डॉ. प्रकाश बाबा आमटे ह्या चित्रपटाबद्दल दोन शब्द...

Submitted by किश्या on 12 October, 2014 - 11:34

आत्ताच मी डॉ. प्रकाश बाबा आमटे हा चित्रपट पाहुन आलो. मी काही फार मोठा परीक्षक नाही पण जे वाटलं ज्या भावना चित्रपट पाहताना जाणवल्या त्या फक्त लिहतो आहे.

खरं तर आपल्याला सगळ्यांनाच बाबा आमटें बद्दल माहीती आहे पण वैयक्तीक मला डॉ. प्रकाश यांच्या बद्दल काहीच माहीती नव्हतं, ह्या चित्रपटामुळे खरच त्यांचा जिवनाचा पट उलगडुन दाखवला. काही बाबी सोडल्या तर चित्रपट खरचं खुप खुप सुंदर आहे. चित्रपटाची मांडणी सुंदर आहे. त्यांच्या जिवानाची एक एक कळी खुप अलगद उलगडुन दाखवली आहे.

चित्रपट पाहताना कधी तरी मनामधे विचार येऊन जातो कि, खरच त्यांनी किती कष्ट, किती व्यातना झाल्या असतील त्यांना आदिवासी लोकांनसाठी काम करताना. आपल्याला ते कष्ट आणि त्या यातना टॉकीज मधे बसुन जाणवनार नाहीच. नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी खरचं खुप छान अभिनय केला आहे.

चित्रपट चालु झाल्यापासुन तो खिळवुन ठेवायला यशस्वी होतो. चित्रपट कधीच कधीच बोर होत नाही.
सगळ्यांनी अवश्य बघावा आणि तो ही टॉकीज मधे जाऊनच बघा.

कोणी जर बघुन आला असेल तर त्याची मत मला जाणुन घ्यायला आवडेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मि पाहिला हा चित्रपट
प्रतेकाने नक्कि पहावा असा आहे

मी पाहिला ,खुप आवडला महत्वाचं म्हणजे थेटर एकदम फुल्ल होते.काही प्रसंग डोळयात पाणी आणतात. सर्वांचा अभिनय छान आहे आणि हो शेवट खासकरुन नावे आल्यावरही लगेच ऊठु नका.सगळ्यांनी जरुर बघा.

अतिशय सुंदर! आतापर्यंत जे काही पाहिलं होते किंवा माहित होतं ते तुकड्या तुकड्यात होते, या चित्रपटातून ते बर्यापैकी सलग मांडलेला प्रवास आहे, कालच सकुसप पाहिला , सगळ्यांन्नाच खूप आवड्ला.. नक्की पहावा अस सुचवेल!

चित्रपट चांगला असेल तर प्रश्नच नाही.. पण डॉक्युमेंटरी सारखा बनवला असला तरी नक्की बघणार !

पण डॉक्युमेंटरी सारखा बनवला असला तरी नक्की बघणार !>>>
ॠन्मेश हे खरयं तो मुव्ही डॉक्युमेंटरी सारखा वाटतो पण सगळे प्रसंग पाहताना तो डॉक्युमेंटरी सारखा आहे हे विसरुन जातो

काल पाहिला.
पत्रकार लोकं भेटायला जातात तेंव्हा नदीच्या पाण्यात योगा करणारे डॉ. डुबकी मारुन बाहेर पडतात व दोन सेकंदाच्या अंतरानी अगदी त्यांच्यापासून पाच सहा फूट मागे पाण्यातून बाहेर येणारा वाघ काय सीन आहे तो. काठावरचे पत्रकर जे धूम ठोकतात ते थेट लोकबिरादरीत. हा सीन थिएटरातच पहावा.

पहिला पेशंट बरा होतो व कॉट खांद्यावर घेऊन पळून जातो तो सीन तर अफलातून.

या पोराची तुम्ही जरावेळ काळजी घ्या, मेलेल्या पोराला झाडाखाली टाकून आले आहे, जरा त्याला जमिनीत पुरुन येते म्हणनारी आई मात्र हादरवून सोडणारी घटना आहे.

अमेरीकेत भेटणारा पुंगाटी तर सर्व थिएटरला रडवून जातो.

आरतीला न्यायला तीचे खरे बाबा येतात तो सीन, सोनाली रॉक्स.

परत एकदा पाहणार आहे!

हतोडावाला ...तुम्ही नमूद केलेले सगळे प्रसंग + शेवटचा सोनालीचा अभिनय ...प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी आले.

