Submitted by दुसरबीडकर on 6 October, 2014 - 11:52
बाप नावाचे उडाले मोसमी वार्यात छप्पर...
माय नावाचा किती मग सांडला पाऊस घरभर..!!
केवढा जीवात तेव्हा जीव येतो काय सांगू..
तो कपाशीचा दिसावा वाढतांना कोंब झरझर..!!
पावसा छळवाद का हा मांडतो तू माणसांचा..?
यायचे तर येत नाही,जात नाही जायचे तर..!!
रात्रभर बाहेर मी आलोच नाही हाय! दैवा..
अन सकाळी चांदणे संपून गेले यार तोवर..!!
संपुदे 'वनवास' देवा एकदा हा प्राक्तनाचा..
मग हवे तर 'राज्य'ही नाकारतो बघ मीच सत्वर..!!
झोप डोळ्यातील आता जाणवू दे ना जराशी..
जायचे आहे सकाळी 'नीज रात्री' तूच लवकर..!!
फार झाल्या आजवर चोर्या उगाचच
ह्या कफल्लक...
भरजरी चोरी करू बघ काळजाची एक स्थावर..!!
-गणेश शिंदे...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाप नावाचे उडाले मोसमी
बाप नावाचे उडाले मोसमी वार्यात छप्पर...
माय नावाचा किती मग सांडला पाऊस घरभर..!!
केवढा जीवात तेव्हा जीव येतो काय सांगू..
तो कपाशीचा दिसावा वाढतांना कोंब झरझर..!!
पावसा छळवाद का हा मांडतो तू माणसांचा..?
यायचे तर येत नाही,जात नाही जायचे तर..!! <<<
सुंदर
>>>भरजरी चोरी करू बघ काळजाची एक स्थावर..!! <<< सुंदर ओळ!
वार्यात = वार्यात
वार्यात = वार्यात
सुंदर अभिप्रायासाठी आभार
सुंदर अभिप्रायासाठी आभार बेफिकीरजी..
तो मोबाईलमधला किपॅड प्राॅब्लेम आहे...तार्यात,वार्यात.. सुरा-सुर्याने..
पहिले तीन नि:संशय
पहिले तीन नि:संशय आवडले
चंदण्याच्या शेर आवडलाच पण मला दुसरी ओळ बदलून वाचावी वाटली मी तशी वाचली मग मला शेर जास्त आवडला ( दुसर्यांच्या शेरात असे बदल मला अनेकदा सुचत असतात कारण नसताना )
पुढच्या शेरांमध्येही सुंदर खयाल आहेत पण शब्दयोजना मांडणी मला कमी आवडली (माझ्या आवडीनिवडीचा भाग !)
शुभेच्छा
खूप सुंदर
खूप सुंदर
पहिले दोन-तीन शेर उत्तम.
पहिले दोन-तीन शेर उत्तम. मत्ला फारच आवडला.