मिरचीचा ठेचा

Submitted by शलाका पाटील on 13 October, 2014 - 02:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य:
१५ हिरव्या मिरच्या,
६ ते ७ लसणीच्या पाकळ्या
१ टिस्पून जिरे
१/२ टिस्पून तेल
मिठ

क्रमवार पाककृती: 

कृती:
१) मिरच्यांची डेखं काढून घ्यावीत, लसूण सोलून घ्यावीत. पॅन गरम करण्यास ठेवावा. १/२ टिस्पून तेल गरम करावे त्यात १ टीस्पून जिरे, मिरच्या आणि लसूण घालून मंद आचेवर साधारण ५ मिनीटे झाकण ठेवून वाफ काढावी.
२) गार झाले कि मिठ घालून खलबत्त्यात कुटून घ्यावे.
३) हा ठेचा भाकरीबरोबर छान लागतो.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

शलाका छान.

मी शेंगदाणे भाजून घ्यायचे. मिरच्या तव्यावर थोड्याश्या तेलावर भाजायच्या त्यातच लसुण, कोथिंबीर घालायची. मग हे सगळ थंड करून त्यावर मिठ टाकून खलबत्यात कुटायचे. आवडत असल्यास त्यावर थोडे कच्चे तेलही टाकतात. भाकरीबरोबर अफलातून लागतो हा ठेचा. त्यात ज्वारीची भाकरी असेल तर भन्नाट.

मागे अमेय यांनीही अशाच टाईपच्या ठेच्याची कृती दिली होती. त्याप्रमाणे मी करुन पाहिला होता. मस्त लागतो एकदम.