माननीय श्रीमती सोनियाजी गांधी यांस,
आदरपूर्वक नमस्कार!
यंदाच्या राजकीय मोसमात आम्ही पाच पत्रे लिहिण्याचे काम हाती घेतलेले आहे व हे दुसरे पत्र आपणांस लिहीत आहोत.
हे पत्र सुरू करताना आमचे मन खरे तर आनंदाने भरून आलेले असायला हवे. लहानपनापासून भाजपीय संस्कारात वाढलेले आम्ही, काँग्रेसचा चौफेर दारूण पराभव होत असलेला पाहून पेढे वाटायला हवेत.
पण बघतो तर काय, हा अनुभव अगदीच निराळा आहे.
सोनियाजी, हे पत्र लिहिताना आमचे मन विषण्णतेने भरून आलेले आहे. मनाचे व्यापार कोणाला कुठे कळतात? आमचाच विश्वास बसत नाही आहे की आपल्याला पत्र लिहिताना खिन्न खिन्न वाटत आहे.
त्याचे काय आहे? आपण ह्या देशाच्या स्नुषा असलात तरी त्यापूर्वी एक परकीय नागरीक आहात. त्यातही ज्या देशातील नागरिकांच्या त्वचेच्या रंगाचा ह्या खंडातील मानवाला नेहमीच आकर्षणयुक्त दबदबा वाटत आला आहे त्यापैकी एका देशातील आहात. नाही विसरता येत हे आम्हाला! हे आमच्यातील पुस्तकी, छापील व नैमित्तिकरीत्या उफाळून येणारे खोटे देशप्रेम नाही आहे. ही आहे आमच्यातील स्वतःला गोर्यांपेक्षा कनिष्ठ मानण्याची जन्मजात प्रवृत्ती! मात्र ह्याला समांतर अशी आणखी एक प्रवृत्ती आमच्यात आहे. ती म्हणजे आपल्या घरी आलेल्या प्रत्येक परक्याला अतिशय उबदार, आपलेसे वाटेल अशी वागणूक देणे!
ही जी दुसरी प्रवृत्ती आमच्यात आहे ना सोनियाजी, ती अशी प्रवृत्ती आहे जी बहुसंख्य देशांमध्ये आढळत नाही. इतर देशात आमच्या नेत्याला व्हिसा नाकारला जातो. वारंवार आमच्या नेत्यांनी इशारे देऊनही आमच्या देशाच्या सीमा शेजारी देशांकडून उल्लंघल्या जातात. आमच्या देशातले सामान्य नागरीक बाँब उडवून मारले जातात. आमच्यावर दिडशे वर्षे राज्य करणार्या आणि आम्हाला लुटणार्या देशाशी आम्ही आजही सद्भावनेने क्रिकेटच्या मालिका घेतो. आमच्या महिला राजदूताचा तपासणीच्या निमित्ताने अपमान करणार्या देशातील कंपन्यांना आम्ही आमच्याकडे गुंतवणूकीसाठी आमंत्रीत करतो. अरुणाचलमध्ये रस्ता बनवल्यावर संतापणारा उत्तरेचा मोठा भाऊ चीन कितीही संतापला तरी आम्ही त्याच्या दारात जाऊन उद्योगकराराची भीक मागतो. अशी प्रवृत्ती जगात नाही आढळत सोनियाजी! म्हणून तर हा देश निराळा, हटके आहे. इथे मुसलमानाच्या घरी नवरात्र बसते आणि हिंदू ईदला शीरखुर्मा मागून आणतो. इथे पंचा गुंडाळून, सूत काढून, अहिंसाधर्माचे व सत्याग्रहाचे पालन करून कोट्यावधींचे नेते बनता येते. नेता होण्यासाठी येथे हिटलरशाही, सद्दाम हुसेन शाही किंवा जॉर्ज बुश शाही आवश्यक नसते.
आमच्यातील हीच ती सहृदयता आहे सोनियाजी, जी तुम्ही ह्या देशाच्या स्नुषा असूनसुद्धा आज आम्हाला विषण्ण बनवत आहे. खिन्न बनवत आहे. वास्तविक पाहता ज्या इंदिराजींच्या एकाधिकारशाहीचा आमच्या मनात तिरस्कार होता, ज्या राजीवजींच्या राजकीय उदयापासूनच आम्हाला अडचणी होत्या त्यांच्या पश्चात त्यांच्या पक्षाची झालेली ही त्रेधा पाहताना आम्हाला कोण आनंद व्हायला पाहिजे? पण वाईट वाटत आहे. एक स्त्री आपले सर्वस्व सोडून भारतात लग्न करून भारताची सून बनून येते. कोणतेही सक्रीय राजकीय पद न स्वीकारता पक्षबांधणीपुरती स्वतःला मर्यादीत ठेवते. तिच्या पक्षाला आज माती चारली जात आहे. तिच्या पाठीशी आज तिची खंबीर सासू नाही, करिष्माई पती नाही! त्या सुनेच्या खिन्न डोळ्यांकडे पाहताना असे वाटते की कित्येक दशके ह्या देशाला एकसंघ ठेवू शकणार्या पक्षाची शकले ह्याच नेतृत्वाच्या कालावधीत का उडाली?
