माननीय श्रीमती सोनियाजी गांधी यांस,
आदरपूर्वक नमस्कार!
यंदाच्या राजकीय मोसमात आम्ही पाच पत्रे लिहिण्याचे काम हाती घेतलेले आहे व हे दुसरे पत्र आपणांस लिहीत आहोत.
हे पत्र सुरू करताना आमचे मन खरे तर आनंदाने भरून आलेले असायला हवे. लहानपनापासून भाजपीय संस्कारात वाढलेले आम्ही, काँग्रेसचा चौफेर दारूण पराभव होत असलेला पाहून पेढे वाटायला हवेत.
पण बघतो तर काय, हा अनुभव अगदीच निराळा आहे.
सोनियाजी, हे पत्र लिहिताना आमचे मन विषण्णतेने भरून आलेले आहे. मनाचे व्यापार कोणाला कुठे कळतात? आमचाच विश्वास बसत नाही आहे की आपल्याला पत्र लिहिताना खिन्न खिन्न वाटत आहे.
त्याचे काय आहे? आपण ह्या देशाच्या स्नुषा असलात तरी त्यापूर्वी एक परकीय नागरीक आहात. त्यातही ज्या देशातील नागरिकांच्या त्वचेच्या रंगाचा ह्या खंडातील मानवाला नेहमीच आकर्षणयुक्त दबदबा वाटत आला आहे त्यापैकी एका देशातील आहात. नाही विसरता येत हे आम्हाला! हे आमच्यातील पुस्तकी, छापील व नैमित्तिकरीत्या उफाळून येणारे खोटे देशप्रेम नाही आहे. ही आहे आमच्यातील स्वतःला गोर्यांपेक्षा कनिष्ठ मानण्याची जन्मजात प्रवृत्ती! मात्र ह्याला समांतर अशी आणखी एक प्रवृत्ती आमच्यात आहे. ती म्हणजे आपल्या घरी आलेल्या प्रत्येक परक्याला अतिशय उबदार, आपलेसे वाटेल अशी वागणूक देणे!
ही जी दुसरी प्रवृत्ती आमच्यात आहे ना सोनियाजी, ती अशी प्रवृत्ती आहे जी बहुसंख्य देशांमध्ये आढळत नाही. इतर देशात आमच्या नेत्याला व्हिसा नाकारला जातो. वारंवार आमच्या नेत्यांनी इशारे देऊनही आमच्या देशाच्या सीमा शेजारी देशांकडून उल्लंघल्या जातात. आमच्या देशातले सामान्य नागरीक बाँब उडवून मारले जातात. आमच्यावर दिडशे वर्षे राज्य करणार्या आणि आम्हाला लुटणार्या देशाशी आम्ही आजही सद्भावनेने क्रिकेटच्या मालिका घेतो. आमच्या महिला राजदूताचा तपासणीच्या निमित्ताने अपमान करणार्या देशातील कंपन्यांना आम्ही आमच्याकडे गुंतवणूकीसाठी आमंत्रीत करतो. अरुणाचलमध्ये रस्ता बनवल्यावर संतापणारा उत्तरेचा मोठा भाऊ चीन कितीही संतापला तरी आम्ही त्याच्या दारात जाऊन उद्योगकराराची भीक मागतो. अशी प्रवृत्ती जगात नाही आढळत सोनियाजी! म्हणून तर हा देश निराळा, हटके आहे. इथे मुसलमानाच्या घरी नवरात्र बसते आणि हिंदू ईदला शीरखुर्मा मागून आणतो. इथे पंचा गुंडाळून, सूत काढून, अहिंसाधर्माचे व सत्याग्रहाचे पालन करून कोट्यावधींचे नेते बनता येते. नेता होण्यासाठी येथे हिटलरशाही, सद्दाम हुसेन शाही किंवा जॉर्ज बुश शाही आवश्यक नसते.
