आत्ताच मी डॉ. प्रकाश बाबा आमटे हा चित्रपट पाहुन आलो. मी काही फार मोठा परीक्षक नाही पण जे वाटलं ज्या भावना चित्रपट पाहताना जाणवल्या त्या फक्त लिहतो आहे.
खरं तर आपल्याला सगळ्यांनाच बाबा आमटें बद्दल माहीती आहे पण वैयक्तीक मला डॉ. प्रकाश यांच्या बद्दल काहीच माहीती नव्हतं, ह्या चित्रपटामुळे खरच त्यांचा जिवनाचा पट उलगडुन दाखवला. काही बाबी सोडल्या तर चित्रपट खरचं खुप खुप सुंदर आहे. चित्रपटाची मांडणी सुंदर आहे. त्यांच्या जिवानाची एक एक कळी खुप अलगद उलगडुन दाखवली आहे.
चित्रपट पाहताना कधी तरी मनामधे विचार येऊन जातो कि, खरच त्यांनी किती कष्ट, किती व्यातना झाल्या असतील त्यांना आदिवासी लोकांनसाठी काम करताना. आपल्याला ते कष्ट आणि त्या यातना टॉकीज मधे बसुन जाणवनार नाहीच. नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी खरचं खुप छान अभिनय केला आहे.
चित्रपट चालु झाल्यापासुन तो खिळवुन ठेवायला यशस्वी होतो. चित्रपट कधीच कधीच बोर होत नाही.
सगळ्यांनी अवश्य बघावा आणि तो ही टॉकीज मधे जाऊनच बघा.
कोणी जर बघुन आला असेल तर त्याची मत मला जाणुन घ्यायला आवडेल.
धन्यवाद आशु आज रात्री मी
धन्यवाद आशु आज रात्री मी पहातो
तुनळी वर सापडेल बहुधा
मलाही तुनळीवरच पाहून समाधान
मलाही तुनळीवरच पाहून समाधान मनावे लागेल बहुधा
नाहीच मिळाली तर सांग
नाहीच मिळाली तर सांग मला...माझ्याकडे आहे...
टोच्या, समाजकार्य करायलाच
टोच्या, समाजकार्य करायलाच लागू नये असा समाज निर्माण व्हायला हवा... मुद्दा पटला.>>
दिनेश, मी येथे कुठलाच मुद्दा मांडलेला नाहीये. तो ‘टोचा’ यांनी मांडलाय. नामसाधर्म्य असले तरी विचार, मुद्दे जुळतीलच असे नाही.
'नाहीतर त्या कुलकर्णी बाईने
'नाहीतर त्या कुलकर्णी बाईने केलेला रस्सा.. कांद्याबटाट्याचा लगदा नुसता'...... असं म्हटल्याशिवाय कच्च्या पावतीची रिसीट होत नाही....
कोण जाणे कधी आणि कसा बघायला
कोण जाणे कधी आणि कसा बघायला मिळणार चित्रपट...
इथे स्क्रिनींग होइल की नाही कोण जाणे. बहूतेक सीडी येईपर्यंत वाट बघावी लागणार.
संपुर्ण चिञपटात फक्त तो
संपुर्ण चिञपटात फक्त तो डोळ्याच्या ऑपरेशन चा प्रसंग थोडा वेगळा वाटतो अन् तो नेगल गेल्यावरचा प्रसंग तर डोळ्यात पाणी आणतो And नानाची अँक्टींग Rocks तिरंगा चिञपटातील नाना अन् हे नाना यांच्यातील फरक जाणवेल
@टोच्या @ किश्या... सोसेल
@टोच्या @ किश्या...
सोसेल तेव्हढेच सोशल वर्क>>>> हे सांगण खरच आवश्यकच आहे
१. सर्वांनी सोशल वर्क करायलाच हवे का? सगळेच लोक सोशल वर्क करत बसली तर उत्पादक काम कोण करणार?
सोशल वर्क करणेच म्हणजे ग्रेट आहे असे तुम्हाला का वाटते. प्रत्येक जण स्वताला आवडेल आणि जमेल आणि समाधान मिळेल असे काम करत असतो.