सोनियाजी, तुमचा भारतीय राजकीय पटावर झालेला उदय अमिताभ बच्चन ह्यांचा राजकीय पटावरून झालेला अस्त हे साधारण एकाच काळातील! स्व. राजीवजींच्या दुर्दैवी व निंदेस पात्र अश्या भ्याड हत्येमुळे अचानक सगळी जबाबदारी तुमच्यावर येऊन पडली. त्यावेळी बिग बी ह्यांनी शिष्टाई करून तुम्हाला सक्रीय राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला व तो तुम्ही मानलात. खरे सांगू का? आम्हाला तेव्हा फार बरे वाटले होते. ह्याचे कारण हे की तुम्ही तेव्हा राजकारणात कोंग्रेसचा चेहरा म्हणून उतरला असतात तर विरोधकांची डाळ पुढच्या दोन निवडणूकांपर्यंत शिजली नसती. पण तुम्ही दूर राहिलात. तुम्ही हिंदी नीट बोलू शकायचा नाहीत, आजही नीट बोलू शकत नाही, तुमचे व्यक्तीमत्व भारतीय वाटत नाही, इंदिराजींच्या देहबोलीचे केविलवाणे अनुकरण करता तुम्ही! एकुण, तुम्ही सक्रीय न होणे हा राजकीय सूज्ञपणाच म्हणावा लागेल. कारण आमचा देश भावनांवर आणि व्यक्तीपूजेवर चालतो. आम्ही नुसते व्यक्तीमत्व पाहून ठरवतो की ह्या विशिष्ट व्यक्तीत विशिष्ट पदाचे मटेरिअल आहे की नाही. आणि त्यावरच आम्ही मतदानही करतो.
नरसिंह राव आणि मनमोहन सिंह हे दोन चांगले पंतप्रधान भारत देशाला बराच काळ एक स्थिर सरकार देऊन गेले. ह्या दरम्यान वलयांकित व्यक्तीमत्व मात्र तुम्हीच राहिलात. प्रत्यक्ष पदभार कोणीही सांभाळत असो, काँग्रेस म्हणजे सोनिया हे समीकरण तसेच राहिले. वादग्रस्त मुद्यांमध्ये न येता तुमची कारकीर्द समांतररीत्या झळाळू लागली. पतीनिधनाचे दु:ख तुमच्या मनात असणार ही कालवाकालव आमच्या मनात कायम तशीच राहिली. इतकेच काय हळूहळू आम्हाला वाटू लागले की तुम्ही खरोखरच महान आहात. तुम्हाला ना पद हवे आहे ना प्रसिद्धी! फक्त पक्ष बळकट राहावा इतकीच तुमची इच्छा आहे. हे सगळे होत असताना तुमचे परकीयत्व विरून जात होते.
पद न स्वीकारणे, तरीही वलयांकित राहणे, गांधी कुटुंबीयत्व मिरवणे ह्यात तुम्ही जेव्हा पारंगत होत होतात, तेव्हा सोनियाजी तुमच्या एक गोष्ट लक्षातच आली नाही. आत्मगौरवाच्या ह्या दुष्टचक्रातून आपली व पक्षाची सुटका व्हावी ह्यासाठी नेतृत्वाची दुसरी फळीच तुम्ही निर्माण केली नाहीत. 'मी नसले तर कोण' हा प्रश्न इंदिराजींना आणि राजीवजींना नव्हता. तो तुम्हाला मात्र पडायलाच हवा होता. ह्याचे कारण तुमचे चिरंजीव काय वकूबाचे आहेत ह्याची तुम्हाला उत्तम जाण होती. तुमच्या कुटुंबियांपलीकडचा नेता पक्षावर थोपला तर पक्षाची शकले उडतील हेही तुम्हाला माहीत होते. मनमोहन सिंग मुखदुर्बळ ह्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे हे तुम्हाला ज्ञात होते. तुमचे एक चांगले नेते तर थेट राष्ट्रपतीच होऊन बसले. चिदंबरम ह्यांना वलय नव्हते. बाकीचे नेते तुमच्या कुटुंबाच्या वलयाला चिकटल्यामुळे सत्तेत तग धरून होते. त्यांना स्वतंत्ररीत्या विशेष अस्तित्त्व नव्हते.