आमच्यातील हीच ती सहृदयता आहे सोनियाजी, जी तुम्ही ह्या देशाच्या स्नुषा असूनसुद्धा आज आम्हाला विषण्ण बनवत आहे. खिन्न बनवत आहे. वास्तविक पाहता ज्या इंदिराजींच्या एकाधिकारशाहीचा आमच्या मनात तिरस्कार होता, ज्या राजीवजींच्या राजकीय उदयापासूनच आम्हाला अडचणी होत्या त्यांच्या पश्चात त्यांच्या पक्षाची झालेली ही त्रेधा पाहताना आम्हाला कोण आनंद व्हायला पाहिजे? पण वाईट वाटत आहे. एक स्त्री आपले सर्वस्व सोडून भारतात लग्न करून भारताची सून बनून येते. कोणतेही सक्रीय राजकीय पद न स्वीकारता पक्षबांधणीपुरती स्वतःला मर्यादीत ठेवते. तिच्या पक्षाला आज माती चारली जात आहे. तिच्या पाठीशी आज तिची खंबीर सासू नाही, करिष्माई पती नाही! त्या सुनेच्या खिन्न डोळ्यांकडे पाहताना असे वाटते की कित्येक दशके ह्या देशाला एकसंघ ठेवू शकणार्या पक्षाची शकले ह्याच नेतृत्वाच्या कालावधीत का उडाली?
सोनियाजी, तुमचा भारतीय राजकीय पटावर झालेला उदय अमिताभ बच्चन ह्यांचा राजकीय पटावरून झालेला अस्त हे साधारण एकाच काळातील! स्व. राजीवजींच्या दुर्दैवी व निंदेस पात्र अश्या भ्याड हत्येमुळे अचानक सगळी जबाबदारी तुमच्यावर येऊन पडली. त्यावेळी बिग बी ह्यांनी शिष्टाई करून तुम्हाला सक्रीय राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला व तो तुम्ही मानलात. खरे सांगू का? आम्हाला तेव्हा फार बरे वाटले होते. ह्याचे कारण हे की तुम्ही तेव्हा राजकारणात कोंग्रेसचा चेहरा म्हणून उतरला असतात तर विरोधकांची डाळ पुढच्या दोन निवडणूकांपर्यंत शिजली नसती. पण तुम्ही दूर राहिलात. तुम्ही हिंदी नीट बोलू शकायचा नाहीत, आजही नीट बोलू शकत नाही, तुमचे व्यक्तीमत्व भारतीय वाटत नाही, इंदिराजींच्या देहबोलीचे केविलवाणे अनुकरण करता तुम्ही! एकुण, तुम्ही सक्रीय न होणे हा राजकीय सूज्ञपणाच म्हणावा लागेल. कारण आमचा देश भावनांवर आणि व्यक्तीपूजेवर चालतो. आम्ही नुसते व्यक्तीमत्व पाहून ठरवतो की ह्या विशिष्ट व्यक्तीत विशिष्ट पदाचे मटेरिअल आहे की नाही. आणि त्यावरच आम्ही मतदानही करतो.
नरसिंह राव आणि मनमोहन सिंह हे दोन चांगले पंतप्रधान भारत देशाला बराच काळ एक स्थिर सरकार देऊन गेले. ह्या दरम्यान वलयांकित व्यक्तीमत्व मात्र तुम्हीच राहिलात. प्रत्यक्ष पदभार कोणीही सांभाळत असो, काँग्रेस म्हणजे सोनिया हे समीकरण तसेच राहिले. वादग्रस्त मुद्यांमध्ये न येता तुमची कारकीर्द समांतररीत्या झळाळू लागली. पतीनिधनाचे दु:ख तुमच्या मनात असणार ही कालवाकालव आमच्या मनात कायम तशीच राहिली. इतकेच काय हळूहळू आम्हाला वाटू लागले की तुम्ही खरोखरच महान आहात. तुम्हाला ना पद हवे आहे ना प्रसिद्धी! फक्त पक्ष बळकट राहावा इतकीच तुमची इच्छा आहे. हे सगळे होत असताना तुमचे परकीयत्व विरून जात होते.
