अमेरीकन expats

Submitted by BS on 13 October, 2014 - 11:08

मायबोलीवर कोणी american expats आहेत का? तुम्ही कुठल्या देशात राहताय सद्ध्या आणि तुमचा अनुभव ईथे लिहू शकाल का? Online शेकडो blogs आहेत तसे पण देशी american perspective वाचायला आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय ताई, तूम्ही माझी आठवण काढलीत, म्हणून विचारपूस करून आलो.
हे नाव ( आधीचे काय्होते ? Happy ) काय ओळखीचे वाटले नाही, म्हणून लेखनात डोकावलो.

साडेसहा वर्षात एकच बीबी. आँ... आजकालच्या आयड्या बघा, आठवड्याला ५ बीबी उघडून ठेवतात.

आणि काय हो, हे म्हणजे जरा अतिच झालं नै. इकडे शेकड्याने अम्रिकन पडीक असतात आणि एकानेही तूम्हाला प्रतिसाद देऊ नये. शो. ना. हो.

मी काय अमेरिकन नाय, कधी होईन याची शक्यतापण नाय.. नायतर मी दिला असता हो प्रतिसाद.

मला नाही, पण तूम्हाला आहे तर ओळख ठेवा हो.

दिनेशदा "शो. ना. हो." अगदी पुलं आठवले. भ्रमण मंडळ आणि गोडी बटाटीचा रस्सा. पु लं माझे आवडते व्यक्तिमत्व ......... तुमच्या पाककृती आणि प्रवास वर्णने अगदी नेहमी वाचते, तुमचे आधीचे काही हलके फुलके प्रतिसाद वाचून वाटत आहे कि तुम्हाला नक्की जमेल एखादा गमतीशीर लेख लिहावयास.

आभार अनन्या. पुर्वी मी लिहायचो तसे... आता सगळेच धागे गमतीशीर वाटतात.. त्यापेक्षा "हटके" काय लिहिणार !

माबोवर american expats फारसे नसावेत. मन्स्मी हा एकमेव मला माहित आहे (त्याने सुरू केलेल्या अशाच तर्‍हेच्या बाफावरून). त्यातही जन्माने अमेरिकन असलेल्या expat बद्दल बोलत असाल तर असे कोणी इथे सापडणे कठीण आहे.

अमेरीकन expats --> मी जी चौकशी करत होते ते म्हणजे अमेरीकन citizens/GC holders ज्यान्च्या अमेरीकन based companiesनी २-३ र्वषाच्या assignments साठी त्याना ईतर देशात पाठवले आहे.

दिनेश --> तुम्ही मागीतलेली link तुमच्या विपूत दीलीये.

तुम्हाला नक्की काय माहिती हवीय , कारण इतरांचा अनुभव तुम्हाला लागु होईलच असं नाही. माहिती हवी असेल तर कदाचीत मिळवुन देऊ शकेन.

श्री -- अशी particular काही माहीती नको आहे. माहीतीसाठी Online शेकडो blogs आहेत तसे पण कोणाचा स्वताचा देशी american perspective वाचायला आवडेल. पण असामीनी लिहील्याप्रमाणे माबोवर american expats फारसे नसावेत. तो धागा वाचून मन्स्मीनी भारतात कायमच्या गेल्या अस वाटल, assignment वर नाही.

माझे काही मित्र एक्सपॅट आहेत.
ऑईल कंपन्यांमधे एक्सपॅट बर्‍यापैकी असतात. सर्वसाधारण नियम असा असतो, की तुम्ही ज्या देशाचे नागरीक आहात, आणी ज्या देशात नोकरी मिळालीय त्या दोन देशांत एक्सपॅट सहसा मिळत नाही. उदा. मी भारतीय अन मला इथे अमेरिकेत हायर केलं म्हणून मला भारत अन अमेरिका या दोन देशात एक्सपॅट मिळणार नाही. त्यानुसार अमेरिकेत अमेरिकन सिटीझन एक्सपॅटवर असणं अवघड असेल.
मधे शेल सारख्या कंपन्यांना बरीच गरज होती म्हणून त्यांनी इथल्या भारतियांना भारतात एक्सपॅट देणं चालू केलं होतं. थोडक्यात गरज असेल तर देउ शकतात.
एक्सपॅट मधे सहसा हाउसिंग, कार, मुलांसाठी इंटरनॅशनल स्कूलमधे अ‍ॅडमिशन आणी फीज, आणी बाकी काही अलाउंसेस मिळतात. आणी बेस सॅलरी होम कंट्री/हायर कंट्री मधे चालू रहाते. घर आणि कार असल्यामुळे अलाउंसमधेच सगळं रहाणं निघत सहसा, आणी बेस सॅलरी सगळी सेव होते.
ऑईल कंपन्यांमधे सहसा एका देशात ३ वर्षांसाठी पाठवतात. त्यानंतर रिस्क अशी की ३ वर्षांनंतर कोणत्या देशात जावं लागेल सांगता येत नाही. फार डिमांड करता येत नाहीत त्यावेळी.
घर एकदम चांगल्या एरीयात असते. उदा. ब्राझीलमधे कोपाकबॅना बीच पासून चालत १० मिनीटांच्या अंतरावर, किंवा पॅरीसमधे आयफेल टॉवर पासून अगदी जवळ इ. (ही दोन्ही उदाहरणे माझ्या जवळच्या मित्रांची)