सोनियाजी, भारताचे राजकारण म्हणजे थट्टा वाटली का तुम्हाला? कोणीही यावे, गांधी घराण्याची सून बनावे आणि इथे राज्य करावे? आम्हाला अक्कल नाही असा भ्रम झाला का आपल्याला? दुसरी फळी कोण तुमचे चिरंजीव उभी करणार का? काँग्रेस पक्षाला आपल्याशिवाय कोणी एक तारणहार असायला हवा हे एखाद्या शेंबड्या आमदाराच्याही लक्षात आले असते ते तुम्हाला समजू नये? कोणती धुंद चढली होती?
गेल्या वीस वर्षात ना तुमच्या वक्तृत्वाचा दर्जा सुधारला ना तुम्ही कोठली जबाबदारी पत्करलीत! तुमची सुरक्षा, तुमचा थाटमाट ह्यावर कोट्यावधी खर्च मात्र झाले. तुमच्या चिरंजिवांनी मनमोहन सिंगांनी काढलेला फतवा फाडण्याच्या लायकीचा आहे असे वक्तव्य केले तेव्हा तुम्ही त्यांची भर संसदेत कातडी सोलायला हवी होतीत. तेही शक्य नसले तर निदान लहानपणापासून त्यांच्यात नेतृत्वगुण येतील हे तरी बघायला हवे होतेत. अहो नुसते त्या कुटुंबात जन्म घेऊन किंवा त्या कुटुंबाशी लग्न करून नाही एवढ्या मोठ्या देशाचा नेता बनता येत!
आमचे मन विषण्ण होण्याचे कारण काय आहे माहितीय का सोनियाजी?
आज भाजपला तोडिचा विरोधक उरलेला नाही हे शल्य बोचत आहे. राष्ट्रवादीसारख्या स्थानिक आणि पोखरलेल्या पक्षाशी लढती द्याव्या लागत आहेत. त्यांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याच्या प्रस्तावाला विचारात घ्यावे लागत आहे. अहो सगळी अंडीपिल्ली तुमच्याच पक्षापासून फुटलेली आहेत आणि तुम्हालाच जड जात आहेत. आज ना तुम्हाला विरोधी पक्षनेते पद आहे ना पराभवाची मीमांसा देण्याचे धाडस! ना एखादे राज्य जिंकून घेण्याची उमेद आहे ना एकेकाळच्या विजेत्याची देहबोली! लोकसभा निवडणूकीपासून पराभूताच्या देहबोलीत वावरणारे तुम्ही मायलेक हे इंदिराजींच्या खमकेपणाची नियतीने केलेली जहाल थट्टा आहे सोनियाजी! जेव्हा एक जायंट स्टार मृत्यूमुखी पडतो तेव्हा त्याची प्रभा कित्येक अब्जावधी किलोमीटरवर पसरून त्याच्या मालिकेतल्या ग्रहांना गिळंकृत करते आणि मग तो तारा विझतो. तुमच्या कारकीर्दीत काँग्रेस पक्ष नुसताच विझला सोनियाजी! फुटलेली अंडीपिल्ली तशीच चेकाळून बेभानपणे तांडव करत आहेत. अस्ताला फक्त काँग्रेस पक्ष चाललेला आहे. ह्या पक्षाचा पुन्हा उदय होणे हे आता कशावर अवलंबून आहे माहितीय का? भाजपचा जनतेला उबग येण्यावर! तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून नाहीच आहे आता ते!
सोनियाजी, स्वतःच्याच धुंदीत वावरणे, दुसरी फळी निर्माण न करणे, गांधी घराण्याच्या वलयापासून मुक्त झाला तरी काँग्रेस बलाढ्य आहे ही भावना कार्यकर्त्यांमध्ये न पोचवणे, स्वतः कोणतेही पद किंवा जबाबदारी न घेणे, वक्तृत्व न सुधारणे, आपलेसे न वाटणे आणि राहुल हे अपत्य ह्या देशाच्या राजकारणावर लादणे! ह्या सर्व अपयशाच्या मालिकांच्या मुळाशी तुमचे परकीय असणे आहे आणि तरीही तुम्ही आमच्या देशाच्या स्नुषा असल्याने आम्ही ते परकीयत्वही कनवाळूपणे चालवून घेतलेले आहे. पण आता बास करा कृपया! प्रियांकाला नका आणू राजकारणात! स्वतःपासून फुटलेल्या पक्षांवर खरा सूड उगवायचा असेल तर काँग्रेसला असेच नामशेष होत राहूद्यात! ते स्थानिक पक्ष एकमेकांचेच गळे दाबून मरतील बघा!