पद न स्वीकारणे, तरीही वलयांकित राहणे, गांधी कुटुंबीयत्व मिरवणे ह्यात तुम्ही जेव्हा पारंगत होत होतात, तेव्हा सोनियाजी तुमच्या एक गोष्ट लक्षातच आली नाही. आत्मगौरवाच्या ह्या दुष्टचक्रातून आपली व पक्षाची सुटका व्हावी ह्यासाठी नेतृत्वाची दुसरी फळीच तुम्ही निर्माण केली नाहीत. 'मी नसले तर कोण' हा प्रश्न इंदिराजींना आणि राजीवजींना नव्हता. तो तुम्हाला मात्र पडायलाच हवा होता. ह्याचे कारण तुमचे चिरंजीव काय वकूबाचे आहेत ह्याची तुम्हाला उत्तम जाण होती. तुमच्या कुटुंबियांपलीकडचा नेता पक्षावर थोपला तर पक्षाची शकले उडतील हेही तुम्हाला माहीत होते. मनमोहन सिंग मुखदुर्बळ ह्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे हे तुम्हाला ज्ञात होते. तुमचे एक चांगले नेते तर थेट राष्ट्रपतीच होऊन बसले. चिदंबरम ह्यांना वलय नव्हते. बाकीचे नेते तुमच्या कुटुंबाच्या वलयाला चिकटल्यामुळे सत्तेत तग धरून होते. त्यांना स्वतंत्ररीत्या विशेष अस्तित्त्व नव्हते.
सोनियाजी, भारताचे राजकारण म्हणजे थट्टा वाटली का तुम्हाला? कोणीही यावे, गांधी घराण्याची सून बनावे आणि इथे राज्य करावे? आम्हाला अक्कल नाही असा भ्रम झाला का आपल्याला? दुसरी फळी कोण तुमचे चिरंजीव उभी करणार का? काँग्रेस पक्षाला आपल्याशिवाय कोणी एक तारणहार असायला हवा हे एखाद्या शेंबड्या आमदाराच्याही लक्षात आले असते ते तुम्हाला समजू नये? कोणती धुंद चढली होती?
गेल्या वीस वर्षात ना तुमच्या वक्तृत्वाचा दर्जा सुधारला ना तुम्ही कोठली जबाबदारी पत्करलीत! तुमची सुरक्षा, तुमचा थाटमाट ह्यावर कोट्यावधी खर्च मात्र झाले. तुमच्या चिरंजिवांनी मनमोहन सिंगांनी काढलेला फतवा फाडण्याच्या लायकीचा आहे असे वक्तव्य केले तेव्हा तुम्ही त्यांची भर संसदेत कातडी सोलायला हवी होतीत. तेही शक्य नसले तर निदान लहानपणापासून त्यांच्यात नेतृत्वगुण येतील हे तरी बघायला हवे होतेत. अहो नुसते त्या कुटुंबात जन्म घेऊन किंवा त्या कुटुंबाशी लग्न करून नाही एवढ्या मोठ्या देशाचा नेता बनता येत!
आमचे मन विषण्ण होण्याचे कारण काय आहे माहितीय का सोनियाजी?
आज भाजपला तोडिचा विरोधक उरलेला नाही हे शल्य बोचत आहे. राष्ट्रवादीसारख्या स्थानिक आणि पोखरलेल्या पक्षाशी लढती द्याव्या लागत आहेत. त्यांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याच्या प्रस्तावाला विचारात घ्यावे लागत आहे. अहो सगळी अंडीपिल्ली तुमच्याच पक्षापासून फुटलेली आहेत आणि तुम्हालाच जड जात आहेत. आज ना तुम्हाला विरोधी पक्षनेते पद आहे ना पराभवाची मीमांसा देण्याचे धाडस! ना एखादे राज्य जिंकून घेण्याची उमेद आहे ना एकेकाळच्या विजेत्याची देहबोली! लोकसभा निवडणूकीपासून पराभूताच्या देहबोलीत वावरणारे तुम्ही मायलेक हे इंदिराजींच्या खमकेपणाची नियतीने केलेली जहाल थट्टा आहे सोनियाजी! जेव्हा एक जायंट स्टार मृत्यूमुखी पडतो तेव्हा त्याची प्रभा कित्येक अब्जावधी किलोमीटरवर पसरून त्याच्या मालिकेतल्या ग्रहांना गिळंकृत करते आणि मग तो तारा विझतो. तुमच्या कारकीर्दीत काँग्रेस पक्ष नुसताच विझला सोनियाजी! फुटलेली अंडीपिल्ली तशीच चेकाळून बेभानपणे तांडव करत आहेत. अस्ताला फक्त काँग्रेस पक्ष चाललेला आहे. ह्या पक्षाचा पुन्हा उदय होणे हे आता कशावर अवलंबून आहे माहितीय का? भाजपचा जनतेला उबग येण्यावर! तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून नाहीच आहे आता ते!