माझ्या ऑफिसातुन एक पंजाबी जोडपे, नवर्‍याला अशी ऑफर आली म्हणुन दिल्लीला २ वर्षांसाठी गेलेत. बायकोने तिथल्या ऑफिसमधे जॉब ऑफर असुन २ वर्ष जॉब न करायचा निर्णय घेतला. एथलं घर रेंट्वर दिलयं. २ मुली, ३ आणि ५ वर्ष ह्यांना भारतीय संस्कृती कळेल म्हणुन निर्णय घेतला. जाताना खुप एक्सायटेड होते. बोलणं झाल्यास काय म्हणतात ते कळवेन.

कंट्रीजप्रमाणे बेस सॅलरी प्लस ठरावीक % ज्यास्त सॅलरी पण मिळते , प्लस ९०~ ९६ हजार टॅक्स फ्री सॅलरी मिळ्ते. ( किती दिवस बाहेर राहिलात त्या प्रमाणात) .
कंपनीचे स्वत:चे रेंट्ल कॉलनीज असतात किंवा तुम्हाला स्वतः घर निवडण्याची पण मुभा असते. फ्री एज्युकेशन , गुड्स अँड सर्व्हिसेस इत्यादी इत्यादी.

करेक्ट श्री!

प्रत्येक देशासाठी coefficient factor असतो १.२, १.५ वगैरे. त्या त्या देशात बेस सॅलरी ला त्याने गुणून तितकी मिळते. आफ्रिकन देशांमधे बराच जास्त असतो हा फॅक्टर. तसेच काही देशांमधे वेगवेगळ्या शहरांमधे वेगवेगळा असतो.

तसेच एका देशातून दुसर्‍या देशात मूव होताना सगळं सामान मूव करायचं पॅकेज पण चांगलं असतं.

मंदार + १ त्यांना इथलीच सॅलरी मिळणार आहे. >>>> usually depending upon the country base salary ला uplift असत. e.g Afghanistan मधे ३-५ पट आपला US पगार असतो.
भारतात आणि तत्स्म देशात hardship allowance असतो, तर Europe मधे higher cost of living चा allowance असतो.

मंदार बरोबर आहे तुझ, मला पॅकेजची कल्पना आहे. थोड्याफार फरकाने सगळीकडे साधारण सेम पॅकेज असते. T &C मधे taxes चा clause डोळ्यात तेल घालून चेक करायला लागतो.

ईथे कोणी अमेरीकन expats असतील तर त्यान्चे स्वताचे अनुभव वाचायला आवडले असते. एखाद्या देशात काय आवडले ... नाही जमले ईत्यादी.

शक्यतो सेम लिव्हिंग स्टँडर्ड असणार्‍या देशांमध्ये अपलिफ्ट मिळत नाही , त्यातल्या समाधान एकच की तुम्हाला डबल टॅक्सेशनला तोंड द्यावं लागत नाही , दिलं तरी कंपनी भरपाई करते.
युरोप किंवा ऑस्ट्रेलियाला गेलात तर सेम अमेरिकेत मिळते तशी वागणुक मिळेलच ह्याची काही खात्री नाही. ( अर्थात हे खुप जनरलाइज्ड विधान आहे पण काही जणांच्या अनुभवानुसार हे बर्‍याच ठिकाणी पाहायला मिळतं. )