>>> आपण ज्या क्षेत्रात आहात तिथेच प्रामाणिक पणे आवडीने आणि त्या त्या ठिकाणच्या सिस्टीमला योग्य प्रकारे चालवत राहाणे .... हा हि सोशल वर्कचाच भाग आहे...आणि यातल्या प्रामाणिक पणावर च उत्पादकताही अवलंबुन असते ना... जितकी आपलं काम प्रामाणिक तितकाच परफोर्मन्स चागला होइलच ना
चित्रपटातला संदर्भ : वनवासीनां होणारी अटक दाखल होणारे गुन्हे... त्याची न मिळणारी दाद- फिर्याद.. आणि वनखात्याच्याच जमीनीवर्ची वृक्षतोड या कडे होणारे दुर्लक्ष....
२. प्रत्येकाने आपापले काम नीट केले आणि दुसर्यांना त्रास दिला नाही - हे पुरेसे नाही का?
हेच मी ही अपेक्षीत धरतो..बरेदा हा अनुभव कुत्ता जाने चमडा जाने हा विचार करत पुढे सरकणे असा असतो
३. साधेसुधे आयुष्य जगणे ( त्यातल्या प्रॉब्लेम सह ) हे सोशल वर्क करणाच्या खालच्या लेव्हलचे आहे असे म्हणणे आहे का?
साधेसुधे आयुष्य हे ही सोशल वर्कच पण आपणही सहज पणे ते शो-शायनीग करत जगतो...
लग्नातले खर्च असोत .... की इतर...
माझं आजिबात म्हणणे नाही की आपणही साध्या पधतीने लग्न करावीत ... आपली हौस ही असतेच आणि काही स्व्प्नही असतात , थोडी तोशीष आपणही घ्यायला हरकत नसावी.... मार्ग अनेक असतात ..
४. ४०-४० वर्ष एकाच एरिआ ( भुक्षेत्रात ) तेच तेच काम करायला लागणे म्हणजे समाज, देश, सरकार ह्यांची नामुष्की नाही का? ह्या पेक्षा व्यवस्था सुधारावी म्हणुन प्रयत्न करणे जास्त महत्वाचे नाही का?
केवळ देश आणि सरकारचेच का आपण ज्या समाजात राह्तो , आपलीही तीच जबाबदारी नाही का...आणि व्यवस्था सुधारावी म्हणुन आपण केवळ व्यक्त करतो पण प्रत्यक्षात कृती त्या मानाने फारच कमी असते ....
मोठा खर्च करुन होणारे डोक्टर ही ग्रामिण भागात सेवा देण्यासाठी काही वर्ष/ महीने देउ शकत नाही.. पण हेच शहरी भागात होणार्या मंडळाच्या /राजकिय मोफत शिबीरांना आवर्जुन हजेरी लावतात ....सोसेल तेव्हडे सोशल म्हणतो ते हे...
असे अनेक प्रश्न तुमच्या कॉमेंट मुळे निर्माण झाले.
गेले कित्यक वर्ष मी ही सोशल वर्क न करता सोसेल तेव्हडा वेळ, पैसा( एकुण उत्पनाच्या ५%केवळ) , मेहेनत सामाजासाठी द्याय्चा प्रयत्न करतोय ... पण आजही आपण सोसेल तेव्हडेच करतो हि खंत आहे म्हणुनच हे चपराक मलाही लागु आहे .. फक्त प्रामाणिक पणे मान्य करायचा हा प्रयत्न
बघितला. पुंगाटी आणि सगळेच
बघितला. पुंगाटी आणि सगळेच प्रसंग अप्रतीम. जरूर बघा.>> पुंगाटी प्रकरण फिक्शन आहे बहुदा. कारण प्रकाशवाटात तसा संदर्भ आलेला नाही. आणि नेटवर पण उसगावातले पुंगाटी शोधून पाहिलेत. पोरे मॅड्मनी डॉ. पुंगाटी हे प्रकरण मनाचेच घुसडविले दिसते.
जर पुंगाटी प्रकरण फिक्शन असेल तर सुरुवातील तसे जाहीर करायला हवे होते की काही भाग फिक्शन आहे. अन्यथा ही तर प्रकाशा आमटेची खोटी जाहिरात ठरेल.
