डॉ. प्रकाश बाबा आमटे ह्या चित्रपटाबद्दल दोन शब्द...

Submitted by किश्या on 12 October, 2014 - 11:34

आत्ताच मी डॉ. प्रकाश बाबा आमटे हा चित्रपट पाहुन आलो. मी काही फार मोठा परीक्षक नाही पण जे वाटलं ज्या भावना चित्रपट पाहताना जाणवल्या त्या फक्त लिहतो आहे.

खरं तर आपल्याला सगळ्यांनाच बाबा आमटें बद्दल माहीती आहे पण वैयक्तीक मला डॉ. प्रकाश यांच्या बद्दल काहीच माहीती नव्हतं, ह्या चित्रपटामुळे खरच त्यांचा जिवनाचा पट उलगडुन दाखवला. काही बाबी सोडल्या तर चित्रपट खरचं खुप खुप सुंदर आहे. चित्रपटाची मांडणी सुंदर आहे. त्यांच्या जिवानाची एक एक कळी खुप अलगद उलगडुन दाखवली आहे.

चित्रपट पाहताना कधी तरी मनामधे विचार येऊन जातो कि, खरच त्यांनी किती कष्ट, किती व्यातना झाल्या असतील त्यांना आदिवासी लोकांनसाठी काम करताना. आपल्याला ते कष्ट आणि त्या यातना टॉकीज मधे बसुन जाणवनार नाहीच. नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी खरचं खुप छान अभिनय केला आहे.

चित्रपट चालु झाल्यापासुन तो खिळवुन ठेवायला यशस्वी होतो. चित्रपट कधीच कधीच बोर होत नाही.
सगळ्यांनी अवश्य बघावा आणि तो ही टॉकीज मधे जाऊनच बघा.

कोणी जर बघुन आला असेल तर त्याची मत मला जाणुन घ्यायला आवडेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

+१

>> एक चित्रपट/कलाकृती म्हणून तो किती चांगला आहे हे स्वतंत्रपणे ठरवताच येणार नाही इतकी मूळ कथा (म्हणजे त्यांच्या जीवनातील घटना) जबरदस्त आहे

+१ नाना पाटेकर चं काम फारच छान झालं आहे ..

>> पत्रकार लोकं भेटायला जातात तेंव्हा नदीच्या पाण्यात योगा करणारे डॉ. डुबकी मारुन बाहेर पडतात व दोन सेकंदाच्या अंतरानी अगदी त्यांच्यापासून पाच सहा फूट मागे पाण्यातून बाहेर येणारा वाघ काय सीन आहे तो

आमच्या स्क्रीनींग मध्ये मागे वाघ बाहेर येताना दाखवलाच नाही .. :|

खरोखर! उत्तम चित्रपट
नाना पाटेकर या कुटुन्बाला खुप खुप वर्शापासून ओळखत असल्याने त्यात अजुनच सहजता आली आहे,सोनाली च कामही आवडल.

आमच्या स्क्रीनींग मध्ये मागे वाघ बाहेर येताना दाखवलाच नाही .. :| >>> मलाही आश्चर्य वाटत होते की मी नीट लक्ष दिले नाही की काय. का कट केले माहीत नाही Happy

प्रकाशवाटा / नेगल इ. वाचून, जवळच्या मित्राकडून त्याबद्दल ऐकून, प्रकाश/ विकास/ मंदाताई आमटे यांच्या मुलाखती/ मनोगत/ ऑर्केस्ट्रा बघून, त्यांच्या कार्याबद्दल, तळमळी/ ध्यासाबद्दल नितांत आदर आणि मनात हेमलकसाबद्दल एक प्रतिमा तयार झालेली. चित्रपटातून दाखवलेला प्रवास आणि घडणाऱ्या घटना इ. घडत राहतात, चित्रपट उलगडत जातो, पण सम्हाऊ नाना/ डॉ. मोहन आगाशे हेच दिसत राहतात. नाना, 'प्रकाश आमट्यांची' भूमिका करतोय हे वारंवार जाणवतं. पटकथा/ संवाद बदलले असते exactly काय केलं असतं तर मला जास्त आवडलं असतं यावर विचार करतोय. मी थिएटर मध्ये नाही पहिला याचाही परिणाम असेल, किंवा माझ्या अपेक्षा काही वेगळ्याच असतील. एक चित्रपटम्हणून मी खिळून बसेन असं वाटलेलं पण दुर्दैवाने झालं नाही. Sad
अर्थात सर्वांनी त्याचं कार्य समजण्यासाठी नक्कीच बघावा.

