महाराष्ट्र राज्या पासून विदर्भ वेगळे राज्या होणे खरच गरजेचे आहे का ?

Submitted by जय@ on 13 October, 2014 - 06:33

महाराष्ट्र राज्या पासून विदर्भ वेगळे राज्या होणे खरच गरजेचे आहे का ? ह्याने विदर्भ वासियांचे प्रश्न सुटतील का ? महाराष्ट्रातील नाकर्ते राज्यकर्त्यान मुळे आजतागायत विदर्भाचा अपेक्षित विकास झाला नाही. अखंड महाराष्ट्र राहून हि विदर्भाच विकास होऊ शकेल ना ..... मात्र तोडून तुकडा करणे हा काही त्यावरील उपाय नाही.
विदर्भातील नेते मंडळी आपल्या राजकीय फायद्या साठी वेगळ्या विदर्भाची मागणी तर नाही ना करत ?
मायबोलीवर असंख्य विदर्भ वासी आहेत. आपणास काय वाटते ?
( चर्चा खेळी मेळीची व्हावी उगाच कुणी महाराष्ट्र X विदर्भ असा वाद घालू नये )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋ, विदर्भात राहणारे लोक उन्हाळ्यात आपला दिनक्रम बदतलात. सकाळी कामाला लागायचे. लवकर जेवायचे. दुपारी निवांत झोपायचे. पाचला परत कामे सुरु. पाण्याचा कुलर, डोक्यावर उपरणे, ताटीचा मंडप, वाळ्याचे पाणी, टरबुज हे अगदी आपसूक घरी आणल्या जाते.

उन्हाळ्यात किती रसाळ फळे येतात.

इचलकरंजीत माझ्या माहीती नुसार चादरी बनवितात... कापड नाही. >> चादरी सोलापुरात. इचलकरंजीत कापड गिरण्या आहेत. मी दिलेली माहिती इचलकरंजीतील कापड गिरणी मालकाकडूनच मिळाली आहे Happy

या राजकारण्याना गोन्धळ निर्माण करायला काहीतरी कारण हव असत. . सगळ सुरळीत चालली असल की याना जेवण जात नसणार बहुदा. ........ मग काहितरी अशी पुडी सोडून द्यायची....मग वातावरण तापल की मग त्यावर स्वतःच्या पोळ्या , भाकर्या..अख्खा स्वयम्पाक करून घ्यायचा.....मग जेवण जात याना...............जो problem आहे तो सोड्वायचा नाही..... (उदा. ... रस्तातले खड्डे....... टोलनाके,, प्यायचे पाणी, भारनियमन........ आणि बरेच काही.... ) नवीन problem निर्माण करायचा.....कारण सगळे problem सोड्वले तर त्यावर वाढ्वून मागून पैसे कसे खाता येणार........

Pages