सोनियाजी, स्वतःच्याच धुंदीत वावरणे, दुसरी फळी निर्माण न करणे, गांधी घराण्याच्या वलयापासून मुक्त झाला तरी काँग्रेस बलाढ्य आहे ही भावना कार्यकर्त्यांमध्ये न पोचवणे, स्वतः कोणतेही पद किंवा जबाबदारी न घेणे, वक्तृत्व न सुधारणे, आपलेसे न वाटणे आणि राहुल हे अपत्य ह्या देशाच्या राजकारणावर लादणे! ह्या सर्व अपयशाच्या मालिकांच्या मुळाशी तुमचे परकीय असणे आहे आणि तरीही तुम्ही आमच्या देशाच्या स्नुषा असल्याने आम्ही ते परकीयत्वही कनवाळूपणे चालवून घेतलेले आहे. पण आता बास करा कृपया! प्रियांकाला नका आणू राजकारणात! स्वतःपासून फुटलेल्या पक्षांवर खरा सूड उगवायचा असेल तर काँग्रेसला असेच नामशेष होत राहूद्यात! ते स्थानिक पक्ष एकमेकांचेच गळे दाबून मरतील बघा!
सोनियाजी, तुमच्या कारकीर्दीत आम्ही काँग्रेसचे रसातळाला जाणे, टप्प्याटप्प्याने कोसळणे पाहिले. आता भाजपचा उबग येईपर्यंत प्रतीक्षा आहे किंवा रामराम आहे तुमच्या नशीबी!
स्वतःच्या देशात राजीवजींची विधवा म्हणून राहिला असतात तर काय किंमत असती हो तुमची? रस्त्यावरून शेजारून गेला असतात तरी कोणाला समजले नसते. आणि इथे येऊन वीस वीस वर्षे स्टारपद? चूक आमचीच आहे. सगळ्या जगाला, त्यातल्या त्यात गोर्या कातडीला आम्ही वचकून असतो, कनवाळूपणे वागतो.
सोनियाजी, विरोधी पक्ष हारण्याचा प्रत्येकाला उन्माद चढतो, प्रत्येकाला आनंद होतो. तुम्ही हारल्याचे वाईट वाटत आहे. कारण तुमच्याबरोबर तुम्ही तो पक्ष घेऊन हारला आहात, ज्या पक्षाची धुरा ह्या देशाने आजवर ज्यांची पूजा केली त्यांनी एकेकाळी वाहिली होती.
उरल्यासुरल्या वलयानिशी परत जा कृपया! आपले सर्व कुटुंबही घेऊन जा! जगूदे ह्या भारताला आणि काँग्रेस पक्षाला तुमच्या नावाशिवाय! बघू काय होते! शिकूदेत सगळ्यांना, की कोणी कोणाला जन्मभर पुरत नसतो.
====================================
-'बेफिकीर'!
लोकहो, श्री. इब्लिस यांची
लोकहो,
श्री. इब्लिस यांची इथली विधाने वाचून करमणूक झाली.
१.
>> तुम्ही तुमच्या खोडल्या गेलेल्या मुद्द्यांनाच पुन्हापुन्हा कोडगेपणाने रेटत रहाता.
पुरावा आहे का?
२.
>> तुमच्या 'संयमित मुद्देसुद' प्रतिवादांमुळेच २ वेळा माबोवरून सद्स्यत्व गेले होते का तुमचे?
माझे आक्रस्ताळे प्रतिसाद दाखवून द्यावे.
आ.न.,
-गा.पै.
सन्नीया गांधी ला दिवाळी च्या
सन्नीया गांधी ला दिवाळी च्या हॅड्रीक शुभेच्छा. .....