सोनियाजी, तुमच्या कारकीर्दीत आम्ही काँग्रेसचे रसातळाला जाणे, टप्प्याटप्प्याने कोसळणे पाहिले. आता भाजपचा उबग येईपर्यंत प्रतीक्षा आहे किंवा रामराम आहे तुमच्या नशीबी!
स्वतःच्या देशात राजीवजींची विधवा म्हणून राहिला असतात तर काय किंमत असती हो तुमची? रस्त्यावरून शेजारून गेला असतात तरी कोणाला समजले नसते. आणि इथे येऊन वीस वीस वर्षे स्टारपद? चूक आमचीच आहे. सगळ्या जगाला, त्यातल्या त्यात गोर्या कातडीला आम्ही वचकून असतो, कनवाळूपणे वागतो.
सोनियाजी, विरोधी पक्ष हारण्याचा प्रत्येकाला उन्माद चढतो, प्रत्येकाला आनंद होतो. तुम्ही हारल्याचे वाईट वाटत आहे. कारण तुमच्याबरोबर तुम्ही तो पक्ष घेऊन हारला आहात, ज्या पक्षाची धुरा ह्या देशाने आजवर ज्यांची पूजा केली त्यांनी एकेकाळी वाहिली होती.
उरल्यासुरल्या वलयानिशी परत जा कृपया! आपले सर्व कुटुंबही घेऊन जा! जगूदे ह्या भारताला आणि काँग्रेस पक्षाला तुमच्या नावाशिवाय! बघू काय होते! शिकूदेत सगळ्यांना, की कोणी कोणाला जन्मभर पुरत नसतो.
====================================
-'बेफिकीर'!
फ़क्त तुम्ही भकलेले ऐकावे असा
फ़क्त तुम्ही भकलेले ऐकावे असा नियम केलाय का?
संत. मिराबैना तांचा नवर
संत. मिराबैना तांचा नवर मेल्यावर दिरने हाकलले होते, त्याची अठवण झाली.
सहिश्णु धर्म की जय !
बकेल? भकलेले? मराठी शब्द ??
बकेल? भकलेले?
मराठी शब्द ??
बारतीय सानस्क्रुती के आनुसार
बारतीय सानस्क्रुती के आनुसार कान्ग्रेस के कारयकरताओं को बारताव करना चाहीये
राजीव हत्येनंतरच्या काही
राजीव हत्येनंतरच्या काही दिवसांत काही पेपरानी सोनिया इटालीला परत जायचा विचार करतेय हेही छापलेले.
पण १९७७ मध्ये जनतापार्टी निवडुन आल्यावर जसे प्रत्येकाला पंप्र बनण्याची स्वप्ने पडु लागली तशीच स्वप्ने राजिव गेल्यावर प्रत्येक कांग्रेसीला पडु लागली. आणि मग या रॅटरेसमध्ये जी मंडळी पंप्र बनण्याची अजिबात शक्यता नव्हती ती मंडळी सोनीयाच्या चरणी जाऊन पडली आणि मोठ्या मिनतवारीने तिला अध्यक्षपद घेण्यास तयार केले. हा सगळा घटनाक्रम तेव्हाच्या पेपरांमधुन वाचलेला आहे, यात खोटे किती आणि खरे किती हे मी प्रत्यक्षदर्शी नसल्याने माहित नाही.
नेहरु गेल्यावर इंदिराजींनाही असेच तयार केले गेलेले हेही असेच कुठेकुठे वाचलेय. तिला पुढे करणा-यांना ती गुंगी गुडीया आहे, तिला पुढे करुन आपण आपला कार्यभाग साधु असे वाटलेले पण इंदीराजींमध्ये स्वतःच प्रतिभा होती, पुढारीपण होते, त्या आधारावर त्यांनी सगळ्यांना मागे टाकुन स्वतःचे स्थान तयार केले. सोनीयामध्ये असे काहीच गुण नसल्याने तिच्या अध्यक्षपदाखाली कांग्रेसची अवस्था खालावत जाऊन आज आयसियुत जाण्याची वेळ त्या पक्षावर आलीय.
मुळात गांधी घराण्याने सुरवातीपासुनच पक्ष म्हणजे गांधी घराणॅ एवढेच पाहिले. इतक्या मोठ्या पक्षाचे निर्णय कायम एका घराण्याहाती राहिले, दुसरी - तिसरी फळी विकसीत झाली नाही. त्याचे परिणाम आज दिसताहेत.
