होममेड चॉकलेटस (खुप्पच सोपे)

Submitted by सायु on 20 October, 2014 - 03:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रॉ चॉकलेट स्लाब = १ (५०० गाम्र)
तुमच्या आवडीचे ड्राय फ्रुट्स (मी बदाम वापरलेत)
वेगवेगळ्या आकाराचे चॉकलेट मुल्डस...

क्रमवार पाककृती: 

हेच चॉकलेट्स बाजारात १५ रु. एक सिल्वहर फोईल मधे राप करुन मिळतात.. आपल्याला घरी २ रु. एक पडते... Happy
शिवाय आपण केलेल्या पदार्थीची मज्जा आणि समाधान.. ही स्लाब १३० रु. मिळाली, त्यापासुन ६५ चॉकलेट्स फक्त १/२ तासात झाली.. Happy

तर एका गंजात पाणी गरम करायला ठेवा त्यात एक रिंग ठेवा, रिंग वर एक अजुन लहान गंज ठेवा त्यात चॉकलेट स्लाबचे दोन तुकडे करुन टाकायचे... काही मिनिटातच वितळायला सुरवात होते... सिरप सारखे झाले की मुल्ङ्स मधे
आवडीचे एक एक ड्राय फ्रुट्स घाला, चमच्यानी सिरप मुल्ड्स मधे भरा आणि फ्रीजर मधे अगदी ५ मि. ठेवा लगेच ट्रे पालथा करा... चॉकलेट्स तय्यार...:)

दिवाळीची भेट म्हणुन देता येईल... सख्या भावाला द्यायचे असतील तर त्याच्या समोर करु नका... नाही तर ... शाहाणे, तु काय केलयस यात, आयता वायता स्ल्याब आणला आणि मुल्डस मधे टाकलाय असं काही तरी ऐकुन घ्याव लागेल... Wink Wink :डोमा:तेव्हा तो नसताना करा आणि फुकटचा भाव खाउन घ्या Wink Wink Wink

वाढणी/प्रमाण: 
उरतच नाही....
अधिक टिपा: 

डबल बॉईलींग करताना एकच काळजी घ्यायची आहे की पाणी आतल्या गंजात जाता कामा नये..

माहितीचा स्रोत: 
माझ्या लाडक्या, संगीता घारपुरे काकु.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे घ्या क्रमवार फोटोज...

ही रॉ चॉकलेट स्लाब... एका पाकीटात अशा ४ येतात..
ch.jpg
डबल बॉईलींग...
ch1.jpg
वित़ळल्यावर असे दिसते...
ch2_0.jpgch3.jpgch4.jpg

केश्वे, तू इतक्यात जांभळी मार्केटला गेली होतीस का? त्या चॉकलेटवाल्याकडे मस्त मस्त मोल्ड्स आले आहेत.

ह्यापेक्षाही सोप्प म्हणजे माय्क्रोवेव्ह मधे लो पॉवर वर वितळवायच.
लागणारा वेळ अजून कमी होतो.
माहितीचा स्त्रोत- वर्षा. Happy
भाव खाण्याबद्दल + १ .तो पोटभर खायला मिळतो Lol

त्याची चव इम्पोर्टेड सारखी आहे म्हणुन... >>>> म्हणुन ती इम्पोर्टंट (important) आहेत का? Wink

रेसिपीच्या नावात तसं लिहिलं आहे ते कर की बरोबर.

मस्तच झालीत ग चॉकलेटस सायली. मी काल स्ट्रॉबेरी आणि मॅन्गो फ्लेवरची आकाशदीवा आणि "Happy Diwali" लिहीलेली केली.

टीप : मोरडेचे स्ट्रॉबेरी आणि मॅन्गो फ्लेवरचे स्लॅब बाजारात आले आहेत Proud

मंजू, नाही गं गेले इतक्यात. आधीचे मोल्ड्सच वाट बघतायत बरेच दिवस चॉकलेट्सची. आजच जमलं तर घेऊन जाते.

सायली, चव डिट्टो तशी मिळते तर उलट अभिमानाने सांग की होममेड आहेत Happy

अश्वे , छान आहेत. मला १/४ स्लॅब ( १२५ ग्रॅम ) ५० रुपयाला मिळाला. लहान भाच्यांना खुप आवडले. एकतर रंग आणि दुसरे आवडता फ्लेवर Happy

मला व्हाईट चॉकलेटमधे फ्लेवर अ‍ॅड केल्यासारखे वाटले Uhoh

धन्यवाद सगळ्यांचे...
अश्विनी नावात बदल केलेला आहे.... धन्स ग!
वर्षा Happy
धन्यवाद दा... कोको घाना कुठे पिकतो लक्षात राहिल आता...

छान झालीत !
इंपोर्टेड सारखी म्हणायचे Happy मायक्रोवेव्ह मधे हेच काम ३० सेकंदात होते.

चॉकलेट्सच्या बाबतीत फ्रेंच आणि स्विस चॉकलेट्सचा जरी बोलबाला असला तरी त्यासाठी लागणारा कोको घाना, नायजेरीया आणि बुर्किना फासो या देशात पिकतो. युरपमधे तो पिकूच शकत नाही. पण या देशांचे नाव कधीच घेतले जात नाही.

मस्त . मुंबईत क्रॉफर्ड मार्केट शिवाय हे रॉ चॉकलेट स्लाब कुठे मिळतील ? कुणीतरी सांगा.

सिनि, तू मुंबईत कुठे राहतेस ते सांगितलंस तर मी सांगू शकेन. क्रॉफर्ड मार्केटच्याच अरीफची अंधेरी आणि बोरीवलीला दुकाने आहेत.
http://www.arifelamoulde.com/store.aspx ह्या लिंकवर पत्ता मिळेल.