महाराष्ट्र राज्या पासून विदर्भ वेगळे राज्या होणे खरच गरजेचे आहे का ?

Submitted by जय@ on 13 October, 2014 - 06:33

महाराष्ट्र राज्या पासून विदर्भ वेगळे राज्या होणे खरच गरजेचे आहे का ? ह्याने विदर्भ वासियांचे प्रश्न सुटतील का ? महाराष्ट्रातील नाकर्ते राज्यकर्त्यान मुळे आजतागायत विदर्भाचा अपेक्षित विकास झाला नाही. अखंड महाराष्ट्र राहून हि विदर्भाच विकास होऊ शकेल ना ..... मात्र तोडून तुकडा करणे हा काही त्यावरील उपाय नाही.
विदर्भातील नेते मंडळी आपल्या राजकीय फायद्या साठी वेगळ्या विदर्भाची मागणी तर नाही ना करत ?
मायबोलीवर असंख्य विदर्भ वासी आहेत. आपणास काय वाटते ?
( चर्चा खेळी मेळीची व्हावी उगाच कुणी महाराष्ट्र X विदर्भ असा वाद घालू नये )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी विदर्भातला आहे आणि बर्‍याच गावी देशी फिरलो आहे. महाराष्ट्रात कुठलेही राज्य घ्या सामान्य माणसांच्या समस्या मला तरी सारख्याच वाटतात. अमुक एक शहर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे तर अमुक खूप घाण आहे असे दिसत नाही. अमुक शहराला मुबलक पाणी आणि वीज पुरवठा आहे आणि अमुक शहराला नाही असेही दिसत नाही. अमुक शहरात रोजगार चांगला आहे आणि अमुक शहरात नाही असे नाही. रस्ते, वस्त्या, सांडपाण्याचे नाले ह्यांची समस्या सर्व शहरात सारखीच आहे. अमुक शहरात जास्त गरीब आणि अमुक शहरात धन्याड लोक असेही चित्र दिसत नाही. महाराष्ट्रात जे चार महानगर आहेत नागपुर, मुंबई, पुणे आणि औरंगाबद्द ह्यात आधीपासूनच मुंबई आणि पुणे ही शहरे पुढे आहेत आणि एकूणच भारतात ही दोन शहरे पुढे आहेत. पण इतर जिल्हे आणि त्यांची परस्पर आर्थिक सामाजिक स्थिती ह्यात फार फरक नाही. मग कशाला ही विभागणी नक्की? अशी विभागणी करुन लोकांच्या भावना दुखतील. ही फाळणी पुर्वीही झालीही आहे. अजून फाळणीचे प्रश्न मिटलेले नाही. परत तोच इतिहास निर्माण होणार असेल तर ही विभागणी न झालेलीच बरी.

मी म्हणतो हरकत काय आहे....घ्या एकदाचा वेगळा विदर्भ आणि मोकळे व्हा....
असाही महाराष्ट्र क्रिकेट संघटना, मुंबई आणि विदर्भ या वेगवेगळ्या आहेत.
आणि जरी ही दोन वेगळी राज्ये झाली तरी त्यांच्यात काय महाराष्ट्र कर्नाटक किंवा महाराष्ट्र गुजरात सारखे वाद होणार नाहीत.
मग दोन मराठी भाषिक राज्ये झाली तर चांगलेच आहे ना. चंद्रपूर, गडचिरोलीमधल्या लोकांना त्यांच्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी पार मुंबईपर्यंत यावे लागते. ते नागपूरातल्या नागपूरात संपुष्टात येतील.
नेत्यांचा फायदा म्हणालात तर ते असाही करून घेणार आणि तसाही...

चंद्रपूर, गडचिरोलीमधल्या लोकांना त्यांच्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी पार मुंबईपर्यंत यावे लागते. ते नागपूरातल्या नागपूरात संपुष्टात येतील.
>>>>

हे महाराष्ट्राचे तुकडे न करता शक्य नाही का?

<<दोन वेगळी राज्ये झाली तरी त्यांच्यात काय महाराष्ट्र कर्नाटक किंवा महाराष्ट्र गुजरात सारखे वाद होणार नाहीत. >>

वाद का होणार नाहीत ?

वाद का होणार नाहीत ?
>>
वाद नक्कीच होणार!
जिथे सामाईक सीमा आली तिथे वाद आलेतच.
वेगळे झालेल्यांमध्ये किंबहुना जास्त होतात.