गांधी घराण्याने जे केले ते काही जगावेगळे नाहीय, इथे बाकी सगळ्यच पक्षाच्या संस्थापकांनी तेच केलेय. कुठल्याच पक्षात आज नंबर एक पदावर पक्षस्थापनकर्ते आणि दोन पदावर त्यांचे भाऊ, मुलगी, मुलगा, पुतण्या, भाचा इत्यादी मंडळी आहेत. बाकीचे कार्यकर्ते आहेत ते कायम कार्यकर्तेच राहणार. त्यांना कधीही नं. १ किंवा २ जागा मिळणार नाही. इथे लोकशाहीच्या आड दडुन राजेशाही वावरते. आणि ती त्या राजांना आणि भारतीय लोकांना चालते. थोर नेत्यानंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा/मुलगी यावी यात कोणाला काहीच वावगे वाट्त नाही. वाटले असते तर कालपर्यंत जिचे नाव माहित नव्हते त्या पंकजा मुंडेला इतकी मते पडली नसती. तिच्या जागी मुंड्यांबरोबरीचा एखादा नेता उभा राहिला असता तर तो जिंकुन आला नसता काय?
असो. भारतात राजेशाहीची परंपरा हजारो वर्षे आहे आणि ती यापुढेही कदाचित तशीच राहिल अशी चिन्हे आहेत.
लेख आवडला फक्त ते परत जा आवडले नाही. इथे सुन म्हणुन आलीय, त्यामुळे ती आता इथलीच आहे. तिने फक्त उरलासुरला पक्ष योग्य हातात (जर असे हात सापडले तर) द्यावा ही अपेक्षा.
अर्थात परत जा नंतर तुम्ही लिहिल्ये का परत जा ते. पण तरीही. परत जा म्हणण्यापेक्षा प्रियांका जशी आजवर जमेल तितके दुर राहिलीय तसे दुर राहा म्हणावे.
अर्थात परत जा नंतर तुम्ही
अर्थात परत जा नंतर तुम्ही लिहिल्ये का परत जा ते. पण तरीही. परत जा म्हणण्यापेक्षा प्रियांका जशी आजवर जमेल तितके दुर राहिलीय तसे दुर राहा म्हणावे.
नको नको परत नका ना जावु देवु प्लीज. ठेवताय ना उंटाच्या पाठीवर शेवटची काडी रागांबरोबर मिळुन ठेवु द्या. प्लीज.
व्यक्ती ................
व्यक्ती ................ कारकेर्द वर्ष
शिवाजी .. ६
सम्भाजी ... ९
वाजपेयी ...... १३ दिव्स + ५ वर्शे
सोनिया .... १०
हिंदुत्ववाड्याम्च्या दैवतांपेक्षा सोनियाचॅए कारकीर्द मोठी आहे.
मुळात गांधी घराण्याने
मुळात गांधी घराण्याने सुरवातीपासुनच पक्ष म्हणजे गांधी घराणॅ एवढेच पाहिले. इतक्या मोठ्या पक्षाचे निर्णय कायम एका घराण्याहाती राहिले, दुसरी - तिसरी फळी विकसीत झाली नाही. त्याचे परिणाम आज दिसताहेत.
गांधी घराण्याने जे केले ते काही जगावेगळे नाहीय, इथे बाकी सगळ्यच पक्षाच्या संस्थापकांनी तेच केलेय. कुठल्याच पक्षात आज नंबर एक पदावर पक्षस्थापनकर्ते आणि दोन पदावर त्यांचे भाऊ, मुलगी, मुलगा, पुतण्या, भाचा इत्यादी मंडळी आहेत. बाकीचे कार्यकर्ते आहेत ते कायम कार्यकर्तेच राहणार. त्यांना कधीही नं. १ किंवा २ जागा मिळणार नाही. इथे लोकशाहीच्या आड दडुन राजेशाही वावरते. आणि ती त्या राजांना आणि भारतीय लोकांना चालते. थोर नेत्यानंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा/मुलगी यावी यात कोणाला काहीच वावगे वाट्त नाही. वाटले असते तर कालपर्यंत जिचे नाव माहित नव्हते त्या पंकजा मुंडेला इतकी मते पडली नसती. तिच्या जागी मुंड्यांबरोबरीचा एखादा नेता उभा राहिला असता तर तो जिंकुन आला नसता काय?
असो. भारतात राजेशाहीची परंपरा हजारो वर्षे आहे आणि ती यापुढेही कदाचित तशीच राहिल अशी चिन्हे आहेत.
लेख आवडला फक्त ते परत जा आवडले नाही. इथे सुन म्हणुन आलीय, त्यामुळे ती आता इथलीच आहे. तिने फक्त उरलासुरला पक्ष योग्य हातात (जर असे हात सापडले तर) द्यावा ही अपेक्षा.