माझे उलटे झाले अमित - मोहन आगाशे हे मोहन आगाशेच वाटले (बरेच तिरंगाछाप चित्रपट पाहिल्याने मधेच हे दोघे काहीतरी जंगी हिन्दी डॉयलॉग मारतील असे वाटले), पण नाना पूर्ण भूमिकेत शिरलाय असे मला वाटले. त्यामानाने सोनाली कायम अभिनय करते आहे असेच वाटले.

नानाच्या कारकीर्दीतील अनेक लोकप्रिय रोल्स हे आक्रमक, अ‍ॅरोगंट वाटू शकणारी व्यक्तिरेखा - कोणाचे ऐकून घेणार नाही-टाईप असे आहेत. अगदी जुने मराठी चित्रपट - नागिण वगैरे, अंकुश, क्रांतिवीर, तिरंगा पासून अब तक छप्पन पर्यंत. त्यामानाने नंतर त्याने देऊळ व या चित्रपटात एकदम सगळे बदलले आहे असे वाटते.

नाना भूमिकेत शिरलेला होता, पण त्याच्यात (मला) आमटे नाही दिसले. Happy नीट लिहिता नाही आलंय मला. अभिनयापेक्षा पटकथा/ दिग्दर्शन/ संवाद/ स्टोरी टेलिंग मांडणी याचा दोष वाटला. उदा. बाहेर उघड्यावर बसलेल्या पोरांना थंडी वाजतेय ते बघून आमटे म्हणतात की 'मला इतके कपडे घालायचा काय अधिकार' हे आणखी मस्त दाखवता आलं असतं.
चिरफाड करायचा हेतू नाही तसं होतंय असं वाटत असेल तर उडवतो.

फा , सशल + १
वाघोबा मलाही दिसला नाही , वाटलं असं कसं सुटल नजरेतून Happy
नाना पाटेकर इतर अनेक चित्रपटात अ‍ॅक्टींग करतोय वाटत असेल पण यात अजिबात नाही , केवळ उच्च .. स्पिचलेस एव्हडीच प्रतिक्रिया माझी !
सोनाली कुलकर्णी आवडली मला नेहेमी प्रमाणे , मला तिची डॉयलॉग डिलिव्हरी- उच्चार इतके प्रचंड आवडतात , ऐकत रहावं असं मराठी !
एकदाच काय ते उन्हात बसलेल्या सीन मधे केसांच्या ब्राउन हायलाइट्स डोकवल्या तेवढं फक्तं खटकलं , बाकी इतकं परफेक्शन असताना , ते ही विक्रम गायकवाड असताना !

लहान मुलांना न्यायला हरकत नाही , त्या सर्जरीज च्या सीन्स ला मी पण डोळे मिटून घेतले !

घेऊन जाता येईल लहान मुलांना पण ते सिनेमात रमतील याची guarantee नाही! जर गेलात तर प्लीज कॉर्नरच्या सीट्स घ्या! आमच्या रांगेत मध्यभागी बसलेले एक जोडपे आपल्या मुलांना घेऊन आले होते आणि त्यांना सारखे बाहेर जावे लागले (किमान ५-६ वेळा)!
सिनेमा चांगला आहे पण खूप ग्रेट नाही. म्हणजे याहून खूप उच्च बनवता आला असता. अर्थात ज्यांना प्रकाश आमटे यांच्या कार्याबद्दल काहीच माहिती नाही त्यांना कसा वाटला हे पाहिलं पाहिजे.
अभिनयापेक्षा पटकथा/ दिग्दर्शन/ संवाद/ स्टोरी टेलिंग मांडणी याचा दोष वाटला.>>+१ खूपchoppy आहे!
सो.कु. बद्दल माझ्या अपेक्षा फारच कमी होत्या त्या मानाने तिने चांगलं काम केलं आहे.
इथे वाचल्यावर पेटलं की आमच्या प्रिंट मध्ये देखील वाघोबा गायब होते!

अरे वा अजुनही हा चित्रपट लोक पहात आहेत आणि प्रतीक्रिया देत आहेत हे पाहुन आनंद वाटला..
मराठी चित्रपटांना आता खरेच चांगले दिवस येतं आहेत.. आणि मुळात आता खुप सुंदर चित्रपट येत आहेत हे महत्वाचं

एक झलक बघा एक अप्रतीम चित्रपट येत आहे
बाजी.......

https://www.youtube.com/watch?v=PGmX5NyHVt4

Pages