महाराष्ट्र राज्या पासून विदर्भ वेगळे राज्या होणे खरच गरजेचे आहे का ?

Submitted by जय@ on 13 October, 2014 - 06:33

महाराष्ट्र राज्या पासून विदर्भ वेगळे राज्या होणे खरच गरजेचे आहे का ? ह्याने विदर्भ वासियांचे प्रश्न सुटतील का ? महाराष्ट्रातील नाकर्ते राज्यकर्त्यान मुळे आजतागायत विदर्भाचा अपेक्षित विकास झाला नाही. अखंड महाराष्ट्र राहून हि विदर्भाच विकास होऊ शकेल ना ..... मात्र तोडून तुकडा करणे हा काही त्यावरील उपाय नाही.
विदर्भातील नेते मंडळी आपल्या राजकीय फायद्या साठी वेगळ्या विदर्भाची मागणी तर नाही ना करत ?
मायबोलीवर असंख्य विदर्भ वासी आहेत. आपणास काय वाटते ?
( चर्चा खेळी मेळीची व्हावी उगाच कुणी महाराष्ट्र X विदर्भ असा वाद घालू नये )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून गडचिरोली, चंद्रपूर यासारखे मागासलेले जिल्हे आहेतच.
>>

घ्या Proud म्हणूनच म्हणालो होतो प्रय्तेक जिल्हा मागणी करु लागेल वेगळं राज्य पायजेल हाय. जौद्या Lol

माझ्या वरच्या एकातरी वाक्यात मी तिथल्या लोकांशी बोललोय, तिथल्या लोकांचे हे मत आहे असा किमान उल्लेख तरी दिसला का....मी माझे स्वतंत्र मत मांडले की अाहे मागणी तर होऊ द्या वेगळे राज्य....

तुम्हीच केव्हापासून बोंबलताय मी तिथल्या अनेकांशी बोललोय...लोकांचा शू्न्य पाठिंबा आहे वगैरे....
म्हणलं तुमचा भोंगळपणा तुम्हालाच विचारावा किती आहे तो

- आशुचँप म्ह्णजेच आशीश फडणिस्स यांनी असांसदीय व असभ्य भाषा वापरून वैयक्तिक प्रतिसादांना सुरवात केल्याने इथले अनेक प्रतिसाद संपादित करत आहे -

अजून गडचिरोली, चंद्रपूर यासारखे मागासलेले जिल्हे आहेतच. >>
अरे याच न्यायाने जरा सोलापूर ,सांगलीचा दुष्काळी भाग पण बघा .
फक्त कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र नाहीये . Sad

- आशुचँप म्ह्णजेच आशीश फडणिस्स यांनी असांसदीय व असभ्य भाषा वापरून वैयक्तिक प्रतिसादांना सुरवात केल्याने इथले अनेक प्रतिसाद संपादित करत आहे -

तुमच्यात वृत्तपत्रे वाचत नाहीत का हो...
थोडे कष्ट घ्या आणि वाचा गेली कित्येक वर्षे वेगळा विदर्भ हवा म्हणून बोंबाबोंब चाललीये ती काय कोथरूडमधले लोक जाऊन करतायत का....तिथलीच लोकं आहेत ना.
तुमचा भोंगळपणा अशासाठी की मोजून नागपूरातल्या दहा एक लोकांशी बोलून तुम्ही ठरवले की तिथल्या लोकांचा शून्य पाठिंबा आहे म्हणून....ग्रो अप

- आशुचँप म्ह्णजेच आशीश फडणिस्स यांनी असांसदीय व असभ्य भाषा वापरून वैयक्तिक प्रतिसादांना सुरवात केल्याने इथले अनेक प्रतिसाद संपादित करत आहे -

हाहाहहा....नेहमीची यशस्वी पळनीती अवलंबणारच तर....
वाटच पाहत होतो कधी हे वाक्य येतेय हे...
मी अपेक्षा करत होतो मी मला काम आहे...पण यावेळी जरा व्हरायटी आहे....
उत्तम चांगली प्रगती आहे...

