `केके' ने उचललेले.. मै अगर कहू सोनूने.. ओम शांती ओम बहुधा शानने .. ईतर गाण्यांचे माहीत नाही.. पण गूगल करून शोधता येतील अजून उदाहरणे..

रागिणी आणि शरारत या चित्रपटात महंमद रफीने साक्षात किशोरकुमारला प्लेबॅक दिला होता!
या चित्रपटात स्वतः किशोरचीही गाणी होतीच!

शम्मी कपूर आणि मोहम्मद रफी हे नाते आपण नेहमीच मानतो. पण कल्याणजी आनंदजी यानी "ब्लफ मास्टर" चित्रपटासाठी तीन गायकांचा त्याच्यासाठी वापर केला होता...

१. "ऐ दिल अब कही ले जाये..." ~ हेमंत कुमार
२. "सोचा था प्यार हम ना करेंगे...." ~ मुकेश
३. "गोविंदा आला रे आला..." ~ म.रफी

आनंद : बहुतेक गाणी मुकेशच्या आवाजात (कहीं दूर जब, मैने तेरे लियेही) पण जिंदगी कैसी है पहेली करता मन्ना डे. हे गाणे कुणाच्याही तोंडी दाखवू नये असा मूळ बेत होता पण बहुधा राजेश खन्नाच्या हट्टीपणामुळे ते गाणे त्याच्या तोंडी घातले आहे.

टॅक्सी ड्रायव्हर : देव आनंदला तलत महमूद (जाये तो जाये कहा), किशोर कुमार (चाहे कोई खुश हो चाहे गालिया हजार दे) आणि जगमोहन बक्षी (देखो माने नही) असे तीन लोकांचे आवाज दिले आहेत.

मुनीमजी: देव आनंद : हेमंत कुमार (दिल की उमंगे है जवां, शिवजी बिहन चले) आणि किशोर कुमार (जीवन के सफर में राही)

उत्तम माहिती . सगळ्यांचे आभार

मीनाकुमारी आणि लता मंगेशकर ही नावे जोडूनच येतात. पण अगदी क्वचित आशा भोसलेंचा आवाजही तिला लाभला आहे. काजल सिनेमातील मीनाकुमारीची गाणी आशा भोसलेनी गायली आहेत.

तसेच हेलन आणि आशा भोसले हे समीकरण आहे पण इंतकाम आणि वो कौन थी या चित्रपटात तिची गाणी लता मंगेशकर यांनी गायली आहेत.

सुमन कल्याणपूरचा आवाजही मीनाकुमारीसाठी वापरला आहे (दिल एक मंदिर)

एक मौजेची गोष्ट म्हणजे मेरे मेह्बूब सिनेमात 'जानेमन एक नजर देख ले' हे गाणे लता आणि आशा यांचे आहे पण चित्रित झाले आहे अमितावर. दोन्ही आवाजात ती एकटीच गाते.

मेरे मेहबूबमधली ही गंमत माहीत नव्हती.
----
बहु बेगममध्ये मीनाकुमारीला आशाचा प्लेबॅक आहे.
---
एकाच चित्रपटात एका अभिनेत्या/अभिनेत्रीसाठी दोनपेक्षा अधिक पार्श्वगायक असा मूळ विषय होता ना?

चित्रपट : बरसात की रात: अभिनेत्री : श्यामा

गरजत बरसत सावन आयो रे : सुमन कल्याणपूर
मुझे मिल गया बहाना तेरी दीद का : लता
ना तो कारवां की तलाश है, निगाह-ए-नाज के मारों का हालक्या होगा; जी चाहता है चूम लूं अपनी नजर को मैं : आशा

गरजत बरसत हे गाणं लताच्या आवाजातही आहे हे आजच या धाग्यासाठी हे गाणं पाहताना कळलं. रेडियोवर कधी ऐकलेलं नाही.