साब भारतीय जानाता को दीपावाली
साब भारतीय जानाता को दीपावाली के शूभ आवासार पार हाराडीक शूभ कामानाये
गामा
गामा
काय बेफि, आज आठ वाजताच?
काय बेफि, आज आठ वाजताच? हॅप्पी दिवाळी तुम्हाला.
लगाम सुटला, आर्त
लगाम सुटला, आर्त हंबरत
सप्तदिशांना थिरकत थिरकत
कुणी मोकळे सुटले
असे लोक पुटपुटले
मला एक आश्चर्य वाटते, या
मला एक आश्चर्य वाटते, या लोकांना एकमेकांबद्दल एवढा तिरस्कार का आहे? - म्हणजे येथील माबोकरांना नव्हे :), तो ही असावा असे दिसते, पण तो वेगळा विषय आहे. या लोकांना म्हणजे - तेव्हाचे केसरी, पवार, अर्जुनसिंग, सध्याचे दुसर्या फळीतील नेते जे असतील त्यांना.
गांधी फॅमिलीतील "सध्याची व्यक्ती" कितीही अपरिपक्व असली तरी चालेल पण दुसरा कोणीही नेता म्हणून चालणार नाही असे का असावे? पूर्वी ज्या कारणाने एकमेकांविरूद्ध लढण्याकरता इंग्रजांच्या तैनाती फौजांची मदत घेण्यात आली तसेच काहीतरी असावे
मत्सर आणि फितुरी आपल्या मातीत
मत्सर आणि फितुरी आपल्या मातीत उगवते. इतर अनेक देशांच्या मातीत देशभक्ती उगवते तशी!
हे बहुधा कारण असावे.
इब्लिस | 23 October, 2014 -
इब्लिस | 23 October, 2014 - 20:19
काय बेफि, आज आठ वाजताच? हॅप्पी दिवाळी तुम्हाला.
संपादन
बेफ़िकीर | 23 October, 2014 - 20:30
लगाम सुटला, आर्त हंबरत
सप्तदिशांना थिरकत थिरकत
कुणी मोकळे सुटले
असे लोक पुटपुटले
<<
अच्छाच्छा! तुमचा लगाम अंमळ लवकर सुटला होय! असो असो. होतं कधीकधी. दिवाळी म्हणून हरकत नाही असं म्हणूया.
पद्यात प्रतिसाद द्यायची कल्पना केवळ अफलातून हां!
काही जण मोकाटच असतात
काही जण मोकाटच असतात
रच्याकने: कविस्वातंत्र्य
रच्याकने:
कविस्वातंत्र्य अलाहिदा, दिशा बेसिकली चार, किंवा उपदिशा धरून आठ. अधो उर्ध्व धरली, तर दहा.
हे सात दिशांना काये?
काळुबाळूचा तमाशाला सुट्टी
काळुबाळूचा तमाशाला सुट्टी वाटते दिवाळीची
मावशी पण आली नाही
गांधी फॅमिलीतील "सध्याची
गांधी फॅमिलीतील "सध्याची व्यक्ती" कितीही अपरिपक्व असली तरी चालेल पण दुसरा कोणीही नेता म्हणून चालणार नाही असे का असावे?
>>> भारतभर मान्य होईल असे दुसरे नाव आहे काय?
एक मात्र मान्य केले पाहिजे
एक मात्र मान्य केले पाहिजे सोनियाजी, की तुम्ही आणि तुमच्या चिरंजिवांनी पराभव झाल्या झाल्या लगेच प्रामाणिकपणे पराभव मात्र मान्य केलात. भारतीय जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला नाही हे बरीक खरे बोललात.
खोट बोलायला मोदी नाहीत ते चुक
खोट बोलायला मोदी नाहीत ते
चुक मान्य करतात आणि कराव्यातच नाहीतर मोदी चुका पण करतात आणि मान्य पण करत नाही
सगळ्यांचे मन मोठे नसते हे खरे
तसेच सोनियाजी, तुम्ही तात्काळ
तसेच सोनियाजी, तुम्ही तात्काळ पराभव व तमाम जनतेचा विरोध लक्षात घेऊन हेही म्हणालात की जनमताचा आम्हाला आदर वाटतो. तुम्ही असे म्हंटल्यामुळे तुमचे कट्टर अनुयायीही प्रामाणिकपणे मागे हटले. अविवेकी अनुयायांची संख्या फार नसल्याने त्यांची चिंता नाही.