मी ही पहिला ...........

हातोडावाला...तुम्ही नमूद केलेले सगळे प्रसंग + शेवटचा सोनालीचा अभिनय ...प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी आले.+ १००००

मी ही काल पाहिला. स्पीचलेस Sad (एक भीषण वास्तव आपल्यासमोर येतं)

हतोडावालांनी सांगितलेले सगळेच प्रसंग +१

या पोराची तुम्ही जरावेळ काळजी घ्या, मेलेल्या पोराला झाडाखाली टाकून आले आहे, जरा त्याला जमिनीत पुरुन येते म्हणनारी आई मात्र हादरवून सोडणारी घटना आहे.>>> कालवाकालव होते अगदी Sad

आरतीला न्यायला तीचे खरे बाबा येतात तो सीन, सोनाली रॉक्स. >>> अप्रतिम केलाय हा सीन सोनालीने Happy

तसेच प्रकाश आमटे जेवणाच्या टेबलवर बोलायला सुरवात करतात आणि बाबा आमटे कुष्ठरोग्यांशी कसे आणि काय विचाराने जोडले जातात तो ही प्रसंग अंगावर सर्रकन काटा आणतो.

आणि त्या बाळाला वाचवु न शकलेले येवढे खंबीर, ध्यासवेडे डॉ. प्रकाश किती अगतिक होतात त्या प्रसंगात नानाला १००० मोदक Happy

एकुणच भारी सिनेमा Happy

आणि त्या बाळाला वाचवु न शकलेले येवढे खंबीर, ध्यासवेडे डॉ. प्रकाश किती अगतिक होतात त्या प्रसंगात नानाला १००० मोदक >>> प्रोमोजमध्ये पाहीला आहे हा शॉट... गदगदुन आल होत अगदी

+ शेवटचा सोनालीचा अभिनय ..>> कोणता?

भर सभेत प्रकाश आमटे विचारतात "काय पाहिलसं तू या फाटक्या माणसात सांग ना?" अन सोनाली उठून जवळ जाते तो का? अरे तो सीन मला फार अपील नाही झाला. का नाही झाला पण? परत एकदा पहावा लागेल. तसही पाहणार आहेच!

मी पाहिला ,खुप आवडला महत्वाचं म्हणजे थेटर एकदम फुल्ल होते.काही प्रसंग डोळयात पाणी आणतात. सर्वांचा अभिनय छान आहे आणि हो शेवट खासकरुन नावे आल्यावरही लगेच ऊठु नका.सगळ्यांनी जरुर बघा. Happy

मुळातच, प्रकाश आमटे, विकास आमटे आणि बाबा आमटे ही वेगवेगळी व्य्क्तीमत्व आहेत आणि प्रत्येकाचे काम वेगळे आहे. त्यामुळे प्रकाश आमटेंनी केलेल्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अर्थातच त्यामुळे बाकी दोघांचे काम छोटे होत नाही. हे म्ह्णण्याचे अश्या साठी कारण प्रेक्षकात बरेच जण असे होते की जे आमटे कुटुंब म्हणजे --- कुष्ठ रोग्यांसाठी काम केले आहेत ते न --- असे म्हणत होते Sad
थोड्क्यात हे लक्षात घेऊन चित्रपट बघा आणि अर्थातच वर वर्णन केलेले सीन --- निव्वळ शब्दातीत Happy

या पोराची तुम्ही जरावेळ काळजी घ्या, मेलेल्या पोराला झाडाखाली टाकून आले आहे, जरा त्याला जमिनीत पुरुन येते म्हणनारी आई मात्र हादरवून सोडणारी घटना आहे.>>> कालवाकालव होते अगदी

आरतीला न्यायला तीचे खरे बाबा येतात तो सीन, सोनाली रॉक्स. >>> अप्रतिम केलाय हा सीन सोनालीने

तसेच प्रकाश आमटे जेवणाच्या टेबलवर बोलायला सुरवात करतात आणि बाबा आमटे कुष्ठरोग्यांशी कसे आणि काय विचाराने जोडले जातात तो ही प्रसंग अंगावर सर्रकन काटा आणतो.

आणि त्या बाळाला वाचवु न शकलेले येवढे खंबीर, ध्यासवेडे डॉ. प्रकाश किती अगतिक होतात >>> त्या प्रसंगात नानाला १००० मोदक

तसाच प्रसंग मांत्रिकापासून बाळाला वाचवण्याचा >>> केवढे धाडस

मोतीबिंदुची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली तो प्रसंग >>> आपण ही नकळत प्रार्थना करतो, सर्व माहित असुनही

सकुसप बघा

कालच घरचे सगळे बघून आले. सगळ्यांच्या याच प्रतिक्रिया आहेत. मला कधी बघायला मिळतो ते बघू.

