मिर्ची का सालन....

Submitted by सायु on 13 October, 2014 - 02:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हिरव्या मिरच्या १२ - १५ (भावनगरी मिर्ची हवी, ती नसेल तर जाड मिर्ची चालेल पण लवंगी नको)
कांदा = १ मोठा
तीळ = २ चहाचे चमचे (चहाचे)
(डेसिकेटेड कोकोनट) नारळाचा कीस = ४ चमचे (चहाचे)
कलोंजी = १ चमचा ( चहाचा)
चिंचेच कोळं = १ छोटी वाटी
क्रीम/ साय = एक वाटी
धणे पुड = २ चमचे (चहाचे)
तेल - ४ चमचे (चाहाचे)
मिठ + साखर चवी नुसार

क्रमवार पाककृती: 

तर सगळ्यात आधी, हिरव्या मिर्च्यांना मधो मध चीरा देवुन त़ळुन घ्या (देठा सकट),
कांदा बारीक चीरुन १/२ च. तेलात गुलाबी रंगावर परतवुन मिक्सर मधुन पेस्ट करुन घ्या..
तीळ आणि खोबर्‍याचा कीस कढईत अरत परत करुन घ्या तातच कलोंजी पण घाला, हे पण मिक्सर मधुन गिरवुन घ्या..

आता कढईत २, ३ चमचे तेल घाला, गरम झाले की त्यात कांद्याची पेस्ट घाला, परतली की तीळ, खोबरं, कलोंजी ची पावडर घाला, धणे पुड घाला, क्रीम घाला निट परतवुन घ्या... चिंचेच कोळ घाला,मीठ साखर घाला.... थोड पाणी घाला साधारण १/२ वाटी उकळी आली की त्यात त़़ळलेल्या मिर्च्या घाला. ५ मि. गॉस बंद करा... सालन तय्यर....

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४ जण
अधिक टिपा: 

कोणाला जेवायला बोलवणार असाल तर,,, पनीरची भाजी/ भुर्जी. परठे , जीरा राईस , दाल तडका, पापड, फ्रुट सलाद आणि सोबत मिर्ची का सालन नी अजुन जेवणाची लज्जत वाढवा... (कालच आमच्या कडे हा मेनु होता..)

माहितीचा स्रोत: 
एका ३तारका होटल चा शेफ.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ms.jpgms1.jpg

हा प्रकार व्हाईट ग्रेव्हीत करायचा आसतो, मी चुकुन ति़खट घातले होते त्यामुळे रंग लाल आलय... पण चवीला
अप्रतिम झाला होता..:)

धन्यवाद नरेश.. मिरच्या शॉलो फ्राय करायच्या...

अमा... आम्ही पहिल्यांदा जीथे याची चव घेतली होती, ती आंबट गोड तिखट अशी होती, त्या शेफ कडुन मी प्रमाण पण लिहुन घेतले होते... कदाचीत काही ठीकाणी क्रीम नसतीलही वापरत...

कूणी घाऊकमध्ये सगळी वाटणं घाटणं करून देणार असेल तर करायला हरकत नाही Wink बरेच दिवस ही रेसिपी शोधणार होते.आता सगळी खलबतं कळली Happy

वरचा दिनेशदांचा फोटो मस्त आहे..तुमची पण पाकृ टाका की...आम्हाला काय तेवढीच व्हरायटी... Happy

दाण्याचा कूट आणि मगज पेस्ट पण घालतात ना? म्हणजे हैद्राबादी मिर्ची सालन मध्ये पाहीलेलं. छान तेल सुटलं पाहीजे. अमा, मीपण क्रीम नाही पाहीलं इकडच्या मिर्ची सालनमध्ये. ही वेगळी वरायटी असावी.
सायलीतै, तोंपासु पाकृ आणि फोटो Happy

वेका, मी नेटवर बघूनच केली होती.. मिरच्या अगदी छान ( म्हणजे काकडीएवढ्याच तिखट Happy ) मिळाल्या होत्या.
वरून लाल तिखट घातलंय.

टीना केलत पण, छान. धन्यवाद.... Happy पुढच्या वेळेस फोटो टाकायला विसरु नका!
मंजुडी पा.कृ शेयर केल्या बद्द्ल धन्यवाद..

मस्तच.

अगदी सालनाच्या मिरच्या मिळाल्यात, वीकान्ताला करून बघणार बिर्याणीसोबत.
छान पाकृ, लाल रंगाने गोंधळात पडलो, मग खुलासा वाचला Happy

आम्ही मिर्चीचं पंचामृत म्हणतो याला फक्त कांदा नसतो आणि सगळ समप्रमाणात मिर्ची, तीळ, दाणेकुट, खोबर, चिंचगुळ Happy

रेसिपी चांगली आहे या प्रकारेपण करुन बघता येइल.

मस्त फोटो आहेत सर्वांचेच अगदि तोपांसु . मी पण एका शो मधे काजु ,मगज पेस्ट आणि क्रीम टाकुन केलेले मिरची सालन पाहीले आहे.पण त्यात चिंच नव्हती . तुमच्या पध्द्तीने करुन पाहीन रेसिपी Happy

आज मुहूर्त सापडला करुन बघायला.

क्रीम घालावंसं वाटत नव्हतं, वाह शेफच्या व्हिडीओवर फेटलेल्या दह्याचा ऑप्शन मिळाला. टॅमॅरिन्ड राईससोबत छान लागलं.

mirchi ka salan.jpg