मला मुलगीच हवी ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 October, 2014 - 06:24

मला मुलगीच हवी ..

......

सन २००८ !
एक काळ होता जेव्हा मला वाटायचे की मला मुलगाच झाला पाहिजे.
हो, त्याकाळी जेव्हा मला एक साधी गर्लफ्रेंडही नव्हती, (वा किमान होत्या त्या मैत्रीणींबाबत सिरीअस तरी नव्हतो) तेव्हाही कॉलेजमधील मित्रांशी चर्चा करताना, वा एकांतात बसून स्वत:च्या भविष्याचा विचार करताना मला असेच वाटायचे की येस्स, मला मुलगाच झाला पाहिजे.

......

एक काळ होता, (अर्थात आजही जिथे सुशिक्षितपणा किंबहुना त्यापेक्षाही सुसंस्कृतपणा आला नाही तिथे तो काळ अजूनही आहेच)

असो, तर एक काळ होता जेव्हा प्रत्येक मातापित्यांची अशी इच्छा असायची, आपले होणारे संतान, हि दुसर्‍याचे घर प्रकाशाने उजळवणारी ज्योती नसून एखादा आपल्याच अंगणात टिमटिमणारा दिपक असावा, आपल्या वंशाचा दिवा असावा. आणि या विचारामागे प्रामुख्याने आणि ढोबळमानाने खालील कारणे असायची :-

१) मुलगा म्हातारपणाची काठी असतो.

२) मुलगी लग्न करून सासरी जाते.

३) मुलगा हुंडा घेऊन येतो, तर मुलीला हुंडा द्यावा लागतो.

४) मुलगा घराण्याचा वारस असतो, तर आपला जमीन-जुमला जावयाला देण्याऐवजी मुलाकडेच जावा.

५) मुलगा आपला वंश आणि आपले नाव पुढच्या पिढीत नेतो.

६) मुलीची अब्रू जपणे हि एक जबाबदारी असते.

वगैरे वगैरे

.......

तर या कारणांची आजच्या जमान्यात साधारण अश्या प्रकारे वाट लागली आहे.

१) मुलगा म्हातारपणाची काठी मानले तरी तोच कधी लाठी मारून वृद्धाश्रमात हाकलवेल किंवा जबाबदारी घेण्यास नकार देईल हे सांगता येत नाही. जिथे दोन किंवा अधिक मुले असतात तिथे प्रॉपर्टीचे वाटे पडताना आपला हक्क कोणीही सोडत नाही, मात्र म्हातारपणी आईवडीलांचा सांभाळ करण्याचा कर्तव्य निभावायची वेळ आली की मात्र टाळाटाळ करण्याची शक्यता असते. (आठवा चित्रपट बागबान) किंवा हल्ली पेंन्शन प्लॅन आणि त्याच्या ‘ना सर झुका है कभी, ना सर झुकायेंगे कभी" वगैरे जाहीराती यामुळेच बघायला मिळतात. थोडक्यात आपल्या म्हातारपणाची सोय आपली आपणच करायची आहे हा विचार रुजतोय.

२) मुलगी लग्न करून सासरी गेली तरी हल्लीच्या काळात ती कमावती आणि स्वतंत्र विचारांची असल्याने लग्नानंतरही ती आपल्या मातापित्यांच्या प्रती आपली जबाबदारी उचलू शकते. एकवेळ तिचा नवरा त्याच्या आईवडिलांना म्हणजे तिच्या सासू-सासर्‍यांना सोडून स्वतंत्र राहत असेल, पण मुलगी मात्र माहेरच्यांशी असलेली आपली नाळ कधीच तोडत नाही.

३) हुंडा वगैरे प्रकार हल्ली फारसे उरले नाहीयेत. लग्नाचा खर्चही बरेच ठिकाणी अर्धा अर्धा उचलला जातो. प्रेमविवाहांचे वाढते प्रमाण हे याला पोषकच आहे.

४) आपल्यापाठी आपली प्रॉपर्टी मुलगा आणि सून उपभोगतेय की मुलगी आणि जावई याचा आता कोणी फारसा विचार करत नाही, कारण मुळात प्रॉपर्टी अशी काही सोडूनच जायची नसते. आपण उभारलेला उद्योगधंदा कोणाच्या हाती सोपवून जायचा असेल तर तो आजच्या जमान्यात मुलीही सुशिक्षित असल्याने त्यांच्याही हाती सोपवून जाता येतो. तसेच मुलगा नालायक निघाला तर नाईलाज होण्यापेक्षा कर्तबगार जावई शोधण्याचा पर्याय तरी आपल्या हातात उपलब्ध राहतो.