याच धर्तीवर नाशिकपासुन कोल्हापूर पर्यंत व मुंबई ठाणे बकाल पट्टा वगळता कोकणासहित पश्चिम महाराष्ट्र हे वेगळे राज्य का करु नये?
नाशिक पुणे कोल्हापुरसारखी केंद्रं ,शेतीचा झालेला विकास, कोकणात पर्यटन खाणी फळबाग विकासाचे असलेले पोटेंशियल. यामुळे एक अग्रेसर राज्य म्हणुन हे पुढे येईल.
मुंबई ठाणे पट्ट्यात वाढणारी बकाल परप्रांतिय लोकसंख्या, २००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेत या बकाल भागातली वाढलेली आमदारांची संख्या,त्यांचा राज्याच्या राजकारणात वाढलेला दबदबा याचा तोटा पश्चिम महाराष्ट्राला होईल, त्यापेक्षा वेगळा पश्चिम महाराष्ट्र काय वाईट आहे.

त्यासाठी खालील तीन गोष्टी कराव्या लागतील.

१) मुंबईतून् राजधानी हलवून औरंगाबादला महाराष्ट्राची राजधानी बनविणे.
२) पश्चीम महाराष्ट्रात जेवढी धरणं आहेत तेवढी धरंणं विदर्भात बांधणे.
३) साखरकारखाणे उभे करुन उसाची शेती हा नवा व्यवसाय विदर्भाला उलब्ध करुन देणे.

या तीन गोष्टी केल्या की विदर्भाची मागणी थंडावेल.

अरे है कोई तय्यार....!!!

वेगळॅ राज्य केले तर तिथे मुख्यमंत्र्यासकट एक नविन टिम तयार होईल आणि त्यांच्यासाठी एक नवे खादाडीचे शेत तयार होईल. याव्यतिरिक्त अजुन काही फायदा असल्यास तो केवळ पेपरावर न राहता प्रत्यक्षात उतरेल याची काळजी कोण घेणार?

रच्याकने, याआधी निर्माण झालेली छत्तिसगढ, झारखंड, उत्तरांचल इत्यादी राज्ये त्यांच्या मुळ राज्याच्या तुलनेतील प्रगतीच्या पायरीवर कुठे आहेत? यांचे विभाजन व्हायचे एक कारण खुंटलेली प्रगती हेच होते बहुतेक. तेलंगणा खुपच नवे आहे.

विदर्भ नक्कीच वेगळे करावे.

मुंबै चे पण स्वतंत्र राज्य करावे.

शिवसेने ला कळत नाहीये, मुंबै चे राज्य झाले तर महानगरपालिके पेक्षा कीतीतरी जास्त सत्ता हातात येइल.

मोदींनी सर्व माहीती घेतली असेलच आणि त्यांनी विदर्भातील लोकांचे दुख त्यांच्या अडचणी समजुन घेतल्या आहेत आणि नक्कीच या निवडणुकी नंतर विदर्भासंदर्भात स्पष्ट भुमीका मांडतील

वेगळ्या देशवरून आठवले, मग काश्मीर किंवा/आणि इशान्येपुर्वेकडची राज्ये जी भारताच्या राजवटीत असंतुष्ट (?) आहेत. त्यांनाही भारतापासून वेगळा देश करायची कल्पना कशी वाटते.

(तळटीप - परवाचे इलेक्शन ऊरकेपर्यंत जाणकार या धाग्यावर आपली प्रामाणिक मते मांडण्याची शक्यता कमी वाटल्याने थोडासा टाईमपास करतोय इतकेच Happy )

अवांतर - वेगळ्या विदर्भावर मायबोलीवर याआधी एकही धागा नव्हता का?

वेगळा विदर्भ कसला विदर्भचा विकास होणार......... या राजकारण्याने पैसे खायला अजून एक राज्य मिळणार .... कसले स्वार्थी राजकारणी आहेत.. स्वतःच्या तुम्बड्या भरण्यासाठी महाराष्ट्राचे तु़कडे करायला निघालेत........ ज्या १०६ लोकानी सन्युक्त महाराष्ट्साठी आपले प्राण वेचले त्यान्चा धड्धडीत अपमान आहे हा....इतक्या शेलक्या शिव्या तोन्डात येत आहेत पण इथे देउ शकत नाही............:(

मी मुंबईकर असल्याने मला केंद्रशासित मुंबईच्या मुद्द्यावरही लोकांची मते जाणून घ्यायला आवडतील.
फक्त मी आधीच बदनाम असल्याने धागा काढायला धजावत नाहीये. कोणीतरी काढा किंवा इथे सोबत त्याचीही चर्चा करा.

