दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा ! सुका मेवा घ्या !

Submitted by दिनेश. on 14 October, 2014 - 05:10

बघता बघता दिवाळी आली कि तोंडावर. तूम्हा सर्वांना शुभेच्छा आणि वेळेवर पोहोचावा म्हणून देशोदेशीचा सुका मेवा आधीच पाठवतोय..

१) कॅलिफोर्नियाचे बदाम

२) इराणी " अनारदाणा". हा प्रकार मला दुबईला मिळाला. दुकानदाराला नाव विचारले तर त्याने अरबी नाव सांगितले.
चवीला अनारदाण्यासारखाच आहे पण बिया नाहीत. सलादवर टाकल्यास छान दिसतो. चटणी पण छान होते.

३) हॅझलनट्स.. हे फोडून खायचे असतात. आत छोटा नट असतो.

४) हे ब्राझिलनट्स.. अर्थातच ब्राझिलचे. याची चव साधारण सुक्या खोबर्‍यासारखी असते.

५) या आहेत सुकवलेल्या क्रॅनबेरीज. मी न्यू झीलंडवरून आणल्या.

६) अंगोलातले काजू. इथे पोर्तुगीजांनी भरपूर काजूची झाडे लावलीत पण इथल्या लोकांना बिया काढायचे तंत्र नीटसे
अवगत नाही. ( पोर्तुगीजमधे पण "काजू" असाच शब्द आहे. )

७) हे साऊथ आफ्रिकेतून आलेले मकाडामिया. माझ्या सगळ्यात आवडता खाऊ. केनयात हे खुप छान आणि स्वस्त
मिळतात. ( भारतात शेवटी बघितलेला भाव २,४०० रुपये किलो होता )

८) इराणी पिस्ते

९) इराणी शहतूत ( तुतीची फळे ) चवीला फार छान लागतात पण निवडून खावी लागतात.

१०) केनयन चेस्टनटस.. भाजून किंवा उकडून खातात.

११) आक्रोड पण मिळाले काल..

परत एकदा दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी हॅ.न. हे चॉकलेट्समधेच खाल्लेले आहेत. त्यामुळे, हॅ.न. ची मुळ चव कशी असते हे मला मुळीच माहिती नाही.

हो ... काबुलीचण्यासारखे थोडे आकाराने मोठे असतात.

हॅझेल नट्स, तपकिरी चण्यासारखे दिसतात. चवीला बरेचसे ऑईली लागतात. चॉकलेट बरोबर त्याची जोडी छान जमते. आईस्क्रीमसोबत पण Happy

बी, थोड्या प्रमाणात वर्षभर हे नट्स खाता येतात. माझ्या ब्रेकफास्ट मधे असतातच. ( म्हणून तर असतात माझ्याकडे नेहमी. )

हो झंपी, खातानाच तेलकट वाटतात. मी गल्फ मधे होतो त्यावेळी पिस्त्यापेक्षा काजू महाग आणि काजूपेक्षा ब्राझिल नटस महाग अशी परिस्थिती होती. त्यावेळी मकाडामिया तिथे नव्हते. यावेळी ते सर्वात महाग आहेत, असे दिसले.

नटसमधे तेल असतच आणि ह्या तेलामधे ओमेगा ०३ असत ज्यामुळे आपले चांगले कोले. वाढते. म्हणून, नट्स खावेत.

बी, नटस मध्ये तेल असतच हो.. पण हे जरा अती तेलकट आणि जड असतात. खूप खालले तर अ‍ॅसीडिटी ठरलेली(मला तरी).

जड असतात कारण नट्समधे प्रथिने अर्थात प्रोटीन्स खूप असतात. प्रोटीन्स पचायला २४ तास लागतात. म्हणून प्रथिनेयुक्त पदार्थ रात्री खाऊ नयेत. तेलापासून अ‍ॅसिडीटी होऊ नये म्हणून रात्री भिजवत ठेवायचे आणि मग सकाळी खायचे. कोरडेच खाल्ले की दातामधील एनेमल सुद्धा कमी कामी होत जात.

दिनेशजी महागड्या खाऊ बद्दल धन्यवाद.:फिदी: तुम्हाला पण दिवाळीच्या शुभेच्छा.:स्मित:

का हो जर्दाळु विसरलात का? किमान ओले जर्दाळु ( अ‍ॅप्रिकॉट्स ) तरी द्यायचे.