अर्थात परत जा नंतर तुम्ही लिहिल्ये का परत जा ते. पण तरीही. परत जा म्हणण्यापेक्षा प्रियांका जशी आजवर जमेल तितके दुर राहिलीय तसे दुर राहा म्हणावे.>>>>>> फुल पॅराला ++++++++१११११११
ऋन्मेष, बकणे व भकणे, यातला
ऋन्मेष,
बकणे व भकणे, यातला फरक मराठी विश्वकोशात शोधा. नच जमले, तर मोल्सवर्थ आहेच.
अर्थात परत जा नंतर तुम्ही
अर्थात परत जा नंतर तुम्ही लिहिल्ये का परत जा ते. पण तरीही. परत जा म्हणण्यापेक्षा प्रियांका जशी आजवर जमेल तितके दुर राहिलीय तसे दुर राहा म्हणावे.>>>>>>>>>
असे का?
त्यांनी काय करावे नि काय करू नये हा त्यांचा प्रश्न आहे.. राजकारणात जय पराजय होतच असतात पण त्याचा इतका अह्गंड असावा. त्यांनी आपल्या मुलांना घेवून माहेरी जावे, मुलीसारखे राजकारणापासून दूर राहावे अशे सल्ले त्यांना देण्याचा अट्टाहास का? त्यांच्या मुलांनी हा देश का सोडवा त्यांच्या वडिलांचा देश त्यांचा नाही? एखाद्या व्यक्तीला विरोध करता करता द्वेष कसा सुरु होतो त्याचे उदाहरण म्हणजे हा लेख नि हि प्रतिक्रिया.
भगव्या साध्व्या आणि टनाटन
भगव्या साध्व्या आणि टनाटन आघातच्या साधिका यावर एक लेख पाडा.
त्यांनी काय करावे नि काय करू
त्यांनी काय करावे नि काय करू नये हा त्यांचा प्रश्न आहे >> तसंच कोणी काय लिहावं आणि न लिहावं हा त्यांचा प्रश्न आहे. किती कीस पाडताय!!
(No subject)
तसंच कोणी काय लिहावं आणि न
तसंच कोणी काय लिहावं आणि न लिहावं हा त्यांचा प्रश्न आहे. किती कीस पाडताय!!>>>>>>.
इतरांनी काही ह्यांच्या मनाविरुद्ध लिहिले कि अड्मीन च्या विपुत डकवतात. महात्मा गांधींच्या धाग्यावर नथुला माथेफिरू म्हंटले कि ह्यांना राग येतो मोठी प्रतिक्रिया देतात हे लिहिणे कसे योग्य नाही सांगतात.
कोणी काय लिहाव नि काय लिहू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न असता तर एखाद्या लिखानावून दंगली झाल्या नसत्या. उद्या तुमच्या म्हणण्यानुसार जग वागायला लागले तर ओवेसी म्हणेल, काय भाषण करायचे नि काय नाही हा माझा प्रश्न आहे.
आपण सार्वजनिक संस्थळावर वावरताना एक जबाबदारीचे भान ठेवायला पाहिजे. एखाद्या विधवा स्त्रीला तिच्या मुलांसकट देश सोडून जायचा सल्ला देणे शोभते का?. आणि सोनियाच नव्हे तर इतर कोणत्याही स्त्रीचा अपमान झाला असता तरी माझी हीच प्रतिक्रिया असती.
इतरांनी काही ह्यांच्या
इतरांनी काही ह्यांच्या मनाविरुद्ध लिहिले कि अड्मीन च्या विपुत डकवतात.<<<
मी आजतागायत एकदाही अॅडमीनकडे कोणाही मायबोली सदस्याची तक्रार केलेली नाही.
>>>एखाद्या विधवा स्त्रीला तिच्या मुलांसकट देश सोडून जायचा सल्ला देणे शोभते का?. आणि सोनियाच नव्हे तर इतर कोणत्याही स्त्रीचा अपमान झाला असता तरी माझी हीच प्रतिक्रिया असती.<<<
सोनियाजी विधवा आहेत म्हणून देश सोडून जा असे लिहिलेले नाही. मराठीचा अर्थ समजत नसेल तर माझा निरुपाय आहे. इतकेच नव्हे तर पूर्वी कधीकाळी विधवेला माहेरी जायला सांगत असत हेही माझ्यासाठी नवीन आहे, अशी काही भीषण रुढी होती हे मला काल समजले ह्याच धाग्यावरील प्रतिसादांमधून!
तेव्हा, कृपया खोटारडी विधाने करू नयेत अशी नम्र विनंती!