सगळ्यांचा खुप खुप आभारी आहे. आपली मते इथे मांडल्या बद्दलं...
आणि खरच खुप काळजाला भीडतो हा चित्रपट.. आणि सगळ्यांना एकच विनंती कृपया टॉकीज मधेच जाऊन बघा कारण तेवढाच आपला हातभार लागतो चित्रपट निर्मात्यांना.... Happy

नमस्कार लोक्स ,
आत्ताच सकु सप बघितला...
प्रकाश बा आमटे , प्रत्यक्ष पाहिल्याचे समाधान आज मिळाले.
विकासाच्या गप्पा मारणार्यांना आणि सोसेल तेवढेच सोशल वर्क करणार्याना हे सही सही चपराक आहे..
संपुर्ण टीम चे खरच अभिनंदन आणि पुढच्या पिढीसाठी अमुल्य असा ठेवा दिल्याबद्दल आभार

खुप काळजाला भीडतो हा चित्रपट> अगदी आताच प्रोमो पाहीला
खरचं
प्रत्येकाने जगण्यातले समाधान शोधायला पहिजे

सोसेल तेवढेच सोशल वर्क करणार्याना हे सही सही चपराक आहे..>>>>>>>

@घारु अण्णा - हे लिहायची काय गरज?

१. सर्वांनी सोशल वर्क करायलाच हवे का? सगळेच लोक सोशल वर्क करत बसली तर उत्पादक काम कोण करणार?
सोशल वर्क करणे म्हणजे ग्रेट आहे असे तुम्हाला का वाटते. प्रत्येक जण स्वताला आवडेल आणि जमेल आणि समाधान मिळेल असे काम करत असतो.
२. प्रत्येकाने आपापले काम नीट केले आणि दुसर्‍यांना त्रास दिला नाही - हे पुरेसे नाही का?
३. साधेसुधे आयुष्य जगणे ( त्यातल्या प्रॉब्लेम सह ) हे सोशल वर्क करणाच्या खालच्या लेव्हलचे आहे असे म्हणणे आहे का?
४. ४०-४० वर्ष एकाच एरिआ ( भुक्षेत्रात ) तेच तेच काम करायला लागणे म्हणजे समाज, देश, सरकार ह्यांची नामुष्की नाही का? ह्या पेक्षा व्यवस्था सुधारावी म्हणुन प्रयत्न करणे जास्त महत्वाचे नाही का?

असे अनेक प्रश्न तुमच्या कॉमेंट मुळे निर्माण झाले.

सोसेल तेवढेच सोशल वर्क करणार्याना हे सही सही चपराक आहे.. >> if we say this, are we saying, ppl who are doing whatever they can, shall stop doing that? I feel, every one should do whatever he or she can.
Don't forget Ram and squirrel story!

टोच्या, समाजकार्य करायलाच लागू नये असा समाज निर्माण व्हायला हवा... मुद्दा पटला. >>>>

धन्यवाद दिनेश.

मला घारु अण्णांची "सोसेल तेव्हडे" ची कॉमेंट पटली नाही. आमटे परीवार महान काम करतोच आहे पण म्हणुन ते काम करत आहेत म्हणजे बाकीच्यांना ( अगदी जे अजिबात सोशल वर्क करत नाहीत ) चपराक वगैरे नाही. इतकेच सांगायचे होते. ज्याला जे आवडते ते तो करतो. दुसर्‍याला/समाजाला त्रास होउ दिला नाही तरी खूप आहे.

चित्रपट अजून पाहिला नाही पण अरण्यातील प्रकाशवाटा म्हणून त्यांच्यावर एक डॉक्युमेंट्री आहे....ती देखील अप्रतिम आहे.
प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन प्रकाशभाऊ आणि मंदाताईंचे कार्य चित्रीत केले आहे. ती बघतानाही अंगावर काटा येतो.
एका अदिवासी महिलेच्या पायावरची कॅन्सरची गाठ काढतानाचेही चित्रीकरण आहे. आणि ही शस्त्रक्रिया चक्क एक झाडाखाली उघड्यावर केलीये.
चित्रपट पाहिलेल्यांनी हा माहीतीपट जरूर पहावा...

Pages