- आशुचँप म्ह्णजेच आशीश फडणिस्स यांनी असांसदीय व असभ्य भाषा वापरून वैयक्तिक प्रतिसादांना सुरवात केल्याने इथले अनेक प्रतिसाद संपादित करत आहे -

माझे म्हणणे आहे की देशात एकमेव मराठी राज्य आहे ती दोन होतील तर हरकत काय आहे.
काय वाटणी करायची ती करून टाका आणि मोकळे व्हा....

आशुचँप , इतके सोप्पे असते का हो वेगळे होणे. साधी एक एकर जमीन नसते पण दोन भाऊ वेगळे होताना किती वाद होतात. आयुष्यभराच्या जखमा होतात आणि तुम्हीतर मनात आले म्हणून महाराष्ट्र राज्य वेगळे करावयास निघालात. कोणते ठोस कारण तर हवे वेगळे होण्यासाठी......

जय मनात आले म्हणून नाही. असेही तुमच्या आमच्या मनाला विचारते कोण. गेली कित्येक वर्षे वेगळ्या विदर्भाची मागणी होत आहे. मान्य आहे की त्यात राजकिय लोकांचाही मोठा हात असेल. पण कायमची ठसठसणारी जखम असेल तर कुरवाळत बसण्यापेक्षा कापून काढणे श्रेयस्कर नाही का.
(आता कृपया या वाक्याचा धागा काश्मिर प्रश्नाशी जोडू नये...).
माझे एवढेच म्हणणे आहे की जर वेगळे राज्य झाल्यामुळे प्रशासकिय यंत्रणेला वेग येण्याची शक्यता असेल तर केवळ भावनिक मुद्दा बाजूला ठेवावा.

लोकसंख्या वाढत जाईल तसे नवीन प्रांत रचावे लागतील.

मुंबै पुण्यातील लोक विरोध करणारच . कारण नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी ते इतर महाराष्ट्रावर अवलंबुन तर आहेतच.

पण उलटपक्षी यांच्याच कडे पैसा जास्त असल्याने ते त्याम्च्यावर तोराही मिरवु शकतातच.

जरा सोलापूर ,सांगलीचा दुष्काळी भाग पण बघा .>> ह्यात सातारा देखील अ‍ॅड करा. हायवेच्या अल्याड आणि पल्याड अशी सरळसोट विभागणी केली तरी बराच फरक आहे पावसाच्या बाबतीत.

- आशुचँप म्ह्णजेच आशीश फडणिस्स यांनी असांसदीय व असभ्य भाषा वापरून वैयक्तिक प्रतिसादांना सुरवात केल्याने इथले अनेक प्रतिसाद संपादित करत आहे -

विदर्भातल्या आळशी आणि बिनकामाच्या लोकांपासुन पुण्यातल्या कामसु हुशार लोकांना मुक्ती मिळालीच पाहीजे.

अरे तुम्ही गेला होतात ना इथल्या असभ्य प्रतिसादांना उत्तर द्यायचे नाही म्हणून....:)

असो, हे असले बागुलबुवे उभे करण्यातच अशा लोकांचा जन्म गेला आहे. आता हे झाले आहे उद्या प्रत्येक जिल्हा वेगळा व्हावा म्हणून मागणी होईल...अरे हे आत्तापासूनच का ठरवताय....वेगळे राज्य व्हायलाही काहीतरी क्रायटेरिया असतो का नाही. का सगळे कात्री घेऊनच बसलेत...अरे मागणी झाली का द्या त्यांना....

आणि झालाच सर्वाधिक राज्यांचा देश तर काय फरक पडणार आहे. सगळी राज्ये अखंड राहीली तरी विकास होणार याची गॅरंटी आहे का...तसे असते तर मग गेल्या ६० वर्षात किती झाला विकास...