५) आपले नाव पुढच्या पिढीत जावे, आणि आपला वंश वाढावा या मरणोत्तर खुळचट आणि मनाला खोटा खोटा दिलासा देणार्‍या कल्पनांमधून बहुतांश समाज बाहेर आलाय. आपण मेल्यानंतरही आपले फेसबूक अकाऊंट या जगात तसेच राहणार आणि आपले नाव गूगलसर्च केल्यास ते सापडणार हे आजच्या पिढीला पुरेसे आहे.

६) या सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाजाच्या जोडीनेच, याच समाजाच्या एका हिश्श्यात वाढीस लागलेली विकृत मानसिकता पाहता दुर्दैवाने शिशू वयात मुलांचा सांभाळ हे सुद्धा मुलींइतकेच जबाबदारीचे काम झाले आहे.

वगैरे वगैरे

.......

असो, तर मी देखील या बदललेल्या सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाजाचा भाग आणि तश्याच आधुनिक विचारांचा असलो, तरीही मला मात्र मुलगाच हवा होता. यामागे कुठलेही संकुचित विचार नसून मला माझ्या मुलामध्ये स्वत:ला बघायचे होते. आयुष्यात मला जे आजवर बनता आले नाही, वा पुढेही बनता येणार नाही, ते माझ्या मुलाने बनावे अशी माझी सुप्त इच्छा होती. अर्थात, कोणतीही जबरदस्ती नाही, तर त्याच्या मर्जीनेच. मला आयुष्यात जी मौजमजा करता आली नाही ती त्याने करावी आणि मी त्यात मला बघावे. अगदी डिडीएलजेमधील अनुपम खेर सारखे मला माझ्या मुलाला सांगायचे होते, "मैने तो अपनी सारी जिंदगी ऐसेही यहा वहा टुक्कार पोस्ट डालने मे बिता दी बेटा, लेकीन तू जी ले अपने मर्जी की झिंदगी, मै समझूंगा मैने अपनी जिंदगी जी ली" .. आणि एवढेच नव्हे तर मला माझ्या मुलाचे नाव ‘आर्यन’ ठेवायचे आहे, असेही मी त्यावेळीच फायनल केले होते. मला माझा मुलगा माझा बेस्ट बडी म्हणून तेव्हाच माझ्या डोळ्यासमोर दिसू लागला होता..

वगैरे वगैरे

.......

पण आज ३० ऑक्टोबर २०१४ उजाडता उजाडता ... मला पुन्हा एकदा मुलगीच हवी झाली आहे.. ते सुद्धा एक नाही तर दोन-दोन मुलीच!
आता याची कारणे काही अश्याप्रकारे,

१) आजवर मला माझ्या आईने मोठ्या लाडात वाढवले. मला काहीही काम करू न देता सारे काही आयते दिले. अगदी च् म्हटले की चहाचा कप हातात. जिथे आई कमी पडली तिथे ती कसर ताई माई अक्कांनी पुर्ण केली. बाहेर आता माझे हे आरामाचे लाड माझी गर्लफ्रेंड पुरवते. पुढे जाऊन बायको हे करेन. अर्थात याच कारणासाठी मी माझ्या गर्लफ्रेंडशी कधीही ब्रेकअप होऊ न देता तिच्याशीच लग्न करणार. मॉरल ऑफ द स्टोरी - ज्या घरात स्त्रियांची संख्या जास्त असते त्या घराला घरपण येते आणि पुरुषांची ऐश मौज मजा सारे काही होते. खास करून माझ्यासारख्या आळशी पुरुषांची जरा जास्तच.

२) स्वत: मुलगा असल्याने आणि आसपासचे मुलांचे जग पाहिल्याच्या अनुभवावरून सांगू शकतो, मुलगा एका ठराविक वयाचा झाला की तो त्याच्या समवयीन मित्रमंडळींमध्येच जास्त रमतो आणि एका वयानंतर तर जेवायला आणि झोपायलाच घरी येतो. मुलीसाठी मात्र तिचे कुटुंब हे सुद्धा तिचे एक मित्रमंडळच असते, किंबहुना सर्वात आवडीचे असे. साधी पिकनिक काढायची म्हटले तरी मुलगा आपल्या मित्रांबरोबर जाणे पसंद करेन, पण मुलगी मात्र फॅमिली पिकनिकलाच पहिले प्राधान्य देईल. फेसबूकावरही मुलांपेक्षा मुलींचेच सहकुटुंब पिकनिकला गेलेल्याचे फोटो जास्त अपलोड होताना दिसतात हा याचा पुरावाही म्हणू शकता.