मस्त धागा. आम्ही पूर्वी ही चर्चा कायम करायचो. पूर्वीच्या चित्रपटांत २-३ गायकांबद्दलच हे होत असे त्यामुळे त्याचे विशेष वाटे. ९० नंतर अनेक गायक वापरण्याची पद्धत सुरू झाली त्यामुळे कुमार शानू, उदित नारायण, विनोद राठोड आणि इतर अनेक गायक यांचे आवाज एकाच नायकाला एकाच चित्रपटात असणे खूप कॉमन झाले. मध्यंतरी तर एकच गाणे दोन गायकांच्या आवाजात स्वतंत्र रेकॉर्ड करून ठेवले आहे व चित्रपटात त्यातील एक व्हर्जन आहे, तर इतरत्र दुसरीही ऐकू येते असेही झाले होते. बहुधा दिल है के मानता नही मधले कोणतेतरी गाणे तसे होते.

बाकी माझ्या डोक्यात सहज आलेली उदाहरणे:

अमर अकबर अँथनी: ऋषी कपूरः रफी (परदा है व इतर), शैलेन्द्र सिंग (अनहोनी को होनी करदे)
विनोद खन्ना: मुकेश (हमको तुमसे हो गया है प्र्यार क्या करे), महेन्द्र कपूर (अनहोनी को होनी करदे)

एक भारी उदाहरण म्हणजे मि. नटवरलालः
रेखा: लता (परदेसिया), आशा (तौबा तौबा), अनुराधा पौडवाल (कयामत है), उषा मंगेशकर (ऊंची ऊंची बातोंसे)
अमिताभः किशोर (परदेसिया), रफी (उंची उंची बातोंसे), स्वतः (मेरे पास आओ)

एस डी बर्मन चे संगीत असलेल्या अनेक चित्रपटांत गाण्याप्रमाणे योग्य गायक वापरला आहे, त्यामुळे अशी अनेक उदाहरणे आहेत. अभिमान चा उल्लेख नंदिनीने केलेलाच आहे. गाईड, गॅम्बलर, तीन देवियाँ, आराधना, ज्वेल थीफ - असे अनेक आहेत त्यात नायकाला रफी व किशोरचा आवाज एकाच चित्रपटात आहे.

नसीबः
अमिताभः रफी (जॉन जानी जनार्दन), अन्वर (जिंदगी इम्तिहान लेती है)
ऋषी: किशोर (पकडो पकडो पकडो), रफी (चल मेरे भाई), शैलेन्द्र सिंग (रंग जमाके जायेंगे)
शत्रुघ्न सिन्हा: किशोर (रंग जमाके जायेंगे), नितीन मुकेश (जिंदगी इम्तिहान लेती है),

यातील रंग जमाके मधे तीन गायिका आहेत की फक्त उषा मं. आहे कळत नाही Happy

शाहरुख साठी परदेस मध्ये दिल दिवाना - सोनू निगम आणि दो दिल मिल - कुमार सानू (बहुतेक का अभिजित?)
फरदीन खान साठी प्यार तुने क्या किया मध्ये कम्बख्त इश्क - सोनू आणि सुखविंदर (एकाच गाण्यात!)
सैफ आली साठी हमतुम मध्ये हमतुम - बाबुल आणि लडकी क्यू न जाने क्यू - शान...

सो ऑन...
हल्ली फार थोड्या वेळा एक नट आणि एक गायक अशा जोड्या (एका सिनेम्यापुरत्या ही) दिसतात.

शाहरुखसाठी अभिजीत, कुमार सानु आणि उदित नारायण या तिघांनी एकाच चित्रपटात प्लेबॅक दिलाय असे दोन चित्रपट :
दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, येस बॉस.

सलमानसाठी जब प्यार किया तो डरना क्या : कमाल खान, उदित नारायण, कुमार सानु

मध्यंतरी तर एकच गाणे दोन गायकांच्या आवाजात स्वतंत्र रेकॉर्ड करून ठेवले आहे व चित्रपटात त्यातील एक व्हर्जन आहे, तर इतरत्र दुसरीही ऐकू येते असेही झाले होते।। >> आता कोइ मिल गया वाजतंय म्हणून लगेच आठवलं. त्यामध्ये जादू गाणं उदित नारायण आणि अदनान सामी च्या आवाजात आहे. चित्रपटामध्ये केवळ उदित नारायणचा आवाज वापरलाय.
हल्ली गाणं आणि नायकाचा आवाज/भूमिका, गायकाचा आवाज आण एकंदर प्रसंग यांचा का ही ही विचार केलेलाच दिसत नाही. अपवादात्मक उदाहरण : रॉकस्टारमध्ये मोहित चौहान आणि रणबीर कपूर ही जोडी.