वेगळ्या विदर्भाची मागणी माझ्या अल्पवाचनानुसार १९९२ पासून किंवा त्या आसपासची आहे. इतक्या वर्षांत अन्य कुठल्या भागाने केलीये का मागणी वेगळे व्हायचे म्हणून....

हे म्हणजे भाऊ म्हणाला वेगळे होतो की म्हणायचे अरे याला काय अर्थ आहे उद्या आई वेगळे होतो म्हणेल परवा वडील...कैच्याकै

- आशुचँप म्ह्णजेच आशीश फडणिस्स यांनी असांसदीय व असभ्य भाषा वापरून वैयक्तिक प्रतिसादांना सुरवात केल्याने इथले अनेक प्रतिसाद संपादित करत आहे -

नाही नाही तुमच्या बाबतीत गोड काही असण्याची काही शक्यता नाहीचे. इथे येणार नाही म्हणता म्हणता येताय म्हणून विचारले.
असो, यात काही नविन नाहीच म्हणा

- आशुचँप म्ह्णजेच आशीश फडणिस्स यांनी असांसदीय व असभ्य भाषा वापरून वैयक्तिक प्रतिसादांना सुरवात केल्याने इथले अनेक प्रतिसाद संपादित करत आहे -

बाकी गोष्टी लिहायची काय गरज होती? त्याचा इथे काय संबंध? वैयक्तिक हिशेब चुकते करायचे असतील तर ती ही जागा नव्हे.

आवराच आता....मी कधी कुठल्या बाकीच्या गोष्टी काढल्या. मी इथल्या माबोच्याच वावराबद्दल बोलत होतो. मी जातो मी जातो म्हणत परत येता ही तुमची सवय सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यात आता माझा कसला डोंबल वैयक्तिक हिशेब....

माझा आणि तुमचा कसलाही हिशेब बाकी नाही.

- आशुचँप म्ह्णजेच आशीश फडणिस्स यांनी असांसदीय व असभ्य भाषा वापरून वैयक्तिक प्रतिसादांना सुरवात केल्याने इथले अनेक प्रतिसाद संपादित करत आहे -

कोकणस्थ | 14 October, 2014 - 15:36 नवीन
हो रे बाबा जाऊन ये. नीट बघून ये.

नाही तर अर्धवट पत्रकार तुझ्या आधी जाऊन आले तर तुमचा जिल्हा वेगळं राज्य करा अशी मागणी करतील इथे येऊन. फिदीफिदी हाहा खो खो

हे असले आचरट लिहीलेत तरीही नाही...
कळले का जोशी

- आशुचँप म्ह्णजेच आशीश फडणिस्स यांनी असांसदीय व असभ्य भाषा वापरून वैयक्तिक प्रतिसादांना सुरवात केल्याने इथले अनेक प्रतिसाद संपादित करत आहे -

अहो मंदार जोशी....
मला खात्री होतीच की इथला राग तुम्ही तुमच्या पानावर जाऊन ओकणार म्हणून...
म्हणलं जरा चेक करावं..तर अजिबात निराशा केली नाहीत माझी.

म्हणून म्हणलं ना नेहमीचंच आहे....काहीही फरक नाही....

- आशुचँप म्ह्णजेच आशीश फडणिस्स यांनी असांसदीय व असभ्य भाषा वापरून वैयक्तिक प्रतिसादांना सुरवात केल्याने इथले अनेक प्रतिसाद संपादित करत आहे -

जिप्स्या...डायव्हर्ट करतोयस का मला...:)
तुझा धागा आल्याबरोबरच पाहिला होता. पण तुझा राग आला कारणाने काही लिहीले नाही.

आशिष फडणीस असे नाव आहे ते...

मळमळतयं कोणाला आणि ओकतयं कोण हे आता पुराव्यानिशी दिलं की....अजून काय पाहिजे....