घारुआण्णा प्रतीसाद भावला,
घारुआण्णा प्रतीसाद भावला, तुम्ही उत्तरे नेमके पणाने दिले आहे..
मला वाटत आपन प्रत्येक़जन सोशल वर्क करतो असतो.. प्रामानिक पणे सांगायचे तर माझ्याकडुन सोशल वर्क होतच नाही तरी पण मी काही गोष्टी पाळतो उदा.
१) वस्तुंसोबत कॅरीबॅग घेण्याचे टाळतो.
२) घरासोबत शक्यतो मी परीसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो.
३) अनावश्यक विज वाया घालवने टाळातो.
४) कधी कोणि भीकारी दिसलाच तर मी त्याला कमीत कमी वडापाव खाऊ घालतो..
बहुदा हे सोशल वर्क नसेल पण तेवढच माझ्या मनाच मी समाधान करतो...
मतदानाची सुट्टी साधुन मी पण
मतदानाची सुट्टी साधुन मी पण काल बघितला आणी आवडला महत्वाचे म्हणजे थेटर एकदम फुल्ल होत.. माझ्या लेकीला घेऊन गेले होते तिच्या प्रश्नाची उत्तर देताना अगदी नको झाले..
उत्तम असणारच आहे! खुप
उत्तम असणारच आहे! खुप उत्सुकता आहे बघण्याची! मायबोलीने माध्यम प्रायोजकत्व केल नाहिये का?
ह्या चित्रपटाबद्दल इतके ऐकत
ह्या चित्रपटाबद्दल इतके ऐकत आहे की पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. काहीतरी बघायला मिळेल म्हणून आशुचँप यांनी सांगितलेली डॉक्युमेंट्री युट्युबवर शोधली तर ही डॉक्युमेंट्री मिळाली. ही english मध्ये आहे पण मूळ भाषा मराठीच आहे बहुधा ही तीच असावी. पाहताना अंगावर काटा येतो. लहान मुलांना वै. दाखवू नका असं मी सुचवीन पण परदेशात राहणाऱ्या लोकांना जर रियल हिरो रियालिटी मध्ये पहायचा असेल तर जरूर पहा! ह्यात सगळ्यांची मनोगतं आहेत विशेषतः बाबा आमटे आणि साधना ताई यांची.
https://www.youtube.com/watch?v=_Myv8S4d1rc
शस्त्रक्रियेचा प्रसंग सोडला
शस्त्रक्रियेचा प्रसंग सोडला तर बाकी त्यात असे अंगावर येणारे काही नाहीये. माझ्या सहा वर्षाच्या मुलाला मी घेऊन पाहीली. त्याने शस्त्रक्रियेच्यावेळी डोळे बंद करून घेतले पण बाकीची डॉक्युमेंट्री आवडीने पाहीली. अर्थात त्यातले त्याला किती कळले ते माहीती नाही पण प्राण्यांबरोबरची दृष्ये त्याला जाम आवडली.
जिज्ञासा धन्यवात लिंक शेयर
जिज्ञासा
धन्यवात लिंक शेयर केल्याबद्दल खुप सुंदर आहे
खरंय आशुचँप, मी पोस्ट लिहिली
खरंय आशुचँप, मी पोस्ट लिहिली तेव्हा पूर्ण डॉक्यूमेंट्री पाहीली नव्हती.
कालच पाहिला.. सुंदर
कालच पाहिला..
सुंदर चित्रपट..
डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि त्यांची टिम यांच्या कार्याला सलाम..
आणि ही आयबीएन ची डॉ. प्रकाश
आणि ही आयबीएन ची डॉ. प्रकाश बाबा आमटे मुलाखत तीन भाग आहेत जे या लिंकवर मिळतील. https://www.youtube.com/watch?v=JKqwR374AXw .
https://www.youtube.com/watch?v=6TcZoN_m_bA .
https://www.youtube.com/watch?v=HdThaTaKeOw .
हो शेवट खासकरुन नावे
हो शेवट खासकरुन नावे आल्यावरही लगेच ऊठु नका.सगळ्यांनी जरुर बघा........ खरंय.
नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांचा सशक्त अभिनय लाजवाब..
