सिंगापूर - माहिती हवी आहे

Submitted by साक्षी on 4 October, 2014 - 07:08

डिसेंबरच्या सुट्टीत सिंगापूरला जाण्याचा बेत ठरतोय. पुण्यातून कुठल्या ट्रॅव्हल कंपनीने जावे. कुणाचे काही अनुभव असल्यास कळवा. वीणा वल्ड किंवा केसरीचा विचार चालू आहे.

आगावू धन्यवाद.

~साक्षी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साक्षी,

तुम्ही फक्त सिंगापुर करु नका. ईंडोनेशिया आणि कम्बोडिया हे दोन्ही देश अत्यंत सुरेख आहे. जर तुम्हाला असे तीन वा दोन देशाचे एकत्रित पॅकेज मिळत असेल तर पहा. मलेशिया आणि सिंगापुर दोन्ही सारखेच देश आहे. त्यामुळे कुणी म्हणेल आम्ही मलेशिया दाखवतो तर त्याला बळी पडू नका. हाँगकॉग सुद्धा सिंगापुरच सारखेच आहे थोडा फरक नक्कीच असेल. पण कम्बो आणि ईन्डो दोन्ही फार वेगळे देश आहेत. बाली आणि सियाम रिप हिन्दू माणसाने एकदा तरी बघावेच.

मी इथे नोकरी करतो अनेक वर्षांपोसून. इथे फिरायला सोपे आहे. तसे पाहता पॅकेजची गरज पडू नये जर आपले आपण फिरायला स्वस्त पडत असेल तर.

येत्या एप्रिल मद्धे सिंगापुर ला जाण्याचा बेत ठरतोय.
ट्रॅवल कंपनी ने न जाता स्वत: सर्व बुकिंग करुन जाणार आहोत.
८ मोठे आनि ४ लहान मुले (५-१३ वयोगट) असा ग्रुप आहे.
स्वतः प्लॅन करुन सिंगापुर ट्रीप केलेले कोणी आहे का ? कसा होता अनुभव.
सिंगापुर मद्धे पब्लीक ट्रान्सपोर्ट ची सोय कशी आहे ?
लिटील ईंडीया या भागात राहाण्यासाठी एखादे चांगले बजेट हॉटेल सुचवु शकाल का ?
बुकिंग.कॉम वर अनेक हॉटेल्स बघितली पण सगळे मिक्स रीव्यु आहेत. त्यामुळे काही कळत नाहिये.
कृपया मदत करा.

सिंगापुर मद्धे पब्लीक ट्रान्सपोर्ट ची सोय कशी आहे ?
मस्त..... बस साठी exact change लागते. ४ जण असतिल तर टॅक्सी, उबेर किंवा ग्रॅब ( जसे भारतात ओला आहे तसे सिंगापुर मध्ये ग्रॅब ) तेवढ्याच पैश्यात लवकर घेउन जाते.
$१५ चे फोन कार्ड (तीन कंप्नया आहेत सगळे जवळपास सारखाच डेटा देतात) घेतल्यास १ जिबीचा डेटा मिळेल जो नॅव्हीगेशन साठी उपयोगाला येईल
स्वस्तात प्रवेश मिळवण्याकरता https://www.govoyagin.com/ सारख्या साईट वर स्वस्तात तिकिटे मिळु शकतात.
वेबवर फोटो , प्रवेश शुल्क , प्रवासाचे अंतर , लोक तिथे किती वेळ घालवतात ते बघुन काय बघयाचे ते आधीच ठरवणे.

हॉटेल बद्दल मला काही कल्पना नाही.

धन्यवाद साहिल. अजुन काही शंका.
८+४ अशा १२ लोकांना प्रवास करायचा आहे तर त्यासाठी बस/मेट्रो पेक्षा मला टॅक्सी चा पर्याय जास्त सोपा वाटतोय.
टॅक्सी कुठीही सहज मिळतात का ? १२ लोकांसाठी प्रत्येक वेळी ३ टॅक्सी बुक करण्यापेक्षा पूर्ण दिवसा साठी भाड्याने वाहन कितपत स्वस्त पडेल ?
एखादी मिनी बस (१२-१३ सीटर )पूर्ण दिवस बुक करायची असेल तर महाग पडेल का ?
आणि तशी सोय सहज होउ शकेल का ?

टॅक्सी ऑफ टाईम ला, पाउस नसेल तर लगेच मिळतात. पिक टाईंम, पाउस असेल तर वेळ लागतो. त्यावेळी ग्रॅब -उबेर मध्ये पण रेट वाढलेले असतात.
ग्रॅबवर मिनी बसचा पर्याय आहे पण तो मी कधी वापरला नाही. ग्रॅब (Grab) चे अ‍ॅप डाउनलोड करुन चेक करा त्यात दरपत्रक आहे. This rate card applicable at normal demand (like uber) they reserve rights to increase fare depending on demand.