फटाक्यांचा धूर झाला
फटाक्यांचा धूर झाला
छान लेख, आवडला, पण थोडा
छान लेख, आवडला, पण थोडा एकांगी वाटतोय.
रच्याकने, यावरुन एका मित्राने सांगितलेला किस्सा आठवला .त्याच्या ओळखीचा असाच एकजण जो बायकोच्या जीवावर बसुन खातो व गावातल्यांना माझं कमवलेलं भरपुर आहे अशी लोणकढी थाप मारतो ,पण त्याच्या गावातले त्या घरबश्या ऐतखाऊला पूरते ओळखतात, तो सोनिया गांधिंविषयी खूप क्रिटिकली बोलत होता ,तेव्हा मित्राने त्याला चिडून 'बायकोच्या जीवावर खाणार्याने एका खंबिर स्त्रीचे मुल्यमापन करु नये' असे सूनावल्यानंतर त्याचा चेहरा बघणेबल झाला होता.
लेखातल्या >>सोनियाजी, भारताचे
लेखातल्या
>>सोनियाजी, भारताचे राजकारण म्हणजे थट्टा वाटली का तुम्हाला? कोणीही यावे, गांधी घराण्याची सून बनावे आणि इथे राज्य कराव>>
ह्याच्याशी सहमत. राजीव गांधींशी लग्न झालं नसतं तर ह्याच सोनिया गांधींना काँग्रेस अध्यक्ष होता आलं असतं का? अध्यक्ष बनण्या आधी त्यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणुन किती काम केलं होतं? पार्टीतच कोणत्या पदावर काम केलं होतं? खासदार म्हणुन तरी काय काम केलं होतं? फक्त राजीव गांधींची पत्नी म्हणुन त्यांना अध्यक्ष का म्हणुन करायचं? असती एवढीच धमक आणि कुवत तर गांधी आडनाव न लागताही स्वबळावर त्या कोणीतरी बनल्या असत्या. असो.
लेखात जे "परत जा" म्हटलय ते हाकलुन देण्याच्या वृत्तीने न म्हणता सन्मानाने आपला गाशा गुंडाळा अशा अर्थी म्हणले आहे असं माझं मत.
फारएण्ड - >गांधी फॅमिलीतील "सध्याची व्यक्ती" कितीही अपरिपक्व असली तरी चालेल पण दुसरा कोणीही नेता म्हणून चालणार नाही असे का असावे>>
मलाही हाच प्रश्न पडला होता तेव्हा एका मित्राने असे सांगितले कि काँग्रेस पार्टीला मिळणारे सगळे फंड (दान, देणगी इ. स्वरुपात) "राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट" ला जातात व तेथुनच ते 'वितरित' होतात. ह्यांना मिळणार्या "पांढर्या" पैशाचीच रक्कम काहीशे कोटी आहे, काळ्या पैशातुन मिळणार्या देणग्या किती असतील देवच जाणे. अशा ह्या ट्रस्टचा अध्यक्ष गांधी घराण्यातीलच असला पाहिजे असा नियम आहे. त्यामुळे काँग्रेसच्या राजकारणातुन गांधी घराणे कधीच वजा करता येणार नाही. अर्थात ही माहिती ऐकीव असल्यामुळे ख खो दे जा. - अवांतराबद्दल क्षमस्व बेफि.
धीरज, तुमचा प्रतिसाद अजिबात
धीरज,
तुमचा प्रतिसाद अजिबात आवडला नाही. एकतर मूळ लेखाशी काही संबंध नाही. शिवाय अशा पर्सनल प्रतिसादाने तुमच्याकडे मुद्दे उरले नाहीत हेच सूचीत करत आहात.
लेखात सोनिया गांधींना परत जा असे उद्वेगाने लिहिले आहे. त्या परत गेल्या तर कॉंग्रेस पुन्हा उभारी घेइल असा लेखकाचा सूर आहे. त्या विधवा आहेत याचा काहीही संबंध नाही. त्यांना परत जायला सांगणे योग्य की नाही हे वेगळे आणी त्यावर जरूर टीका करावी.