लहान मुलांना वै. दाखवू नका असं मी सुचवीन>>>>>>> मला उलट वाटतेय. जरूर दाखवा,आपल्या सुरक्षित जगापलिकडे दुसरं जग असते याची आपल्याबरोबर लहानांनाही जाणीव असू द्या.आजच तो मूव्ही पहाताना
पाठची एक मुलगी आपल्याआईवडलांबरोबर पूर्ण मूव्ही एन्जॉय करत होती.एक्दोनदा श्शूत करावं लागलच. शेवटी तिने एक प्रश्न विचारला : was he god?.
देवकी, लहान मुलांना सिनेमा
देवकी, लहान मुलांना सिनेमा जरूर दाखवा. ते मत मी युट्युब वरची documentry पाहताना मांडलं होतं आणि ती पूर्ण पाहिल्यावर मला वाटलं की हरकत नाही ही देखिल मुलांनी पाहायला पण त्यातली काही दृश्ये अंगावर येतात (मी स्वतः फार रक्त, ऑपरेशन वै. पाहू शकत नाही) हेही तितकंच खरं आहे.
आणि हो त्या मुलीला कोणी सांगितलं का की He was नाही he very much is a देवमाणूस!
He was नाही he very much is a
He was नाही he very much is a देवमाणूस!>>>>> मूव्ही संपल्यानंतर,ती मुलगी एकदम म्हणाल्यावर ,तिचे आईवडिलही काही बोलू शकले नाही.मी न राहवून म्हणाले, हो ,ही इज गॉड .तिच्या पर्यंत ,डो. प्रकाश बाबा आमटे यांचे मोठेपण पोहोचले याचे मला कौतुक वाटले.
ते मत मी युट्युब वरची documentry पाहताना मांडलं होतं >>>>>> ओह ! मग मी घाई केली कॉमेंट टाकायची.कारण मी त्या प्रभावाखाली होते.क्षमस्व.
मुलं गावाकडं पाठविल्यानंतर
मुलं गावाकडं पाठविल्यानंतर पाडव्याच्या सुट्टीच्या दिवशी सिनेमा पहावा असं मी आणि माझ्या बायकोनं ठरवलं. शाहरूखचा हॅन्यूइ आणि स्वप्नीलचा प्यारवाली लवस्टोरी असे ऑप्शन होते, पण आम्ही एकमतानं तिसरा ऑप्शन डॉ. प्रकाश बाबा आमटे निवडला. आश्चर्य म्हणजे एवढे मोठे-मोठे (बजेट आणि नावांनी) सिनेमे रिलीज झाले असतानाही डॉ. प्रकाश आमटे सिनेमा हाऊसफुल्ल होता. आम्हाला कसे तरी तिकिट मिळाले. दिवाळीच्या सुट्टीत एक अप्रतिम अनुभूती मिळाली. लोक उगाचच म्हणतात, सिनेमाने पिढी बिघडतेय. हा सिनेमा बघा, पिढी नक्कीच घडेल.
नाना जसा आहे, तसा या सिनेमात दिसला,व्यक्त झाला. सोनालीही अप्रतिम. भारत गणेशपुरेने साकारलेला लंपट पोलिस लक्षात राहतो. प्रत्येकाने एकदा तरी पहावाच असा हा सिनेमा. फक्त मुलांना दाखवावा की दाखवू नये याबाबत मीही साशंक आहे. पंधरा वर्षांच्या वरील मुलांनी पाहिल्यास हरकत नसावी. कारण काही दृश्ये खरोखरच मेंदूला झिणझिण्या आणतात.
मी बघितला. मला आवड्ला. नाना
मी बघितला. मला आवड्ला. नाना पाटेकर ने अतिशय स्नूदर काम केले आहे.
मी पाहिला आणि मला आवडला. एक
मी पाहिला आणि मला आवडला. एक सुखद चित्र म्हणजे शेजारच्याच स्क्रीनवरचे हॅन्युई आणि बँगबँग अगदीच कमी लोकसंख्येत पाहणारे लोक होते तर या सिनेमाला रांगेत उभी राहुन तिकीट मिळवुन पाहायचीही तयारी असलेले बरेच होते.