सुम, अगदी अगदी, काही गरज नाहीये वेगळे होण्याची.
तिकडच्या नेत्यांमधे कोणीतरी एकतरी धडाडीचा नेता असता तर आत्तापर्यंत चांगला विकास करवून घेऊ शकला असता. पश्चिम महाराष्ट्राचा विकास होण्याचे कारण इकडचे नेते पहिल्यापासुन जबरदस्त होते.

स्वतःच्या स्वार्थासाठी महाराष्ट्राचे तुकडे करू पाह्णारर्यानो. ...आणि वेगळा विदर्भ करू पाहणारयानो...................

आम्ही कुठही नेउ देणार नाही महाराष्ट् माझा ..........:)

काँग्रेसचे नेते जबरदस्त होते असा अर्थ निघतोय महेशभाऊ. कारण पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचेच वर्चस्व होते.

काँग्रेसचे नेते जबरदस्त होते असा अर्थ निघतोय महेशभाऊ.>>>>>>>>>. अहो महाराष्ट्तले सगळे national highway वाजपेयीच्या काळात झाले होते.........

१. वेगळा विदर्भ या मुद्द्यावर भावनिक न होता विचार करावा.
२. अस्मिता वगैरे गप्पा पुरे. मुम्बई प्रगत , पश्चिम महाराष्ट्र सधन , आणि विदर्भ/ कोकण मागसलेला ,हा असमतोल मुख्यतः राष्ट्रवादी / काँग्रेस च्या राजवटीमुळे निर्माण झालाय .
३. शिवसेना / मनसे नेत्याना मुंबई बाहेरच्या जगाची पुरती जाण नसल्याने असेल किंवा राजकीय स्वार्थापोटी असेल, ते विदर्भाचा मुद्दा भावनिक बनवून भाजप ला टार्गेट करत आहेत .
४. वेगळा विदर्भ झाल्यास त्या भागाच्या विकासाला चालना मिळेल ,असे मला प्रामाणिकपणे ( कोकणी असूनही ) वाटते ...

शिवसेना / मनसे नेत्याना मुंबई बाहेरच्या जगाची पुरती जाण नसल्याने असेल किंवा राजकीय स्वार्थापोटी असेल, ते विदर्भाचा मुद्दा भावनिक बनवून भाजप ला टार्गेट करत आहेत .>>>>>>>>>>. ईथे तिघही स्वतःच्या फायद्याचे राजकारण करत आहेत....... ति़कडे सरकार कुणाचही येउदे पण महाराष्ट्राचे तुकडे होउ नये.... इतका विकासाचा विचार असेल तर अखन्ड महाराष्ट्राचाच करा ना मग........तुकडे केल्याशिवाय जमल तर ते तुमच कौशल्य.... नाहितर सगळ स्वार्थासाठीच आहे.......

एका रिसर्च लेखामधुन (२००४ चा आहे. पण मला वाटते की % जास्त बदलले नसेल)

१> Mumbai here is defined as the metropolitan region comprising Mumbai
district (Greater Mumbai), and the urbanized part of Thane and Raigard
districts, inhabited by 22 million people, with a GDP of 130,000 Rs crores (30
billion US$). It represents about 22% of the population of the State and 2.2% of
the population of India, but 37% of the GDP of the State.

२> For the Sales tax, we do have an
estimate of what is collected in Mumbai metropolitan area: 74% of what is
collected in the entire State. Assumption is based on The numbers are 14,939 Rs cr for MMR and 20,288 Rs cr for the State ; they refer to the Sales tax plus some other taxes such as a
professional tax, but the ratio can be assumed to be valid for the sole sales tax.

37% राज्याचे उत्त्पन्न आणि ७४% कर जर Greater मुम्बईतुन येत असल्यास विदर्भ वगळा मागण्यात दम नाही. वगळा झाल्यावर राज्य चालवणारअकसे? पैसा कुठुन आणनार?