- आशुचँप म्ह्णजेच आशीश फडणिस्स यांनी असांसदीय व असभ्य भाषा वापरून वैयक्तिक प्रतिसादांना सुरवात केल्याने इथले अनेक प्रतिसाद संपादित करत आहे -

राज्याची विभागणी ही नक्की कशावर झालेली आहे पुर्वी?

माझ्यामते, राज्ये झालीत त्याला मुख्य कारण भाषा आणि एकच भाषा असलेल्या लोकांची संस्कृती होती. ह्यात काही जिल्यात दोन मुख्य भाषा होत्या. जसे की धारवाडला मराठी आणि कानडी ह्या दोन्ही भाषा बोलल्या जातात. पण हा भाग कर्नाटकाला दिला गेला. नागपुरात हिन्दी जास्त प्रचलित आहे. पण असे असूनही नागपुर महाराष्ट्रात आला. पुर्वी नागपुर मध्यप्रदेशाची राजधानी होती.

विदर्भाची बोलीभाषा मराठी आहे. त्यामुळे विदर्भाला महाराष्ट्रापासून वेगळा करु नका.

- आशुचँप म्ह्णजेच आशीश फडणिस्स यांनी असांसदीय व असभ्य भाषा वापरून वैयक्तिक प्रतिसादांना सुरवात केल्याने इथले अनेक प्रतिसाद संपादित करत आहे -

विदर्भ ..विदर्भ ! स्वतंत्र विदर्भाबद्दल बोला ! उर्वरित महाराष्ट्राला विदर्भापासून मुक्ती मिळालीच पाहिजे... स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे. विदर्भाचा स्वहस्ते विकास झालाच पाहिजे....

इतर मंडळी, काही सदस्यांच्या विनंतीवरुन या धाग्यावर यापुढे पोष्टी टाकणे बंद करत आहे. इतरांचा रसभंग झाल्या असल्यास माझ्यापुरती दिलगिरी व्यक्त करुन मी सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.

धन्यवाद जोशी...आता हे लक्षात ठेवा म्हणजे झालं...

कोकणस्थ , धन्यच वाद नाहीतरी तुम्ही तसे काही मीनींगफुल कॉन्ट्रिब्युशन करीत नव्हताच

Rofl Rofl

आम्हास वाटले महाराजांनी सरसेनापती रॉबीनहूड यांसी 'खलिता धाडूनही समयासी का न पोहोचलास' असा जाब पुसून चाकरीतून बेदखल केले असेल, तर येथील चित्र आगळेच!

दरम्यान, कोकणातील पोर्तुगीजांनी स्त्रीरूप धारण करून नव्याने सुरू केलेला कत्लेआम पाहून स्वतंत्र कोकण किनारा आंदोलनाचा धागा आहे की काय असे वाटले.

वेगळा विदर्भ मागणार्‍यांना व त्यास विरोध करणार्‍यांना, अश्या दोघांनाही आमचा पूर्ण पाठिंबा! ह्याचे कारण असे की दोन्हीपैकी काहीही झाले तरी आम्हास यत्किंचितही फरक पडत नाही.

कळावे

गं सं

माझी जी काय अल्प माहीती आहे त्या नुसार...नागपूर ही बेरार प्रॉव्हिनन्सची राजधानी होती. आणि पाण्याचा प्रश्न वगळता कमालीचा सधन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला आहे. पण तरीही विकासाच्या नावाने बोंब...याला स्थानिक नेतृत्व जितके कारणीभूत होते तितकेच उर्वरित महाराष्ट्राचेही.

दिवाळीच्या काळात नागपूरला पुण्या मुंबईवरून जाणारी संख्या (माझ्या एका नागपूरकर मित्राच्या नुसार हा आकडा ५-६ लाखांच्या घरात जातो) प्रचंड आहे. हे सगळे केवळ पुण्या मुंबईच्या लखलखाटाला भुलुन आले नसावेत. पद्धतशीर विकास झाला असता तर हे कदाचित घडले नसते.