बर्फी चे टायटल साँग (आला बर्फी) स्वानंद किरकिरेच्या आवाजात रेकॉर्ड झाले असतानाही म्हणे रकुच्या आग्रहाखातर मो चौ च्या आवाजात रेकॉर्ड केले गेले आहे.

अपवादात्मक उदाहरण : रॉकस्टारमध्ये मोहित चौहान आणि रणबीर कपूर ही जोडी>>>
अजून एक अपवाद म्हणावा का.... आशिकी २ - अंकित तिवारी-सुन रहा है ना तू आणि अर्जित सिंग-क्यूंकी तुम ही हो.. दोघांचेही आवाज आदित्यरॉय कपूर ला फिट्ट बसलेत

मित, नाही. कारण गायक बदलला ना.

तसंच रॉकस्टारमध्ये केलेलं नाही, सगळीच गाणी (वेगवेग़या धाटणीची असूनदेखील) मोहितने गायली आहेत. नायक हा चित्रपटामध्ये गायकाचा रोल करत असेल तर त्याला सूट होणारा आवाज एकच असावा असं मला वाटतं.

अदिति, तेव्हा किशोरकुमारकडे इतक्या भूमिका होत्या की त्याला गाण्याकडं लक्ष द्यायला वेळ नव्हता, त्यामुळे त्याच्यासाठी रफीचा प्लेबॅक वापरला गेला, असं कुठंतरी वाचलंय

ओम शांती ओमचा मी वर उल्लेख केलेला त्याचे गूगाळून शोधले.

१) आंखो मे तेरी अजब सी -- केके
२) दर्दे डिस्को -- सुखविंदर
३) दीवानगी दीवानगी आणि दास्तान ए ओम शांती -- शान
४) जग सूना सूना लागे -- राहत फतेह अली खान
५) धूम ताना - अभिजीत (सावंत नाही भट्टाचार्य)
६) मै अगर कहू - (सोनू निगम)

अवांतर - या सर्वात ६ नंबरचे गाणे आणि त्याचा गायक दोघे आपले फेव्हरेट आणि चित्रपटाचा हिरो सुपरफेव्हरेट

एकाच गाण्यात एकाच नटासाठी/नटीसाठी दोन वेगळे आवाज असे कधी झालेय का?

तसे फनाह चित्रपटात, चांद सिफारीश गाण्यात शान आणि कैलाश खेर होते, पण कैलाश खेर बहुधा नुसते कोरसला बल्ले बल्ले करायचा.

एकाच गाण्यात एकाच नटासाठी/नटीसाठी दोन वेगळे आवाज असे कधी झालेय का?<< प्रतिसाद वाचले नाहीस का?

दोन उदाहरणे याप्रकारची येऊन गेली. चल मेरे भाई (नसीबमधल्या, याच नावाचा एक पिक्चर येऊन गेला, त्याचं टायटल ट्रॅक नव्हे!! त्यात सलमान संजय दत्तनी गाणं म्हटलंय.) पण अमिताभ ऋषी व्हर्जनमध्ये ऋषी कपूर स्वतःच्या आवाजात संवाद म्हनतो आणि रफीच्या आवाजात गानं म्हणतो. अमिताभ स्वतःच्याच आवाजात बोलतो. Happy

Kishorn kumar might have needed Rafi's playback as the music directors were not sure whether he- kk could sing classical based songs.

यातील रंग जमाके मधे तीन गायिका आहेत की फक्त उषा मं. आहे कळत नाही<<< फारेण्डा, बर्निंग ट्रेनमधलं "पहली नजरमे" गाणं ऐअक्ताना होतं त्यात तर इतर तिघांपेक्षाही उषा मंगेशकरचा किंचाळा आवाज ऐकू येत राहतो.

Pages