शुभ दीपावली.
आँ !यात पर्सनल काय आहे ?हा
आँ !यात पर्सनल काय आहे ?हा खरा घडलेला किस्सा आहे, असे पॅरासाईटीक लाईफस्टाईल असलेले लोक असतात समाजात.जे सतत इतरांवर टीका करतात.
काटकर, बेफिकीर यानी सोनियाला
काटकर, बेफिकीर यानी सोनियाला लिहीलेले सोनिया इथे येऊन वाचणार नाहीये, त्यामुळे ती काळजी करु नका. पण मायबोलीवर एक साधारण नियम आहे की दुसर्या मायबोलीकराविषयी निदान त्याच्या वैयैक्तीक आयुष्याबद्दल बोलायचा अधिकार नाहीये. बेफिकीर तुमच्या विषयी किन्वा तुमच्या घरच्या व्यक्ती विषयी काही अनूचीत बोलले आहेत का? नाही ना? मग इतक्या खालच्या पातळीवर कशाला उतरताय?
विकु सहमत आहे.
.बायकोच्या जीवावर खाणार्याने
.बायकोच्या जीवावर खाणार्याने एका खंबिर स्त्रीचे मुल्यमापन करु नये>>>>>>> तो स्वतःच्या बायकोच्या जिवावर खाईल अथवा नाही .तो त्यांचा प्रश्न आहे.दुसरा येऊन घास तर नाही ना घालत.वर लिहिलेले बोलणारा चुकला.
.वि.कु आणि रश्मी यांना अनुमोदन.
सोनिया गांधी या काँग्रेसच्या
सोनिया गांधी या काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत, त्यांच्या धोरणांविषयी लिहावे, व्यक्तीगत विधवा आहे ,ती हिंदी नीट बोलत नाही, तिचा मुलगा अमुक तमुक असे व्यक्तीगत लिहू नये.
चर्चा याच लाईनवर चालू आहे .मी सांगितलेला किस्सा खरच घडलेला आहे, असे बायकोच्या जीवावर निर्लज्ज तुकडे तोडणारे असतात जे पुरुषप्रधान मानसिकतेतुन ती विधवा आहे, तीने तिच्या देशात परत जावे वगैरे बोलत असतात.इंदिरा गांधीवगैरेंनाही अशा व्यक्तीगत टिकेला सामोरे जावे लागायचे. त्यातला एक सत्य किस्सा सांगितला, त्यात व्यक्तीगत काहिच नाही.
सोनियाला लिहीलेले सोनिया इथे
सोनियाला लिहीलेले सोनिया इथे येऊन वाचणार नाहीये, त्यामुळे ती काळजी करु नका<<
त्या वाचणार नाहीत म्हणून काय वाट्टेल ते लिहिलेले चालते का?
<<असे बायकोच्या जीवावर
<<असे बायकोच्या जीवावर निर्लज्ज तुकडे तोडणारे असतात जे पुरुषप्रधान मानसिकतेतुन ती विधवा आहे, तीने तिच्या देशात परत जावे वगैरे बोलत असतात.>>
कमाल आहे! हाऊसवाईफने नवर्याच्या जिवावर तुकडे तोडलेले (?) चालतात पण एखादया जोडप्यात कमावती बायको आणि न कमावणारा नवरा असेल तर लगेच तो निर्लज्ज का? हीच ती घाणेरडी पुरुषप्रधान मानसिकता. असली मानसिकता असलेले लोक सोनियाच काय कोणत्याच स्त्रीचा कधी आदर करु शकणार नाहीत.
मयत झाल्यानंतर एखाद्या स्त्री
मयत झाल्यानंतर एखाद्या स्त्री ला रडू येत नाही तेव्हां तिला रडवण्याचे प्रयत्न केले जातात. हे पत्र वाचून सोनिया गांधी तसेच अनेक कट्टरा कॉंग्रेसी धाय मोकलून रडत आहेत अशी विश्वसनीय गोटातील माहीती आहे.
Pages