सोनिया यांनी वाजपेयीला घरी
सोनिया यांनी वाजपेयीला घरी बसवले अडवाणीच्या कारकीर्दीचा बोर्या वाजवला हे बघून काही लोकांचा जो जळफळात झाला त्याचे प्रतिक दिसून आले. परदेशी सुनेचा मुद्दा उचलणार्यांना जनतेने दोन वेळा निवडणूकीत सणसणीत वाजवली आहे हे विसरलेले दिसून येत आहे. तरी सुधरण्याची लक्षणे दिसून येत नाही
बाकी हत्ती खाली बसला काहीवेळ तरी तो गाढवांपेक्षा मोठाच असतो फरक इतकाच की गाढव उभे असते आणि हत्ती बसलेला असतो
बेफि, तुमचं लिखाण जिथे
बेफि, तुमचं लिखाण जिथे पोहोचायचं तिथे पोहोचल आहे.
तुम्ही आता डिफेन्सिव्ह होऊन का उत्तर देत बसलाय या प्रश्नांची?
स्वाहा, >> परदेशी सुनेचा
स्वाहा,
>> परदेशी सुनेचा मुद्दा उचलणार्यांना जनतेने दोन वेळा निवडणूकीत सणसणीत वाजवली आहे
हा दावा चुकीचा आहे. नरसिंह रावांच्या कारकीर्दीत काँग्रेसला मिळणाऱ्या मतांचा टक्का सोनिया गांधींच्या वेळेस घसरला. म्हणूनच सत्तेसाठी काँग्रेसला आघाड्या कराव्या लागल्या.
आ.न.,
-गा.पै.
तोंडात वाजवली तरी बडबड करणे
तोंडात वाजवली तरी बडबड करणे सोडत नाहीतच संघी
मान्य करतील ते संघी कुठले
10-15 वर्षातून एकदा जिंकले तर बेडका सारखे फुगलेत
किरणोत्सर्ग आरंभला.
किरणोत्सर्ग आरंभला.
स्वाहा, १. >> तोंडात वाजवली
स्वाहा,
१.
>> तोंडात वाजवली तरी बडबड करणे सोडत नाहीतच संघी
>> मान्य करतील ते संघी कुठले
यू आर राईट! यालाच आमच्यात चिकाटी म्हणतात. संयम ठेवून मुद्देसूदपणे प्रतिवाद केला की तुमचं माथं सणकतं. म्हणूनच मी मुद्देसूद लिहितो!
२.
>> 10-15 वर्षातून एकदा जिंकले तर बेडका सारखे फुगलेत डोळा मारा
वन्स अगेन, यू आर राईट! आमचा अहंकार कमी असल्याने बेडकाएव्हढंच फुगता येतं आम्हाला!
आ.न.,
-गा.पै.
पैलवान. तुम्ही तुमच्या
पैलवान.
तुम्ही तुमच्या खोडल्या गेलेल्या मुद्द्यांनाच पुन्हापुन्हा कोडगेपणाने रेटत रहाता. ही चिकाटी नाही, चिकटपणा आहे, गोबेल्ससारखा. शिवाय तुमच्या मुद्द्यांत सोयिस्कर खोटारडेपणाही ठासून भरलेला असतो.
तुमच्या 'संयमित मुद्देसुद' प्रतिवादांमुळेच २ वेळा माबोवरून सद्स्यत्व गेले होते का तुमचे?
दोन वेला ? त्यापेक्षा जास
दोन वेला ? त्यापेक्षा जास वेळा असेल
२ खासदार (२ < ४४ नां??)
२ खासदार (२ < ४४ नां??) तेव्हा अडवाणी-वाजपेयींना हिमालयातच पाठवायला हवे होते,
इंटरेस्टिंग लेख! त्यांना परत
इंटरेस्टिंग लेख!
त्यांना परत जा म्हणून म्हंटले आहे त्याच्याशी मी सहमत नाही. तरीही ते वरती अनेकांनी काढलेल्या अर्थाने म्हंटलेले नाही हे उघड आहे. "गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेसचे नेते काय करतात ते बघू", या अर्थानेच आहे असे मलाही वाटले.
पण मुळात सोनिया गांधी अनेक वर्षे राजकारणाबाहेर राहिल्या होत्या. तत्कालिन काँग्रेस नेत्यांनीच त्यांना परत आणले, कारण एकवेळ त्या चालतील पण काहींना केसरी नकोत, काहींना पवार, काहींना अर्जुनसिंग नकोत असले प्रकार होते.
