दह्यातलं कारलं

Submitted by चिन्नु on 14 October, 2014 - 08:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४-५ मध्यम कारली, १ वाटी दही, धनेपूड, जीरेपूड, तिखट, मीठ, आले-लसून पेस्ट प्रत्येकी एक चमचा, थोडे मोहरीचे तेल, थोडे पाणी, मीठ, ४ मोठे चमचे बेसन (किंवा स्टफींगला लागेल तसे), एक छोटा कांदा, शॅलोफ्रायसाठी तेल, फोडणी वापरत असाल तर. एक दोन हिरव्या मिरच्या व कोथिंबीर भाजीवर पेरायला.

क्रमवार पाककृती: 

एका मिक्सिंग बोलमध्ये दही, तिखट, मीठ (ग्रेव्हीला लागेल तसे अंदाजे), धने पूड, आले-लसूण पेस्ट घाला. हवे असल्यास यात थोडे बेसन घालू शकता. एका पॅनमध्ये चमचाभर मोहरीचे तेल गरम करा. त्यात चिमूट हळद घाला. हे दह्यात घाला. नीट मिक्स करून मिश्रण साधारण १० मिनिटे बाजूला ठेवावे. तोवर कारली स्टफ करून शिजवून घ्या.
त्यासाठी कारली धुवून पुसा व वरील भाग थोडा खरवडून घ्या. ती स्टफ करण्यासाठी मध्ये चिरा. बिया काढून टाका. बिया वापरत असाल तर स्टफिंगमध्ये घाला.
एका पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करा. बारीक चिरलेला कांदा घाला. गुलाबीसर परता. त्यात तिखट मीठ बेसन घाला. खालून लागू न देता मिक्स करून घ्या. मिश्रण रवाळ असले तरी स्टफ केल्यावर नीट बसते कारल्यात. तरी वाटलेच तर थोडे पाणी शिंपडा. आता स्टफिंग कारल्यात भरावे. हवे असल्यास दोरीने बांधा.
पॅनमध्ये थोडे मोहरीचे तेल घ्या. कारली त्यावर शॅलोफ्राय करा. झाकण ठेवून कारली शिजू द्या. जरा मऊसर व्हायला हवीत. ५ ते ७ मिनिटे शिजवा. मधून मधून स्टफिंग ओघळू न देता हलवा.
दुसर्‍या पॅनम्ध्ये मोहरीचे तेल गरम करा. फोडणी ऑप्शनल आहे. तेल गरम झाल्यावर दह्याचे मिश्रण ओता. दही कडसर न होउ देता हात भराभर चालवा. उकळी आली की तीत शिजवलेली कारली सोडा. गॅस सिम वर करून झाकण ठेवून २-३ मिनिटे शिजवा. एका छानश्या बोलमध्ये काढून स्लिट केलेल्या मिरच्या व कोथिंबीर पेरा.

वाढणी/प्रमाण: 
२-३ झणांसाठी अंदाजे
अधिक टिपा: 

तिखट मिठाचे प्रमाण चवीनुसार घ्यावे. दही आंबट असल्यास लज्जत वाढते. दह्याच्या मिश्रणात बेसन नसेल घातले तरी स्टफिंगमध्ये असल्याने चव येते, पण ग्रेव्ही दाट हवी असल्यास बेसन दह्याच्या मिश्रणात घालावे. दोन तीन पॅन्स नसतील किंवा झटपट कामं करता येत नसेल तर लागणारा वेळ वाढू शकतो!

माहितीचा स्रोत: 
टिव्हीवरील कुकरी शो
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोहरीचे तेलाने वेगळा स्वाद येतो. या तेलाच्या इफेक्टसाठी थोडी मोहरी नॉर्मल कूकिंग ऑइलमध्ये भरडून वापरता येते असं ऐकिवात आहे. माझ्या मते एक तर बडीशेप नाहीतर मोहरीतेल वापरावे. कारण दोन्ही डॉमिनंट आहेत.
थँक्स आशु, मी ह्या डीशमध्ये कुठेच फोडणी वापरत नाही.

Mast zaleli bhaji. tumhi photo dila navhata mhanun kashi disayala havi bhaji yachi idea ali nahi. Bahutek ashich disavi -
2015-04-26 14.38.36.jpg

Pages