मी माझ्या दोन्ही लेकींसह (वय १३ आणि ८) पाहिला. दोघींनाही तो पुन्हा पहायचा आहे कारणं वेगळी आहेत किंबहुना हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प खराखुरा पहायला आवडेल अस मोठी म्हणाली तर छोटीला अस घरात नेगल आणि इतर प्राणी पाळणे हा कंन्सेप्टच खूप आवडला.
हा सिनेमा पहाण्याअगोदर मी झी वरचा त्यांचा प्रमोशनल भाग बघितला होता स्वतः डॉ. प्रकाश आमटे आणि नाना अगदी भरभरुन बोलत होते या प्रकल्पाबद्दल.
बाकी वरिल नाना आणि सोनाली यांच्या अभिनयाबद्दलच्या सगळ्याच पोस्टींना मम.
सिनेमा या माध्यमाला पण मर्यादा आहेत आणि एखाद्याचा जीवनपट तीन तासात उत्तम रित्या साकारताना काही गोष्टी अनवधाने किंवा काही कारणाने राहुन जातात. तिकडे थोडस दुर्लक्ष करुन हा सिनेमा प्रत्येकाने अगदी आवर्जुन पहावा.
समृद्धी पोरेंनी उत्तम प्रयत्न केलाय आणि त्याला नानाने आणि इतरांनी तितकीच समर्थपणे साथ दिलीय हे महत्वाचे.
काल बघितला . प्रकाश आमटे याच
काल बघितला . प्रकाश आमटे याच कार्य माहित होत. पण त्याची जाणीव बघताना झाली. खरच दंडवत
माझ्या १५ वर्षाच्या मुलाला त्यांची काहीच माहिती नव्हती. चित्रपट संपला तेंव्हा तो भारावून गेला होता.
माझ्या मते मुलांना नक्की दाखवा. आपल्या आयुष्याच्या परीघा बाहेरचे काय असू शकते आणि ते किती दाहक असू शकते त्याची जाणीव होते. विशेषता डॉ आमटे हे आजही हे कार्य करत आहेत हे कळल्यावर तर जास्तच.
अप्रतिम . निव्वळ अप्रतिम
अप्रतिम . निव्वळ अप्रतिम
सगळ्यांचे खुप खुप धन्यवाद
सगळ्यांचे खुप खुप धन्यवाद तुमच्या प्रतिसाद शेअर केल्याबद्दल...
खुप सुंदर चित्रपट
खुप सुंदर चित्रपट आहे...................
बरेच दिवसांनी काहीतरी छान बघितल्याचे समाधान मिळाले....
हेमलकसा रंजले गांजले
हेमलकसा
रंजले गांजले आदिवासी
जमात त्यांची माडीया
लुटुनी त्यांचे अनुदान
अधिकाऱ्यांनी बांधल्या माड्या
नक्षलवादाचा घेऊन संशय
मांडला त्यांचा छळ
जन्मताच ज्यांची
ठेचली गेली नाळ
जगण्यासाठी करती
कसबसे मेळ
वर्दीतील जनावरे
करिती शरीराशी खेळ
निबिड अरण्यात शिरला
प्रकाशाचा एक कवडसा
घेऊन मानवतेचा वसा
गाव वसवले हेमलकसा
अनाथ प्राण्यांसाठी
काढले त्यांनी निवास
बनले प्राणिमित्र
गौरविले त्यांस भारतरत्न
सहकारी भेटले सारे
होते ध्येयाने भारलेली
सहचरी पण अद्वितीय
भुवरी देवमाणसे पेरलेली
राजेंद्र देवी
आज पाहिला. एकदम जबरदस्त आहे.
आज पाहिला. एकदम जबरदस्त आहे. एक चित्रपट/कलाकृती म्हणून तो किती चांगला आहे हे स्वतंत्रपणे ठरवताच येणार नाही इतकी मूळ कथा (म्हणजे त्यांच्या जीवनातील घटना) जबरदस्त आहे. ती आपल्यापर्यंत पोहोचवण्यात चित्रपट प्रचंड यशस्वी झालेला आहे (त्या दृष्टीने तो चांगला आहेच). नानाचा अभिनय, त्याची संवादफेक हे एक महत्त्वाचे कारण आहे, तसेच सहकलाकारांचा अभिनयही.
आवर्जून पाहा आणि थिएटर मधे पाहा.
Pages