३) मला स्वत:ला नटण्याची, नीटनेटके राहण्याची आणि छान छान फोटो काढण्याची, काढून घेण्याची जरा जास्तच आवड आहे. हि आवड मुलापेक्षा मुलीबरोबर जास्त चांगल्या प्रकारे जपता येईल असे मला वाटते कारण मुलांच्या तुलनेत मुलीला विविध प्रकारचे ड्रेसेस आणि अलंकारांनी छानपैकी नटवता येते.

४) वडील आणि मुलाचे नाते हे जरासे कॉम्प्लिकेटेड असते. ते योग्य प्रकारे जमले तर ठिक अन्यथा समजे उलगडेपर्यंय आयुष्यातील एक काळ निघून जातो. पण मुलगी हि लहानपणापासूनच अगदी शेवटपर्यंत, सहजगत्या आणि नैसर्गिकरीत्या, वडिलांशी भावनिकरीत्या खूप चांगली जोडली जाते, वडिलांची लाडकी लेक होते.

वगैरे वगैरे

.........

अर्थात हि माझे मते आहेत. माझ्या अनुभवांवरून आणि त्या अनुभवांच्या आकलनावरून बनवली आहे. बहुतांश बाबतीत, बहुतांश जणांनी, एकमत व्हायला हरकत नसावी. तरीही न पटल्यास, धागा चर्चेला खुला आहे. चॉईस इझ युअर्स, पण मला मात्र बाबा मुलगीच हवी Happy

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परत विचार करा >>>> @ सिनि - अहो तुम्ही कोणाला काय करायला सांगताय? त्यांचे लिखाण तुम्ही वाचले नाही का?

त्यांना सई ताम्हणकर सारखी जाडी, मद्दड, थोडीशी तिरळी बाई अप्सरा वाटते.

आपले नाव पुढच्या पिढीत जावे, आणि आपला वंश वाढावा या मरणोत्तर खुळचट आणि मनाला खोटा खोटा दिलासा देणार्‍या कल्पनांमधून बहुतांश समाज बाहेर आलाय. आपण मेल्यानंतरही आपले फेसबूक अकाऊंट या जगात तसेच राहणार आणि आपले नाव गूगलसर्च केल्यास ते सापडणार हे आजच्या पिढीला पुरेसे आहे.

>> हे भारीच Happy

पण बाकी लेख वाचून प्रश्नच पड्ला. आशी आपल्या सोइनी, आपल्या मपात बसणारी मुलं नीवडायची असतात होय. मग आमच चुकलच जरा. आम्ही आपले, येणार्या बाळा साठी आपण चांगले पालक होउ का नाही याचीच चिंता करत होतो.

टोचा >>>> हो वाचलेय .सईबद्द्ल नो कमेंट्स ,बाकी कोणाला काय आवडेल याचा(चित्रपटांच्या) बाबतीत मी आदर करते. पण घाईघाईत व जरा विचारपुर्वक न लिहीता कधी कधी चांगल्या विषयाची वाट लागते.कमी लेख लिहा पण दर्जेदार लिहा व जरा जास्त वाचन करा म्हणजे कोणी दिवे दाखवणार नाहीत हे सांगण्याचा सर्वांनीच प्रयत्न केला आहे.
ते कळुनही जर असं लिहिलं तर हे सांगावच लागतं परत एकदा विचार करा. कारण नाही म्हंटलं तरी ऋन्मेऽऽष यांच काही लिखाण खरच वाचनीय आहे.

ऋन्मेऽऽष, हे लिखाण नाही आवडलं रे. उगाच मनात काहीतरी आलं म्हणुन लिहून काढलं असं वाटतय. पोस्ट करायच्या आधी एक दोन लोकांना दाखवलं असतस तर बरं झालं असतं.

असो. हे मा वै म.

चौकट राजा, खरेय मान्य आहे. मनात आलेले म्हणूनच लिहिले गेले. मूळ हेतू लेख लिहिणे नसून चर्चेचा धागा काढणे होते, पटापट लिहिण्याच्या नादात पोस्ट वाढत गेली, आणि मुख्यत्वे खालचे माझे वैयक्तिक मताचे ४ पाँईंट मांडले त्यावरच केंद्रित झाली.

असो, मात्र आजच्या काळात "मला मुलगीच हवी" अशी प्रामाणिक इच्छा वा हट्ट ठेवणार्‍यांची संख्या वाढत आहे.
म्हणजे मुलगा-मुलगी एक समान, काहीही चालेल असेही न म्हणता आवर्जून मुलगीच हवी असे म्हणणार्‍यांची संख्या वाढत आहे असे माझे निरीक्षण आहे.

अर्थात, माझे निरीक्षण चुकत नसेल आणि इतरांनाही असे वाटत असेल तर यामागची कारणमीमांसा यावर चर्चा अपेक्षित होती Happy

शहरी भागात एकवेळ मुली ठिक आहेत... पण गावात काय? शेतातली मेहनीतीची कामं मुली थोडिच करु शकणार आहेत... जिथं अंगमेहनीतचं काम असतं... तिथं पुरुषच लागतात.