सोनियाजी, स्वतःच्याच धुंदीत वावरणे, दुसरी फळी निर्माण न करणे, गांधी घराण्याच्या वलयापासून मुक्त झाला तरी काँग्रेस बलाढ्य आहे ही भावना कार्यकर्त्यांमध्ये न पोचवणे, स्वतः कोणतेही पद किंवा जबाबदारी न घेणे, वक्तृत्व न सुधारणे, आपलेसे न वाटणे आणि राहुल हे अपत्य ह्या देशाच्या राजकारणावर लादणे! >>> यात दोष जास्त इतर कॉंग्रेस नेत्यांचा आहे व मतदारांचाही. यातील कोणाच्याही हुकमी पाठिंब्याशिवाय हे होउ शकले नसते.
सोनिया गांधींबद्दल मला आदर आहे. रागही आहे - तो अशाकरिता की एवढे अमर्याद अधिकार हाती आलेले असताना सुद्धा पक्ष सुधारण्याचा जेवढा हवा होता तेवढा प्रयत्न केलेला त्यांनी दिसला नाही (१९९५ मधल्या महाराष्ट्र विधानसभेतील निवडणुकीनंतर ठाकर्यांबद्दलही असेच म्हणता येइल).. उलट गेली अनेक वर्षे भ्रष्टाचाराला संरक्षण दिल्याचेच चित्र दिसले. त्यांचे पक्षातील, समाजातील हितसंबंधी मंडळींवर काहीही अवलंबून नव्हते, कारण मतदार त्यांना थेट सपोर्ट करत होते. तरीही त्यांच्या राजवटीत फार काही वेगळे चित्र दिसले नाही.
डोन्ट राईट देम ऑफ सो सून!
डोन्ट राईट देम ऑफ सो सून!
बेफीजी, सोनिया-राहुल पुन्हा बाऊन्स बॅक करु शकतील हो!
म्हणुनच तर. हे सन्घी
म्हणुनच तर. हे सन्घी क्याम्पेन सुरु आहे.
भाजपला मिळालेला. विजयापेक्षा हे यश उद्या गांधी परिवार. पुहा खेचुन गेइल का ही भीती य लोकाना जास्त आहे
बेफिभौनी राहुल , प्रियन्का यानाही देश सोडुन जायचा सल्ला देणं यातही फारसं आस्चर्यकारक काही नाही.
सत्तेचे बालवयीन संभाव्य वारस जंगलात / वनवासात घालवणं आणि त्याला देवानं अढळपद दिलं अशा भाकडकथा पसरवणं ही एका महान धर्माची शिकवणच आहे.
स्वतःच्या देशात राजीवजींची
स्वतःच्या देशात राजीवजींची विधवा म्हणून राहिला असतात तर काय किंमत असती हो तुमची? >>>>>>स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून केव्हा पहायचे. अमुकची बायको....त्या अमुकच्या जिवंत असण्यावर त्या स्त्रीचा मान इ. ...एखादी इंदिरा गांधीसारखी समर्थ स्त्री यापलिकडे जाऊ शकते.
यात दोष जास्त इतर कॉंग्रेस नेत्यांचा आहे व मतदारांचाही. यातील कोणाच्याही हुकमी पाठिंब्याशिवाय हे होउ शकले नसते.>>>+१
सत्तेचे बालवयीन संभाव्य वारस जंगलात / वनवासात घालवणं आणि त्याला देवानं अढळपद दिलं अशा भाकडकथा पसरवणं ही एका महान धर्माची शिकवणच आहे.>>>>>> हो ना! खणलं की माती लागते.या बाबतीत सर्व धर्म समभाव.
हो. पण १०००० वर्शे जाली
हो. पण १०००० वर्शे जाली तरी बेफिभौच्या डोक्यातील उत्तानपादाची बाय्को व कैकेयी अजुन मेली नाही.
सोनियाबैंचे इंग्रजी उच्चर १०. वर्षात कसे बदलणार ?
सोनिया गान्धी यान्ना
सोनिया गान्धी यान्ना राजकारणात येण्याची अजिबातच इच्छा नव्हती. मे १९९१ मधे राजिव गान्धी यान्च्या हत्ये नन्तर अनेक वर्षे राजकारणा पासुन दुर रहाण्याचा आटोकाट प्रयत्न त्या करत होत्या....
कॉन्ग्रेसच्या नेत्यान्चा, जनतेचा दबाव तब्बल १९९७ पर्यन्त थोपवण्यात त्यान्ना यश आले. ९८ मधे त्यान्नी प्रथम अध्यक्षपद स्विकारले. त्यान्नी राजकारणात यावे यासाठी लोकाग्रहाच्या प्रचन्ड रेट्याशी दर दिवशी त्यान्ना सामना करावा लागत होता. तब्बल सहा वर्षे पदाची खुर्ची खुणावत असतानाही त्यान्नी स्वतःला राजकारणापासुन दुर रहाण्याचा सय्यम दाखवला हे नक्कीच वाखाणण्याजोगे आहे.
Pages