नागपूराच्या मातीत तीन गोष्टी मिळतात. खनिजे, अरेरावी आणि 'मी मरेन पण तुला विधवा बनवेन' ही वृत्ती!

ह्यापैकी खनिजे डोक्यावरच्या रायपूर, बिलासपूरात आणि डावीकडच्या आंध्रात अधिक! नागपूरला नुसत्याच खाणींच्या कचेर्‍यांची रेलचेल अधिक! खाण एकच!

अरेरावी करून काहीच मिळत नाही हे समजलेले असूनही अरेरावी सोडवत नाही.

तसेच, दुसर्‍याचे नुकसान व्हावे म्हणून वाटेल ती किंमत सोसायला तयार होण्याने सगळाच कुटाणा होतो हे कळूनही ती वृत्ती सोडवत नाही. मागासलेल्या छत्तीसगड आणि ओरिसाचे आशीर्वाद आणि आदर्श पाठीशी व समोर (अनुक्रमे) आहेत.

त्यामुळे वेगळा विदर्भ ही स्वतुंबडी भरण्यास सहाय्यकारक मोहीम ह्यात शंका नोहे.

पण मग तेच सगळीकडे चालू आहेच.

मग वेगळा विदर्भ झाला काय किंवा नाही झाला काय?

कळावे

गं सं

वेगळ्या विदर्भामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना वेगळे पॅकेज देता येणे शक्य होईल असेही वाटते आहे<<<

किती मौलीक विचार आहे! एखादा कुटील, सत्तापिपासू नेता असता तर म्हणाला असता आम्ही आत्महत्या थांबवू! पण सत्शील, विचारी नेते पॅकेज देऊ करतात.

आता आत्महत्या करा आणि आधीपेक्षा वेगळे पॅकेज मिळवा

कळावे

गं सं

नागपुर म्हणजे फक्त विदर्भ ही व्याख्या चुकीची आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपुर, वर्धा, चंद्रपुर, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गढचिरोली असे एकूण ११ जिल्हे आहेत विदर्भात.

ज्यांना विदर्भ वेगळा झाला किंवा नाही झाला काही फरक पडत नाही अशा लोकांना आपली अस्मिता ठावूक नाही.

पॅकेज हे आत्महत्या थांबवण्यासाठी...आत्महत्या केल्यानंतरची भरपाई म्हणून नव्हे...

असेही या आत्महत्या होण्यामागची कारणे अनंत आहेत. विदर्भात आधीही कोरडवाहू शेती होतीच. तेव्हा आत्महत्या होत नव्हत्या. गेल्या काही वर्षातच त्या वाढण्याचे कारण काय आहे.
त्यामुळेच असे वाटत आहे की वेगळा विदर्भ होऊन त्यांना मदत होत असेल तर वेगळा विदर्भ व्हावाच.

ज्यांना विदर्भ वेगळा झाला किंवा नाही झाला काही फरक पडत नाही अशा लोकांना आपली अस्मिता ठावूक नाही.<<<

ज्यांना आपल्या नावाच्या स्पेलिंगमधील पहिल्या अक्षरापुढची अक्षरेही आठवत नाहीत त्यांनी अस्मितेबद्दल बोलावे?

वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडाच आहे, आणि केंद्रशासित मुंबई हा देखील डाव आहे हे आता लपून राहीले नाही.

तर ज्यांना महाराष्ट्राचे तुकडे होऊ नये असे मनापासून वाटत असेल त्यांनी भाजपाला मत द्यावे का?

विदर्भातल्या आळशी आणि बिनकामाच्या लोकांपासुन पुण्यातल्या कामसु हुशार लोकांना मुक्ती मिळालीच पाहीजे.

खरेतर आमच्या रत्नाग्री चे वेगळे राज्य झाले पाहीजे. आणि पुण्याचे पण वेगळे करा.

Pages