ते हाजलु बाजलु ( हॅजलनट्स )मला अजीबात आवडत नाहीत, मी ते बाजूला काढुन चॉकलेट्स खात होते.

रश्मी, जर्दाळू, आक्रोड, अंजीर इथे कधीमधीच असतात. घरून आणलेले संपले ( फोटो काढायला पण शिल्लक नाहीत Happy )

मानुषी, एकदा खाऊन खात्री करा. पुण्याला कदाचित मोठ्या दुकानात मिळतील.

मस्त दिसतोय मेवा, दिनेशदा.

तुती सुकवलेली अगदी पहिल्यांदाच पाहतेय.

दिनेशदा.... माकडमिया पहिल्यांदाच ऐकतेय... बघतेय... चाखता आले असते.. .. चार दिवसाधी शुभेच्छा दिल्या असत्या तर.... कालच लेक ऑस्ट्रेलियाहून परतली... असो! मेवा आवडला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

मस्त! सगळे आवडते dry fruits! तुम्हालादेखील दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिनेशदा!

मस्त. पिस्ता फोटो आवडला. जांभळा रंग गोड दिसतो आहे.
आता ह्या सगळ्याचा वापर तुम्ही कुकिंग मधे कसा करता ते पण लिहा Happy
कॉस्ट्कोच्या मिक्स नट्सच्या डब्यात ह्यातील बरेचसे असतात. अनार दाना ड्राय फ्रुट म्हणुन खाल्ला नाहीये कधी. तुतीची फळ पण नवीन प्रकार दिसतो आहे माझ्यासाठी. पाइन नट्स नाही टाकलेत का? खुप महाग असतात इतर नट्स पेक्ष्या (इथे तरी) पण पेस्टो सौस मस्त लागतो पास्त्यामधे.

आदिती, पाइननट्स नाही मिळत इथे अंगोलात. ( हे सगळे नट्स आता घरी आहेत म्हणूनच फोटो काढता आले. )
पाककृतीत वापर Happy
अनारदाणा नाही तो, वेगळेच काहीतरी आहे. पण छान लागते. काल मी मटार पुलाव केला होता त्यात वापरले.
छान दिसले आणि चवही छान आली.

बी, माकडमियाच म्हणतात मायबोलीवर Happy

माकडमियाचे कौतुक बास.>>>रिया, मी पण खाल्लेत. Happy

माझी एक इराणी मैत्रिण इराणी अनारदाना घालून मस्त सॅफ्रॉन पोटॅटो राईस बनवायची.

बी, माकडमियाच म्हणतात मायबोलीवर

हो,, माकडांनी खायचे ते माकडमिया. पण नावात काय आहे? मी खाल्लेत माकडमिया भरपुर.. आता परत आणा पुढच्या वेळेस.. मागच्या वेळेस मॅकेडॅमिया केक करेन करेन म्हणुन शेवटी ते असेच खाउन संपले, केक काही बनला नाही.. Happy

सगळे फोटो आवडले. वाळकी तुती कशी लागेल कल्पना करवत नाही. फोटोवरुन तरी मला खाविशी वाटली नाही. बाकी सगळे मेवे मात्र लगेच उचलावेसे वाटले.

साधना,
यावेळेस फक्त मकाडामियाच आणेन..
सुकवलेली तुती आंबट गोड नाही तर नुसती गोड लागते. देठ मात्र काढावे लागतात. गल्फ मधे अमाप लागतात त्या.
सुकल्यावरही रंग राहिला असता तर !!!

ह्यातले फक्त काजू, बदाम आणि पिस्ते महिती आहेत... बाकी पहिल्यांदाच बघितले!!
दा, तुम्हालाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!! Happy

हा.. मस्त रे दिनेश.. तोंपासू....

मला काजू सोडून सर्वच्यासर्व नट्स आवडतात..

अक्रोड आणी ,'पेकन्स' मिस्सिंग आहेत तुझ्या लिस्टीत Happy

अरे हो खरंच की.. आक्रोड दिसलेच नव्हते आधी..

मला पेकन नट्स खूप आवडतात.. पण भारतात दिसले नाहीत कधी.. हेझलनट्स ,चीन मधे थंडीच्या दिवसात ठेले भरभरून विकायला असतात, उकडलेले, भाजलेले ..अमाप खाल्लेत... Happy

Pages