धिरज, होय कॉन्ग्रेसचे नेते यशवंतराव, शरद पवार, आदी लोकांनी महाराष्ट्राचा विकास नक्कीच केला सुरूवातीच्या काळात. यशवंतरावांप्रमाणे शरद पवार हे सर्वसमावेशक, पुर्ण राज्याचा विकास करून घेऊ शकतील असे नेतृत्व होते, पण त्यांनी तसे पुर्णपणे केले नाही, का ते सांगण्याएवढा माझा अभ्यास नाही.

ज्यांनी विकास केला त्यांनी तो केला म्हणण्याएवढा दिलदारपणा माझ्याकडे नक्कीच आहे.

पुर्ण महाराष्ट्राचे चित्र पाहिले तर जास्त विकास हा पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, आदी भागातच दिसतो.

दुर्दैवाने विदर्भ, कोकण आणि खानदेशात कोणीही नाव घेण्यासारखे नेतृत्व अद्याप पर्यंत दिसले नाही.
खरेतर विदर्भाचा मुख्यमंत्री देखील झाला होता (सुधाकरराव नाईक) पण त्यांच्या ३ वर्षांच्या काळात काही भरीव कामे झाली असल्याचे ऐकिवात नाही, असल्यास सांगा, तेवढीच माहितीत भर.

निदान आत्तापर्यंत विदर्भात होऊन गेलेले, असलेले नेते, आणि त्यांनी विदर्भाच्या विकासासाठी केलेली, करून घेतलेली कामे यावर तरी चर्चा व्हावी. मगच कळू शकेल की खरेच वेगळ्या राज्याची गरज आहे की नाही.

विदर्भ वगळा मागण्यात दम नाही. वगळा झाल्यावर राज्य चालवणारअकसे? पैसा कुठुन आणनार?
>>
त्या तिथे पलिकडे याच मुद्द्यावर वाद चालू आहे.विदर्भात लोखंड , कोळसा आहे, विदर्भाची वीज जी प. महाराष्ट्र आयतोबासारखी वापरतो आहे ती विदर्भाची विदर्भाला राहील. विदर्भात जंगल सम्पत्ती जिचे प. महाराष्ट्र शोषण करीत आहे मुबलक आहे. शिवाय विदर्भाचे १५ वर्षे मुख्यमंत्री होते त्यानी उर्वरित महाराष्ट्राचे हित पाहिले. स्वतंत्र विदर्भ झाल्यास तिथल्या मुमं ला झक मारून विदर्भाचेच हित पहायला लागेल. विदर्भ प्रचंड समृद्ध आहे पण त्याचा फायदा उर्वरित महाराष्ट्र घेतोआहे. सबब स्वतंत्र विदर्भ झालापाहिन्जे . विदर्भापासून उर्वरित महाराष्ट्राला मुक्ती मिळालीच पाहिजे.....

आजपर्यंत राज्यात पश्चिम महाराष्ट्राची सत्ता होती कारण राज्यातले ८२ टक्के विधानसभा मतदारसंघ ग्रामीण भागातले होते. २००९च्या मतदारसंघ पुनर्रचनेत शहरी मतदारसंघ ४५टक्के झालेत ,यातले बरेच मतदारसंघ मुंबई ठाणे पट्ट्यातले असल्याने सध्या त्या भागातले आमदार ४० वरुन ८५ झाले आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रावर खापर फोडायचे कारण उरलेले नाही, उद्या मुंबई ठाणे वगैरे पट्ट्यातले नेते पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करतात अशी ओरड किंवा या भागातल्या परप्रांतिय नेत्यांविषयीची ओरड पश्चिम महाराष्ट्रातच सुरु होईल, त्यापेक्षा राज्याचे चार तुकडे करावेत व गुण्यागोविंदाने रहावे.

वेगळा विदर्भ या मुद्द्यावर भावनिक न होता विचार करावा हे १००% खरे आहे मात्र हा विचार विदर्भ वासियांनी केला पाहिजे. विदर्भ राज्य वेगळे होऊन फक्त विदर्भातील नेत्याचाच त्यात फायदा आहे ना तर कुणा सामान्य जनतेचा......

वेगळा विदर्भ ही रिडिक्युलस कल्पना आहे. त्याला लोकांचा शून्य पाठिंबा आहे (हवेत बोलत नाही आमचे शेजारी तिथलेच, अनेक मित्र तिथलेच, त्यांच्याशी बोलूनच बोलतोय) आणि बहुतेककरुन राजकीय नेत्यांची हौस आहे.