अनंतरंगी, सहमत!
आमच्यासारख्यांचं बरं आहे, गावातल्या शेतात काम करायला मुलगाही आहे आणि चहा करून द्यायला माझे सगळे दागिने वापरायला आणि नटवायची हौस पूर्णं करायला मुलगीही आहे.

लेख चुकून क्लिक झाला म्हणून फक्त कमेंट वाचली आणि एकदम लोटपोट..

>>तुमचा खुप हेवा वाटतो...सगळ्याच विषयांवर कसे लिहु शकता तुम्ही? तेही एवढ्या कमी वेळात?

हिला माझ्यापुरता कमेंट ऑफ द डे. Rofl

चला तिकडच्यांना शब्बा खैर आणि आम्ही जातो आमच्या वेळची धुणी धुवायला.

त्यांना सई ताम्हणकर सारखी जाडी, मद्दड, थोडीशी तिरळी बाई अप्सरा वाटते.>>>>.ह्मम.. म्ह्णजे अजून कुणाला तरी ती तिरळी वाट्ते तर...

<<सामी | 30 October, 2014 - 20:00
तुमचे आणि एका माबोकराचे विचार तंतोतंत जुळतात.>>

कोण तो एक माबोकर?

असो पण लेख आवडला. रुन्मेश तुम्ही तुमचा_अभिषेक या आयडीचा असाच एक लेख वाचलाय का? तोही जरुर वाचा हं आवडेल तुम्हाला.

हा खरा विनोदी लेख !

गर्लफ्रेंडशी कधीही ब्रेकअप होऊ न देता तिच्याशीच लग्न करणार - हे तुमच झाल पण तिच काय

असे विचार मनात येत असतील तर मनातच ठेवा हो. असे चार चौघात बोलून दाखवले तर अपत्य सोडा लग्नाला मुलगी नाही मिळणार.

शहरी भागात एकवेळ मुली ठिक आहेत... पण गावात काय? शेतातली मेहनीतीची कामं मुली थोडिच करु शकणार आहेत... जिथं अंगमेहनीतचं काम असतं... तिथं पुरुषच लागतात. >>> अनंतरंगी हा प्रतिसाद तुम्ही केवळ विनोदनिर्मिती म्हणुन लिहीलाय की you are serious about this? कारण माझ्याकडे तुमच विधान खोडुन काढणारी काही जिवंत उदाहरण आहेत म्हणुन विचारतेय... ती कुणाची ते नंतर लिहीन वेळ पडल्यास..

मला पुन्हा एकदा मुलगीच हवी झाली आहे.. ते सुद्धा एक नाही तर दोन-दोन मुलीच!>>> म्हणजे आधीची एक आणि आता दोन अश्या तीन मुली कि दोन -दोन = चार + आधीची एक अश्या पाच मुली ??:अओ: Uhoh
थोडक्यात काय तुम्हाला "हम पांच" मधला आनंद माथुर व्हायचं तर Biggrin

ऋन्मेष, तुम्हाला(अपत्य म्हणुन) मुलगी हवीय ते ठिक आहे, पण समजा तुम्हाला (अपत्य म्हणुन) मुलगाच झाला आणि दुसर्‍या वेळेला सुध्दा मुलगाच झाला तर..................... डोक्यात सहच एक किडा वळवळला Happy

आधी हे लेखन तुमच्या जी एफ ला दाखवा मग जर ती तुमच्याबरोबर लग्नाला तयार झाली ना तरच तीचे तुमच्यावर खरे प्रेम आहे हे कळेल...तुमचे तर तीच्यावर आता कशासाठी प्रेम आहे ते जगजाहिरच झाले आहे...आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नवराबायकोमध्ये विश्वास नावाच काहितरी असत ते मात्र तुमच्यात नाहिये सध्यातरि आणि नंतरही ..
असो ... ह्यांचा धागालेखनाचा (काढण्याचा) स्पीड पाहुन २-३ महीन्यापुर्वीची माबो आठवली त्यावेळेला पण एक आय डी असेच बदाबदा लिहित असे...

अरे एक संपला कि पुढचा धागा. एक संपला कि पुढचा . इतके फटा फट धागे विणण कस काय जमत बुवा ? भरपूर वेळ दिसतोय Happy जरा वेग आवरा . नाहीतर दोन महिन्यातच "मला मुलगी झाली हो " म्हणून पुढचा लेख हजर होईल Happy
( लगेच पुढचा धागा वाचला गेला "एकट्या माणसाला करता येण्याजोगे उद्योग" काय योगायोग आहे )

Pages