याच न्यायाने प्रत्येक जिल्हा वेगळं राज्य होईल. Rofl

वेगळं राष्ट्र आणि वेगळा जिल्हापण करावा असे सांगणाऱ्याचे जामच हसू येत आहे...
अरे किमान फरकही काही नाही का यात....आवरा रे...
असेही अखंड महाराष्ट्र अखंड महाराष्ट्र म्हणून नाचणाऱ्यांना विदर्भातल्या स्थानिक प्रश्नांची किती जाण आहे. असेही महाराष्ट्राच्या नेत्यांना दिल्लीत कुणी विचारत देखील नाही. विदर्भाच्या तर त्याहून नाही.
ही राज्ये वेगळी झाल्यामुळे राजकाऱण्याची पोळी भाजली जाईल त्यामुळे ही राज्ये व्हावीच अशी माझी इच्छा आहे....
आणि त्याचबरोबर मुंबई ही केंद्रशासित म्हणून जाहीर व्हावी....

< अखंड महाराष्ट्र अखंड महाराष्ट्र म्हणून नाचणाऱ्यांना विदर्भातल्या स्थानिक प्रश्नांची किती जाण आहे >
विदर्भ वेगळा झाल्याने हे प्रश्न सुटतील हा तुमचा भाबडा आशावाद आहे. आणि असे अनेक प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. विदर्भाचा विकास होण्यासाठी राजकीय इच्छा शक्ती हवी हो.........विदर्भ वेगळे राज्य करणे हा काही त्यावरील उपाय नव्हे.

एक काम करा मग लगे हाथ गोव्यालाही महाराष्ट्रात घ्या ... गोव्यासह कोकण वेगळे राज्य करा... अरे काय चालूय धाग्यावर

विदर्भ वेगळा झाल्याने हे प्रश्न सुटतील हा तुमचा भाबडा आशावाद आहे.

माझा कसलाही आशावाद नाही....भाबडा तर मुळीच नाही. माझे म्हणणे आहे की देशात एकमेव मराठी राज्य आहे ती दोन होतील तर हरकत काय आहे.
काय वाटणी करायची ती करून टाका आणि मोकळे व्हा....

बेळगावचा प्रश्न वेगळा आहे....तिथल्या मराठी जनतेवर कानडीची सक्ती होते. प्रशासकिय कागदपत्रेही कानडीमध्येच असतात. असा काही प्रश्न नागपूरात होणार आहे का...हा आता ते म्हणजे वैदर्भिय हिंदी हिच आमची राज्यभाषा तर कदाचित...अन्यथा होईना का प्रशासकिय सोयीसाठी दोन राज्ये....

कोण किती पाण्यात आहे ते कळून येईलच..
जोशी - तुम्हाला कोथरूडमध्ये हवाय का सिंहगड....घेऊन टाका....

विदर्भातून मुंबईत एक पिढी आधी आलेले व स्थिरावलेले कितीतरी लोक मुंबईत आहेत. खरोखरच हा लढा प्रांतिक आहे की आहेरे नाहीरे गटातला ? आणि तो आहेरे नाहीरे स्वरूपाचा असल्यास चांगले सक्षम नेतृत्व , धोरणांचा पाठपुरावा यातून अनुशेष भरला जाणार नाही का?

मी तिथल्या अनेक लोकांशी बोललोय. त्यांचेही हेच म्हणणे आहे की हे सगळे अतिमहत्वाकांक्षी राजकीय नेत्यांच्या डोक्यातले किडे आहेत. लोकांचा शून्य पाठींबा असताना कशाला उगाच प्रशासकीय सोयीच्या नावाखाली वेगळं राज्य? टोटली रिडिक्युलस.

अहो जोशी काका किती लोकांशी बोललाय असे....फक्त नागपूरचीच लोकसंख्या ३० लाखाच्या आसपास आहे...असे सांगताय जसे काय सगळा सर्व्ह् करून आलाय...
अजून गडचिरोली, चंद्रपूर यासारखे मागासलेले जिल्हे आहेतच.

आशुचँप,
कृपया आयडी आहे तेच नाव उल्लेखावे. काका, मामा म्हणण्याची परवानगी मी तरी कुणाला दिल्याचे मला स्मरत नाही. धन्यवाद.

Pages